करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
1 Feb 2012 - 1:38 pm

बरेच दिवस लिहिन..लिहिन म्हणत होतो,,,सौरभनी काल आमच्या या करंट मिसळची अठवण करुन दिली ,आणी आज मुहुर्त लागला...तर ठाकाण कोणतं..? अमच्या(च)मंगला टॉकिज बाहेर वॉल्सवॅगेनचं शोरुम हाय ना त्येच्या भायेर...अगदी रोडटच.हे आमचे करंट मिसळचे जन्मदाते मामा आणी त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच मिसळची गाडी

ओपनींगची येळ मंजी सामान्यपणे म्युन्सिपाल्टीतले,पिएमटितले (आणी पी-एम.टि.तले) चाकरमानी, सक्काळी सक्काळी ७ते९ यादरम्यान कामाला भायेर पडतात त्या येळची. गाडीचा लवाजमा लागे लागे पर्यंत खाणार्‍यांची पण लाइन लागते.या मिसळला आंम्ही करंट मिसळ का म्हणतो? याचं इंगित जेवढं मिसळच्या तर्रीत आहे,तेवढच ते खाणार्‍या अट्टल गिर्‍हाइकातही आहे...सामान्य भूक भागवणारे जसे इथे येतात,तसे पट्टीचे मसालेदार डोक्यात करंट येइपर्यंत तिखट खाणारेपण इथेच येतात.सायकलवर टांग मारुन कामाला पळणारे-घरुन सकाळची भाकर किंवा चपात्यांची चवड घेऊन मिसळ हानायला बी हितच येतात,तसे रातीची ओव्वर-फुल्ल झाल्याले सकाळी उतरल्यावर उतारा-काढायला किंवा परत दुपार पर्यंत टांग्यातच बसुन र्‍हायला पण इथच येतात,टांगापल्टिंच्या शब्दशास्त्रानुसार हिला कॉटरमिसळ किंवा फुल्ल-ब्याट्रीचार्जमिसळ असंही नाव आहे. ब्याट्रीचार्ज साठी काढुन ठेवलेली तर्री :-)
आणी आपण फक्त दिल से खाणारे असू तरी हिची नशा त्यांच्या इतकीच अपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही..आमच्या मामांची मिसळ जर का मनापासुन अनुभवायची असेल तर फक्त एकच अट आहे.अट ही की सक्काळी ११च्या आत जायला हवे.आणी पोटात वैश्वानरानी अरोळी मारलेली असायला हवी.मिसळ खाल्यापासुन पुढिल तीनएक तास कामाचं कोणतही ओझं डोसक्यावर नको...म्हणजेच पोटाइतकच मनही रिकामं हवं.नायतर देवर्शनाला जाताना मानात दुसरे इतर भाव असले तर ते गणित फसतं, आणी देवाचं दर्शन होण्याऐवजी नुसतच देवळाचं दर्शन होतं..तसं होइल

