आधीच जाहीर करतो की "आलेल्या फॉरवर्डेड मेलमधून साभार"
परवाच्या सिडनी टेस्ट नंतर आयसीसी ला सूचवलेले काही नवे नियम :
१. यानंतर पुढे कुठल्याही ऑस्ट्रेलियाचया मॅचसाठी रिकी पाँटिंग [ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान, हाडाचा व ज्याच्या प्रामाणिकपणावर कोणिही शंका घेऊ शकत नाही, असा क्रिकेटचा सितारा ] याला कायदेशिररित्या चौथा पंच म्हणून मान्यता देण्यात यावी. या नव्या कायद्याप्रमाणे चौथ्या अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आधीच्या निर्णयामध्ये सुध्धा बदल करण्याचा त्याला अधिकार राहिल. मैदानावरचे २ अंपायर वेळोवेळी रिकीची मदत घेऊ शकतात. रिकी पॅवेलियन मधून पण निर्णय देऊ शकतो.
२. ऑस्टेलिया संघाची गोलंदाजी चालू असताना फलंदाजाने मारलेला चेंडू जर क्षेत्ररक्षकाच्या ५ मिटर परिघात गेला तर तो फलंदाज बाद समजण्यात येईल, मग तो झेल थेट असो अथवा जमिनिवर टप्पा पडून असो. जर काही वाद निर्माण झाला तर निर्णयाचा अधिकार हा रिकीला असेल... खेळात जान यावी म्हणून या नियमांची काटेकरपणे अंमलबजावणी व्हावी.
३. ऑस्टेलियाची फलंदाजी चालू असताना, कोणताही फलंदाज कमीत कमी ४ वेळा बाद झाल्याशिवाय त्याला बाद समजण्यात येऊ नये. प्रेत्येकवेळी फलंदाज मैदानावरच्या अंपायरच्या पिर्णयाची वाट पाहत खेळपट्टीवरच ठाण मांडतील [ अगदी चेंडू बॅटला स्पर्श न करता ५ व्या स्लीपच्या क्षेत्ररक्षकाच्या हाती गेला तरी ......]
४. ऑस्टेलियन खेडाळूने बनवलेल्या प्रत्येक शतकामागे, बोनस म्हणून मैदानावरच्या अंपायरला सुध्धा काही रक्कम भेट मिळेल.
५. सामन्याच्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या खेडाळूना प्रतिस्पर्धी खेडाळूवर टिप्पणी करण्याचा पूर्ण अधिकार राहील. मात्र प्रतिस्पर्धी संघाने ईतर भाषेत केलेल्या टिप्पणीवर, ती "वंशभेदी" असल्याच्या कलमाखाली कठोर कारवाई केली जाईल.
६. सामनाधिकारी त्यांचे निर्णय सुध्धा ऑस्ट्रेलियन खेडाळूबरोबर चर्चा करूनच देतील. इतर संघातील खेडाळूना त्यावर अपिल करण्याचे स्वातंत्र नसेल. सामना-अधिकारी सुध्धा बोनस रकमेला पात्र असेल. बोनस हा ऑस्ट्रेलिया कडून प्रायोजीत असेल...
७. कुठल्याही पाहूण्या संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याचा अथवा सामना अनिर्णीत राखण्याचा प्रयत्न करू नये. हे प्रकार खेळातील स्पर्धा संपवण्याचे प्रयत्न समजून कठोर कारवाई केली जाईल.
८. सर्वात महत्वाचा नियम :
दौर्याच्या दरम्यान जर कुठल्या प्रतिस्पर्धी गोलंदाजाने "रिकीला" जर २ पेक्षा अधिक वेळा आऊट केले तर त्या खेडाळूवर त्या दौर्याच्या उरलेल्या सामन्यांकरिता बंदी घातली जाईल.
वाचकांच्या नजरेला जर अजून काही येत असेल, तर त्यांनी सुचवलेल्या नियमांचे स्वागत असेल पण नियम सूचवताना ते पूर्ण पणे खेळातील जान टिकवण्याच्या हेतूने सूचवल्याची खात्री असावी...
वंशभेदी नसलेला, हाडाचा क्रिकेटप्रेमी [ छोटा डॉन ]
प्रतिक्रिया
9 Jan 2008 - 6:18 pm | ब्रिटिश टिंग्या
९. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजी दरम्यान जर चेंडू बॅटच्या ५ इंच जवळून गेला आणि यष्टीमागे क्षेत्ररक्षकाच्या ५ मिटर परिघात गेला तर तो फलंदाज बाद समजण्यात येईल.
१०. चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाच्या कोणत्याही अवयवास स्पर्श करून गेल्यास सदरहू फलंदाज बाद समजण्यात येईल.
वरील नियमांमध्ये काही वाद निर्माण झाल्यास ते 'रिकी' च्या विशेष न्यायालयात सोडविले जातील.
हुकुमावरून,
(सर'पंच') छोटी टिंगी
18 Jan 2008 - 5:01 am | एक
१. प्रतिस्पर्धी गोलंदाजाचा चेंडू मधल्या यष्टीवर खालून ३ इंचावर बसला आणि यष्टी उडाली नाही तरच ऑस्टेलियन फलंदाज बाद असे घोषित करता येईल. जर यष्टी उडाली तर फलंदाज बाद असणार नाही आणि उडालेली यष्टी परत लावण्यात येणार नाही.
२. प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षकाने ऑस्टेलियन फलंदाजाचा झेल हा "सावधान" स्थितीमधे उभे राहून आणि हातांची ग्रिप "गोल्फ च्या ग्रिप" सारखी ठेवून घेतला पाहिजे. "गोल्फची ग्रिप" माहित नाही हा युक्तिवाद मान्य केला जाणार नाही.
गोल्फची ग्रिप : उजव्या हाताची करंगळी डाव्या हाताच्या अनामिका आणि मध्यमा यात गुंतवून केलेली पकड.