करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
1 Feb 2012 - 1:38 pm

बरेच दिवस लिहिन..लिहिन म्हणत होतो,,,सौरभनी काल आमच्या या करंट मिसळची अठवण करुन दिली ,आणी आज मुहुर्त लागला...तर ठाकाण कोणतं..? अमच्या(च)मंगला टॉकिज बाहेर वॉल्सवॅगेनचं शोरुम हाय ना त्येच्या भायेर...अगदी रोडटच.हे आमचे करंट मिसळचे जन्मदाते मामा आणी त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच मिसळची गाडी

ओपनींगची येळ मंजी सामान्यपणे म्युन्सिपाल्टीतले,पिएमटितले (आणी पी-एम.टि.तले) चाकरमानी, सक्काळी सक्काळी ७ते९ यादरम्यान कामाला भायेर पडतात त्या येळची. गाडीचा लवाजमा लागे लागे पर्यंत खाणार्‍यांची पण लाइन लागते.या मिसळला आंम्ही करंट मिसळ का म्हणतो? याचं इंगित जेवढं मिसळच्या तर्रीत आहे,तेवढच ते खाणार्‍या अट्टल गिर्‍हाइकातही आहे...सामान्य भूक भागवणारे जसे इथे येतात,तसे पट्टीचे मसालेदार डोक्यात करंट येइपर्यंत तिखट खाणारेपण इथेच येतात.सायकलवर टांग मारुन कामाला पळणारे-घरुन सकाळची भाकर किंवा चपात्यांची चवड घेऊन मिसळ हानायला बी हितच येतात,तसे रातीची ओव्वर-फुल्ल झाल्याले सकाळी उतरल्यावर उतारा-काढायला किंवा परत दुपार पर्यंत टांग्यातच बसुन र्‍हायला पण इथच येतात,टांगापल्टिंच्या शब्दशास्त्रानुसार हिला कॉटरमिसळ किंवा फुल्ल-ब्याट्रीचार्जमिसळ असंही नाव आहे. ब्याट्रीचार्ज साठी काढुन ठेवलेली तर्री :-)
आणी आपण फक्त दिल से खाणारे असू तरी हिची नशा त्यांच्या इतकीच अपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही..आमच्या मामांची मिसळ जर का मनापासुन अनुभवायची असेल तर फक्त एकच अट आहे.अट ही की सक्काळी ११च्या आत जायला हवे.आणी पोटात वैश्वानरानी अरोळी मारलेली असायला हवी.मिसळ खाल्यापासुन पुढिल तीनएक तास कामाचं कोणतही ओझं डोसक्यावर नको...म्हणजेच पोटाइतकच मनही रिकामं हवं.नायतर देवर्शनाला जाताना मानात दुसरे इतर भाव असले तर ते गणित फसतं, आणी देवाचं दर्शन होण्याऐवजी नुसतच देवळाचं दर्शन होतं..तसं होइल

