आज भारतीयांनी चित्रपट क्षेत्रात जबरदस्त अशी प्रगती केलेली आहे,तरीही भारतीय अभिनेत्यांना हॉलीवूड चे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे,अनेक जण हॉलीवूडमधे काम मिळवताना धडपडताना दिसतात,या पार्श्वभुमी वर काळाच्या ओघात मागे पडलेल्या पण हॉलीवूड गाजवलेल्या एका भारतीय अभिनेत्या बद्दल वाचण्यात आले ती माहीती मिपा करांसमोर मांडण्या चा हा छोटासा प्रयत्न.
२७ जानेवारी १९२४ ला मैसूर ला साबू चा जन्म झाला. मुळ नाव शेलर शेख साबू. जन्म गाव कारापुर सभोवताली प्रसिध्द अस मैसूरच जंगल पसरलेलं(होय विरप्पन फेम जंगल).त्यामुळे बालपण जंगली श्वापदा मधे गेलेलं,त्याचे वडील मैसूरच्या महाराजांच्या पदरी माहुत होते,साहजीकच साबू ही हत्तींच्या अंगाखांद्यावर खेळतच मोठा झालेला.वयाच्या दहाव्या वर्षी वडीलांच्या हाताखाली काम करायला तोही मैसूरला गेला त्याबदल्यात त्याला मिळणार होतं दोन वेळच जेवण,वर्षाला दोने कपड्यांचे जोड आणी रोज एक रुपया पगार.घरच दारीद्र्य पाहता दररोज पोटभर जेवण हे पण मोठ आमिष होतं .हे पाहता हा मुलगा भविष्यात परदेशात जाउन किर्ती मिळवेल, महालात राहील असा विचार ही कुणी केला नसेल.
साबूला पहिल्यापासुनच हत्तींच जबरदस्त आकर्षण होत वयाच्या १० व्या ११ व्या वर्षीच हत्ती नियंत्रण करण्याच त्याच कसब अफलातुन होतं,हत्तींशी खेळण,त्यांच्या वर माया करण हे जणु त्याच्यात जन्मजातच होत.
१९३७ ला हत्तींच्या जिवनावर माहीतीपट काढणारी एक ब्रिटीश फिल्म कंपनी मैसूरला आलेली होती त्याचा प्रमुख होता रॉबर्ट फ्लो हार्टी. रॉबर्ट साबूच हत्ती हाताळण्याच कसब थक्कच झाला एकतर ब्रिटीशांना भितीदायी आकर्षण आणी त्यात हा एवढासा पोरगा मोठमोठ्या हत्तींशी एवढ सहज खेळताना पाहून त्यान साबूला अमेरिकेला नेण्याची इच्छा दाखवली,मोठ्या कष्टानं त्याच्या वडीलांच मन वळवुन रॉबर्ट साबूला आपल्या बरोबर नेण्यात यशस्वी झाला.
इथुन सुरु झाला साबूचा झगमगता काळ १९३७ ला १३ व्या वर्षी साबू रुपयार्ड किपलिंग च्या कथे वर आधारीत "एलेफंट बॉय" या चित्रपटात झळकला,हा चित्रपट चांगलाच गाजला,पुढे १९३८ ला त्याचा "दि ड्र्म " हा चित्रपट तर १९४० ला "थिफ ऑफ बगदाद" झळकला.
१९४२ ला झोल्टन कोर्डा या दिग्दर्शकाने "जंगलबुक" हा चित्रपट बनवला यामधे "मोगली"नावाच्या मुलाची प्रमुख भुमिका केली,या चित्रपटानं बॉक्स ऑफीस वर प्रचंड यश मिळवल .
१९४४ ला साबूला अमेरिकन नागरीकत्व बहाल करण्यात आल्,या नंतर साबू अमेरीकन वायुसेनेते भर्ती झाला व दुसर्या महायुध्दात अनेक चकमकीत त्यान मोलाची कमगीरी बजावली. त्याच्या या धाडसाबद्दल सरकारने त्याला "डिस्टिंगविश्ड फ्लांइग क्रॉस या पदकान सन्मानीत केल.
साबून तब्बल २० चित्रपटात काम केलं. २ डिसेंबर १९६८ ला त्याचं निधन झालं.
वरील लेखा चा संदर्भ हा मधुबाला या अप्रतीम पुस्तकातील आहे त्याचे लेखक डॉ.श्रीकांत मुंदरगी हे आहेत्,अजुन पुस्तक वाचतोय पण जेव्हढ वाचलय त्यावरुन सांगतो मधुबाला या अभिनेत्रीबद्दल अतिशय सुंदर माहीती यामधे आहे.
प्रतिक्रिया
24 Jun 2012 - 9:31 pm | बहुगुणी
तुम्ही सांगताहात ते सर्व चित्रपट माहिती होते, पण त्यामागचा हा भारतीय कलाकार माहीत नव्हता. नवीन माहितीबद्दल धन्यवाद! वयाबाबतीतील माहितीवरून हा अभिनेता ३४व्या वर्षी म्हणजे फार तरूणपणी गेला :-(, पण ७-८ वर्षांत २० चित्रपट म्हणजे किरकोळ कामगिरी नव्हे! कौतुकास्पदच! आणखी शोधून वाचलं पाहिजे.
24 Jun 2012 - 10:41 pm | अत्रुप्त आत्मा
खुप छान माहिती दिलित,त्याचा एखादा फोटो टाकायला हवा होतात.
24 Jun 2012 - 11:01 pm | शिल्पा ब
या नावाचा अभिनेता आहे हे माहीती नव्हतं..त्याचा पिच्चर कुठे मिळाला तर बघेन.
http://www.youtube.com/watch?v=CqehjbJiON4
मिळाला लगेच. :)
24 Jun 2012 - 11:40 pm | बहुगुणी
पूर्ण चित्रपटच आहे! पहातो आहे, साबूचं इंग्लिश बोलणं आत्मविश्वासपूर्ण आहे.
त्याच्याविषयी आणखी माहिती इथे आणि इथे आहे. ड्रम या चित्रपटातील त्याची माहिती इथे मिळाली. हा चित्रपट इथे पहायला मिळेल (बहुधा पूर्ण लांबीचा असावा).
सेलार साबूचे जालावर काही फोटो आहेत, त्यांपैकी एकः
24 Jun 2012 - 11:42 pm | चित्रगुप्त
'जंगलबुक' मधे साबू:
(Patricia O'Rourke & Sabu in Jungle Book )
थीफ ऑफ बगदादः
एलिफंट बॉयः
25 Jun 2012 - 8:24 am | स्पंदना
व्वा! मारी नाव वाचतो आम्ही या अॅक्टरच पण इतिहास नव्हता माहित . माझ्याकडे आहेत या सि डी ज.
खरच नशिब नावाच काहीतरी आहे याचा पडताळा येतो.
25 Jun 2012 - 2:50 pm | चावटमेला
काही वर्षामागे, हिस्ट्री चॅनेल वर साबू वरील डॉक्युमेंट्री पाहिल्याचे आठवते. बहुधा त्याने एका अमेरिकन मुलीशी लग्न केले होते आणि चित्रपट निर्मितीचाही प्रयत्न केला होता.
25 Jun 2012 - 3:57 pm | प्राध्यापक
१९४८ ला त्याने मार्लिन कूपर या गौरवर्णीय अभिनेत्रीबरोबर प्रेम विवाह केला. त्यांना दोन मुल झाली,त्याच्या पॉल साबू नावाच्या मुलानं "रॉक बँड साबू" नावाचा वाद्यव्रुंद १९८० साली काढला.