हां अजुन एक पेशालिटि हाय बरं का..! मिसळ मंजे फक्त जाळ तिखट असच इथे गणित नाहीये.सामान्या पणे मिसळ इथे आपल्याला मानवेल अशी म्हणजे तिन टाइपमधे दिली जाते.
१)तर्री मिसळ२) लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ
हे तिन सामान्य प्रकार पण त्याशिवाय आपल्याला हवं ते काँबिनेशनही इथे घडवुन मिळतं,मंजे पोहे मिसळ,बटाटा भाजी पेशल मिसळ,किंवा आम्हाला-लागणारी फक्त फरसाण मिसळ... एरवी त्यांनी दिलेली मिसळ म्हणजे शांपल+ मटकी/मूग किंवा वाटाण्याची उसळ+फरसाण+शेव....जोडिला रोज सकालीच येणारे ताजे पाव आणी कांदा/लिंबू/तर्री-शांपल लागल तेवढं आपण(मागुन) घेतलं नाही तरी मामा वरनं विचारतात,टाकू का गरम...आणी काम करणार्‍या पोरांना हाळी देत असतात-'ए...लाइट दे रे खाली'...'मागच्या बाकाला पाव लाव'...'या तात्या...(तात्यांची रात्र ओळखत..) आजा डबल तर्री दिऊ का..?,बसा खाली वार्‍याला'' शंकराच्या देवळात जसे पुजारी आणी भक्तांचे हुंकार मंत्र अरोळ्या ऐकू येत असतात..तस आमच्या मामांच्या गाडिवरच वातावरण खरोखरीचं भक्तिमय असतं..(नाटकी गिर्‍हाइक इथे टिकत नाही,ते काही दिवसातच शेजारीच असलेल्या तसल्याच गाडीवर जातं) यात पलिकडं ती लाल गाडी दिसतीये..बघा
तुंम्ही एकदा इथले मेंबर झालात की तुमची मिसळही त्यांच्या री-मेंबरमधे जाते...इथला पुलाव वडे पोहे या साइड डिशपण अगदी साध्या दिसणार्‍या पण वेगळ्या चविच्या आहेत...उसळ फरसाण मारलेले पोहे बी झ्याक..आणी गरम काढलेला वडा तितक्याच गरम शांपल बरोबर कपाळावर आणी अन्यत्र ;-) घाम येत असला तरी खाण्यात तेवढीच मज्जा. आरोग्यदायी कवि कल्पनांच्या आहारी गेलेल्यांचा हा प्रांतच नव्हे,,,त्यांनी आपलं स्वच्छ आरोग्य भुवनातच जावं ..हां,,,पण मनाचं आरोग्य बिघडलं तर मात्र त्यांनाही आमच्या मामांच्या गाडिवर कमित-कमी ६महिने यावे लागेल. कारण अमच्या दृष्टीनी पोट भरण्या इतकीच मानसिक आरोग्य फुलवणारी वाढवणारी ही जागा हाय...कारण ही मिसळ जितकी चढते,डोक्यातही जाते,अगदी केस उभे करते,डोक्यात घाम काढते...तितकीच खाऊन झाल्यावर आपल्या आवडी नुसार कडक चहा,पान,तंबाखू,शिगरेट याच्या साथिनी पुन्हा बहरते देखिल(म्हणुनच हिला कॉटर मिसळ म्हणतात ;-) ) फक्त ही मिसळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटीलागी पंढरपुरासी जावे लागते...तसेच अमच्या मामांच्या मिसळचे आहे...पारावरच्या मारुतीसारखं बारा महिने तेराकाळ भक्तांसाठी खुलं असलेलं मिसळ मंदिर
हे काही अजुन फोटो,,,विशेषतः तर्री कशी बनते त्याचे काढलेले---
१)पातेलं पाणी कडधान्य घेऊन शिजायला लागतं
२)त्यात बटाट्याची वडे करायची भाजी मिसळली जाते
३)नंतर ते मिसळण आणखि पाण्यासह घालुन पातेलं टॉप-अप केलं जातं
४)अता त्याला तर्री पडनार हाय... त्यासाठी एका भांड्यात आधी खणखणीत तिखट
५)मग त्याहुन झणझणीत स्पेशल फक्त तिखटच असलेल्या मिर्च्यांचा मसाला
६)अता त्यो गरम त्येलात घोळला जातोय...
७) ही...लागली बघा तर्री.....१)
२)

८)अता हे बघा ३ब्रँड-संपत आलेली व्हाइट(आमच्या लेखी बेचव..!)-तळाला गेलेला मग, दुसरा फुल्ल भरलेला पिवळसर लाइट (आमचा ब्रँड-करंटवाला),आणी मागे तिसरा कॉटरमिसळ ब्रँड
९)उसळ फरसाण पोहे
१०)साधासुधा-पण बासमतीच्या तोंडात मारेल असा-पुलाव


११)हे आमचे हरहुन्नर्री आवाज देणारे मामा
१२) आणी हे त्यांचे तेवढेच फिल्मी राम/लखन(मंगला टॉकिज शेजारी,राम लखन तयांचे अंतरी ;-) )
१२) आणी सगळ्यात शेवटी ही भल्याभल्यांची नशा उतरवणारी आणी चढवणारी देखिल-टॉप-अप पातेल्यातील पहिल्या तर्रीची वाटी....मिसळचं आणी आमचं जिवनतत्वही आणी जिवनसत्वही

संस्कृतीसाहित्यिकसमाजजीवनमानमौजमजाविचारआस्वादलेखअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 1:50 pm | टवाळ कार्टा

ती तुमची ऑर्डर होती

तुषार काळभोर's picture

26 May 2015 - 1:47 pm | तुषार काळभोर

हो का??

