नवा चित्रपट "दस कहानियाँ :- सिनेमा जगताची पण २०-२० !!!

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
20 Dec 2007 - 7:17 pm

या चित्रपटाच्या प्रदर्शानानंतर चित्रपटस्रुष्टी सुध्धा नव्या साचात बदलत आहे याची जाणीव होते. याच्या आधी "डरना मना है, सलामे इश्क" यासारख्या चित्रपटातून हे प्रयत्न झाले पण प्रत्येक कधेचा कही ना काही धागा शेवटी एकत्र आला. पण "दस कहानियाँ " हा एकदम वेगळा अनूभव आहे. दहा वेगवेगळ्या कथा, एकाचा दुसरीशी काहीही संमंध नाही हे वेगळेपण.

माझा नजरेने घेतलेला आस्वाद .......

*** मॅट्रोमोनी ****
एका कंपनीच्या अति कार्यमग्न असणार्‍या "वाईस प्रेसिडेंटच्या" पत्नीची ही कथा. एकटेपणाला कंटाळलेली ही पत्नी मग स्वताच वेगळा मार्ग शोधते. अर्थातच पतीला अंधारात ठेवून. त्यांचे हे लफडे तिच्या प्रेमीच्या शहर सोडण्याबरोबरच संपुष्टात येते. पण त्याने जाताना दिलेल्या भेटवस्तूमुळे पुढे तिला खर्या सत्याची कल्पना येते.
पटकथेत काहीच दम नाही पण नेत्रसुखद "मंदिरा बेदीमुळे" ही १० मिनिटे लगेच निघून जातात.

*** हाई ऑन दी हाईवेज***
एकुणच ही जिम्मी शेरगील व माशूमी मखिजा यांची कथा काहिही न बोलण्यासारखी. आडातच नाही तर पोहर्यात कोठून येणार ?

*** पुरनमासी ****
मेघना गुलजारची आत्तपर्यंतची सर्वोत्तम कथा. जे तिने आत्तपर्यंतच्या २००-२०० पानाच्या कादंबर्या व ३-३ तासाचे चित्रपटात मांडले नाही तेवढे या १५ मिनिटाच्या कथेत प्रभावीपणे मांडले आहे.
एका साखरपुडा झालेल्या मुलीच्या आईची ही कथा. वडील बाहेरगावी गेल्यावर ही मुलगी आपल्या आईला स्वताच्या बांगड्या, कपडे देईन नटवते. पण ती असते पोर्णिमेची रात्र. आईला या वेळी तिच्या तारूण्याच्या प्रेमीची आठवण येते की ज्याने दर पोर्णिमेला तिची वाट पहाण्याचे वचन दिले असते. आईने याला दिलेला प्रतिसाद व त्यामुळे तिच्या मुलीच्या आयुष्यात येणारे वादळ याची ही कथा.
अमृता सिंग च्या उत्कृष्ट अभिनयाची लाभलेली भेट हे याचे वैशिष्ट्य.

*** जहीर ***
एका होतकरू लेखकाची [ मनोज वाजपेई ] ही कथा. आपल्या शेजारी राहणार्‍या मुलीवरचे त्याचे प्रेम, तिने दिलेला नकार, त्यानंतर तिचे चारित्र्याचे सत्य समोर येणे व लेखकाने तिच्यावर केलेली जबरदस्ती व शेवटी तिला असणार्या रोगाची माहिती हे तिच्या नकारामागचे कारण असल्याचे सत्य समोर येणे अशी ही कथा. एकूणच साधारण म्हणावी अशी.

*** स्ट्रेंजर्सं इन दी नाईट***
लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाच्यावेळी वर्षभारातील एकमेकांची रहस्ये जाणून घेणार्या जोडप्याची ही कथा. पहिल्यांदा बदचलन वाटणार्या पत्नीच्या लैगिकतेकडे झूकणार्‍या घटनेमागचे रहस्य जेव्हां समोर येते तेव्हा या भागाच्या दिग्दर्शकाला शाबासकी देई वाटते. मस्त आहे. चित्रपटाच्या ऊत्तम कथा मधील एक.

