~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
आज २० ऑगस्ट, २०१०
राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन!
आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ......
WE MISS YOU!
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
आज २० ऑगस्ट, २०१०
राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन!
आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ......
WE MISS YOU!
प्रतिक्रिया
20 Aug 2010 - 6:10 pm | वेताळ
त्याबद्दल काही माहिती देवु शकता काय?
20 Aug 2010 - 6:12 pm | बिपिन कार्यकर्ते
माणूस अशा पद्धतीने जायला नको होता. एवढेच म्हणतो.
20 Aug 2010 - 6:15 pm | मृगनयनी
ह्म्म... बिपिन'दांशी सहमत!
_________
आज राजीव'जी असते... तर देशात.. भ्रष्टाचार वगैरे.. झालाच नसता..... असं मी कधीच म्हणणार नाही...
पण नेहरू-गांधी घराण्याचं वर्चस्व पाहता........ कदाचित आज मनमोहन-सिन्गांच्या ऐवजी "राजीवजी"च आपले पन्तप्रधान असते! :)
20 Aug 2010 - 6:17 pm | अर्धवट
ह्येबी खरंय..
आन् चित्र थोडं वेगळं दिसलं असतं हे ही खरय..
अवांतर - हल्ली मला 'वेगळं' म्हटलं की चौकट राजा आठवतो..
20 Aug 2010 - 6:13 pm | आनंद
देशाच कस चित्र कस असत ते माहीत नाही पण राजीवजींच अस असत.
21 Aug 2010 - 5:13 am | राजेश घासकडवी
फोटोशॉपिंग मस्त जमलंय.
21 Aug 2010 - 8:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
20 Aug 2010 - 6:18 pm | परिकथेतील राजकुमार
विनम्र अभिवादन!
फोटु अंमळ जास्तच मोठा वाटत आहे गो ! संपादक त्याला योग्य तो आकार देतील काय ?
21 Aug 2010 - 10:51 am | खरडपंच
येड आकड बोलून कला कोकन ची आन घालवितान............
20 Aug 2010 - 6:19 pm | मेघवेडा
शीर्षकात STILL या शब्दाची जागा चुकली आहे असं वाटून गेलं. बाकी चालू द्या! :)
21 Aug 2010 - 11:42 am | मृगनयनी
काही लोकांचे डोक्याच्या पुढच्या भागातले केस फार लवकर उडतात नै! ;)
____
फार विचार करत असतील बहुधा ती लोकं!.. राजीव'जींसारखी! :)
20 Aug 2010 - 6:28 pm | अर्धवट
सद्गुरू.. उच्च इनोद आहे..
पायाचा फोटु धाडणे..
20 Aug 2010 - 7:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
(अ)शुद्धलेखन आणि excess capitalization भडकपणे अंगावर आलं!! राजीव गांधींनी संगणक क्रांतीबरोबर इंग्लिश लेखनसरावही भारतात आणावयास हवा होता असं राहून राहून वाटलं!
21 Aug 2010 - 10:55 am | मृगनयनी
अरे बापरे! "स्कोअर लेवल" करायचा केवढा हा अट्टाहास !! ;) ;) :|
असो! .... हा (अ)सभ्यपणा अंगावर आला बरं!!!! ;) ;) ;)
__________________________
टीप : "ऑम्लेट" पचत नसेल.. तर रात्री हाजमोला वगैरे घेऊन झोपावे...
आणि हो!.. आज शनिवार असल्यामुळे "ऑम्लेट" न खाणे उचित ठरेल!
20 Aug 2010 - 6:56 pm | निखिल देशपांडे
राजीव गांधींच्या पुण्यतीथीच्या दिवशी धागा प्रवर्तिकेनी काढलेला जुना धागा आठवला.
http://www.misalpav.com/node/12412
अर्थात जुन्या धाग्याचा मजकुरही काहिसा असाच होता.
तिथे काही लोकांनी उत्तम चर्चा केली होती.
त्यापेक्षा काही नवीन माहिती मिळाली तर ती वाचण्यास उत्सुक.
अवांतर :- अश्या लोकांची जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी असती तर????
20 Aug 2010 - 7:27 pm | क्लिंटन
जुन्यापुराण्या गोष्टींच्या जोखडातून बाहेर काढून देशाला आधुनिकतेची वाटचाल देऊ शकायची क्षमता ठेवणारा हा नेता असा अचानक गेला याचे वाईट वाटते.अर्थातच घरी/शाळेत/नातेवाईकांमध्ये/परिचयातील व्यक्तींमध्ये राजीवजींचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन न करता केवळ ’गांधी’ म्हणून त्यांच्यावर टिका करणारे बहुसंख्य लोक आसपास होते.त्याचा परिणाम होऊन मी सुध्दा अनेक वर्षे अशाच लोकांची री ओढत त्यांच्यावर टिका करत होतो.पण तटस्थपणे विचार करता असे जाणवते की हे सगळे लोक म्हणतात तितके राजीवजी वाईट नक्कीच नव्हते.भारतात संगणक आणि टेलिकॉम क्रांतीची मुहूर्तमेढ रोवायचा त्यांचा निर्णय आमच्या पुढीला आज खूपच फायदेशीर ठरत आहे. त्यांना श्रध्दांजली.
क्लिंटन
20 Aug 2010 - 7:31 pm | मदनबाण
लहानपणी मी आकाशात एखादे विमान ( खरेखुरे ) दिसले की उगाच... इंदिरा गांधी टाटा /राजीव गांधी टाटा असे बोंबलत सुटायचो ते आठवले. ;) शिवाय, हमे ये करना है आणि हमे वो करना ही वाक्य देखील आठवली. ;)
बाकी चालु द्या.
20 Aug 2010 - 10:13 pm | चिरोटा
आजच्या ठळक् बातम्यांमध्ये राजीव गांधीची बातमी नाही असे सहसा होत नसे.८:४० च्या समाचार मध्ये परत तेच. आणि ९:३०च्या news मध्ये परत तेच्!!विरोधी पक्ष नक्की आहेत तरी कोण हे कळतच नसे.
21 Aug 2010 - 10:59 am | मृगनयनी
लहानपणी मी आकाशात एखादे विमान ( खरेखुरे ) दिसले की उगाच... इंदिरा गांधी टाटा /राजीव गांधी टाटा असे बोंबलत सुटायचो ते आठवले. शिवाय, हमे ये करना है आणि हमे वो करना ही वाक्य देखील आठवली.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
सही!
आम्ही "सोनिया गान्धी --टाटा"... "राहुलदादा- टाटा".. "प्रियान्का तै-टाटा" ..... असं ओरडायचो! ;)
_____________________
20 Aug 2010 - 8:21 pm | विजुभाऊ
राजीव गांधी एक द्रष्टा नेता होते हे मान्यच केले पाहिजे
भारतात संगणक आणि टेलिकॉम क्रांतीची मुहूर्तमेढ रोवायचा त्यांचा निर्णय आमच्या पुढीला आज खूपच फायदेशीर ठरत आहे
नुसते हेच नाही तर आज आपण भारतीय रस्त्यांवर जी नवी वाहने पहातो त्या साठी श्रेय राजीव गांधीनाच जाते.
लोकानुनय करताना राजीव गांधींचे काही निर्णय चुकले असतील पण त्यांचे काही निर्णय त्या वेळच्या भविष्यकाळात म्हणजेच आजच्या वर्तमान काळात खूपच फायदेशीर ठरत आहेत.
"द मारुती स्टोरी " पुस्तकात भारतात मारुती मोटार्स ने काय काय नवीन आणले याचा आढावा घेता येतो.
मारुती ने केवळ नवी टेक्नीलॉजीच आणली असे नव्हे तर एक प्रॉडक्षन इंडस्ट्रीत एक नवी विचारसरणी ( चांगल्या अर्थाने एक नवी संस्कृती) आणली.
ज्याचे फायदे आज आपण सर्वचजण घेतोय.
राजीव गांधींच्या काळातील काही इतर नेते ( वि प्र सिंग्/देवेगौडा ) याना कोणतीच धोरणे नव्हती असेच म्हणावे लागेल.
रथयात्रा आणि मंडल या नी लोकाना रोजगार /चैतन्य वगैरे देण्यापेक्षा भारताचे नुकसानच फार केले.
20 Aug 2010 - 10:12 pm | मिसळभोक्ता
राजीव"जी"ंच्या जयंतीनिमित्त जाहिरातींचा खर्चः ३०० कोटी रुपये.
लेह ला दिलेली मदतः १२५ कोटी रुपये.
जय हिंद !
20 Aug 2011 - 2:09 pm | मराठी_माणूस
राजीव"जी"ंच्या जयंतीनिमित्त जाहिरातींचा खर्चः ३०० कोटी रुपये.
अण्णांच्या वाढदिवसाला २/३ लाख खर्च केले म्हणुन तो मनोज तिवारी बोंबलत होता. कदाचीत गांधी घराण्यातल्यां साठी ह्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नसेल.
20 Aug 2010 - 10:12 pm | मिसळभोक्ता
राजीव"जी"ंच्या जयंतीनिमित्त जाहिरातींचा खर्चः ३०० कोटी रुपये.
लेह ला दिलेली मदतः १२५ कोटी रुपये.
जय हिंद !
21 Aug 2010 - 10:54 am | खरडपंच
सहमत
20 Aug 2010 - 10:20 pm | हुप्प्या
आज भारत माहितीयुगाचा एक मोठा आधारस्तंभ बनला आहे ह्याचे सग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ळे श्रेय राजीवजींना आणि उरलेच तर सोनिया आणि राहुलला जाते. आणि हो, थोडे बिटिया प्रियांकालाही. हे सगळे लोक नसते तर कंप्युटर आणि कार तर सोडाच, आपण आकडेमोड, गणिते आणि बैलगाड्याही विसरलो असतो. थेट अश्मयुगात जाऊन पोचलो असतो. शेतीबिती विसरून पुन्हा आदिमानवासारखे शिकारी बनलो असतो. कंदमुळे खाऊन जगावे लागले असते. कुठली सुपरपावर आणि कुठले काय.
राजीवजींसारखा गणकयंत्र तज्ञ लाभल्यामुळे आज प्रत्येक भारतीय आज गणकयंत्र साक्षर झालेला आहे.
विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम ही मंडळी गुगल, अॅपल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट च्या डोळ्यासमोर तारे चमकतील असे नवनवे शोध लावत आहेत!
राजीवजी अमर रहे!
20 Aug 2010 - 10:35 pm | मिसळभोक्ता
विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम ही मंडळी गुगल, अॅपल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट च्या डोळ्यासमोर तारे चमकतील असे नवनवे शोध लावत आहेत!
अगदी अगदी !
20 Aug 2010 - 11:01 pm | क्लिंटन
कोणाही राजकिय/ऐतिहासिक व्यक्तीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून त्या विषयी मते बनवायचीच नाहीत तर केवळ भावनेच्या आहारी जाऊन पूर्वग्रहदुषित मते आधीच बनवायची आणि ती वारंवार ठासून सांगायची असा पणच केला असेल तर काही बोलायचे नाही. चालू द्या.
राजीवजींनी भारतात संगणक आणायला सुरवात केली हे कोणी नाकारू शकेल का?टेलिकॉम क्षेत्राच्या विकासाची पायाभरणी सॅम पित्रोदांना हाताशी धरून राजीव सरकारनेच सुरू केली. त्यावेळी आपल्यासारख्या गरीब देशात ही थेरं परवडणार नाहीत असेच बहुसंख्यांचे मत होते.बहुसंख्य जनतेला दोन वेळेला खायला मिळत नाही मग करायचे काय ते संगणक आणि फोन असेच सर्वसाधारण मत त्याकाळी होते. अर्थात माझी माहिती वाचलेली आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना २०+ वयाचे असलेले मिपाकर याविषयी नक्कीच सांगू शकतील. मागे मिपावर राजीवजींच्या पुण्यतिथीवर चर्चा झाली होती तेव्हा कोणा मिपाकराने देवीलाल यांनी शेतकऱ्यांच्या सभेत बोलताना केलेल्या भाषणाचा उल्लेख केला होता. देवीलाल म्हणाले,"सरकार वीजप्रकल्पांसाठी वापरून सगळे कस गेलेले पाणी शेतीसाठी देते". अशा विरोधाला न जुमानता नव्या काळाशी अनुरूप प्रकल्प रेटणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पुढे नरसिंह राव आणि मनमोहन सिंह यांनी मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणल्या पण त्याची सुरवात काही प्रमाणात तरी राजीव गांधींच्या सरकारने केली होती हे मान्य करायला अडचण कोणती?