हां अजुन एक पेशालिटि हाय बरं का..! मिसळ मंजे फक्त जाळ तिखट असच इथे गणित नाहीये.सामान्या पणे मिसळ इथे आपल्याला मानवेल अशी म्हणजे तिन टाइपमधे दिली जाते.
१)तर्री मिसळ२) लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ
हे तिन सामान्य प्रकार पण त्याशिवाय आपल्याला हवं ते काँबिनेशनही इथे घडवुन मिळतं,मंजे पोहे मिसळ,बटाटा भाजी पेशल मिसळ,किंवा आम्हाला-लागणारी फक्त फरसाण मिसळ... एरवी त्यांनी दिलेली मिसळ म्हणजे शांपल+ मटकी/मूग किंवा वाटाण्याची उसळ+फरसाण+शेव....जोडिला रोज सकालीच येणारे ताजे पाव आणी कांदा/लिंबू/तर्री-शांपल लागल तेवढं आपण(मागुन) घेतलं नाही तरी मामा वरनं विचारतात,टाकू का गरम...आणी काम करणार्‍या पोरांना हाळी देत असतात-'ए...लाइट दे रे खाली'...'मागच्या बाकाला पाव लाव'...'या तात्या...(तात्यांची रात्र ओळखत..) आजा डबल तर्री दिऊ का..?,बसा खाली वार्‍याला'' शंकराच्या देवळात जसे पुजारी आणी भक्तांचे हुंकार मंत्र अरोळ्या ऐकू येत असतात..तस आमच्या मामांच्या गाडिवरच वातावरण खरोखरीचं भक्तिमय असतं..(नाटकी गिर्‍हाइक इथे टिकत नाही,ते काही दिवसातच शेजारीच असलेल्या तसल्याच गाडीवर जातं) यात पलिकडं ती लाल गाडी दिसतीये..बघा
तुंम्ही एकदा इथले मेंबर झालात की तुमची मिसळही त्यांच्या री-मेंबरमधे जाते...इथला पुलाव वडे पोहे या साइड डिशपण अगदी साध्या दिसणार्‍या पण वेगळ्या चविच्या आहेत...उसळ फरसाण मारलेले पोहे बी झ्याक..आणी गरम काढलेला वडा तितक्याच गरम शांपल बरोबर कपाळावर आणी अन्यत्र ;-) घाम येत असला तरी खाण्यात तेवढीच मज्जा. आरोग्यदायी कवि कल्पनांच्या आहारी गेलेल्यांचा हा प्रांतच नव्हे,,,त्यांनी आपलं स्वच्छ आरोग्य भुवनातच जावं ..हां,,,पण मनाचं आरोग्य बिघडलं तर मात्र त्यांनाही आमच्या मामांच्या गाडिवर कमित-कमी ६महिने यावे लागेल. कारण अमच्या दृष्टीनी पोट भरण्या इतकीच मानसिक आरोग्य फुलवणारी वाढवणारी ही जागा हाय...कारण ही मिसळ जितकी चढते,डोक्यातही जाते,अगदी केस उभे करते,डोक्यात घाम काढते...तितकीच खाऊन झाल्यावर आपल्या आवडी नुसार कडक चहा,पान,तंबाखू,शिगरेट याच्या साथिनी पुन्हा बहरते देखिल(म्हणुनच हिला कॉटर मिसळ म्हणतात ;-) ) फक्त ही मिसळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटीलागी पंढरपुरासी जावे लागते...तसेच अमच्या मामांच्या मिसळचे आहे...पारावरच्या मारुतीसारखं बारा महिने तेराकाळ भक्तांसाठी खुलं असलेलं मिसळ मंदिर
हे काही अजुन फोटो,,,विशेषतः तर्री कशी बनते त्याचे काढलेले---
१)पातेलं पाणी कडधान्य घेऊन शिजायला लागतं
२)त्यात बटाट्याची वडे करायची भाजी मिसळली जाते
३)नंतर ते मिसळण आणखि पाण्यासह घालुन पातेलं टॉप-अप केलं जातं
४)अता त्याला तर्री पडनार हाय... त्यासाठी एका भांड्यात आधी खणखणीत तिखट
५)मग त्याहुन झणझणीत स्पेशल फक्त तिखटच असलेल्या मिर्च्यांचा मसाला
६)अता त्यो गरम त्येलात घोळला जातोय...
७) ही...लागली बघा तर्री.....१)
२)

८)अता हे बघा ३ब्रँड-संपत आलेली व्हाइट(आमच्या लेखी बेचव..!)-तळाला गेलेला मग, दुसरा फुल्ल भरलेला पिवळसर लाइट (आमचा ब्रँड-करंटवाला),आणी मागे तिसरा कॉटरमिसळ ब्रँड
९)उसळ फरसाण पोहे
१०)साधासुधा-पण बासमतीच्या तोंडात मारेल असा-पुलाव


११)हे आमचे हरहुन्नर्री आवाज देणारे मामा
१२) आणी हे त्यांचे तेवढेच फिल्मी राम/लखन(मंगला टॉकिज शेजारी,राम लखन तयांचे अंतरी ;-) )
१२) आणी सगळ्यात शेवटी ही भल्याभल्यांची नशा उतरवणारी आणी चढवणारी देखिल-टॉप-अप पातेल्यातील पहिल्या तर्रीची वाटी....मिसळचं आणी आमचं जिवनतत्वही आणी जिवनसत्वही

संस्कृतीसाहित्यिकसमाजजीवनमानमौजमजाविचारआस्वादलेखअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

भन्नाट हो गुर्जी

झटका लागला ब्वा :)

लै भारी हो गुर्जी.
एकदा तिथली मिसळ खाल्याचं पुसटसं आठवतय.
चटकदार तर्री बघूनच आमची जिव्हानंदी टाळी लागलीय. जाऊ आता लवकरच मिसळ हाणायला.

