(प्रणयासक्ती)

मूकवाचक's picture
मूकवाचक in काथ्याकूट
28 Dec 2013 - 1:04 am
गाभा: 

प्रणयासक्तांच्या प्रेमभावना आणि निसर्गदत्त वासनांप्रती पूर्ण आदर आहे.कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा).

पुनरूत्पादनाच्या सहजप्रेरणेतून प्रणयासक्तीचा उगम झाला आणि पुढे काम हा पुरूषार्थ गणला जाण्यापर्यंत या भावनेचा प्रवास झाला. भोळ्याभाळ्या लोकांनी मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाखाली घडणार्‍या या गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद वर्तनाला मर्दानगी, स्त्रीत्व समजायला सुरूवात केली. काहींनी मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करायला सुरूवात केली. मात्र पुढे या प्रकाराला विकृत वळण लागले.

सॅडिझम, मेसोचिझम, कुंटणखाने, मनुष्य देह व्यापार, पेडोफिलिया असल्या सगळ्या विकृती आणि गरमी, परमा ते एच आय व्ही पर्यंतचे घातक आजार ते लोकसंख्येचा विस्फोट हे सगळे नेस्तनाबूत करायचे असेल, तर प्रणयाराधन मुळातून थांबले पाहिजे. मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाला बळी पडणारे भोळेभाळे रोमँटिक लोक शहाणे होतील तो सुदिन. किरकोळ केमिकल लोच्याच्या प्रभावाला मर्दानगी, पुरूषार्थ वगैरे समजणे किंवा मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करणे थांबले पाहिजे. साचेबद्ध प्रक्रिया न करता पुनरूत्पादन करता येण्याची सोय आधुनिक विज्ञानाने करून दिलेलीच आहे. ती प्रणयाराधनाला सशक्त पर्याय देणारी व्यवस्था ठरेल अशी सोय करता येईल का?

बरे प्रणयाराधनच नसेल तर माणूसपणाचे अन्य लक्षण कोणते?

खरोखर हे विषय जटिल आहेत. यावर चर्चा करताना हेतूंच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाणे अपरिहार्य आहे. आणि एकदा का तुमची इंटेग्रिटी क्वेश्चन होऊ लागली, तुमची कळकळ समोरच्याला समजेनाशी झाली की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून वातावरण तप्त होणार, रणकंदनही माजणार.

पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, पुनरूत्पादनाच्या साध्यासुध्या नैसर्गिक प्रेरणेच्या (मर्दानगी, मातृत्वाची आस वगैरे नव्हे) खर्‍या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. (सध्याचे प्रणयासक्त लोक मूर्ख आहेत आणि पुढे कधीतरी ते शहाणे होतील असे म्हणणे नाही, तसा अर्थ कृपया कोणी काढू नये.)

टीपः अखंड मानवतेचे ब्रह्मचारी, समलिंगी, विषमलिंगी, तृतीयपंथी वगैरे छोट्या छोट्या तुकड्यात विभाजन होणे, आणि त्यांनी एकमेकांकडे तिरस्काराने बघणे हे सगळे प्रकार थांबवणे आपल्याच हातात नाही का?

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

28 Dec 2013 - 1:13 am | प्यारे१

___/\___
केवळ उच्च!
टीपेबद्दल म्हणाल तिथं पार्टी. =))

प्रचेतस's picture

28 Dec 2013 - 10:53 am | प्रचेतस

अगदी अगदी.

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Dec 2013 - 11:41 am | लॉरी टांगटूंगकर

हेच म्हणतो,

बाकी वल्लीशेठ सहीचा अर्थ काय ओ?

बाकी वल्लीशेठ सहीचा अर्थ काय ओ?

उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला सातवाहन राजा यांनी पृथ्वीचा भार समानपणे तोलून धरलाय. :)

इरसाल's picture

28 Dec 2013 - 12:37 pm | इरसाल

मला वाटलं की सर्दीमुळे विद्या उदंड, मान चुकवत शिंकली तर मग अश्या विद्येला कोण पुसेल ?