कोणाही व्यक्तीची आंधळी भक्ती नको आणि उगीचच ठोकणे हा पण दृष्टीकोन नको.प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या चांगल्या कामांचे श्रेय मिळाले पाहिजे आणि त्याचबरोबर तिने केलेल्या चुकींबद्दल दोषही आपण द्यायला हवा. पण आपल्याकडे ’राजीव गांधी’ हे नाव उच्चारले तरी काहीही ऐकून न घेता शिव्या घालायला सुरवात करायची हाच दृष्टीकोन दुर्दैवाने दिसतो. राजीव गांधींनंतर वि.प्र.सिंह, देवेगौडा यासारखे भविष्याचा काहीही अजेंडा नसलेले बिनडोक नेते आले. त्यातही वि.प्र.सिंहांनी मंडल आयोगाच्या निमित्ताने भारतीयांच्या एकात्मतेच्या मार्गात मोठी पाचर मारून ठेवली आहे आणि भारतमातेच्या पायात कधी न तुटणाऱ्या साखळ्या बांधून ठेवल्या आहेत हे लक्षात घेतले तर त्यापेक्षा राजीव गांधी अनेक पटीने चांगले होते हे मान्य करायला अडचण कोणती?
राजीव गांधी नसते तर भारत अश्मयुगात गेला असता असे कोणीही म्हणत नाही.पण निदान त्यांनी भारतात संगणकीकरणाची सुरवात केली हे मान्य करून त्याचे श्रेय द्यायला काय हरकत आहे समजत नाही.
बाकी चालू द्या.
21 Aug 2010 - 1:50 am | शिल्पा ब
संगणक , मारुती , टेलेकॉमचे जाळे इ. त्यांनी पुढाकार घेतल्याने घडले हे सत्य आहे..
बाकी देवीलाल या माणसाचे "सरकार वीजप्रकल्पांसाठी वापरून सगळे कस गेलेले पाणी शेतीसाठी देते"हे मत वाचून किती मूर्ख लोक आपले प्रतिनिधित्व करत आहेत हे पुन्हा एकदा जाणवले.
बाकी चालू द्या..
21 Aug 2010 - 2:45 am | मिसळभोक्ता
आधी स्वतः शोषून घेतलेले वेब पेज गूगल तुम्हाला देते ते चालते, आणि वीज काढून घेतलेले पाणी चालत नाही ?
21 Aug 2010 - 6:44 am | शिल्पा ब
आम्हाला चालतंय हो...पण देविलालला चालत नाही असे ऐकून आहे.
21 Aug 2010 - 7:28 am | हुप्प्या
देवीलाल पाण्यातली वीज काढून घेतली म्हणू शकणारा मूर्ख असेलही पण दुसरी अशी शक्यता आहे की त्याला खात्री होती की जनता मूर्ख आहे आणि आपण असले काही बोललो तरी ते लोकांना पटेल आणि रुचेल.
अडाणी, अशिक्षित, उथळ मतदारांचे प्राबल्य असल्यामुळे असले सवंग डायलॉग मारले जातात आणि त्यावर निवडणूकाही जिंकल्या जात असतील. लालू यादव म्हणाला होता की तमाम पंतप्रधानपदाच्या उमेदवारांत एक अशी शर्यत लावा की सगळ्यांपुढे एक एक म्हैस ठेवा. जो गडी दिलेल्या वेळात सगळ्यात जास्त म्हशीचे दूध काढू शकेल तो पंतप्रधान. प्रेक्षकात अर्थातच जोरदार टाळ्या! हेही तितकेच बिनडोक वाक्य आहे. पण काँग्रेसने (होय तीच ती पार्टी जिने भारताला आधुनिक युगात नेले!) ह्याचे समर्थन घेतलेच की हो!
अशी अनेक नमुनेदार वाक्ये शोधता येतील. जशी प्रजा तसा राजा असा लोकशाहीचा नियमच आहे. (अर्थात मोतीलालजी, जवाहरलालजी, इंदिराजी, संजयजी, राजीवजी, सोनियाजी, राहुलजी, प्रियांकाजी आणि त्यांची वर्तमान व भविष्यातली पिलावळजी यांना हे नियम लागू नाहीत बरं का. ते सगळे एकदम एलिट्स आणि जिनियसेस !)
21 Aug 2010 - 2:34 pm | क्लिंटन
तसाच संधीसाधूपणा सगळ्या पक्षांनी कधीनाकधी केलेला आहे. भाजपने अशा किती पक्षांचे समर्थन घेतले आहे याची गणतीच नाही.
अशाच लोकांच्या सान्निध्यात संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रांमध्ये नवे बदल घडवून आणणे अजिबात सोपे नव्हते.देवीलाल सारखे बिनडोक नेते याविरूध्द राळ उठविणार आणि त्याची किंमत कॉंग्रेस पक्षाला मतांच्या स्वरूपात द्यावी लागणार हे उघडउघड दिसत असूनही राजीवजींनी हे निर्णय पुढे रेटले. याच देवीलालांच्या लोकदलाने १९८७ मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा ऐतिहासिक पराभव केला. अर्थात त्यामागे पंजाब प्रश्न आणि राजीव-लोंगोवाल करार आणि त्यात हरियाणावर झालेला कथित अन्याय ही कारणे जरूर होती पण देवीलालांनी राजीवजींविरूध्द अशा प्रश्नांवरून (आणि कोणताही पुरावा नसताना बोफोर्स प्रश्नावरून) उठवलेली राळ हे ही एक कारण होतेच. राजीवजींनी बन्सीलालसारख्या गणंगाला हरियाणाचे मुख्यमंत्री केले याचे अजिबात समर्थन नाही पण त्याचबरोबर भाजपने त्याच बन्सीलालला पुढे पाठिंबा दिला याचेही समर्थन होऊ शकत नाही. १९८७ मध्ये याच देवीलाल या बिनडोक माणसाला भाजपने पाठिंबा दिला होता. सुषमा स्वराज आणि सूरज भान हे भाजपचे ज्येष्ठ नेते देवीलाल यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपण होते. सांगायचा मुद्दा हा की अशा राजकिय वातावरणात आपल्याला मतांच्या स्वरूपात किंमत चुकती करावी लागणार आहे याची पुरेपूर जाण असूनही संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रात बदल पुढे रेटणे ही गोष्ट साधी नव्हती. त्याचे काहीच श्रेय राजीवजींना नाही का? की केवळ ’राजीव गांधी’ हे नाव धारण केल्यामुळे त्यांना देय असलेले कोणतेच श्रेय द्यायचे नाही आणि कोणताही पुरावा नसताना बोफोर्स प्रकरणी राजीवजींनी पैसे खाल्ले असा निर्णय देऊन टाकायचा याला पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन सोडून दुसरे काय म्हणता येईल?
या वाक्यासंबंधी दोन मुद्दे निघतात.
१. आपली प्रजा संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रातील बदल समजून घ्यायच्या परिपक्व अवस्थेत राजीवजींच्या पंतप्रधानपदाच्या कारिकिर्दीत नव्हती हे तर उघडच आहे. तरीही राजाकडे भविष्याची काहीतरी दृष्टी होती हे अमान्य कसे करता येईल?
२. तुम्ही भाजप समर्थक आहात का ते माहित नाही. अनेकदा भाजप समर्थकांचे मत असते की १९९८-९९ मध्ये जनता परिपक्व होती कारण त्यांनी आम्हाला निवडून दिले.पण तीच जनता २००४-०९ मध्ये अपरिपक्व झाली आणि you get a government you deserve in a democracy असे त्यांचे मत असते. म्हणजे निवडणुकींचे निकाल आपल्याला अनुकूल झाले तर जनता चांगली आणि निकाल आपल्याविरूध्द लागला तर तीच जनता वाईट कशी? मग केवळ अशाचवेळी ’जशी प्रजा तसा राजा’ हे म्हणणे दुटप्पीपणा नाही का?
क्लिंटन
21 Aug 2010 - 7:26 pm | हुप्प्या
देवीलालविषयी तीळमात्र आदर न बाळगता हे मी नक्की सांगेन की राजीवजींचे एकेकाळी टेलीकॉम हे जितके लाडके स्वप्न होते तितके देवीलालचे पाण्यातून वीज काढणे हे काही नव्हते. तो एक त्याच्या मूर्खपणाचा किस्सा आहे. पण ही ह्या राजकारण्याची संपूर्ण ओळख नव्हे.
दुसरे असे की मला भाजपाबद्दल काहीही आदर नाही. मी एक वेळ काँग्रेसला मत देईन पण भाजपला नाही. यथा प्रजा तथा राजा हे मत नेहमीच लागू आहे असे मला वाटते.
परमपूज्य राजीवजी नवे प्रयोग करु शकले याचे स्वच्छ कारण म्हणजे त्यांना गांधी घराण्यावरील लोकांची भक्ती. अगदी आणीबाणी हा अपवाद सोडला तर सहसा लोक त्यांची साथ सोडत नाहीत. काही प्रमाणात त्यांची राजेशाही असल्यामुळे त्यांना चोखाळलेली वाट सोडता आली. तळागाळातून आलेला राजकारणी असता तर अमक्या गटाला खूष करा, तमक्या लॉबीला खूष करा. ह्या जातीकडे बघा इ. कामात सगळा वेळ गेला असता. राजीवजी वरुन अलगत टपकले म्हणून आणि सॅम पित्रोडाशी मैत्री वगैरे गोष्टीमुळे हे घडले असावे. एक लहरी राजा होता. लहर आली, कर टेलिकॉम क्रांती, लहर आली धाड श्रीलंकेत सैन्य, लहर आली, फिरव शाह्बानोचा निर्णय , लहर आली, उघड अयोध्येच्या वादग्रस्त स्थळाचे कुलुप. भारतीय परिस्थितीचा फार सखोल अभ्यास, भारतीय मानसिकतेचा अभ्यास असे काही दिसत नाही.
<<
आपली प्रजा संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रातील बदल समजून घ्यायच्या परिपक्व अवस्थेत राजीवजींच्या पंतप्रधानपदाच्या कारिकिर्दीत नव्हती हे तर उघडच आहे. तरीही राजाकडे भविष्याची काहीतरी दृष्टी होती हे अमान्य कसे करता येईल?
<<
अगदी असहमत. फोन यंत्रणा सुधारणे ह्या विचाराला जनता तयार नव्हती हा निष्कर्ष कसा काढला तुम्ही? उत्तम दळणवळणाला कोण नाही म्हणेल? का म्हणून? राजकारणी लोक ज्यांना तो पैसा इतरत्र वळवायचा असेल ते नाही म्हणतील पण जनता का बरे नाही म्हणेल?
21 Aug 2010 - 8:50 pm | क्लिंटन
मी अमेरिकेत असताना माझ्या प्राध्यापकांचे सत्या एन. अतलुरी हे आर्यव्हाईन येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथील ज्येष्ठ प्राध्यापक हे मित्र-सहकारी होते.एका कॉन्फरन्सदरम्यान त्यांनी माझ्या प्राध्यापकांना आणि त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये डिनरसाठी बोलावले होते.त्यावेळी प्रा.अतलुरींना राजीव गांधींनी १९८८ मध्ये भारताला ’व्हिजन २०००’ साठी विशेष सल्लागार म्हणून बोलावून घेतले होते हे स्वत: अतलुरींनी बोलता बोलता आम्हाला सगळ्यांना सांगितले. वरील दुव्यावर प्रा.अतलुरींचा सीव्ही आहे आणि आधुनिक काळातील ऋषि हेच विशेषण त्यांना लागू पडेल हे त्यांच्या सीव्हीवर एक नजर फिरवली तरी आपल्या लक्षात येईल. आपल्याला वाचायला कंटाळा येतो पण अतलुरींच्या achievements संपतच नाहीत. त्यावेळी स्वत: अतलुरींनी राजीव गांधींना भविष्यकाळाचा दृष्टीकोन होता हे सांगितले. सॅम पित्रोदा हे नाव आपल्याला वर्तमानपत्रांमुळे माहित झाले. सत्या अतलुरी हे नाव मला स्वत: अतलुरींना भेटेपर्यंत माहित नव्हते आणि मिपावरील कोणालाही ते नाव आधी माहिती असायची शक्यता फारच थोडी आहे. अशा अनेक वेगवेगळ्या मोठ्या लोकांशी सल्लामसलत करून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पावले उचलायचा प्रामाणिक प्रयत्न राजीव गांधींनी केला होता असे अतलुरींनी मुद्दामून सांगितले. पण भारतातील परिस्थिती आणि लाल फित यामुळे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना पाहिजे तितके यश आले नाही but Rajiv Gandhi meant business असे त्यांनी बोलताना म्हटले होते. तेव्हा एक लहरी राजा होता, आली लहर केली टेलिकॉम क्रांती इतका उथळ प्रकार हा नक्कीच नव्हता. बाकी चालू द्या.