*** राईस प्लेट ***
एकदम परंपरावादी असणार्या दाक्षीणात्य स्त्री ची सामाजीक वागणूक व एका अपघातातून तिला होणार्या सत्याचे जाणीव याची ही कधा. माझा मते चित्रपटातिल सर्वोत्कृष्ट कथा. दमदार पटकधा, शबाना व नासिर चा मस्त अभिनय यांची जोड लाभलेली एक ऊत्तम राईस प्लेटची मेजवानी. मजा आली ..........

*** गुब्बारे***
आपल्या पत्नीवर असणारे आपले प्रेम आपल्या बसमधल्या सहप्रवासी महीले बरोबर वाटणार्या एका प्रेमल पतीची ही कथा. स्वताच्या घडणार्या प्रत्येक चूकीची भरपाई म्हणून तिला फूगे भेट देण्याचे त्याची पध्धत. पण शेवटी जेव्हा रहस्य समोर येते तेव्हा मनाला चटका लावणारी ही कथा, नाना पाटेकरचा दमदार अभिनय हे याचे वैशिष्ट्य.

*** राईज & फॉल ***
मुंबईवर हुकूमत गाजवणार्‍या २ डॉन लोकांची ही कथा [ माझा अथवा बेडेकर यापेक्षा सिंहगड, पुरंदरपायथ्याशी मिसळ चापणार्‍या अभिजीत-मोठा डॉन यांचा काहिही संबंध नाही ]. एकहाती हुकूमत गाजवता यावी यासाठी त्यांनी खेळलेले डावपेच व त्यातूनच कोवळ्या पोरांचे या नरकात ओढले जाणे व अखंडित चालु राहणारि ही मालिका हा या कथेचा विषय. दिग्दर्शक संजय गुप्ता व कलाकार संजय दत्त, सुनील शेट्टी यांची उत्तम भट्टी जमली आहे.

याशिवाय "सेक्स ऑन दी बिच "" लव डेल" नावाच्या आणखी २ कथा आहेत. पण त्यांचा नुसता उल्लेख केला यातच सगळे आले.

एकंदरीत चित्रपटांच्या दुनयेतला हा नवा प्रयोग तेवढा मनाला रूचत नाही. पण एकदा पहायला हरकत नाही. थेटरात नाही, कुठून फूकट डिव्हीडी मिळाली तरच ...........

मांडणीविनोदमुक्तकजीवनमानमौजमजाचित्रपटमतप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

20 Dec 2007 - 7:40 pm | स्वाती राजेश

खुपच छान मांडणी आहे.
सर्व चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो.

लोकांना चित्रपट कथा आवडली नाही तर मधुनच उठून जाउ नयेत. निदान दुसरी कथा काय...? यासाठी प्रेक्षकांना खिळवून ठेवायचा प्रकार असावा.
इंग्रजी मधे असे काही चित्रपट आहेत कि जे ४/५ वेगवेगळ्या कथा शेवटी एकत्र येतात.

टिउ's picture

20 Dec 2007 - 8:54 pm | टिउ

हा असाच एक चित्रपट. यात पण ४-५ कथा दाखवल्या आहेत. पण सर्व कथांचा एकमेकांशी काहितरी संबंध आहे! 'दस कहानिया' तर माझ्या डोक्यावरुन गेला.

प्राजु's picture

21 Dec 2007 - 1:50 am | प्राजु

आपण लिहिलेले परिक्षण वाचून आता खरच जालावर मिळाला तरच पाहिन.. डिव्हीडी सुद्धा नाही आणणार...
पण आपले परिक्षण एकदम दमदार... आवडले..
१० गोष्टी एकदमात सांगून टाकल्यात... मजा आली.

- प्राजु.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Dec 2007 - 1:10 am | बिपिन कार्यकर्ते

आजच मित्राने डाऊनलोड करून दिला आहे.... बघावा म्हणतोय...