मुक्तक
प्रिंटर आणि मी!
माझं आणि प्रिंटरचं काय वैर आहे माहिती नाही.पण मी प्रिंट दिली अन प्रिंटरजवळ गेल्यावर ती आलेली दिसली असं कधीच होत नाही. त्या लॅनचा तरी प्रॉब्लेम असेल किंवा आतमध्ये आधीपासूनच कागदं तरी अडकलेले असतील किंवा प्रिंटर हँग तरी झालेलं असेल! एकतर मी बसतो तिथून प्रिंटभर कोसभर लांब आहे. अश्यावेळी आपण दहा-बारा प्रिंट्स देऊन प्रिंटरजवळ गेल्यावर तो मक्ख चेहऱ्याने आपल्याकडे बघताना दिसला की माझा तिळपापड होतो.
"अरे बाबारे, कंपनीत आम्ही आहोत ना मक्ख, आम्ही आहोत ना मठ्ठ !! तुला काय गरज आहे माणसात यायची !"
गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक २ काहूर
प्रिय,
एकदा लिहिलं , खोडलं , पुन्हा लिहीलं, पुन्हा खोडलं
पण प्रिय तर आपल्याला ज्या व्यक्ती आवडतात त्यांना लिहितो ना मग का खोडलं मी?
प्रिय
तुझं भावना पत्र मिळालं. तुला माहितेय इतक्या वर्षांनी मला कोणीतरी संबोधून पत्र लिहिलंय.
आज अनेक वर्षांनी मी पत्र वाचतोय. तेही केवळ मला आलेलं. आणि कोणी लिहिलेलं? तिने जिने मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी स्थान ग्रहण केलय. वर लिहीत होतो खोडत होतो आता धीर आलाय. हो केलं आहेस तू एक स्थान तयार माझ्या मनात. म्हणजे जे मला वाटतं होतं अगदी तस्संच तुलाही वाटतं होतं तर.
चहा वालं प्रेम
अमेरिकेहून सुट्टीसाठी घरी आलेली ऋतु लॉकडाऊन मुळे भारतातच अडकली होती. आपलं तिकडचं सगळं काम अर्धवट सोडून आल्यामुळे घरी राहूनही तिचा अर्धा जीव सतत सातासमुद्रापलीकडे लागून राहिला होता. ऋतु ही पंचविशीच्या उंबरठ्यावरची एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मोहन काका आणि अरुणा काकूंची एकुलती एक लाडकी कन्या. काकूंची आई सुध्दा सोबतच राहायची. खूप वयस्क असूनही आजीबाई बोलण्यात अगदी ताठ होत्या. इन्जिनीअर झालेली ऋतु काही वर्षापूर्वी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. काका काकूंनी मोठ्या हिमतीने, आपल्या काळजावर दगड ठेऊन आपल्या लेकीला दूर पाठवलं खरं पण तेव्हापासून काकू मात्र हरवल्यागत वागायच्या.
सुशांत
नव्हते जेव्हा पाहत कुणिही ...
रडलो होतो
झगमगताना पायतळीच्या अंधारी...
तगमगलो होतो
बेमालुमसा प्रतिमेमागे...
दडलो होतो
उजेड नाकारून अंधारा...
भिडलो होतो
श्रेयस प्रेयस तुंबळात..
सापडलो होतो
रुजताना उन्मळलो...
का मी किडलो होतो?
गुलाबी कागद निळी शाई....1 अनामिक
गुलाबी कागद निळी शाई
Hiiii
पत्र पाहून आश्चर्य वाटलं ना? गंमत सांगू, मलाही वाटलं. :) कारण शाळेतलं पत्र लेखन संपल्यावर पुन्हा कधी खरंखुरं पत्र लिहिलंच नाही बघ. तसंही बोअरींगच होतं ते. तिथं हमखास मार्कस् जायचे. मराठीच्या मिस् तर छळायच्याच मला. माझे निबंध आणि पत्र भर वर्गात वाचली जायची. लेखन कसं नसावं याचं उदाहरण म्हणून. सगळे चिडवायचे मग. Science घेतलं आणि सुटले त्यातून. ते जाऊदे.
तर काय सांगत होते? हं तर तुला लिहिलेलं पत्र. त्याचं काय आहे,
शब्द
बोलणं जे जिवंत
कागदावर त्याचं प्रेत
बोलणं जे भाबडं मुक्त
कागदावर तेच अडचणीचं
बोलणं अधीर ओथंबलेलं कोवळं
कागदावर विचारपूर्वक शुष्क निबर
बोलणं गरमागरम लालबुंद
कागदावर डीप्लोमसीटाईप गुळमुळीत
बोलणं, वार्यावर विरून जाणारं
कागदावरचं, आयुष्यभर पायगुंता होऊन बसणारं
बोलणं, अगदी वैयक्तिक, थेट ओंजळभर.
कागदावरचं, वाचणाराच्या मूडनुसार हरवणारं गवसणारं.
बोलताना जे गाणं,
त्याचं कागदावर संदर्भासहीत स्पष्टीकरण.
एकेकाळी, बोलणं, प्रपोज करायला घाबरणारं.
त्याचकाळी, लिहिणं, चिठ्ठी पाठवायची सोय असणारं.
गुलाबी कागद निळी शाई
पूर्वी पत्रं "लिहिली" जात...
आता "आठवली" जातात.
गेल्या १०० शंभर वर्षांचा विचार केला तर जलद संदेशासाठी आणि दीर्घ संवादासाठी दळणवळणाची वेगवेगळी साधने होती .
अनादी .....अनंत.....
आयुष्याच्या वाटेवर एखादा अजाणता क्षण ज्यावेळी कठोरपणे थांबलेला असतो..
आणि काही प्रारब्धातील प्रश्नांची उत्तर शोधायला ही पर्याय नसतो..
त्यावेळी अचानक एखादा पर्याय उभा दिसतो..
त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..
जेव्हा, सगळं जग सोबत असतानाही आम्ही एकटे असतो..
आणि संसारिक दुःखात आम्ही पराजित होत असतो..
तेव्हा आमच्या रथाचा सारथी म्हणून तू समोर दिसतो..
त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..
मी पणा सोबत घेऊन जेव्हा आम्ही तुला शोधत असतो..
दानपेटीत दान टाकून , तुला जणू विकतच घेत असतो..
जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,
जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,
आणि तुला माझी खूप खूप आठवण येईल ना,
आणि तेव्हा जेव्हा आपण भेटू ना,
तू म्हणशील, "नमस्कार मॅडम!"
मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग तुझ्या बाजूला गाडीत बसेन.
"अगं, बेल्ट!"
मी मग चिडून बेल्ट लावेन.
"बोला!", तू म्हणशील.
मग मात्र मला रहावणार नाही.
मी तुझा गीअरवरचा हात हातात घेईन.
गालापाशी नेईन.
तू हसशील..म्हणशील, लोक बघतील
मी म्हणेन बघुदेत.
रहावणार नाहीच मला..
बेल्ट काढेन, अशी अख्खी झुकून मी तुझ्या जवळ पोचेन.
तुझ्या छातीवर डोक ठेवेन..
मान वर करून तुझ्याकडे पाहीन.