हा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात? राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्यात बहुसंख्य ठिकाणी त्यांचा पराभवच झाला.१९८४ च्या लोकसभा निवडणुकींमधील झंझावातानंतर मार्च १९८५ मध्ये कॉंग्रेस पक्ष उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यासारख्या राज्यात जिंकला.पण प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाचे बळ डिसेंबर १९८४ पेक्षा कमी झाले होते. उदाहरणार्थ डिसेंबर १९८४ मध्ये कॉंग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशात ८५ पैकी ८३ लोकसभेच्या जागा जिंकल्या.त्याच न्यायाने पक्षाने विधानसभेत विधानसभेत ४२५ पैकी किमान सव्वा तीनशे जागा जिंकायला हव्या होत्या. जिंकल्या किती? २६८! महाराष्ट्रात ४८ पैकी ४३ लोकसभा जागा जिंकणारा कॉंग्रेस पक्ष विधानसभेत मात्र २८८ पैकी १६७ जागाच जिंकू शकला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तर कॉंग्रेस पक्षाचा पराभवच झाला आणि रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले.याच कर्नाटकात १९८४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये कॉंग्रेसने मोठा विजय मिळवला होता. आंध्र प्रदेशात रामारावांनी परत एकदा कॉंग्रेस पक्षाला दणकून चोप आंध्र प्रदेशात दिला. पुढे कॉंग्रेस पक्षाचा सप्टेंबर १९८५ मध्ये पंजाबमध्ये तर नोव्हेंबर १९८५ मध्ये आसाममध्ये पराभव झाला.या राज्यांमधील पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळे या राज्यांचा मुद्दा थोडा बाजूला ठेऊ या. पुढे मार्च १९८७ मध्ये केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांनी असाच जोरदार चोप कॉंग्रेसला दिला. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी २० जागा जिंकल्या होत्या. खुद्द सोमनाथ चॅटर्जींचा पराभव झाला.या पार्श्वभूमीवर कम्युनिस्टांनी विधानसभेच्या २९४ पैकी २५०+ जागा जिंकणे म्हणजे कॉंग्रेसने खाल्लेली मोठीच आपटी नाही का?त्यानंतर राजीव गांधींना खरा धक्का बसला जून १९८७ मध्ये हरियाणामध्ये.९० पैकी अवघ्या चार जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या. खुद्द मुख्यमंत्री बन्सीलाल यांचा पराभव झाला. पुढे जानेवारी १९८९ मध्ये तामिळनाडूतील विधानसभा निवडणुका राजीव गांधींनी प्रतिष्ठेच्या केल्या आणि अण्णा द्रमुकशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. निकाल काय लागला? २३४ पैकी २६ जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या! वि.प्र.सिंह राजीव गांधींच्या मंत्रीमंडळातून आणि कॉंग्रेस पक्षातूनही बाहेर पडले आणि त्यांनी लोकसभेची पोटनिवडणुक कॉंग्रेसविरूध्द अलाहाबादेतून लढवली.त्या पोटनिवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तेव्हा राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारिकिर्दीतही जनतेचा अबाधित पाठिंबा त्यांना होता आणि त्या जोरावर ते वाटेल ते करू शकत होते हे म्हणणे अप्रस्तुत वाटते.
यातही दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे हे दुर्दैवाने बहुसंख्य पंतप्रधानांविषयी खरे आहे. वाजपेयींविषयी बोलायचे झाले तर आली लहर गेले लाहोरला आणि केली लाहोर जाहिरनाम्यावर सही. मग कारगीलमध्ये कंबरड्यात मोठी लाथ बसली तेव्हा यांना जाग आली! इतकी वर्षे रामनामाचा जप केला त्या रामाला सत्ता मिळाल्यावर बासनात गुंडाळून ठेवले. पुढे २००१ मध्ये नागालॅंडच्या प्रश्नावर बृहद-नागालॅंडची निर्मिती करायचे आश्वासन देऊन बसले त्याविरूध्द मणिपूरमध्ये उग्र आंदोलन झाल्यावर यांना जाग आली. असे काहीनाकाही प्रत्येक पंतप्रधानाविषयी लिहिता येईल.
आणि दुसरा मुद्दा म्हणजे भारतीय मानसिकता म्हणजे नक्की काय? आणि त्या मानसिकतेत जो सत्ताधीश गुरफटून राहिल तो भारताला नवी दिशा नक्कीच दाखवू शकणार नाही. भारतात आज जी प्रगती दिसते आहे ती मूठभर लोकांनी (ज्यांना आधुनिक काळाची जाण आहे आणि भविष्यकाळाचे व्हिजन आहे) केलेली आहे. बहुसंख्य जनता तर जातीपाती, रूढी-परंपरा यातच गुरफटलेली आहे.मग भारतीय मानसिकता म्हणजे ही बहुसंख्य लोकांची मानसिकता का? उत्तर प्रदेशातील बांदा-झाशी-चित्रकूट या बुंदेलखंडातील भागात सतीची परंपरा अजूनही चालते याविषयी डॉक्युमेन्टरी मी स्वत: एन.डी.टी.व्ही वर बघितली आहे.ही मानसिकता म्हणजे भारतीय मानसिकता का?अशा मानसिकतेत गुरफटलेला पंतप्रधान म्हणजे संकटास निमंत्रणच.
भारतातील बहुसंख्य (अगदी शिकल्या सवरलेल्यांनाही) लोकांचे भारतासारख्या गरीब लोकांच्या देशात फोन आणि संगणक गरजेचे नाहीत असेच मत होते. त्याकाळाशी संबंधित लेखांमधून मी हे नक्कीच वाचले आहे.तसेच पंगा या ज्येष्ठ मिपाकरांचे पूर्वी राजीव गांधींवर झालेल्या चर्चेतील हे मत बघा. विरोधी पक्षांचे तर सत्ताधारी पक्षाचे पाय खेचायचे परमकर्तव्य असते.तेव्हा गरीबांना ’तुझ्या भाकरीची सोय करायची सोडून राजीव सरकार फोन आणि संगणक आणत आहे’ असे राजकिय स्वार्थासाठी भडकावणे सोपे असते आणि देवीलालसारख्यांनी ते केले सुध्दा. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून नवीन बदलांना विरोध (केवळ फोन यंत्रणा सुधारणे असा संकुचित अर्थ कृपया घेऊ नको या) अशीच मानसिकता लोकांची होती.
21 Aug 2010 - 11:04 pm | हुप्प्या
राजीव गांधींची टेलिकॉम क्रांती हा फार विचार करुन, अभ्यासाने घेतलेला निर्णय होता असे मला अजूनही वाटत नाही. मुळात हा गृहस्थ अभ्यासू होता ह्याचे पुरावे फारसे नाहीत. एखाद्या क्षेत्रात गाजलेल्या परदेशस्थ व्यक्तीने राजीव गांधींबद्दल चांगले मत व्यक्त केले म्हणून त्यांचे मत ग्राह्य मानायचे हे काही पटत नाही. नंतरचे राजीव गांधींचे निर्णय बघता हा माणूस फार विचारी वाटत नाही. चमचे, संधीसाधू लोकांचे सल्ले घेऊन काम करणारा वाटतो.
>>हा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात? राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्यात बहुसंख्य ठिकाणी त्यांचा पराभवच झाला.१९८४ च्या लोकसभा निवडणुकींमधील झंझावातानंतर मार्च १९८५ मध्ये कॉंग्रेस पक्ष उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यासारख्या राज्यात जिंकला.पण प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाचे बळ डिसेंबर १९८४ पेक्षा कमी झाले होते.
<<
भारतात केंद्रीय पातळीवर कुठले घराणे कायम वरचढ असते? अर्थातच गांधी घराणे. संख्याबळ वरखाली होत असले, लंबक इकडे तिकडे हेलकावे घेत असला तरी गांधी घराण्याला मरण नाही असेच इतिहास सांगतो. अनुभव इतका कमी असताना, (बहुधा) अगदी कमी कष्ट करुन, इतका विजय मिळवल्यामुळे राजा बेसावध झाला असणे शक्य आहे. बोफोर्स प्रकरणी ही बेसावधता दिसलीच.
नंतर बोफोर्स प्रकरण शौरी वगैरेंनी उचलून धरल्यामुळे साहेब हरले. पण ती सगळी नंतरची गोष्ट.
भारतात लोकांना चांगले फोन होते ही आपली माहिती साफ चुकीची आहे. माझ्या आसपासच्या लोकांचे तरी असे मत नव्हते. असे काही सर्वेक्षण वगैरे केले होते का? निव्वळ काही डाव्या विचारसारणीच्या लेखकांचे मत हे प्रातिनिधिक का मानायचे?
>>
यातही दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे हे दुर्दैवाने बहुसंख्य पंतप्रधानांविषयी खरे आहे. वाजपेयींविषयी बोलायचे झाले तर आली लहर गेले लाहोरला आणि केली लाहोर जाहिरनाम्यावर सही. मग कारगीलमध्ये कंबरड्यात मोठी लाथ बसली तेव्हा यांना जाग आली! इतकी वर्षे रामनामाचा जप केला त्या रामाला सत्ता मिळाल्यावर बासनात गुंडाळून ठेवले. पुढे २००१ मध्ये नागालॅंडच्या प्रश्नावर बृहद-नागालॅंडची निर्मिती करायचे आश्वासन देऊन बसले त्याविरूध्द मणिपूरमध्ये उग्र आंदोलन झाल्यावर यांना जाग आली. असे काहीनाकाही प्रत्येक पंतप्रधानाविषयी लिहिता येईल.
<<
आपल्याला वाजपेयींना शिव्या देण्याची फार हौस दिसते. मीही काही वाजपेयींचा चाहता नाही. हव्या तर मी आणखी शिव्या घालतो. पण विषय तो नाही. राजीवजी खूप खूप थोर आहेत हा ह्या लेखाचा विषय आहे. त्यामुळे इतर फालतू पंतप्रधान किती वाईट होते आणि त्यांचे कसे चुकले होते हे विषयांतर नको.
दुसर्याचे चुकले म्हणून ह्यांची चूक ठीक होत नाही.
भारतीय मानसिकता जाणणे म्हणजे निव्वळ भारतीयांना हवे तेच करणे असे नाही तर आपल्या देशाचा इतिहास, समाजशास्त्र जाणणे. त्या आधारावर आपल्या निर्णयाचे दूरगामी परिणाम ओळ्खणे. तो विचार करुन निर्णय घेणे. शाहबानोचा निर्णय फिरवताना भारतीय मुस्लिमांची, हिंदूंची मानसिकता जाणणे आवश्यक होते. तीच गोष्ट अयोध्येच्या वास्तूचे कुलुप उघडण्यापूर्वी. ह्या दोन्ही कृत्याचे अगदी वाईट परिणाम आहेत. आणि ते दीर्घकाळ टिकणार आहेत.
21 Aug 2010 - 11:52 pm | क्लिंटन
निदान आपली प्रगती ’राजीव गांधींची टेलिकॉम क्रांती’ हे म्हणण्याइतकी झाली हे पण काही कमी नाही. नाहीतर राजीव गांधींचे बहुसंख्य टिकाकार त्यांच्या यातला वाटाच मुळात नाकारतात.
मान्य.पण राजीव गांधी हे एक well meaning पंतप्रधान होते आणि भारताचे भवितव्य संगणक आणि टेलिफोन क्रांतीत आहे हे समजण्याइतकी पात्रता त्यांची होती.आणि त्यासाठीच त्यांनी सॅम पित्रोदा,सत्या अतलुरी यासारख्या नावाजलेल्या लोकांचे सल्ले घेऊन त्यादिशेने पावले टाकायला प्रारंभ केला होता.त्यात त्यांना यश पूर्णपणे आले नाही म्हणून त्यांच्या मूळ उद्देशालाच नाकारणे योग्य नाही.
मग कोणाचे मत ग्राह्य धरायचे?निदान नव्या सुधारणा घडवून आणण्यासाठी राजीव गांधींनी ज्यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले आणि अशा सल्लागारांनी राजीव गांधींबरोबर जवळून काम केले अशांचे मत अधिक ग्राह्य की राजीव गांधी हे नाव ऐकताच त्यांना कसलेच (अगदी देय असलेलेही) श्रेय द्यायचे नाही असा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन असलेल्यांचे?
बोफोर्स प्रकरणी बेसावधतेपेक्षा राजीव गांधी चाणक्यनितीचे खेळ खेळण्यात कमी पडले. ’मी बोफोर्स प्रकरणी पैसे घेतलेले नाहीत’ हे त्यांनी अनंतवेळा सांगितले.त्यातूनच बोफोर्स प्रकरण राजीव गांधींनी स्वत:हूनच लोकांच्या स्मरणात राहिल अशी व्य्वस्था करून ठेवली. याउलट नरसिंह रावांवर हर्षद मेहताने लाच दिल्याचा आरोप केला तर त्यावर रावांनी चकार शब्द काढला नाही. महिन्या दोन महिन्यात ते प्रकरण आपोआपच मागे पडले.