मग काय करंट येण्यासाठी घरून प्रविण मसाल्याच्या पुड्या न्यायच्या का?
:) :) ;)

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 10:20 am | टवाळ कार्टा

चूकून नेफळेंची मिसळ असे वाचले =))

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2015 - 12:21 pm | प्रसाद गोडबोले

नेवाळेची मिसळ करंट असते,

नेवाळेंची मिसळ डोक्याला शॉट असते ! एका मिसळीत किमान चार मिसळींना पुरेल इतकी मिरची घालतात ... एकदा खल्लि होती तेव्हा काना नाकाला घाम फुटला होता ! नंतर दुसरे दिवशी सांप्रदायिक कविता सुचली होती !

नाखु's picture

26 May 2015 - 12:38 pm | नाखु

मी गेली १५-१६ वर्षे खात आहे (शेवटी साधारण २-३ वर्षांपूर्वी खाल्ली.)

मिसळीचा तिखट पणा ज्या वेगाने वाढत गेला त्याच वेगाने टेश्ट आणि लोकप्रियता उतरणीला लागली.

(आतली बातमी: हेच मिसळवाले संध्याकाळी वडा-पाव आणि भजीची गाडी लावतात त्याची उलाढाल बरीच मोठी असल्याने मिसळीकडे (आणि पर्यायाने मिसळप्रेमींकडे) साफ दुर्लक्ष झाले आहे हे कटू सत्य आहे)

कमेरामन सत्यवादी उभे सह नाखु मिपा टाइम्सकरीता..

प्रचेतस's picture

26 May 2015 - 1:11 pm | प्रचेतस

नेवाळे नुसता तिखटाच्या बरण्याच्या बरण्या ओतत असतो.
घरी चिवडा केल्यावर मटकीची उसळ बनवायची आणि नेवाळेकडून २५/३० रूपयात श्याम्पल विकत आणायचे आणि ते उसळीत मिक्स करून मिसळ बनवायची. जबराट चव येते मग.

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2015 - 1:16 pm | प्रसाद गोडबोले

घरी चिवडा केल्यावर मटकीची उसळ बनवायची आणि नेवाळेकडून २५/३० रूपयात श्याम्पल विकत आणायचे आणि ते उसळीत मिक्स करून मिसळ बनवायची. जबराट चव येते मग.

हा प्रयोगही केला आहे ... तब्बल ४-५ माणसांन्ना पुरेल इतकी मिसळ होते . नको नको होतो तो तिखटपणा ...

थोडक्यात नेवाळेंच्या मिसळ वरुन आमचे मन उडाले आहे ...

प्रचेतस's picture

26 May 2015 - 3:05 pm | प्रचेतस

माझेही तेच.

बाकी पिंपरीगावात नुकतेच 'दिप्ती मिसळ हाऊस' नावाचे मिसळ पेश्शल हाटेल उघडले आहे. जाऊन येउ एकदा.

गणामास्तर's picture

26 May 2015 - 5:09 pm | गणामास्तर

कुठे आहे रे हे 'दिप्ती मिसळ हाऊस' यग्जॅक्टली ??

प्रचेतस's picture

26 May 2015 - 5:13 pm | प्रचेतस

शाळेच्या मागच्या बाजूला.
कुदळे भेळीच्या शेजारीच.

झकासराव's picture

27 May 2015 - 4:44 pm | झकासराव

नेवाळे मिसळ म्हणजे नुसताच भडकाच.
दुसरी चव येतच नाही.
आणि ३-४ वर्षामागे मी गेलो होतो तेव्हाच हाटीलच इन्टेरियर १८५७ च्या उठावापासुन तसेच आहे इतके कळकटलेले.
परत ट्राय केलीच नाही मी.

प्रचेतस's picture

27 May 2015 - 4:47 pm | प्रचेतस

अगदी अगदी.
त्याची भजी मात्र लै भारी असतात.

करंट-बिरंट लांब राहिला! तो पुण्यात आत्तापर्यंत फक्त काताकिर्र्र ला मिळालाय

अगदी, मुंबईत मामलेदार, मुनमुन आणि पुण्यात काटाकिर्र!! सुदैवाने ही मामांची मिसळ खाल्लेली नाही.

वेल्लाभट's picture

26 May 2015 - 11:27 am | वेल्लाभट

हुइहुइहुइहुइहुइ

खायलाच पैजे की !

खंडेराव's picture

26 May 2015 - 12:22 pm | खंडेराव

ही मिसळ खायची? पुन्यात शक्य तेवढ्या ठिकाणी मिसळ खाल्ली आहे. एकेकाळी दुपारचे जेवण मिसळच होते. आता पुढच्या वेळी नक्की!