____/\____
काय तर्री आहे का ज्योक?
तिखट आवडतं, पण त्या रक्तवर्णी तर्रीला जिभेवर घ्यायची टाप नाय होणार ब्वॉ आपली.

(मिसळप्रेमी) यशवंत

चिंतामणी's picture

1 Feb 2012 - 2:17 pm | चिंतामणी

त्यावेळी खाउन बघु. वरती वाचले नाहीस का??? :) :-) :smile:

आपल्याला मानवेल अशी म्हणजे तिन टाइपमधे दिली जाते.
१)तर्री मिसळ२) लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ

२) लाइट मिसळ
पुण्‍यात आल्यावर बुक् आहेच हो चिंतुकाका ;-)

:bigsmile:

राजघराणं's picture

1 Feb 2012 - 1:56 pm | राजघराणं

ही नाय मिलनार.. पण मिळेल ती मिसळ खायला आम्ही हापिसातून बाहेर पड्त आहोत

मूकवाचक's picture

1 Feb 2012 - 2:00 pm | मूकवाचक

+१

मोहनराव's picture

1 Feb 2012 - 1:59 pm | मोहनराव

लै भारी गुर्जी. भन्नाट!

वपाडाव's picture

1 Feb 2012 - 2:02 pm | वपाडाव

एकदा जाळ काढुन बघुच म्ह्ण्तो मी....

गणपा's picture

1 Feb 2012 - 2:04 pm | गणपा

अन्नदाता सुखी भव !!!
:)

प्रचेतस's picture

1 Feb 2012 - 2:12 pm | प्रचेतस

बाकी झणझणीत तर्रीदार मिसळ बनवणारे मामा मात्र एकदम सात्विक प्रवृत्तीचे दिसत आहेत. :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2012 - 7:28 pm | अत्रुप्त आत्मा

@मामा मात्र एकदम सात्विक प्रवृत्तीचे दिसत आहेत. >>>
तीच तर मज्जा हाय....अशी चव देणारा माणुस सात्विकच असतो,,,ते भणंग प्रवृत्तीचे कामं नोहे

अमित दळवे's picture

3 Feb 2012 - 1:54 am | अमित दळवे

++ १

अल्टिमेट मिसळवृत्तांत.. डीटेलवारीची दाद देत आहे...

मेघवेडा's picture

1 Feb 2012 - 2:40 pm | मेघवेडा

अल्टिमेट मिसळवृत्तांत.. डीटेलवारीची दाद देत आहे...

खरंय.. टाळ्याच!

मी-सौरभ's picture

1 Feb 2012 - 3:04 pm | मी-सौरभ

टाळ्यांचा कडकडाट :)

अशी ही मिसळगाथा ऐकलेल्या सर्व मिसळप्रेमींना ही मिसळ खाणेसाठी हार्दीक निमंत्रण....(वेळ, सोबत्=आवड आपली आपली)

रमताराम's picture

1 Feb 2012 - 6:03 pm | रमताराम

ऐसाईच बोल्ताय.
फटूंनी मार डाला.

मुक्त विहारि's picture

1 Feb 2012 - 2:37 pm | मुक्त विहारि

आत्ताच मस्त पैकी चिकन बिर्याणि आणि झिन्गा रस्सा ओरपुन आलो आणि समोर परत अशी मिसळ,,,,,,परत भारतात जायची ओढ लागली....

सिग्रेट्....तम्बाखु...मिसळ...आणि मद्य-पान...
विसरायला लावतात देह-भान....

वढ ए वढ... हाण्ण्ण्ण्ण तिज्या मारी. ;)

खंग्री तर्री नि मिसळ. भटजी , मानलं आपल्याला. आत्ताच जेवलेलो हो... परत भूक लागली की!