नाही संदर्भ चुकला.मूळ लेखाचा विषय राजीव गांधींना त्यांच्या ६६व्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली वाहणे हा आहे.आणि राजीव गांधी हे नाव ऐकतात तुमच्यासारखे लोक त्यांच्याविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बाळगून त्यांना देय असलेले श्रेय द्यायलापण नकार देतात हे मला पूर्णपणे माहित असल्यामुळे त्यांच्याविषयीचे तटस्थ अभ्यासातून मी बनविलेले मत मांडणे हा माझ्यापुरता या लेखाचा उद्देश मी वाढविला असे म्हटले तरी चालेल. मी जेवढ्या हिरीरीने राजीव गांधींच्या नव्या काळानुरूप असलेल्या धोरणांचा पुरस्कार करतो तितक्याच हिरीरीने श्रीलंका प्रकरणी त्यांचा विरोधही करतो हे वरील एका प्रतिसादात दिसून आले असेलच. राजीव गांधी खूप खूप थोर आहेत असा म्हणायचा माझा मुळातच उद्देश नाही.माझा उद्देश एकच की त्यांच्या कारभाराचे वस्तुनिष्ठ मुल्यांकन करावे आणि बहुसंख्य लोक त्यांच्यावर टिका करतात त्याचबरोबर त्यांना देय असलेले श्रेयसुध्दा संकोच न करता द्यावे. कोणाही राजकिय/ऐतिहासिक व्यक्तीविषयी पूर्वग्रहदूषित मते ठेवणे ही वस्तुनिष्ठ अभ्यासाची पायरी नव्हे.
मागे मृगनयनी यांच्याच राजीव गांधींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजली वाहायच्या चर्चेत आपण "मुस्लिमांकरता असणारे घटस्फोटविषयक कायदे हे कित्येक मुस्लिम देशांपेक्षा जुनाट, रानटी आणि असंस्कृत आहेत. त्याचे श्रेय ह्या महाभागलाच दिले पाहिजे" हे विधान केले होते. त्यावरील चर्चा मी परत जशीच्या तशी इथे चिकटवत आहे. त्यावेळी तुम्ही उत्तरे द्यायचे टाळले होतेत. ती उत्तरे आता देणार का? (माझा मूळ चर्चेवरील प्रतिसाद: इथे
या वाक्याचा अधिक खुलासा करू शकाल का? माझ्या माहितीप्रमाणे शाहबानो या मुस्लिम महिलेस तिच्या नवऱ्याने ’तलाक’ दिला. शरियतप्रमाणे अशा तलाक दिलेल्या महिलेस पोटगीचा हक्क नाही. पण न्यायालयाने शाहबानोला पोटगी मिळावी असा आदेश दिला. त्यावर मुल्ला मौलवींचे पित्त खवळले आणि त्यांनी आंदोलनाची धमकी दिली. त्यापुढे राजीव सरकार नमले आणि संसदेत कायदा करून न्यायालयाचा निर्णय फिरविण्यात आला. ही माहिती चुकीची असल्यास बरोबर माहिती सांगावी ही विनंती.
काही प्रश्न:
१. राजीव सरकारने न्यायालयाचा निर्णय फिरविण्यापूर्वी या संदर्भातले कायदे कसे होते?
२. राजीव सरकारने निर्णय फिरविल्यामुळे नक्की काय बदल झाला?
३. तुम्ही जे म्हणत आहात त्याप्रमाणे आपल्याकडील कायदे अनेक मुस्लिम देशांमधील कायद्यांपेक्षा जुनाट आणि असंस्कृत आहेत. नक्की कोणत्या मुस्लिम देशांमध्ये आपल्याकडील कायद्यांपेक्षा आधुनिक आणि सुसंस्कृत कायदे आहेत? त्यात नक्की फरक काय?
याविषयी अधिक माहिती दिल्यास बरे होईल.
एकेकाळी मी स्वत: भाजपच्या कळपातला (कदाचित अडवाणी-वाजपेयींपेक्षा) कट्टर समर्थक होतो. त्याकाळी मी पण तसेच म्हणत असे. आणि पूर्णपणे तटस्थपणे विचार केला तर शाहबानो प्रकरणी न्यायालयाचा आदेश फिरविणे अयोग्य होते असे मला वाटते.
आज आपण २०१० मध्ये आहोत आणि चर्चा करत आहोत १९८५-८६ च्या शाहबानो प्रकरणाची म्हणजे २५ वर्षे जुन्या प्रकरणाची. मी आपल्याला आणखी ३५ वर्षे मागे घेऊन जातो. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात डॉ.आंबेडकर कायदामंत्री होते. त्यांनी नेहरू सरकारपुढे ’हिंदू कोड बिल’ आणण्यासाठी पाठपुरावा केला. पंडित नेहरूंचा या बिलाला तत्वत: पाठिंबा होता. तसेच समान नागरी कायदा आणायलाही नेहरूंचा तत्वत: पाठिंबा होता पण फाळणीच्या वेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे त्यांनी समान नागरी कायदा आणायचा निर्णय पुढे ढकलला (संदर्भ: रामचंद्र गुहांचे India After Gandhi हे पुस्तक). आंबेडकरांचे हिंदू कोड बिल हे हिंदू समाजापुरते मर्यादित होते.
आंबेडकरांच्या प्रस्तावित हिंदू कोड बिलाप्रमाणे एकापेक्षा अधिक लग्ने करण्यास बंदी, मुलींना संपत्तीत वाटा देणे, घटस्फोटांना मान्यता, मुली दत्तक घेण्यास परवानगी यासारखे भाग होते. तसेच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हिंदू या शब्दाची व्याख्या जे मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी आणि ज्यू नाहीत ते अशी केली. म्हणजे बौध्द, जैन आणि शीख हे पण हिंदू समुदायाचाच भाग म्हणून गणण्यात येणार होते. तसेच हिंदू समाजाला एक समाज म्हणून (जातींचा उल्लेख न करता) गणण्यात येणार होते. (संदर्भ: एक , दोन )
या प्रस्तावित हिंदू कोड बिलाविरूध्द हिंदुत्ववादी संघटनांनी राळ उठवली. निर्मलचंद्र चॅटर्जी (सोमनाथ चॅटर्जींचे वडिल) आणि शामाप्रसाद मुखर्जी या हिंदुत्ववादी नेत्यांनी हे बिल म्हणजे हिंदू समाजातील कुटुंब आणि विवाहविषयक परंपरांना धोका आहे असे म्हटले. करपात्री महाराजांची रामराज्य परिषद ही संघटना या बिलाविरूध्द केलेल्या आंदोलनातून उभी राहिली. शामाप्रसाद मुखर्जी म्हणाले की सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये काही बदल केलेला नाही. संदर्भ ते म्हणणे तथ्याला धरून होते. यावर पंडित नेहरूंचे उत्तर कोणते होते हे पण याच संदर्भात दिले आहे. पुढील काळात होणाऱ्या आंदोलनांना घाबरून नेहरू सरकारने हिंदू कोड बिल प्रस्तावित स्वरूपात आणले नाही आणि त्याच्या निषेधार्थ डॉ.आंबेडकरांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. नंतरच्या काळात नेहरू सरकारने ४ वेगवेगळी बिले पास केली पण त्यात आंबेडकरांना अभिप्रेत असलेले हिंदू कोड बिल पूर्णपणे नव्हते. राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांचाही या बिलाला विरोध होता.
काही प्रश्न:
१. सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये बदल केले नाहीत हे म्हणणे बरोबरच होते. पण तत्वत: हिंदू कोड बिलात वाईट काय होते? तसाच बदल मुस्लिम कायद्यातही घडवावा असा आग्रह धरणे वेगळे आणि मुस्लिम समाज आपले जुनेपुराणे विचार सोडायला तयार नाही म्हणून आपणही ते सोडणार नाही असे म्हणणे आणि म्हणून बिलाला विरोध करणे वेगळे.
२. हिंदू कोड बिलाला ’आमच्या परंपरांना धक्का लागेल’ असे म्हणून विरोध करणे समर्थनीय होते का?
३. ते समर्थनीय असेल तर मुस्लिम समाजाने न्यायालयाचा निर्णय म्हणजे त्यांच्या परंपरांना लावलेला धक्का असे म्हटले तर त्यात काय बिघडले?
४. राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी मुस्लिम मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले त्याचप्रमाणे नेहरू सरकारने हिंदू मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले असे म्हटले तर काय चुकले?
५. राजीव सरकारने घातलेले लोटांगण हे धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला असेल तर नेहरू सरकारचे लोटांगण हे धर्मांध हिंदूंच्या कफन्या सांभाळायला घातलेले होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?
६. पण स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारे पक्ष असे म्हणत नाहीत. ते का? (अवांतर: हिंदुत्ववादी पक्ष गांधींनी १९१९ मध्ये खिलाफत चळवळीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांच्यावर टिका करतात. पण लोकमान्य टिळकांनी मुस्लिम लीगशी त्यापूर्वी ३ वर्षे केलेल्या लखनौ कराराविषयी मौन का बाळतात? स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांचे सहकार्य मिळावे हा जर टिळकांचा त्यामागचा उद्देश असेल तर तोच उद्देश गांधींचाही होता. मग टिका करताना टिळकांना आपल्या बाजूला ओढून घेऊन केवळ गांधींवर टिका का?)
मला वाटते नेहरू सरकारने हिंदू कोड बिलावर घेतलेली माघार आणि राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी घेतलेली माघार यासारख्या घटनांमागे सरकारचे अतिनेमस्त धोरण कारणीभूत आहे. हिंदू संघटनांनी मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आणि नेहरू नमले. मुस्लिम संघटनांनी मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आणि राजीव गांधी नमले. काही वाटेल ते झाले तरी चालेल कायद्यापुढे धमक्या चालायच्या नाहीत असे ठणकावून दोघांनीही सांगितले नाही. तसेच भारताचे विमान कंदाहारला पळवून नेल्यावर वाजपेयी नमले. काहीही झाले तरी दहशतवाद्यांपुढे लोटांगण घालणार नाही असे वाजपेयी ठणकावून सांगू शकले नाहीत. या सगळ्या घटनांचे कारण -- आपल्या समाजाचा (आणि म्हणून समाजानेच निवडून दिलेल्या सरकारचा) अति नेमस्तपणा हेच आहे असे मला वाटते. एकट्या राजीव-नेहरू-वाजपेयींना तरी का का दोष द्यावा?
या प्रश्नांना तुम्ही मागे उत्तरे द्यायचे टाळले होतेत ती आता देणार का? मी राजीव सरकारच्या शाहबानो प्रकरणाबरोबरच नेहरू सरकारची हिंदू कोड बिलावरील माघारीवरही तितक्याच प्रमाणावर टिका करत आहे.
क्लिंटन
20 Aug 2011 - 2:39 pm | रमताराम
टोपी काढली आहे सायबा.
श्री. विल्यम जेफरसन क्लिंटन यांना इथे दिलेल्या एकाहुन अधिक साक्षेपी नि अभ्यासपूर्ण प्रतिसादांबद्दल आमच्याकडून एक भक्कमशी पार्टी लागू झालेली आहे. इतके तपशीलवार नि नि तरीही मुद्दे धरून प्रतिसाद फारच क्वचितच वाचायला मिळतात. मुद्दे १ ते ६ अतिशय मार्मिक आहेत. पण काय आहे माणूस हा प्राणीच असा आहे ज्याच्याबाबत 'आपला तो बाब्या' हे नेहमीच खरे असते. माझा धर्म बरोबर तुमचा भ्रष्ट, माझं ज्योतिष अचूक तुमची नाडीपट्टी खोटी, आमचे नेते स्वच्छ तुम्ही सगळे भ्रष्ट, आमचे लिखाणातील पुरावे मागायचे नाहीत आहे तसे मान्य करायलाच हवे तुम्ही, तुम्ही कितीही अभ्यासपूर्ण, टीपांसहित लिहिलेत तरी तुमचे संदर्भ खोटे, हा सारा मूर्खपणा सार्वत्रिक आहे, त्याला इलाज नाही. शेवटी काय 'आहे' हे समजून घेण्यापेक्षा काय 'असायला हवे' असे आपल्याला वाटते ते 'आहेच' असा समज करून घेणे सोपे नि डोस्क्याला ताप न देणारे असते साहेब. असा तुमच्यासारखा बयाजवार अब्यास करायला टैम हाय कुनाकडं राव. असो.
पुन्हा एकवार टोपी काढतो आहे. हॅट्स ऑफ सरजी.
20 Aug 2011 - 4:55 pm | चिंतामणी
निदान आपली प्रगती ’राजीव गांधींची टेलिकॉम क्रांती’ हे म्हणण्याइतकी झाली हे पण काही कमी नाही. नाहीतर राजीव गांधींचे बहुसंख्य टिकाकार त्यांच्या यातला वाटाच मुळात नाकारतात.