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2015 - 2:13 pm | प्रसाद गोडबोले

१००

हुश्श

नाखु's picture

26 May 2015 - 2:29 pm | नाखु

फेब्रु २०१२ चे धाग्याला मे २०१५ मध्ये शंभरी पार केल्याबद्दल समस्त मिपाकरांचे (धाग्यावर पळणार्‍या/जळणार्‍या/खेळ्णार्‍या) २०१२ सालचे शँम्पल व आजचे पाव देऊन कर्रंट सत्कार करणेत येत आहे (जाताना आपापले बिल देऊन जाणे)

अभामिपामांकासस.
पिंचीशाखा
स्वगत : ऐन्वळी हा जेपी कुठे गेला सत्काराचे वेळी!

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 2:32 pm | टवाळ कार्टा

आपके पांव जमीं पर मत रख्खे....मैले हो जायेंगे :)

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 2:33 pm | टवाळ कार्टा

चेपूवरचा जोक

देवा मला पाव...देवा मला बटरपण

सेंचुरी मारल्याबद्दल बुवाचा आत्मा अता त्रुप्त झाला असेल.

सतिश गावडे's picture

26 May 2015 - 4:03 pm | सतिश गावडे

सुप्तावस्थेत गेलेल्या धाग्याला ज्याने वर आणले त्याला मामाची करंट मिसळ बुवांनी खाऊ घालायला हरकत नाही आता.

तुषार काळभोर's picture

27 May 2015 - 11:03 am | तुषार काळभोर

बुवा खाऊ घालणार असतील तर गंडलेली मिसळपन चालवून घेऊ.

(बदल्यात त्यांना काटाकिर्र्ची / किंवा नेवाळेची (!!!) मिसळ आम्ही खाऊ घालू)

नूतन सावंत's picture

27 May 2015 - 10:12 am | नूतन सावंत

अ.आ. तुम्ही दिलेल्या पा..कृ.प्रमाणे लाईट मिसळ घरीच बनवली.मस्तच झाली.धनस.

शि बि आय's picture

27 May 2015 - 5:06 pm | शि बि आय

क्या बात है गुरुजी…

तुम्हाला बरी सगळी तर्रीची रेशिपी संगीतालीन मामानं… अट्टल मिसळकर हाय का ?

आता तोंडाला सुटलेले पानी पळवणारी मिसळ चाखायाचं पाहिजे

गणेशा's picture

28 May 2015 - 5:33 pm | गणेशा

वल्ली ...

आदितीत जाऊया एकदा.. पिंपरी वाघेरे.. वल्ली येरे घेवुन सगळ्यांना...
शक्यतो रविवार सकाळी लवकर .. शनिवार जमत नाही..

बाकी गुरजींच्या मिसळला नावे ठेवल्याने शाप मिळेल काय कोणाला ?

अतिथी असे वाचावे... शाळेच्या समोर...
मागे नविन दिप्ती झाले आहे... पण आधीपासुन एकच आवडते आपल्याला.. चव चांगली शिवाय गरम पण होत नाही पोटात.. दिलखुलास

प्रचेतस's picture

28 May 2015 - 8:58 pm | प्रचेतस

जाऊ ना राव.

त्यांनी औषधोपचारासाठी समक्ष भेटावे...आणी अद्याप झाला नसेल तर भविष्यात नक्की होइल.सांगताही येत नाही आणी सहनही होत नाही असा हा आजार आहे,त्यामुळे मंडळी वेळीच जागे व्हा.

खटपट्या's picture

28 May 2015 - 8:56 pm | खटपट्या

सर्व चर्चा वाचली. कळायला लागल्यापासुन ठाण्याची मामलेदार मिसळ खात आहे.
पण कोणी करंट म्हणजे काय ते सांगेल काय ??

तुषार काळभोर's picture

28 May 2015 - 9:09 pm | तुषार काळभोर

नेवाळेकडे न्या रे!