सुहास झेले's picture

1 Feb 2012 - 3:10 pm | सुहास झेले

भन्नाट एकदम ... काय बोलू? बोलती बंद ;)

आता निव्वळ ह्या मिसळीसाठी पुणे दौरा करावा म्हणतो.... :) :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2012 - 7:39 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या मिसळीसाठी पुणे दौरा करावा म्हणतो.. >>> याच...
याच(साठी) केला,लेखा अट्टाहास,
तो योग खास,मामा मिसळीचा...

नगरीनिरंजन's picture

1 Feb 2012 - 3:17 pm | नगरीनिरंजन

काय टिपायचं आणि काय सांगायचं ते जमलेलं आहे!

मनराव's picture

1 Feb 2012 - 3:21 pm | मनराव

+१

Maharani's picture

1 Feb 2012 - 3:24 pm | Maharani

एकदम भारीच!!

जबरी.. हायला मला कितीतरी जवळ आहे मंगला टॉकिज. आता उद्याच जाऊन हाणतो..

- पिंगू

मी-सौरभ's picture

2 Feb 2012 - 10:51 am | मी-सौरभ

कसं वाटतयं आता??

मज्जा आहे की ;)

पिंगु शेठ कॉल टाका च !!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2012 - 7:32 pm | अत्रुप्त आत्मा

पिंगु शेठ कॉल टाका च !! >>> उद्या सक्काळी ९वाजेपर्यंत मी तिथे असणारच आहे...त्यांना दाखवायचय ना...हे मिसळायण..

प्रभाकर पेठकर's picture

1 Feb 2012 - 4:17 pm | प्रभाकर पेठकर

कडक मिसळवृत्तांत्त. येतोच आता आस्वादायला. मस्त, चमचमीत तपशीलांबद्दल धन्यवाद.

प्रास's picture

1 Feb 2012 - 5:02 pm | प्रास

फोटो पाहून नि तुम्ही केलेलं वर्णन वाचून आमचा

स्विकार करा.....

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2012 - 7:35 pm | अत्रुप्त आत्मा

स्विकार करा..... स्विकारला हो भाऊ

पैसा's picture

1 Feb 2012 - 6:12 pm | पैसा

तर्रीचा रंग पाहून अंमळ टरकीफाय झाले आहे!

स्वाती२'s picture

1 Feb 2012 - 8:48 pm | स्वाती२

तर्रीचा रंग, मिसळीचे फोटो, वर्णन सगळेच एकदम सही आहे!

मराठमोळा's picture

1 Feb 2012 - 8:53 pm | मराठमोळा

तर्रीदार मिसळ....
उद्याच सकाळीच जाऊनच खाणारच.. :)
धन्स Unsatisfied Soul.. ;)

रेवती's picture

1 Feb 2012 - 8:56 pm | रेवती

बापरे! काय ही मिसळभक्ती!
वर्णन अगदी तर्रीदार झाले आहे.

मराठे's picture

1 Feb 2012 - 10:30 pm | मराठे

खत्तरनाक मिसळ दिसतेय. मिसळ खाणार्‍याला नाकातोंडातून आग ओकणारा ड्रॅगन बनवणार बहुतेक.

शिवाय

मिसळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटीलागी पंढरपुरासी जावे लागते.

हे ही तितकंच खरंय.

धमाल मुलगा's picture

7 Feb 2012 - 4:51 pm | धमाल मुलगा

प्र्याक्टिकली बोलायचं झालं तर 'एंटर' न म्हणता 'एक्झिट द ड्रॅगन' म्हणावं लागेल ज्यांना झेपणार नाही त्यांच्यासाठी. ;)

पाषाणभेद's picture

1 Feb 2012 - 10:35 pm | पाषाणभेद

हाथ मारता है लाथ मारता है
लडका अत्रूप्त ये साला
करंssट मारता है

मामाची मिसळ
खाउन झनझनाट!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2012 - 12:24 am | अत्रुप्त आत्मा

चला धागा काढल्याचं सार्थक झालं,,,अनेकजण मिसळ चाखुन गेले.
तरिही सोकाजीराव,
धनाजीराव,सूड,गणेशा
पन्नासराव(ज्यांची अमची ओळखच मुळी मामांच्या गाडिवर भेटुन झाली...)आनी आमचे किसनद्येव--- ते का कुणास ठाऊक आले नाहीत... :-(

एरवी मीच माझ्या धाग्यावर अशी प्रतिक्रीया देण्याचे कारण नाही.
परंतू मिसळ हे आमुचे देवाघरचे देणे
त्यामुळे ते जितक्या जमेल तितक्या आप्तांसह खाणे हा धर्म,,, त्यामुळे अठवण झाली
शिवाय हे सगळे खादाड कंपूचे सदस्य----स्वारी---मेंबर...मग होणारच अठवण...