आज पुणे मुंबई प्रवास करताना फक्त एक्सप्रेस हायवेनेच अजेकजण प्रवास करतात. मुंबईत अनेक फ्लायओव्हर बांधुन वाहतुक खूप प्रमाणात प्रवाही झाली. पण त्या काळात "ही चैन कोणाला परडवणार आहे" असे अनेकजण बेँबीच्या देठापासुन ओरडत असत. वाजपेयीच्या काळात राष्ट्रीय महामार्ग आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना इत्यादीमुळे रस्ते मोठे व वाहतुक वेगाने होउ लागली. त्या काळात महागाई नव्हतीच असे म्हणले तर वावगे होउ नये. या आणि अश्या अनेक गोष्टी चांगल्या झाल्या होत्या. त्याला "चांगले" असे म्हणले का कधी त्यांच्या विरोधकांनी. तुझ्याच शब्दात सांगायचे तर "त्यात त्यांना यश पूर्णपणे आले नाही म्हणून त्यांच्या मूळ उद्देशालाच नाकारणे योग्य नाही."
काही प्रश्न:
१. सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये बदल केले नाहीत हे म्हणणे बरोबरच होते. पण तत्वत: हिंदू कोड बिलात वाईट काय होते?
मा. आंबेडकरांनी मांडलेल्या बिलात काय काय तरतुदी होत्या आणि पं.नेहरूनी त्यांनी त्या बिलात (तु म्हणतो त्या प्रमाणे- हिंदूववादी संघटनांनी राळ उठवल्याने) जे बदल केले याचे तपशील तुला स्वत:ला माहीत आहेत काय????
२. हिंदू कोड बिलाला ’आमच्या परंपरांना धक्का लागेल’ असे म्हणून विरोध करणे समर्थनीय होते का?
कोणी समर्थन केले (मुकर्जी आणि चटर्जी यांचे व्यतिरीक्त) याचा आणि हिंदू कोड बिलातील कोणत्या तरतुदींविरूध्द राळ उठवली याचा तपशील मिळाल्यावर मत व्यक्त केले जाईल.
३. ते समर्थनीय असेल तर मुस्लिम समाजाने न्यायालयाचा निर्णय म्हणजे त्यांच्या परंपरांना लावलेला धक्का असे म्हटले तर त्यात काय बिघडले?
म्हणजे येथे कायदा निदान १९४७सालापासून अस्तीत्वात होता. नवीन कायदा केला त्या आधारे निर्णय दिला असे तर नव्हते. फक्त तो पर्यन्त कोणिही कोर्टात जाउन पोटगी मागीतली नव्हती. ती शहाबानोनी कायद्याला धरून मागीतली होती.
तोडे विषयांतर होइल. पण आवश्यक आहे म्हणून विचारतो, कोर्ट अस्तीत्वात असताना "शरीयतप्रमाणे" निवाडा करणे योग्य आहे का? एकाच देशात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे कायदे हे तत्व मान्य आहे का तुला?????
४. राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी मुस्लिम मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले त्याचप्रमाणे नेहरू सरकारने हिंदू मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले असे म्हटले तर काय चुकले?
५. राजीव सरकारने घातलेले लोटांगण हे धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला असेल तर नेहरू सरकारचे लोटांगण हे धर्मांध हिंदूंच्या कफन्या सांभाळायला घातलेले होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?
वरील दोन्ही प्रश्णांचे उत्तर प्र.दोनला दिलेल्या उत्तराप्रमाणेच.
६. पण स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारे पक्ष असे म्हणत नाहीत. ते का? (अवांतर: हिंदुत्ववादी पक्ष गांधींनी १९१९ मध्ये खिलाफत चळवळीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांच्यावर टिका करतात. पण लोकमान्य टिळकांनी मुस्लिम लीगशी त्यापूर्वी ३ वर्षे केलेल्या लखनौ कराराविषयी मौन का बाळतात? स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांचे सहकार्य मिळावे हा जर टिळकांचा त्यामागचा उद्देश असेल तर तोच उद्देश गांधींचाही होता. मग टिका करताना टिळकांना आपल्या बाजूला ओढून घेऊन केवळ गांधींवर टिका का?)
तु ज्यापध्दतीने तुलना करीत आहेस ते बघता असे दिसत आहे की "खिलाफत चळवळ काय होती ते कदाचीत पुर्णपणे माहीत नसावे. आणि कदाचीत "लखनौ करारा विषयीसुद्धा हीच परीस्थीत असावे असे वाटते. म्हणून मत देत नाही. [ए. जी. (अब्दुल गफूर) नूरानी यांनी टिळक आणि जीना या दोघांच्या संबंधांवर एक ग्रंथ लिहिला आहे. ‘जीना अॅण्ड टिळक- कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’ त्यात लखनौ कराराविषयी सर्वात अधीकृत माहिती वाचायला मिळेल]
21 Aug 2010 - 3:38 am | बेसनलाडू
विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम ही मंडळी गुगल, अॅपल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट च्या डोळ्यासमोर तारे चमकतील असे नवनवे शोध लावत आहेत!
पडलोच! भारी!!
(विनोदी)बेसनलाडू
21 Aug 2010 - 6:36 pm | विंजिनेर
ठार मेलो! हुच्च!
20 Aug 2010 - 10:57 pm | शशिकांत ओक
कै. राजीवजींच्या जन्मदिनाबद्दल संस्मरण
20 Aug 2010 - 11:10 pm | मृत्युन्जय
हो आणि त्यांच्यामुळेच भारता बोफोर्स तोफा आल्या. त्यांचा कारगिलच्या युद्धात किती उपयोग झाला महितीये? भारतात जागतिकीकरणाचे वारे पण त्यांच्यामुळेच वाहायला लागले हे पण मान्य करायला लागेल.
21 Aug 2010 - 2:19 am | हुप्प्या
मला वाटते भारतीयांचा उद्धार करायला राजीवजींच्या रुपाने एक प्रेषितच देवाने भारतात धाडला. एका हातात टेलिफोन दुसर्या हातात संगणक, मागल्या खिशात कीबोर्ड आणि माऊस, कंबरेला सगळ्यांकरता केबल्स अशा अवतारात मारुती कारमधे स्वार होऊन हा महात्मा भारतात आला. (नंतर बहुधा स्वर्गात शोस्टॉपर बग आल्यामुळे देवाने त्यांना घाईघाईने परत बोलावले.) जाण्यापूर्वी चोरखिशात ठेवलेला एक मोबाईल फोन त्यांनी सोनियाजींना दिला आणि त्यामुळेच आपल्या देशात मोबाईलची क्रांती आली.
मोझेस जसा दहा देवाज्ञा लिहिलेल्या शिळा घेऊन भूतलावर आला तसेच राजीवजीही नव्या युगाच्या शिळा घेऊन आले!
आता राहुलजींमुळे गुगल, फेसबुक, आयफोन आणि अॅण्ड्रॉईडची क्राती येत आहे. तीन पिढ्या एकहाती अशी क्रांती घडवतायत असे दृश्य भूतलावर कुठेतरी पहायला मिळेल का?
21 Aug 2010 - 8:11 am | llपुण्याचे पेशवेll
राजीवजी दिसायला हॅन्डसम होते. म्हणून बर्याच बायकाना ते आवडायचे असे ऐकून आहे.
21 Aug 2010 - 11:48 am | अप्पा जोगळेकर
राजीवजी दिसायला हॅन्डसम होते. म्हणून बर्याच बायकाना ते आवडायचे असे ऐकून आहे.
धाग्याच्या शीर्षकातच मिस यु, लव्ह यु असं 'हरणासारखे डोळे' असलेल्या बाईंनी लिहिलं आहे. त्यावरुनच काय ते समजून जा.
21 Aug 2010 - 12:03 pm | मृगनयनी
धाग्याच्या शीर्षकातच मिस यु, लव्ह यु असं 'हरणासारखे डोळे' असलेल्या बाईंनी लिहिलं आहे. त्यावरुनच काय ते समजून जा.
हा हा हा हा हा !!!
आप्पा!, राजीव'जी गेले...तेव्हा मी ४-५ वर्षांची होते हो फक्त! ;)
पण तेव्हादेखील मला त्यांचे व्यक्तिमत्व आवडायचे! :)
:)
21 Aug 2010 - 1:06 pm | wings
gr8!.. I think I was li'l too dumb! when Rajeevji expired , I was 6-7 yrs old.. but I don't remember anything of that time..!!
21 Aug 2010 - 1:18 pm | मृगनयनी
पंख्या उर्फ wings... :)
तुमच्याकडे टी.व्ही. पण नव्हता.. का तेव्हा? कारण टीव्ही'वर राजीव'जींचे सगळे अन्त्यविधी दाखवत होते!
रस्तोरस्ती.. लोक मूकमोर्चा काढत होते....
आमच्या पुण्यात देखील अनेक मुस्लिम लोक "नाचणीच्या भाकरी"ला करतात... तसा आक्रोश करत होते! ;)
_________
आणि तुम्ही तेव्हा ६-७ वर्षांचे होतात... म्हणजे १ली किन्वा २ रीत नक्की असणार!
आणि २ रीत असूनही तुम्हाला काही आठवत असेल... तर तुम्ही नक्कीच मठ्ठ असणार! ;)
_________
21 Aug 2010 - 2:55 pm | मृत्युन्जय
तुमच्याकडे टी.व्ही. पण नव्हता.. का तेव्हा? कारण टीव्ही'वर राजीव'जींचे सगळे अन्त्यविधी दाखवत होते!
अंत्यविधी बघता बघता आवडले तुम्हाला ते?
21 Aug 2010 - 5:23 pm | भारतीय
पंख्या उर्फ wings..
म्हणजे आम्हीच बरं का! भ्रमणध्वनीचा ऊपयोग करून मिपावर असलो कि आम्ही wings असतो! तेंव्हा फक्त वाचनमात्र असतो पण 'हरणांसारखे डोळे' असणार्या व्यक्ती जेंव्हा असामान्य प्रतिसाद देतात तेंव्हा रहावत नाही हो! असो..
>>तुमच्याकडे टी.व्ही. पण नव्हता.. का तेव्हा? कारण टीव्ही'वर राजीव'जींचे सगळे अन्त्यविधी दाखवत होते!
आम्ही खेड्यात वाढलेले ! राजीवजींची क्रांती आमच्याकडे पोहोचायला १९९२ ऊजाडले व आमच्याकडे टी.व्ही. आला..!! पण दै. सकाळ मात्र मी जन्मायच्या अगोदरपासून घरी येत असे... त्यात राजीवजींना 'व्यवस्थित' कव्हर केले नसावे का? (केलेच असेल्...कदाचित आम्हीच मठ्ठ असू! किंवा मी 'मुलगी' व त्यातही 'हरणांचे डोळे' नसल्याने रजीवजींच्या फोटोकडे लक्षच गेले नसावे!)
>>आमच्या पुण्यात देखील अनेक मुस्लिम लोक "नाचणीच्या भाकरी"ला करतात... तसा आक्रोश करत होते
पुणे आमचे देखील बरं का.. गेली १५ वर्षे पुणेच आहे आमच्या आयुष्यात!
बाकी आम्ही मठ्ठ हे एकदम मान्य! ;)
21 Aug 2010 - 6:23 pm | मृगनयनी
अय्या!... माझ्या हरणासारख्या डोळ्यांना फारच प्रसिद्धी मिळतेय बुवा! ;)
__________________________________
असो... भारतीय पंखा..... उपयुक्त माहितीबद्दल आभारी आहे....
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
अजून काही नवी माहिती असेल... राजीव'जींबद्दल.. तर कृपया इथे टंका... संकोच करू नका.....
तुम्ही "भारतीय" असल्याने तुम्हाला घटनेने आणि मिसळपावच्या सम्पादकीय महा-मन्डळाने इथे टंकण्याचा अधिकार दिलेला आहे....
___
हुश्श!
:)
---
मन्डळ आभारी आहे...
__
सर्वांना विकान्ताच्या शुभेच्छा! :)
21 Aug 2010 - 1:53 pm | सुनील
राजीव गांधींमुळे भारतात संगणकक्रांती झाली हे साफ़ चूक आहे. आमच्याकडे संगणक पूर्वीच होते. इतकेच काय, मोबाईल, विमाने इ. सगळे सगळे काही होते. (नाहीतर, अयोद्धेपासून थेट लंकेपर्यंत राम गूगलमॅपशिवाय जाऊ कसा शकेल?)
परंतु, उदो उदो होतो तो केवळ राजघराण्याचा! कारण पाठ्यपुस्तकेच!.
म्हणून आम्ही ही पाठ्यपुस्तकेच बदलायला निघालो होतो, पण जनतेने आम्हाला लागोपाठ दोन वेळा शत-प्रतिशत घरी बसवले!