अर्धवटराव's picture

28 Dec 2013 - 1:42 am | अर्धवटराव

पण नकोच.
प्रणयाने मानवतेचं विभाजन झालय हे तुम्ही स्विकारत नाहि तोवर चर्चा संभवत नाहि.

चिन्मय खंडागळे's picture

28 Dec 2013 - 2:26 am | चिन्मय खंडागळे

जमलं नाही.
कुंटणखाने, पेडोफिलिया, समलिंगीच्या समस्या वगैरे गोष्टी ट्रिविअलाइझ करून विनोद साधण्याइतक्या क्षुल्लक वाटत नाहीत.
असो.

स्पा's picture

28 Dec 2013 - 11:45 am | स्पा

दंडवत

लेखकाचे प्रणयाराधनाबद्दलचेच काय मत आहे हे कळले नाही.

अनिरुद्ध प's picture

28 Dec 2013 - 12:36 pm | अनिरुद्ध प

+१ सहमत

कवितानागेश's picture

28 Dec 2013 - 3:43 pm | कवितानागेश

प्रणयाराधनच नसेल तर माणूसपणाचे अन्य लक्षण कोणते?>
प्रणयाराधनापलिकडे तीनचार गोष्टी सहज सुचतात.
- पुनरुत्पादनावर विश्वास
- शरीराच्या आसक्तीवर विश्वास
- शेकडो वेगवेगळ्या पद्धती
- लग्नव्यवस्थेचं समर्थन.

लई
फ्येमस
धागे

राजेश घासकडवी's picture

28 Dec 2013 - 11:05 pm | राजेश घासकडवी

बरे प्रणयाराधनच नसेल तर माणूसपणाचे अन्य लक्षण कोणते?

- खाणे
- श्वास घेणे
- पिणे
- संस्थळांवर विडंबनं करणे वा लोकांवर टीका करणे (अर्थात संस्थळीय राज्यघटनांनी या वर्तनाचा सुंभ जाळलेला असला तरी पीळ टिकून आहे)

;)

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Dec 2013 - 11:24 pm | हतोळकरांचा प्रसाद

भोळ्याभाळ्या लोकांनी मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाखाली घडणार्‍या या गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद वर्तनाला मर्दानगी, स्त्रीत्व समजायला सुरूवात केली. काहींनी मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करायला सुरूवात केली. मात्र पुढे या प्रकाराला विकृत वळण लागले.

पटलेले नाही. संपूर्ण लेख हा सर्व मनुष्य जात हि भोळीभाळी आहे आणि डोक्यातील रासायनिक लोच्याच्या आहारी जाऊन प्रणय ह्या अपप्रवृत्तीकडे वळलेली आहे ह्या निष्कर्षावर आधारलेला आहे. आजिबात पटण्यासारखे नाही. एकूण काय तर माणसाने प्रणयामधली भावनिकता बाजूला सारून इतर सर्व प्राण्यांप्रमाणे विणीचा हंगाम आला कि पुनरुत्पादन करावे असे लेखकाला वाटते.

बॅटमॅन's picture

28 Dec 2013 - 11:39 pm | बॅटमॅन

एकूण काय तर माणसाने प्रणयामधली भावनिकता बाजूला सारून इतर सर्व प्राण्यांप्रमाणे विणीचा हंगाम आला कि पुनरुत्पादन करावे असे लेखकाला वाटते.

नै म्हणजे लोच्या एकच आहे की माणसाचा विणीचा हंगाम एकच एक असा नाही. त्यामुळे पुनरुत्पादन कधीही करू शकतो-करतो.

लग्न झालेल्यांना यातल्या भावनिकतेवर आपलाच अग्रहक्क आहे असे वाटत असेल तर वाटो बापडे. खाऊंदे गरीब!