अन्नू's picture

2 Feb 2012 - 7:18 pm | अन्नू

आता तुंम्ही पण!
काका- मामा- नाना- दादा- भाई- आत्या- मामी- काकी- मावशी- वहीनी- ताई- माई- आक्का..
मला वाचवा...................................

अमित दळवे's picture

3 Feb 2012 - 2:34 am | अमित दळवे

जवा पुण्यात आलो होतो तवा सकाळ-संध्याकाळ निरा मिसळपाव हाणली होती राजेहो...
आता वर्‍हाडी ठेच्या वानी तीखटजाळ हाय म्हणता तर जा लागल ना ब्वा.

नुकतीच जेऊन बसलीये ,तरी तुमचे हे मिसळीचे फोटो पाहून भूक लागली राव.

चतुरंग's picture

4 Feb 2012 - 1:12 am | चतुरंग

तर्रीदार चित्रे बघून पुढच्या टायमाला ही मिसळ चापायचा विचार पक्का झालाय!

(मिसळप्रेमी)रंगा

विसोबा खेचर's picture

4 Feb 2012 - 11:24 am | विसोबा खेचर

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

तर्रीदार मिसळीचा वृतांत आवडला

अमोल केळकर's picture

4 Feb 2012 - 1:41 pm | अमोल केळकर

जबरदस्त

अमोल केळकर

धमाल मुलगा's picture

4 Feb 2012 - 2:34 pm | धमाल मुलगा

काय तिच्यायला ते फोटू म्हणायचं का काय म्हणायचं द्येवा.... ती तरी बघूनच इथं बसल्याबसल्या आमची अवस्था इठूरायाच्या दर्शनला तळमळणार्‍या पुंडलिकागत झाली वो...

भटजीबुवा अत्तरवाले,
च्यामायला, चलाच आता. मामांकडं पैल्या धारेची लालभडक कॉटरमिसळ खाल्याबिगर आमच्या पिंडाला कावळा शिवायचा न्हाईच खरं. ठरवा बॉ कधी जायाचं त्ये. :)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Feb 2012 - 8:28 pm | अत्रुप्त आत्मा

ठरवा बॉ कधी जायाचं त्ये. >>> ह्हा ह्हा ह्हा....ध.मु. तुमचा प्रतिसाद वाचल्यावर मला एकच म्हणावसं वाटतं,,,
धम्माल मुलगा=मामांची मिसळ
मामांची मिसळ=धम्माल मुलगा

मामांकडे मिसळीला हवं तेंव्हा जाऊ... फक्त आधी कळवा...म्हणजे तर्री कडक असतानाचा टाइम गाठता येइल...

अवांतर-तुमच आमच जमणार बघा ;-)

मी-सौरभ's picture

7 Feb 2012 - 11:19 am | मी-सौरभ

अवांतर-तुमच आमच जमणार बघा

क्काय??

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2012 - 11:34 am | अत्रुप्त आत्मा

@क्काय??>>> देव येगळा असला तरी बिघडत नाय...धर्म तर एक हाय ना.. ;-)

इरसाल's picture

7 Feb 2012 - 11:22 am | इरसाल

आमाला कदी बलावताय ?

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2012 - 11:30 am | अत्रुप्त आत्मा

@आमाला कदी बलावताय ? >>> हवं तवा जाऊ...आनी दाबुन खाऊ...कारन आपुन मिसळपाव भाऊ ;-)

इरसाल's picture

7 Feb 2012 - 4:16 pm | इरसाल

सहिइइइइइइइइइइइइइ...........
शेवटची मिसळ खावुन ६/७ वर्शे झालीत राव.....................................