तरीही आम्ही हिंमत सोडली नाही. जमेल तिथे, जमेल तितक्या वेळा, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रयक्ष, कधी बोंबलून तर कधी कुजबुजून, आम्ही राजघराण्याविरुद्ध शंख करायचे काही सोडले नाही.
पण हाय रे दैवा! त्यांची चौथी पिढीच काय पण बाहेरून आलेली सूनदेखिल लोकप्रियता कमावत आहे.
पण आम्ही हिंमत सोडणार नाही. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा गर्व महत्त्वाचा हे जनतेला एक दिवस कळेलच.
बद्धकोष्ठ्बापूंचा राम आमचे युद्ध लढायला येणार आणि रावण मरणार, निश्चित!
21 Aug 2010 - 2:09 pm | मृगनयनी
पण आम्ही हिंमत सोडणार नाही. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा गर्व महत्त्वाचा हे जनतेला एक दिवस कळेलच.
इतकाही गर्व करू नका... कारण गर्वाचं घर खाली असतं! ;) ;) ;)
आणि हो, राजीव गांधी, राजघराणे आणि पाठ्यपुस्तके असा एक वेगळा धागा काढून तिथे
(अ)विचारप्रदर्शन करा..
इथे "राजीव गांधीं " बद्दल काही माहिती असेल. तर सांगू शकता....
बद्धकोष्ठता झाली असेल, तर "ऑम्लेट" खाणं कमी करा....
नैतर उगीच नन्तर पाण्याच प्रॉब्लेम झाला... तर आमच्या बापूंचेच नाव घ्यावे लागेल!
21 Aug 2010 - 3:28 pm | सुनील
कारण गर्वाचं घर खाली असतं
हे बाकी बरोबर! शायनिंग अहुजाचं काय झालं बघितलत ना?
इथे "राजीव गांधीं " बद्दल काही माहिती असेल
नाय बॉ! आम्ही काही वाचत-बिचत नाही. खोटं कशाला बोला? हां पण आमची मतं बाकी एकदम ठाम बर्रका!! अजिबात बदलायची नाहीत ती! (गुर्जींची शिकवणच तशी!)
"ऑम्लेट" खाणं कमी करा
आरारारारारारारा....
श्रावणात आमलेट? छ्या छ्या भलतच काय? श्रावणात आम्ही फक्त पिठलं खातो!
(हां, आता पिठल्यातल्या मिरच्या कुणाला झोंबल्या तर आम्ही काय करू शकत नाय बॉ!)
21 Aug 2010 - 3:40 pm | मृगनयनी
नाय बॉ! आम्ही काही वाचत-बिचत नाही. खोटं कशाला बोला? हां पण आमची मतं बाकी एकदम ठाम बर्रका!! अजिबात बदलायची नाहीत ती! (गुर्जींची शिकवणच तशी!)
ह्म्म्म!... वाचत बिचत नसलात, तरी "एखाद-दुसरी यत्ता" तरी शाळंला गेला असाल की न्हायी! ;)
म्हणजे अक्षरओळख आहे.. असं गृहित धरायला हरकत नसावी!
__
सांगायचा मुद्दा इतकाच, की राजीव गांधींव्यतिरिक्त काही लिहायचं असेल.. तर आपण नवीन धागा उघडु शकता! :)
_______________
"ऑम्लेट" खाणं कमी करा
आरारारारारारारा....
श्रावणात आमलेट? छ्या छ्या भलतच काय? श्रावणात आम्ही फक्त पिठलं खातो!
अरे बापरे!... श्रावणात कान्दा-लसूण खाता तुम्ही ? चातुर्मास पाळत नाही वाटतं?
असू दे.. असू दे! ... "ऑम्लेट्"पेक्षा बरं हो! ;)
(हां, आता पिठल्यातल्या मिरच्या कुणाला झोंबल्या तर आम्ही काय करू शकत नाय बॉ!)
आता "खाता" तुम्ही.. म्हणजे "झोम्बणार" तुम्हालाच की! ;)
आणि नन्तर.....पाण्याची सोय तेवढी करून ठेवा! ;) ;) .. तुमच्यासाठीच हो!
नाहीतर व्हायचं "गर्वाचं घर खाली!" =)) ;)
21 Aug 2010 - 3:41 pm | क्लिंटन
गांधी घराण्याने फारसे कर्तृत्व दाखविलेले नाही असा ’शतप्रतिशत’ दावा असेल तर तो मुद्दा जनतेपुढे नेटाने लावून न धरता जो भाजपवाल्यांचा आक्रस्ताळेपणा चालतो त्यामुळे गांधी घराण्याला फारसे काही परिश्रम न घेताच जनतेची सहानुभूती मिळते आणि अनेकदा त्याचेच रूपांतर मतांमध्येही होते.
इंदिरा गांधींच्या हत्येवरील या डॉक्युमेन्टरीमध्ये (किंवा डॉक्युमेन्टरीच्या १० पैकी दुसऱ्या कोणत्या भागात) सोनिया गांधींचा राजीव गांधींना पंतप्रधान व्हायला मुळातच विरोध होता असे स्पष्टपणे म्हटले आहे.तसेच निकोलस न्यूजंट यांनी लिहिलेल्या राजीव गांधींच्या चरित्रातही तसेच म्हटल्याचे वाचले आहे. राजीव गांधींनी मोठ्या प्रयासाने सोनिया गांधींची समजूत काढली. अन्यत्र एका मुलाखतीत सोनिया गांधींनी त्यांचा राजीव गांधींना पंतप्रधान व्हायला विरोध का होता याचे उत्तर दिले आहे. त्याचा नक्की दुवा माझ्याकडे नाही पण ती मुलाखत इंग्रजी चॅनेलवर मी बघितली होती.त्यात सोनिया गांधी म्हणतात--’ऑपरेशन ब्लू स्टारनंतर इंदिरा गांधींना आपले दिवस भारले आहेत हे जाणवले आणि तसे त्यांनी राजीव-सोनियांना अनेकदा बोलूनही दाखविले होते.३१ ऑक्टोबर १९८४ रोजी ती भिती प्रत्यक्षात उतरली आणि राजीव पंतप्रधान झाल्यास एकनाएक दिवस त्यांनाही असेच मारतील अशी भिती मला वाटत होती. आणि राजीव पंतप्रधान झाल्यानंतर मी माझ्या मनाची तयारी पण करून ठेवली की राजीव गांधींची पण एकनाएक दिवस अशीच हत्या होणार!’ अर्थात सोनियांनी १९९९ मध्ये शरद पवारांना पक्षातून का काढले किंवा २००४ मध्ये पहिल्यांदा खासदारांची यादी घेऊन राष्ट्रपतींकडे गेलेल्या सोनिया गांधी नंतर अचानक का बदलल्या असे काही अनुत्तरीत प्रश्न आहेत.पण अशा मुद्द्यांवर जनतेचे लक्ष वेधायचे सोडून भाजप व्यक्तिगत पातळीवर जाऊन सोनियांवर आरोप करतो आणि ज्या पध्दतीने सोनिया या वैयक्तिक प्रचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात यातून जनतेच्या मनात भाजपची प्रतिमा डागाळते आणि सोनियांची अधिक उजळते यात शंका नाही.
दुसरे म्हणजे ’राजीव गांधी देशाला खड्ड्यात घालून एक दिवस इटलीला पळून जाणार’ हे उद्गार मी अगदी माझ्या घरी, नातेवाईकांमध्येही ऐकले आहेत.१९८९ मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बोफोर्स प्रकरणातून वाचण्यासाठी राजीव गांधी इटलीला पळून जाणार हे अशा मंडळींनी अगदी गृहितच धरले होते.जणू काही राजीव गांधींना देशाबाहेर न्यायला दिल्ली विमानतळावर विमान तयारच आहे अशा थाटात अशा मंडळींना मी बोलताना बघितले आहे. अर्थातच तसे काही झाले नाही. नंतरच्या काळात राजीव गांधी तर गेलेच. त्यानंतरही सोनिया गांधी नाही त्या इटलीला पळून गेल्या? लग्न झाल्यानंतर स्त्रीने पतीच्या घराला आपले घर मानणे हीच भारतीय संस्कृती ना?इतकेच नव्हे तर पतीचे निधन झाल्यानंतरही त्या स्त्रीने त्या घराला अंतर न देणे ही पण भारतीय संस्कृती ना?त्यावेळी त्या इटलीला पळून गेल्या असत्या तर कोण काय बोलू शकणार होते? पण सोनिया गांधींनी ते केले नाही. (यावर त्यांची हांजीहांजी करायला दिल्लीत जसे हजारो लोक तत्पर होते तसे रोममध्ये नव्हते असे म्हणणारे महाभाग निघतीलच). याउलट पतीचे निधन झालेल्या (किंवा इतर कोणाही) स्त्रीवर वैयक्तिक पातळीवर जाऊन घाणेरडे आरोप करणे ही भारतीय संस्कृती अजिबात नाही. प्रमोद महाजनांनी तर एका परिने सोनिया गांधी आणि मोनिका ल्युईन्स्कीची तुलना १९९९ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती असे वाचल्याचे आठवते.
मी सोनिया गांधी समर्थक अजिबात नाही.पण या काही गोष्टी मला जरूर खटकतात. स्वत:ला भारतीय संस्कृतीचे मोठे पाईक समजणाऱ्या पक्षाकडून असे भारतीय संस्कृतीविरूध्द वर्तन करणे आणि सोनिया गांधी त्याकडे जाणीवपूर्वक पूर्णपणे दुर्लक्ष करतात यातूनच सोनिया गांधींना आपोआप जनतेची सहानूभूती आणि मते मिळतात.
क्लिंटन
21 Aug 2010 - 3:47 pm | मृगनयनी
क्लिन्टन्'जी तुमचा व्यासंग दांडगा आहे! :)
मला तुमच्याविषयी आदर वाटतो! :)
20 Aug 2011 - 3:30 pm | मराठी_माणूस
त्यानंतरही सोनिया गांधी नाही त्या इटलीला पळून गेल्या? लग्न झाल्यानंतर स्त्रीने पतीच्या घराला आपले घर मानणे हीच भारतीय संस्कृती ना?इतकेच नव्हे तर पतीचे निधन झाल्यानंतरही त्या स्त्रीने त्या घराला अंतर न देणे ही पण भारतीय संस्कृती ना?त्यावेळी त्या इटलीला पळून गेल्या असत्या तर कोण काय बोलू शकणार होते? पण सोनिया गांधींनी ते केले नाही.
हा वरवरचा मुलामा आहे, सामान्य लोकांसाठीचा भावनिक मुद्दा आहे. मूळात प्रचंड सत्तेचा मोह टाळता आला नाही. राहुलला पुरेसे सेट होईपर्यंत सत्ता स्वतःच्या घराण्याकडेच सलग राहीली पाहीजे हा हेतु आहे.
(अवांतर : पंतप्रधान पद नाकारणे , हा पण राजकारणाचाच भाग आहे कारण पीएम कोणीही असुदे , आपण चालवु तसेच चालणार हा विश्वास आहे(कारण उर्वरीत लोक बिन कण्याचे आहेत हे माहीत आहे). सेनेत त्याल उघडपणे रीमोट म्हटले जाते. इथे म्हटले जात नाहे इतकाच फरक)
21 Aug 2010 - 5:44 pm | वेताळ
पण तामिळ वाघानी राजीव गांधीची हत्या करुन एक मोठी घोडचुक केली असे कायम वाटते.कारण त्यावेळी राजीव गांधी हत्या झाली नसती तर आज देशाचे चित्र खरोखर वेगळे दिसले असते.निव्वळ सहानुभुतीवर ह्या कॉग्रेस कंरट्याच्या हातात त्यावेळी सत्ता मिळाली.
पण ते देखणे होते हे जर एकच क्वॉलीफिकेशन त्याना लावायचे म्हटले तर आज कित्येक देखणे नट बॉलीवुड मध्ये काम करतात त्यापैकी एकाला कराना भारताचा पंतप्रधान..मग उजेड काय पाडतात ते दिसेल.राजीव गांधी जर गांधी नसते तर ते एक उच्चवर्तुळात वावरणारे वैमानिक इतकीच त्याची ओळख असती.
क्लिंटन साहेब खरोखर जर चांगला राजकारणी व जनतेबद्दल काम करणारा नेता निवडायचा झाला तर नरेंद्र मोदी खेरीज आज कोणी नाही.दलीत कुटुंबात जेवणे,लोकल मधुन बोंबलत फिरणे,उगाच काम नसल्या प्रमाणे आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या घराला भेट देणे (नवल म्हणजे ज्या ठिकाणी ह्याचे सरकार गेली १० ते १५ वर्षे आहे त्या आंध्र व महाराष्ट्रात ज्यादा शेतकरी आत्महत्या करतात) असली कामे म्हणजे जनतेच्या भावनाशी खेळुन ,लोंकाच्या डोळ्यात धुळफेक करणे व सत्तेत टिकुन राहणे इतकेच ह्या कुटुंबाचे आजपर्यतचे उद्योग आहेत.