अनंत छंदी's picture

28 May 2015 - 9:24 pm | अनंत छंदी

बा अतृप्ता, तुझ्या या धाग्यामुळे कालच इथे भेट दिली. पण वेळ मिसळ खाण्याची नसल्याने पुलाव चापला. त्याबरोबर मिळालेले "शांपल" इतके छान होते की फक्त तेच पुन्हा वाटीभर मागवून प्यावे असे वाटत होते. अर्थात कुठून आलं ह्ये येडं असं मामांना वाटायला नको म्हणून मोह आवरला. पण आता लवकरच मिसळ खाण्यासाठी हजेरी लावण्याचा विचार आहे. तो पर्यंत मी पण अतृप्त आत्मा! :)

अत्रुप्त आत्मा's picture

28 May 2015 - 10:01 pm | अत्रुप्त आत्मा

@ त्याबरोबर मिळालेले "शांपल" इतके छान होते की फक्त तेच पुन्हा वाटीभर मागवून प्यावे असे वाटत होते.>>> हाच तो करंट पॉइंट! हे शांपल आहे ना,तिच या मिसळची कलाकारी आहे. फक्त इथलं हे शांपल पातेल्याच्या सेकंड हाफ ,म्हणजे तळाच्या गाळातलं नशिबी आलं,तर ते नुस्तच तिखट जाळ लागतं.आणि मग मिसळ टुकार,छपरी इत्यादी लागते. अर्थात अनेक मिसळ स्पॉटवर हाच प्रकार असतो. आणि हे लक्षात ठेऊन ,हेरुन इथली चव चाखायला हवी. तुम्हाला ती सहज मिळाली...पण ज्यांना अजुनही हवी असेल्,त्यांनी मी हे गणित जमवलं,तर नक्कीच निराशा होणार नाही. नायतर मग नुसताच काटा आणणारं कीर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पाणी आहेच...प्यायला - इतरत्र!

गेल्या वर्षी आयुष्यात प्रथमच घरी न बनलेली मिसळ खाल्ली. भावाने काटाकिर्रर्रर्रर्र मधून पार्सल आणलं होतं.

नुसताच काटा आणणारं कीर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पाणी आहेच...प्यायला -

हीच अवस्था झाली ;-) .

पुढच्या भारतवारीत करंट मिसळीचा झटका घेऊन बघीन :-) .

अत्रुप्त आत्मा's picture

28 May 2015 - 10:07 pm | अत्रुप्त आत्मा

त्यांनी मी हे सांगितलेलं गणित जमवलं,तर नक्कीच निराशा होणार नाही. नायतर मग नुसताच काटा आणणारं कीर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पाणी आहेच...प्यायला - इतरत्र!

प्रचेतस's picture

29 May 2015 - 2:12 pm | प्रचेतस

मामाचा नंबर द्या हो.
तिथे जायच्या आधी मामाला फोन करुन विचारीन म्हणतो की शांपलची पातळी पातेल्यात कुठपर्यंत आलीय ते. मगच जाईन म्हणतो.

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 2:32 pm | अत्रुप्त आत्मा

ते प्रत्यक्ष भेटीतच ओळ खायचे गणित आहे, बघा जम्ले तर!

प्रचेतस's picture

29 May 2015 - 2:38 pm | प्रचेतस

आम्हीं प्रत्यक्ष भेटीतच खाल्लेली ती पण तुमच्या संगे. तरी पण पाणचट लागली.

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 2:45 pm | अत्रुप्त आत्मा

त्या दिवशीच सांगितलं होतं, ही आज आपल्याला गाळातली मिळालेली आहे म्हणून! पण त्ते लक्षात ठेवलं तर कसं ना? शिवाय हे तर्रीच्या पातेल्याचं गणित आजवर अनेकदा बोलतानाही सांगितलेलं आहे. पण आता ते ही आठवणार नाहीच्च टुम्हास! त्त्यामुळे आता...असोच्च!

बाकि माझ्या बरोबर मीसौरभ नी सुद्धा एकदा मस्स्स्स्स्त करंट तिथे खाल्लेला आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 2:47 pm | अत्रुप्त आत्मा

@तरी पण पाणचट लागली.>>> टुमची आमची आवड वेगळी आहे. त्या तर्रीदार पाण्याचा मझा आंम्हास येतो,तुम्हास येत नाही... हा आवडीचा फरक असतो.

प्रचेतस's picture

29 May 2015 - 2:50 pm | प्रचेतस

हो..
पण मिसाळ गंडलेली आहे असे म्हणणारे येथेच अनेक जण निघालेत पहा ना...मी, यसवायजी, धन्या......, त्यांचे काय?

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा

त्यानीही तशीच खाल्ली असेल मग!