विनोद१८'s picture

29 Dec 2013 - 1:29 am | विनोद१८

महाराज नमस्कार.

हा धागा एका नाजुक विषयावर आहे, त्यानिमीत्ताने आपण विचार करुया.

मला जरा जाणुन घ्यायचेय कि या धाग्याचे शीर्षक प्रणयासक्ती म्हणजे काय ? प्रणयासक्ती = .प्रणय + आसक्ती कि प्रणयासक्ती = .प्रणय + सक्ती ?? भोळेभाबड्या लोकानी कोणता अर्थ घ्यावा ?

आता तुम्ही म्हणता तसे विचार करू.

पुनरूत्पादनाच्या सहजप्रेरणेतून प्रणयासक्तीचा उगम झाला आणि पुढे काम हा पुरूषार्थ गणला जाण्यापर्यंत या भावनेचा प्रवास झाला. भोळ्याभाळ्या लोकांनी मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाखाली घडणार्या या गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद वर्तनाला मर्दानगी, स्त्रीत्व समजायला सुरूवात केली. काहींनी मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करायला सुरूवात केली. मात्र पुढे या प्रकाराला विकृत वळण लागले.

म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचेय ? ज्या नैसर्गिक सहजप्रेरणेतून प्रणयासक्तीचा उगम झाला तिला अन्गिकारणारे फक्त भोळेभाबडेच असतात का / होते का ?? हे कसे ?? त्यान्चा प्रणय हा नेहमीच गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद होता व असतो याला आधार कोणता ?? जसेच त्याला पुढे विकृत वळण लागले म्हणजे नक्की काय झाले ?? सरसकट सम्पुर्ण मनुष्यजात ही विकृतीयुक्त प्रणय करते असे तुम्हाला सुचवायचे आहे का कि आपण सगळे व आपले सगळे पूर्वज त्या विकृतीची उपज आहोत ?? सरसकट सम्पुर्ण मनुष्यजात ही फक्त विकृत प्रणय कशी काय करू शकते. हे अशक्य आहे. विकृत-प्रणयाची तुमची नक्की व्याख्या काय ?? विकृती ही कमी अधिक प्रमाणात प्रतेक गोष्टीत अस्तेच की.

सॅडिझम, मेसोचिझम, कुंटणखाने, मनुष्य देह व्यापार, पेडोफिलिया असल्या सगळ्या विकृती आणि गरमी, परमा ते एच आय व्ही पर्यंतचे घातक आजार ते लोकसंख्येचा विस्फोट हे सगळे नेस्तनाबूत करायचे असेल, तर प्रणयाराधन मुळातून थांबले पाहिजे.

प्रणयाराधन म्हणजे काय याबद्दल तुमचा गैरसमज झालेला दिसतोय, प्रणय म्हणजे सम्भोग नव्हे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे व समजुतीप्रमाणे जर तमाम मनुष्यजातीने जर 'प्रणयाराधन' थाम्बविले तर काय होइल यावर अधिक काय लिहावे. तुमचा हा उपाय म्हणजे रोगापेक्षा औषध भयन्कर असा प्रकार आहे. तुम्हाला नक्की काय म्हणायचेय ??

मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाला बळी पडणारे भोळेभाळे रोमँटिक लोक शहाणे होतील तो सुदिन

म्हणजे फक्त भोळेभाळे लोकच काय ते रोमँटिक ??? बरे जे तुम्ही म्हणता तसे भोळेभाळे नाहीत ते कधीच रोमँटिक होउ शकत नाहीत का ?? वाचावे ते नवलच.

किरकोळ केमिकल लोच्याच्या प्रभावाला मर्दानगी, पुरूषार्थ वगैरे समजणे किंवा मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करणे थांबले पाहिजे.

किरकोळ केमिकल लोच्याचा प्रभाव म्हणजे काय हो ??

साचेबद्ध प्रक्रिया न करता पुनरूत्पादन करता येण्याची सोय आधुनिक विज्ञानाने करून दिलेलीच आहे. ती प्रणयाराधनाला सशक्त पर्याय देणारी व्यवस्था ठरेल अशी सोय करता येईल का?

