भलत्या वेळी, भलत्या जागी. --२
आमच्या आधीचे दोन पेशंट तिथे बसले होते. टेबलावर पेपरांची चळत पडली होती. एक जण ‘प्रभात’ वाचत होता. त्याने प्रभात टाकून सकाळ उचलला. बाबांनी चपळाईने प्रभातवर कब्जा केला. डायरेक्ट चौथ्या पानावरच्या काडीमोडच्या नोटीसा वाचायला सुरवात केली.
“आमच्या अशिलाने तुला एकूण चौदा पत्रे लिहिली. तू जी लग्नाच्या आठव्या दिवशी माहेरास निघून गेलीस ती आजतागायत नांदायला परत आली नाहीस. त्यामुळे आमच्या अशिलास लग्नाचा हक्क बजावता...”