पुढच्या वेळेस मिसळ खाल्ली जाईन..

धन्यवाद

काल रात्री आणि आज सकाळी मस्त पैकी मिसळ हाणण्यात आली आहे तरीही 'मण' भरलेले नाही. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Feb 2012 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा

@काल रात्री आणि आज सकाळी मस्त पैकी मिसळ हाणण्यात आली आहे तरीही 'मण' भरलेले नाही. >>> कुठे खाल्ली...? माझ्या बरोब्बर एकदा चलं... सर्व काही भरेल ;-)

अवांतर-तसंही इतक्या जणांना, आपण बरोबर जाऊ असं म्हणलोय,की सगळ्रे एकदम गेलो,तर मामांकडे एक कट्टाच होऊन जाइल... :-)

मी-सौरभ's picture

22 Feb 2012 - 7:52 pm | मी-सौरभ

आता अश्याच दुसर्‍या उपहारगृहाची ओळख करुन द्या ना..

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 10:35 pm | अत्रुप्त आत्मा

@आता अश्याच दुसर्‍या उपहारगृहाची ओळख करुन द्या ना..>>> आहेत नंबरवर दोन/तीन :-)

चौकटराजा's picture

24 Feb 2012 - 9:28 am | चौकटराजा

मिसळी वर पातळ पोह्याचा चिवडा व टोंमॅटो व कोथिबीर यांचे गार्निशिंग मस्त दिसते. व मामा, वाईच कांदा बारीक चिरा ना राव !
मामा, लई " पब्लिकशिट्टी " झाली. आत्म्यानं फुकाट किती मिसळी मारल्या ?

पुष्कर जोशी's picture

6 Jan 2013 - 11:09 pm | पुष्कर जोशी

?

आज हि "करंट मिसळ" खाण्या चा योग आला ..
तीन प्रकारात तर्री ची तिखट मिसळ हीच फक्त खऱ्या मिसळ खाणाऱ्याला आवडेल ! मिसळ वाले मामा सगळ्यांना उत्साहात ह्या मिसळी चा ३२ वर्षा चा इतिहास सांगत होते .. त्यांनी हे सुद्धा आवर्जून सांगितले कि इंटरनेट वर मिसळपाव साईट वर त्यांचा फोटो आहे म्हणून !
मिसळ खवय्यान साठी एक सावधानते चा इशारा : ह्या मामांच्या मिसळ गाडी शेजारीच एक "डुप्लिकेट" मिसळ गाडी आहे..चुकू नका ! :)

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2013 - 6:18 pm | टवाळ कार्टा

पुन्यात का मुम्बैत???

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jun 2013 - 8:33 pm | अत्रुप्त आत्मा

पुण्यात...मंगला टॉकिज जवळ. पुणे महानगर पालिके जवळ! :-)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2015 - 9:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गुर्जींनो मला खायचीये ही मिसळ. कधी जायचं बोला?

अत्रुप्त आत्मा's picture

26 May 2015 - 12:15 am | अत्रुप्त आत्मा

3 तारखे नंतर

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2015 - 6:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चालेल. फोनविन तुम्हाला संध्याकाळचा.

मामा मिसळ ही गंडलेली मिसळ आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

यसवायजी's picture

26 May 2015 - 8:54 am | यसवायजी

ही गंडलेली मिसळ आहे असे माझेही सपष्ट मत आहे.

सतिश गावडे's picture

26 May 2015 - 9:13 am | सतिश गावडे

माझेही हेच मत आहे.
जेव्हा मी बुवांना तसं सांगितलं तर बुवा म्हणाले "तुम्हाला मिसळ कशी खायची हे माहिती नाही." =))

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 10:06 am | टवाळ कार्टा

म्हणजे???? बुवांना कट* मिळतो का तिथे ;)
का बुवा कोणाचा खास पुणेरी सत्कार करायचा असेल तर तिथे नेतात =))

*इथे श्लेष अपेक्षित आहे :D

सतिश गावडे's picture

26 May 2015 - 10:17 am | सतिश गावडे

*इथे श्लेष अपेक्षित आहे :D

आम्ही तुम्हाला इतके हे* वाटलो काय?

*इथे श्लेष अपेक्षित नाही. हे म्हणजे बावळट असे अभिप्रेत आहे.