जे आपल्या आयुष्यात कधीही व कोणत्याही कारणाने प्रणय म्हणजे सम्भोग करू शकणार नाहीत, त्यान्च्या रान्गेत तमाम मानवजातीने का उभी रहावे ?? प्रणय हा फक्त आणि फक्त जीवाच्या पुनरूत्पादनाकरीताच करायचा असतो असे सन्स्कार तुमच्यावर झालेले दिसतात कीवा तशी तुमचीच समजूत दिसते. कितीही विज्ञान प्रगत झाले तरी मनुष्यनिर्मितिचा कारखाना निघणे केवळ अशक्य.

पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, पुनरूत्पादनाच्या साध्यासुध्या नैसर्गिक प्रेरणेच्या (मर्दानगी, मातृत्वाची आस वगैरे नव्हे) खर्या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे.

पुनरूत्पादनाच्या साध्यासुध्या नैसर्गिक प्रेरणेचे खरे रूप ते कोणते ??? जरा अधिक स्पष्ट केलेत आमच्यासारख्या लोकांना त्याचे आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. मर्दानगी, मातृत्वाची आस वगैरे प्रकाराचा आपल्याला एव्हढा तिटकारा का बरे ??

टीपः अखंड मानवतेचे ब्रह्मचारी, समलिंगी, विषमलिंगी, तृतीयपंथी वगैरे छोट्या छोट्या तुकड्यात विभाजन होणे, आणि त्यांनी एकमेकांकडे तिरस्काराने बघणे हे सगळे प्रकार थांबवणे आपल्याच हातात नाही का?

अहो कुणाच्या हातात काय असेल हे सान्गणे तसे जरा अवघडच, सरकारी अल्पसन्ख्यान्क आयोग आहेच कि तिकडे पहायला. अजुनही मला तुमचा नक्की प्रोब्लेम काय तो समजला नाही.

आपला धागा वाचला काही विचार मनात आले म्हणुन ह प्रतिसाद.

विनोद१८

pacificready's picture

29 Dec 2013 - 2:57 am | pacificready

Now consider this to be a parody. Rgds,

ग्रेटथिन्कर's picture

29 Dec 2013 - 9:47 am | ग्रेटथिन्कर

you are confused btw copulation and romance

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2013 - 10:35 am | डॉ सुहास म्हात्रे

लेखाचे शिर्षक कंसात आहे... नाहितर लेखकाच्या विचारप्रक्रियेबद्दल संशय आला असता ! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2013 - 10:38 am | डॉ सुहास म्हात्रे

हे राहिलंच की... (केवळ) त्या कंसामुळेच 'विचारपूर्वक इतकं असंबद्ध लिहू शकल्याचे' कौतूक वाटले ! :)

राही's picture

29 Dec 2013 - 11:56 am | राही

अहो, कुठलीच सक्ती नसावी, अगदी आसक्तीचीही. सक्तीने आसक्त तरी का व्हावे? आता नरप्राणी हे चित्रविचित्र आवाज करून आणि मादीप्राणी हे चित्रविचित्र पेहेराव, त्वचारंग इ. करून प्रणयासक्तीची सक्ती करतात, त्यांच्या विषयी आदर बाळगूनही, त्यांचे विचारपरिवर्तन व्हावे/होईल असे वाटते.!
बाकी विडंबन फर्मास.
जाता जाता : मिपावर विडंबन येणे ही मूळ लेखाच्या उच्चतेची खूण समजावी काय?

मंदार कात्रे's picture

29 Dec 2013 - 1:18 pm | मंदार कात्रे

मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाखाली घडणार्‍या या गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद वर्तनाला ????????

तुमचा सूर औपहासिक आहे का?

अन्यथा वरिल विधाने आक्षेपार्ह आहेत मूकवाचक साहेब !