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 3:00 pm | अत्रुप्त आत्मा

पण त्याला "आंम्हाला आवडलेली नाही" असे म्हणतात.. गंडलेली म्हणणं..हे म्हणजे........................................ तुम्हाला जे मला म्हणायचय..ते निश्चित माहिती आहे ना............... तेच्च असतं! ;)

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2015 - 3:05 pm | प्रसाद गोडबोले

पण त्याला "आंम्हाला आवडलेली नाही" असे म्हणतात.. गंडलेली म्हणणं..हे म्हणजे........................................

>>>
स्वमतांधता
=))

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 3:14 pm | अत्रुप्त आत्मा

कुंथा आता... दिवस रात्र मग! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt002.gif

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2015 - 3:21 pm | प्रसाद गोडबोले

इथे मी तुमच्या बाजुने बोलत होतो बुवा .

स्वतः ला अवडली नाही म्हणुन मिसळ गंडलेली आहे असे म्हणणे ही हत्तीची स्वमतांधता आहे असे म्हणत होतो .

पण बहुतेक तुम्हीच स्वमतांधतेचा कॉपीराईट घेतलेला आहे , अत्मरंजना सारखाच ...

ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

प्रचेतस's picture

29 May 2015 - 3:14 pm | प्रचेतस

मिसळ गंडलेली म्हणजे फसलेली असणं.
इथे मामा मिसळ पानचट असल्याने फसलेली होती म्हणजेच गंडलेली होती. ती गंडलेली असल्यानेच आवडली नाही म्हणजेच गंडणं = न अवडणं. ल्ल्ल्लूऊऊऊऊऊउ.

प्रचेतस's picture

29 May 2015 - 3:17 pm | प्रचेतस

बाकी मिसळ खाताना कधीच पातेल्याकडे बघून (तुमच्याशिवायच बहुधा) कोणीच खात नसतो. त्यामुळे गंडलेली ती गंडलेलीच. बाकी मधुच्या गाडीवरचे पदार्थ मला सर्वच आवडतात. त्यांना मी चांगलंच म्हणतो. जे चांगलं ते चांगलंच. त्यात आपलं परकं काय करायचं?

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 3:28 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यामुळे गंडलेली ती गंडलेलीच. बाकी मधुच्या गाडीवरचे पदार्थ मला सर्वच आवडतात. त्यांना मी चांगलंच म्हणतो. जे चांगलं ते चांगलंच. त्यात आपलं परकं काय करायचं? >>> हम्म्म्म्म्म्म्म्म्म! आधीच लक्षात आलेलं होतं.. फक्त सदर चिडवाचिडवीचा हाच्च डाव आहे, हे पटलावर आणायच होतं.
म्हणूनच मी ही थोडी ढील दिली! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt014.gif

फार्च पटक्क्न खुला सा - दिल्याबड्डल ढण्यवाद हो आगोबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

आता चालू द्या तुमच........................ http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif

चांगल्याला चांगलंच म्हणण्यात चिडवाचिडवी ती काय?

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 3:30 pm | अत्रुप्त आत्मा

@.मी, यसवायजी, धन्या......, त्यांचे काय?>> तिघात मिळून ..माझा मैसळीक खून पाडायचा पूर्व-नियोजित कट आहे हा..................... हे काय ओळखू येत णाही काय आंम्हास? http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

डॉन व्हिटो कॉर्लिऑन's picture

29 May 2015 - 6:33 am | डॉन व्हिटो कॉर्लिऑन

एकदा फक्त मिसळ खायचा कट्टा करुयात का? त्या निमित्ताने मिपाकर दिसतील.

मिसळ जरी पुणेरी आणि कोल्हापूरी फेमस असली तरीही मुंबईत सुद्धा अशी कही ठिकाणे आहेत जिथे ती पुणे-कोल्हापूर सारखीच चवदार मिळते. उदा...आनंदभुवन(नायगांव परेल), सरदार(लालबाग पण आता बंद झाले आहे).
आनंदभुवन मध्ये पोळा नावाचा डोश्यासारखा दिसणारा एक पदार्थही मिळतो जो उसळीबरोबर खाल्ला जातो.
मिपाकरांनी एकदातरी भेट द्यवीच असे हे ठिकाण.

मृत्युन्जय's picture

29 May 2015 - 2:38 pm | मृत्युन्जय

मी खाल्लेल्या सगळ्या मिसळीत मामलेदारचा नंबर फार वरचा लागतो. दिवे आगरला आवळसकरांकडे सुद्धा सुंदर मिसळ मिळते. पण सगळ्यात आवडती मिसळ मात्र बेडेकर.