21 Aug 2010 - 6:17 pm | क्लिंटन
राजीव गांधी देखणे किंवा चांगल्या व्यक्तीमत्वाचे होते हा मुद्दा माझ्या लेखी तरी पूर्णपणे बाद आहे.कोणाही राजकिय व्यक्तीचे मूल्यमापन करताना त्या व्यक्तीचा चेहरा किती चांगला किंवा वाईट होता हा मुद्दा मी आजपर्यंत कधीही ध्यानात घेतलेला नाही आणि यापुढेही घेणार नाही. दुसरे म्हणजे आपल्या राज्यपध्दतीत वय वर्षे २५ पूर्ण केलेल्या आणि लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असलेल्या कोणाही भारतीय नागरिकास पंतप्रधान बनता येते. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर कॉंग्रेस संसदीय पक्षाने त्यांना रितसर नेता निवडले होते.त्यावेळी कॉंग्रेस पक्षाकडे लोकसभेत बहुमत होते त्यामुळे त्या पक्षाचा संसदेतील नेता आपोआप पंतप्रधान बनायला पात्र होता. तसेच १९८४ च्या निवडणुकांमध्ये त्यांना लोकसभेत बहुमत प्राप्त झाले होते त्यामुळे त्यांना पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नव्हते. आजसुध्दा हृतिक रोशनला किंवा तत्सम चेहऱ्याच्या इतर कोणालाही लोकसभेत बहुमत असेल तर त्यालाही पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.त्यामागे त्या माणसाचा चेहरा नव्हे तर लोकसभेतील बहुमत हाच एक निकष असेल.
उच्च वर्तुळात वावरणारे का एक सामान्य वैमानिक यापेक्षा त्यांची ओळख जास्त नसती.किंबहुना गांधी म्हणून जन्माला येऊनही आपली ओळख त्यापेक्षा जास्त असावी ही महत्वाकांक्षा मुळातच त्यांना नव्हती. त्यांच्या ’महान’ बंधुराजांच्या कर्तृत्वाशी तुलना केल्यास ही गोष्ट लगेच लक्षात येते.पण हे सांगण्यामागचा तुमचा उद्देश काय हे लक्षात येत नाही.वर म्हटल्याप्रमाणे ते पंतप्रधान का झाले? कारण त्यांच्यामागे लोकसभेत बहुमत होते.ते गांधी घराण्यात जन्माला आले म्हणून नव्हे. १९८९ च्या निवडणुकींनंतर ते पंतप्रधान का बनू शकले नाहीत? कारण त्यांच्याकडे लोकसभेत बहुमत नव्हते. अशावेळी ’गांधी’ घराण्यातील असणे हे ’क्वालिफिकेशन’ उपयोगी पडले का?तरीही लोक त्यांच्या पंतप्रधान बनण्याशी घराणेशाहीचा संबंध जोडतात ते मला पटत नाही.
असे तुम्हाला वाटते.तेच मत मतदान यंत्रांमधून व्यक्त झाले आणि नरेंद्र मोदी त्याच्याआधी तुरूंगात गेलेले नसतील तर जरूर पंतप्रधान होतील.
पण अजून तरी भारतातील बहुसंख्य मतदारांचे मत ते नाही याचे काय?लोकशाही हा आकड्याचा खेळ असतो.ज्यावेळी बहुसंख्य मतदारांचे तेच मत होईल तेव्हा कॉंग्रेस पक्षाचा आपोआपच पराभव होईल.पण विरोधी पक्ष अजूनतरी असा मुद्देसूद प्रचार करून जनतेत जाऊन आपली बाजू मांडत आहेत असे दिसत नाही.
21 Aug 2010 - 6:44 pm | वेताळ
तोच न्याय जर राजीव गांधीना लावला तर?????
नरेंद्रमोदीनी जर काही गुन्हा केला असेल व त्यात ते दोषी आढळले तर त्याना जरुर तुरुंगात पाठवावे. मी काही नरेंद्र मोदींचा किंवा भाजपाचा हिंतचिंतक आहे असे काही नाही.मोदीनी जर गुजरात दंगलीत निरपराध लोकांच्या हत्या घडवण्यात हातभार लावला असला तरी आज सामान्य गुजराती त्याना काय समजतो? तुम्ही अमहदाबाद मध्ये आहात म्हणुन हे तुम्हाला विचारतो आहे.
त्यानी आज गुजरात मध्ये खरोखरीच खुप आमुलाग्रबद्दल घडवुन आणले आहेत. मोदी हे कोणत्याही घराण्याशी संबधित नाहीत तरीही भारतातील सर्व मुख्य उद्योग घराण्याना व विकासप्रेमी लोकांना तेच देशाचे पंतप्रधान व्हावे असे का वाटते?
दुसरी बाजु.. राजीव गांधीची हत्या नेमक्या कोणत्या कारणा साठी झाली होती? त्यानी भारतीय शांतीसेना श्रीलंकेत पाठवुन तामिळ लोकांचे हत्याकांड घडवुन आणले व निरपराध तामिळींवर अत्याचार झाले त्याला तेच जबाबदार होते.आज जर सुदैवाने राजीव गांधी जर जिवंत असते तर कोणी त्याच्या विरुध्द सीबीआयचा हत्यारा सारखा वापर करुन तामिळवाघांच्या हत्याकांडाला त्याना जबाबदार ठरवु शकला असता. मग राजीव गांधीना शिक्षा झाली नसती कशावरुन? हे जर तरचे प्रश्न आहेत.दोन्ही नेत्यांची कारकिर्द तपासली तर राजीव गांधी हे नशीबवान राजकारणी होते जे नंतर कमनशीबी ठरले व मोदी नशीबवान राजकारणी आहेत त्याला त्यानी कर्तुत्वाची खुप मोठी जोड दिली आहे.
21 Aug 2010 - 6:47 pm | अर्धवट
अनपेक्षीत धाग्यावरची चांगली चर्चा वाचतोय.. फक्त इथं अडखळलो.
>>त्यानी भारतीय शांतीसेना श्रीलंकेत पाठवुन तामिळ लोकांचे हत्याकांड घडवुन आणले व निरपराध तामिळींवर अत्याचार झाले त्याला तेच जबाबदार होते.
आजच कळतय मला.. (बाकी आमच 'सखोल' ज्ञान बघता आश्चर्य नाही म्हणा.) पण अजुन जरा माहिती कळाली तर बरं होइल
21 Aug 2010 - 7:03 pm | वेताळ
कायदा जोपर्यंत तुम्हाला दोषी ठरवत नही तो पर्यत तुम्हाला गुन्हेगार म्हणता येत नाही.मी वर जो मुद्दा मांडला आहे तो जर तर चा आहे.राजीव गांधीची हत्या कोणत्या कारणासाठी झाली? ती नक्कीच वैयक्तिक वादातुन झालेली नाही.त्याचा शांतीसेना पाठवण्याचा जो निर्णय होता,त्यातुन जी तामिळवाघाची हत्या श्रीलंकेत भारतिय सेनेकडुन झाली त्यामुळे बिथरुन जावुन तामिळी वाघानी त्याची हत्या घडवुन आणली.राजीव गांधीची हत्या ज्या मानवी बॉम्बने घडवुन आणली त्या मुलीच्या बहिणीवर लंकेत शांतीसेनेकडुन अत्याचार झाले होते म्हणुन ती सहभागी झाली होती असे त्यावेळच्या पेपरात मी वाचले होते.राजीव गांधीची हत्या झाली त्यावेळी मी देखिल लहान होतो व थोडेफार कळत देखिल होते.मी देखिल त्यावेळी खुपच भावनावश झालो होतो.म्हणुनच त्याची हत्या एक घोडचुक होती असे मी वर म्हटले देखिल आहे.
पण आज जो कॉग्रेस वाल्यानी सीबीआयचा तपासाचा ससेमिरा आपल्या विरोधकांच्या मागे लावुन आपल्याला हवे ते साध्य करण्याचा पायंडा पाडला आहे. तसा कोणीही सीबीआयचा वापर करुन शांतीसेना लंकेत पाठवायला राजीव गांधी जबाबदार होते व त दोषी आहेत असा निष्कर्श काढला असता.
मी फक्त जर तर असा उल्लेख वर मुद्दामहुन केला आहे.राजीव गांधी लंकेतील तामिळवाघाच्या नाशाला कितपत कारणीभुत होते कि नाही त्याचे सविस्तर उत्तर निदन आजतरी मी तुम्हाला देवु शकत नाही.
21 Aug 2010 - 7:30 pm | क्लिंटन
मोदींनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणला आहे हे उघडच आहे.अगदी कच्छच्या वाळवंटात त्यांनी पिण्याचे पाणी नेऊन पोहोचवले आहे. अंबानी, रतन टाटा यासारख्यांनी मोदींची जाहिरपणे तारिफ केली आहे. २००३ मध्ये आमच्या आय.आय.एम मध्ये येऊन आझीम प्रेमजींनी मोदींवर टिका केली होती पण काही दिवसांपूर्वी याच आझीम प्रेमजींनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. यात दोन मुद्दे आहेत.
पहिला मुद्दा म्हणजे गोध्रासारखी महाभयंकर घटना घडूनही मरणारे हिंदू होते म्हणून की काय पण तथाकथित धर्मनिरपेक्ष मिडिया आणि राजकिय पक्षांनी गोध्रावर चकार शब्द न काढता दुसऱ्या दिवशी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पावर जास्त लक्ष केंद्रित केले.गुजरात गांधींजींचा असूनही जातीय दंगलींची मोठी पार्श्वभूमी राज्याला आहे. १९६९ मध्ये चार महिने दंगली चालू होत्या आणि शेवटी खान अब्दुल गफार खानांना बोलावून घेऊन त्यांच्याकरवी शांततेचे आवाहन करावे लागले होते. तसेच १९८५ आणि १९९२-९३ मध्येही दंगली मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या.अशा परिस्थितीत जो भडका उडाला तेव्हा नरेन्द्र मोदीच काय अगदी शंकरसिंह वाघेला जरी मुख्यमंत्री असते तरी किती उपयोग झाला असता हे त्या भगवंतालाच ठाऊक. तरीही या दंगलींमध्ये मोदींनी खरोखरच भाग घेतला होता का हे अजून तरी सिध्द झालेले नाही.वर्तमानपत्रातील बातम्यांप्रमाणे तरी एहसान जाफरी हत्या आणि गुलबर्ग सोसायटी प्रकरणी ते अडचणीत यायची शक्यता आहे.एहसान जाफरींनी संरक्षणाची मागणी फोन करून केली असता त्यांना फोनवर शिवीगाळ करणे आणि ’मरा मी काही तुम्हाला संरक्षण देणार नाही’ असे मोदींनी म्हटल्याचे वर्तमानपत्रांमध्ये वाचनात आले आहे. कायद्याच्या दृष्टीने यातून मोदींवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका जरूर ठेवता येईल पण त्यांचा दंगलीत प्रत्यक्ष हात होता हे सिध्द करता येईल की नाही यासाठी काही महिने थांबावे लागेल. पण तसा हात मोदींचा असेल तर मात्र त्यांना तुरूंगात जावेच लागेल.
दुसरा मुद्दा म्हणजे मोदी विरोधकांचे म्हणणे असे की मोदींची पक्की खात्री आहे की मुख्यमंत्रीपदावरून दूर होताच त्यांना तुरूंगात जावे लागेल.म्हणून त्यांना मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करणे भागच आहे.कारण तिकडे जर आळस केला तर किंमत आहे तुरूंगवासाची!
या प्रकरणी कायद्याला मान्य असेल ते होईल.मोदींचे नशीब चांगले असेल तर ते तुरूंगात जायच्या आधी पंतप्रधान होतीलही.आणि ते पंतप्रधान झाले तर निदान विकासाच्या बाबतीत तरी गुजरात मॉडेल त्यांनी देशभरात राबवावे असेच मला वाटते.
