तुम्हाला वाजते का थंडी.
आणि कळपाची भीती.
का भरलाय तुम्हाला ताप.
तोंड दाबुन बुक्क्याचा मार.
शब्दांना नसते दु:ख.
फक्त ओझे वाहणारे आपण.
सवत आनली म्हणे.
ग्यानबाची बायको हरवली.
आता जास्त विचारत नाही.
कारण तुमच्याकडे उत्तर नाही.
राम रावण युध्द होणार
अनिरुध्द मिशा पिळणार
मी झाडावर लपणार
।। निश्चित ।।
ही कविता संपादकांना अडचणीत तर नाही ना आणनार??????????
.
.
.
कविवर्य भावसार.
प्रतिक्रिया
1 Aug 2010 - 4:47 pm | राजेश घासकडवी
'आपला तो बाब्या' ही ओळ राहिलीच. पण बाकी कल्पना बहारदार. झकास.
1 Aug 2010 - 5:07 pm | मितभाषी
हा! ते धो धो रण आणि अजुन बरच काही अॅडवायचे होते हो. पण परत संपादनाचा दुवाचा मिळेना काय करणार??
आले संपादकाच्या मना.
2 Aug 2010 - 7:36 am | स्पंदना
आणी झाडाच्या मुळ्या?
की कवितेते ठेचा ठेची बसत नाही?
आणखी एक' "सज्जनंम...'
ते पण लय भारी हाय.
मि.पा, वरच्या मित्र मैत्रीणींना 'मित्रदिनाच्या' शुभेच्छा'