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 10:19 am | टवाळ कार्टा

खिक्क

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2015 - 10:29 am | प्रसाद गोडबोले

चालु द्या तुमचे निरर्थक अत्मरंजन !

बाकी आमच्या चिंचवड मधील मयुर मिसळ अम्हास अत्यंत अवडलि आहे ... कधी येताय बोला !!

पाटील हो's picture

26 May 2015 - 10:36 am | पाटील हो

चिंचवड मधील मयुर मिसळ अम्हास अत्यंत अवडलि आहे

मिसळ नंतर ची सोलकडी & ताक पण लई भारी .

गणामास्तर's picture

26 May 2015 - 11:53 am | गणामास्तर

मयुर ची मिसळ मला पण जाम आवडते..कुठल्या शाखेत आणि कधी जायचं बोला.

नाखु's picture

26 May 2015 - 12:01 pm | नाखु

मयूर मिसळ नक्की कुठे आहे.

आजच हल्ला बोल करू, प्रगो,वल्ली येताय ना विथ गणामास्तर (लै दिसांनी दर्शन हुईल मास्तुरेचे)

आप्ला.
सुंमडी सोपान
नाखु

गणामास्तर's picture

26 May 2015 - 12:06 pm | गणामास्तर

एक शाखा चिंचवड स्टेशन कडून आकुर्डी चौकाकडे येताना डाव्या हाताला आहे आणि दुसरी थरमॅक्स एनर्जी हाउस च्या बाहेर आहे.

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2015 - 12:18 pm | प्रसाद गोडबोले

एक शाखा चिंचवड स्टेशन कडून आकुर्डी चौकाकडे येताना डाव्या हाताला आहे

मी ह्याच शाखेत गेलो होतो .

नाखु , गणामास्तर , संध्याकाळि मला जमत नाही राव , सकाळी जायचा प्लान करु ? उद्या भेटुयात का !!

गणामास्तर's picture

26 May 2015 - 12:24 pm | गणामास्तर

सकाळी जायचं असेल तर वीकांतालाच जमेल राव..संध्याकाळी कुठल्याही दिवशी जमु शकेल.

नाखु's picture

26 May 2015 - 12:29 pm | नाखु

याला जोरदार हाणुन मोदन

मिसळ संध्याकाळी खाण्यात काही अर्थ नाही राव.

सकाळी मिसळ आणि संध्याकाळी भेळ खायची असते असा अलिखित नियमच आहे म्हणे.

तुषार काळभोर's picture

26 May 2015 - 10:17 am | तुषार काळभोर

गंडलेली तर आहेच, शॅम्पल पन जरा पांचटच वाटलं होतं. (करंट-बिरंट लांब राहिला! तो पुण्यात आत्तापर्यंत फक्त काताकिर्र्र ला मिळालाय)
अवांतरः नेवाळेची मिसळ करंट असते, असं ऐकलंय, पण लई लांब आहे.

सतिश गावडे's picture

26 May 2015 - 10:19 am | सतिश गावडे

तुम्हाला मिसळ कशी खायची हे माहिती नाही.

(त्याआधी) कशी मागवायची हेच्च माहित नाही तुम्हाला.

सतिश गावडे's picture

26 May 2015 - 12:15 pm | सतिश गावडे

मी "ओ, एक मिसळ दया" अशी मागितली होती.

मिसळ कशी मागवायची म्हणजे "करंट" बसतो?

यसवायजी's picture

26 May 2015 - 12:34 pm | यसवायजी

"मिसळ कशी मागवावी" यावर एक जिल्बी पाडावी अशी मिपाक्रांतरफे बुवेश करण्टपचवीना इनंती करतो.

तुम्ही निरर्थक कटवादाचे बळी आहात.

सतिश गावडे's picture

26 May 2015 - 1:22 pm | सतिश गावडे

आपण मिसळ खाल्लेली नाही.

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2015 - 1:49 pm | प्रसाद गोडबोले

बुवा biziee आहेत म्हणुन डाव साधता काय रे रामखोरांन्नो !

थांबा , बुवा आले की सुधारणावादी आसुड कसा लागतो ते तुम्हाला पहायला मिळेल ...