अगदी इंदिरा गांधी, एम.जी.रामचंद्रन यांनी एल.टी.टी.ई ला अनूकूल भूमिका घेतली होती.इतकेच काय तर मे १९८७ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना जाफनामध्ये श्रीलंकन सैन्याने एल.टी.टी.ई ची कोंडी केल्यानंतर भारतीय हवाईदलाच्या विमानांनी श्रीलंकेची हवाईहद्द ओलांडून तामिळ लोकांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन होत आहे या नावाखाली अनेक टन धान्य आणि इतर सामुग्री टाकली होती.परराष्ट्र राज्यमंत्री नटवर सिंह यांनी श्रीलंकेच्या दिल्लीतील राजदूतास बोलावून घेऊन ’आमची विमाने तुमच्या देशात जाऊन तामिळ लोकांना मदत टाकून येणार आहेत आणि त्यावर हल्ले केल्यास गंभीर परिणाम होतील’ अशी धमकी दिली. माझ्या मते राजीव सरकारने उचललेले हे पाऊल सर्वथैव अयोग्य होते. उद्या काश्मीरी लोकांवर अन्याय होत आहे अशी हाकाटी करत पाकिस्तानची विमाने श्रीनगरमध्ये आली तर आपल्याला चालेल का? श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाची अशी पायमल्ली करणे पूर्णपणे अयोग्य होते असे मला वाटते. भारतापुढे आपली धडगत नाही हे श्रीलंकन अध्यक्ष जयवर्धने यांना समजून चुकले आणि त्यातून जुलै १९८७ मध्ये श्रीलंका करार झाला. या कराराचा उद्देश तामिळ समस्येवर श्रीलंकेच्या एकात्मतेच्या चौकटीत तोडगा शोधणे हा होता. तसेच तामिळ वाघांना नि:शस्त्र करायला (साध्या शब्दात त्यांच्याशी लढायला) भारताची शांतीसेना पाठविण्यात आली. तेव्हा
१. तामिळ लोकांवर अत्याचार करावेत यासाठी भारतीय शांतीसेना पाठविण्यात आलेली नव्हती.
२. भारतीय सैन्याकडून तामिळ लोकांवर अत्याचार काही प्रमाणावर जरूर झाले. याचे कारण तामिळ जनतेत तामिळ वाघांविषयी काही प्रमाणात तरी सहानूभूती असल्यामुळे स्थानिक लोकांनी भारतीय सैन्याविरूध्द तामिळ वाघांना मदत केली आणि त्यातूनच पुढे काही प्रमाणावर त्यांच्यावर अत्याचार झाले. हाच प्रकार भारतात पंजाब, काश्मीर आणि पूर्वोत्तर भारतात बघायला मिळाला आहे.
तेव्हा मुद्दा क्रमांक १ हा valid असल्यामुळे मुद्दा क्रमांक २ प्रमाणे झालेल्या अत्याचारांसाठी संबंधित सैनिक/अधिकारी यांना जबाबदार धरता येईल. तेव्हा अगदी निरपराध तामिळींवर जरी अत्याचार झाले असतील तरी त्यासाठी राजीव गांधींना (ते हयात असते तरीही) कोणतेही न्यायालय शिक्षा करू शकणार नाही.
अनेक वर्षे तामिळ वाघांना भारत सरकारने पाठिंबा दिला होता पण अचानक त्यांच्याविरूध्द भारत सरकार (राजीव गांधींचे सरकार) उलटले याचा राग म्हणून पुढे राजीव गांधींची हत्या तामिळ वाघांनी केली.
याचे उत्तर वर दिलेलेच आहे. पण नरेंद्र मोदींविरूध्दचे आरोप आणि राजीव गांधींविरूध्द काल्पनिक आरोप एका मापाने कसे तोलता येतील? तसा अर्थ आपल्या प्रतिसादातून ध्वनित होत आहे म्हणून मुद्दामून लिहावेसे वाटते.
21 Aug 2010 - 5:45 pm | भारतीय
गांधी घराण्यातील काही (हा शब्दही मोठा वाटतोय !) अपवाद वगळता ईतरांबद्दल मला व्यक्तिशः काहीच आदर नाही.. काँग्रेसी लोक तर ज्याप्रकारे गाधी घराण्याचे लांगूलचालन करतात ते पाहून किव येते त्यांची.. मी अभ्यासलेल्या अथवा मला समजायला लागल्यापासून सर्व राजकारण्यांमधे अटलजींबद्दलच फक्त आदर होता.. पण आता सगळे एका माळेचे मणी! लक्षात घ्या राजीव गांधी नसते तर दूसरा कोणीतरी असता! 'बोफोर्स' तोफांचा व्यवहार (कि गैरव्यवहार?) त्यांच्याच काळातील होता.. बोफोर्स तोफा भारताला आवश्यक होत्याच, ते कारगिल युद्धात दिसलेच.. त्या राजीवजींच्या काळात खरेदी केल्या गेल्या म्हणून राजीव गांधी थोर होतात? त्या खरेदी करताना झालेल्या गैरव्यवहाराबद्दल काय? राजीवजी शुद्ध होते काय?.. मग नरसिंह रावही त्याच्यापेक्षा थोर म्हणावेत, कारण त्याच्याच कालखंडात भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारले.. पण नरसिंहांचे आडनाव 'गांधी' नव्हते ना ! म्हणून ते थोर नाहीत.. (नरसिंह रावांचे समर्थन करण्याचा प्रयत्न नाही, कॉंग्रेसची प्रकृती दाखवतोय..) राजीव गांधींनतर काँग्रेस गांधीमुक्त झाला होता.. पण सीताराम केसरींसारखे फुटकळ नेते काँग्रेसचे नेतृत्व करताना कॉग्रेसची हालत काय होती हे सर्व जाणतातच, 'गांधी' नावाचे टॉनिक काँग्रेसला म्हणूनच हवे होते, अन म्हणूनच सोनिया गांधींना राजकारणात आणले गेले...
बाकी सोनियांबद्दल काही बोलणार नाही.. सध्या काँग्रेस सत्तेवर आहे ते केवळ "वासरांत लंगडी गाय शहाणी" म्हणून!
21 Aug 2010 - 6:37 pm | क्लिंटन
या कारणावरून राजीव गांधींना थोर म्हणणारी मंडळी आहेतच.पण त्यांना थोर म्हणण्यासाठी हे पुरेसे सबळ कारण नाही असेच माझे तरी स्वत:चे मत आहे. तसेच राजीव गांधींना ’थोर’ मी तरी म्हटलेले नाही.माझा मुद्दा एवढाच की त्यांच्याकडे संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रात विकास घडवून आणायची दूरदृष्टी होती (जी बहुसंख्य भारतीयांकडे त्याकाळी नव्हती) आणि ते बदल त्यांनी नेटाने घडवून आणले. आजच्या तरूण पिढीला त्याचा फायदा किती होत आहे हे समोर दिसतच आहे आणि त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे.
खरेखोटे त्या भगवंतालाच ठाऊक.पण कायद्याच्या दृष्टीने तरी त्यांचा कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभाग सिध्द होऊ शकलेला नाही.
माझे स्वत:चे मत हे तर नरसिंह राव हे भारताचे सर्वोत्तम पंतप्रधान होते हेच आहे.विविध पंतप्रधानांच्या कारभाराचे मी माझ्या पातळीवर मूल्यमापन केले आहे त्यावरून माझे मत झाले आहे की नरसिंह रावांनी न बोलता देशासाठी खूप चांगले काम करून ठेवले.आणि हे मूल्यमापन करताना पंतप्रधानांचा पक्ष, चेहरा, व्यक्तिमत्व,ते जन्माला आले त्या घराण्याचे नाव या सगळ्या गोष्टी गौण मानून केवळ त्यांचे कार्य हा एकच मुद्दा मी ध्यानात घेतला होता. आणि नरसिंह राव गांधी नाहीत याच एका कारणावरून अर्जुन सिंहांसारखी झुरळे त्यांच्यावर टिका करतात ते पूर्णपणे अयोग्य आहे असेच माझे मत आहे.
हीच तर लोकशाही व्यवस्था आहे. ज्या क्षणी जनतेला कॉंग्रेसपेक्षा समर्थ पर्याय आहे असे वाटेल त्याक्षणी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा पराभव होईल. भारतीय जनतेने हे यापूर्वी पण दाखवून दिले आहे आणि जनता यापुढेही ते दाखवून देईल याविषयी शंका नको.
फक्त ही देशव्यापी क्रांती मतदान यंत्रातूनच होऊ दे ही सदिच्छा.
20 Aug 2011 - 12:34 pm | मृगनयनी
~*~*.|.*~*~ राजीव गान्धींना ६७व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन!!! ~*~*.|.*~*~
राजीव'जी, तुमच्या राहुलमध्ये तुमच्यातले काही चान्गले गुण आले असते तर कदाचित आज आपल्या देशाचे चित्र खूपच वेगळे असते.... :|
राजीव'जी, तुमचे कॉन्ग्रेसवाले ज्या म. गान्धींचा उदो उदो करून आजपर्यन्त लोकांच्या भावनांशी खेळत आले... त्याच गान्धींना दैवत मानणार्या अण्णा हजारेंच्यामुळे गान्धीवादाच्या शान्ततामय मार्गाने कॉन्ग्रेसी भ्रष्टाचाराविरूद्ध सम्पूर्ण भारत देश जागृत होऊन एकत्रितपणे लढा देत आहे... आणि आम्ही न पाहिलेली "ऑगस्ट क्रान्ती" पुन्हा घडवून आणत आहे....
या क्रान्तीमध्ये सहभागी होऊन भ्रष्टाचाराविरूद्ध खारीचा वाटा उचलण्याची सन्धी आम्हालाही मिळाल्याबद्दल अण्णा हजारेंचे शतशः आभार!!!....
राजीव'जी... तुम्ही पाहिलेल्या उज्ज्वल भारतवर्षाचे स्वप्न कदाचित देशातील जनता.... अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याला अधिकाधिक मूर्त स्वरूप देऊन पूर्ण करेल......
अर्थात तुमच्या राहुलबाबाचा यात सहभाग असता..... तर कदाचित तुमच्याबद्दल, इन्दिराजींबद्दल आम्हाला वाटणारा आदर राहुल गान्धींबद्दलही वाटला असता......
|| जयहिन्द ||
20 Aug 2013 - 12:12 pm | मृगनयनी
राजीव गांधीं'ना जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन ..._/\_ .....
*मानवी बॉम्ब'च्या माध्यमातून हत्या झालेल्या राजीव'जींच्या जयन्तीदिनाची सुरुवात एका सामाजिक कार्यकर्त्याच्या -नरेन्द्र दाभोळकरांच्या हत्येनेच व्हावी...... याचे खरोखर दु:ख वाटते.... :|
20 Aug 2014 - 1:50 pm | मृगनयनी
राजीव'जींना विनम्र अभिवादन!!!! :)
राहुल'च्या जन्माच्या आधी सोनियाजीं'वर उचित गर्भसंस्कार झाले असते.. तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती!!!! :)
20 Aug 2014 - 2:40 pm | प्यारे१
म हा न आहेस. ___/\___
22 Aug 2014 - 12:35 pm | मदनबाण
मॄग्गा... मॄग्गा अगं काय हे ? स्त्रीया दरवर्षी ज्या प्रमाणे वटसावित्रीची पुजा करुन वडाला चक्कर मारतात, तशी दरवर्षी या धाग्यावर तू चक्कर टाकताना दिसत आहेस हो. :P
22 Aug 2014 - 1:00 pm | मृगनयनी
:) हो रे.. मदनबाण.. अॅक्चुली 'राजीव गान्धी' यांच्याबद्दल मला मनापासून आदर वाटतो. कंप्युटर-सिस्टीम भारतात त्यांच्यामुळे आली. इतर राजकारण्यांप्रमाणे राजीव'जींच्या नावावरही काही भ्रष्टाचार आहेत.. पण तरीही त्यांच्यात 'असं' काहीतरी निश्चित होतं..ज्यामुळे आजही ते गेल्यानंतर सुद्धा मला (इन्डिविड्ज्युअली) त्यांच्याबद्दल मनापासून आदर, प्रेम वाटते. तसे "ते" कायमच माझ्या मनात असतात. पण तरीही दरवर्षी त्यांच्या जयन्ती-पुण्यतिथी'ला इथे या मराठी संस्थळावर त्यांच्या स्मृती जागृत करताना मला विशेष आनन्द होतो. आय लव राजीव गान्धी!!!!
राजीव'जींमधले व इंदिराजींमधले "नेतृत्वा"चे आणि समाजकारणा'चे गुण राहुल'मध्ये आलेले नाहीत.. त्यामुळे वाईटही वाटते... :)
पण तरीही 'नरेन्द्र भाई मोदीं'च्या भगव्या राज्यात मी खूष आहे...... :)
22 Aug 2014 - 10:51 pm | श्रीगुरुजी
>>> कंप्युटर-सिस्टीम भारतात त्यांच्यामुळे आली.
+ १
त्याच प्रमाणे नरसिंहरावांमुळे भारतात केबल टीव्ही सुरू झाला, देवेगौडामुळे भारतात इंटरनेट सुरू झाले, गुजरालांमुळे भारतात मोबाईल फोन सुरू झाले आणि मनमोहन सिंगांमुळे स्मार्ट फोन आणि टॅब्ज.
22 Aug 2014 - 2:19 pm | धर्मराजमुटके
बघा ! बघा !
आणि इथे महाराष्ट्रात बालाजी तांब्यांना मोडीत काढतात. :)
22 Aug 2014 - 2:24 pm | अनुप ढेरे
=))