पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते?
आमची कुठेही शाखा नाही.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !!
जे का हिंडले बिंडले
पत्ता शोधण्यात गुंगले
ते उलटे जावोनी गंडले
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही
सुजला सुफला मुळा मुठा अन
दुथडी भरी नागझरी.
सर्वांचे चितळे पोटभरी
सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी
उण्या दुण्या चे काम नसे हे
पुण्या गुण्याचे नाव असे हे.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही.
जय हे जय हे जय जय हे.......
जय.पुणे......
प्रतिक्रिया
17 Oct 2014 - 12:57 pm | वेल्लाभट
हा हाह हा हाह हाह हा !
सहीए!
17 Oct 2014 - 3:35 pm | माम्लेदारचा पन्खा
तुम्हारा खून खून..... हमारा खून पानी?
17 Oct 2014 - 12:59 pm | वेल्लाभट
बरं, आता झेंडा वगैरे येऊदे. आणि हो, राज्यभाषा पुणेरी मराठीच. बरोबर ना?
राजधानीचं ठिकाण शनिवार वाडा. कसे?
17 Oct 2014 - 1:12 pm | नानासाहेब नेफळे
कोथरुड=उपराजधानी
राष्ट्रीय पदार्थ= आळुचे फदफदे
राष्ट्रीय रंग =घारा
राष्ट्रीय चिन्ह =घारे डोळे
राष्ट्रीय प्राणी= पांढरी चिपाडं
राष्ट्रीय घोषवाक्य =ध चा मा.
उपराजधानी= सहकारनगर
राष्ट्रीय संविधान= पुणेरी पाट्या.
17 Oct 2014 - 1:50 pm | पैसा
मस्त प्रतिसाद! अजून पुढचा भाग येऊ दे!
17 Oct 2014 - 2:38 pm | सुहास..
हा हा हा !!
राष्ट्रीय खेळ आणि खेळाचे मैदान दगडुशेठच्या आसपास आहे का ;)
( अज्ञानी )
वाश्या
17 Oct 2014 - 2:42 pm | काळा पहाड
जल्ला काय कल्ला नांय.
17 Oct 2014 - 3:15 pm | यसवायजी
जल्ला तुमी राष्ट्रीय पेठेत जाऊन कदी कल्ला केला नाय काय??
17 Oct 2014 - 3:19 pm | काळा पहाड
जल्ला नाय ओ. उल्टं मान वर कराला भ्या वाटाचं तितून जाताना. पकल्ला तर काय घ्या.
17 Oct 2014 - 4:02 pm | यसवायजी
@ उल्टं मान वर कराला भ्या वाटाचं तितून जातान >>
ते जौद्या, बाकी काय वर करु नगसा म्हंजे झालं. ;) आनी मान उल्टी कशापाई कराची म्हंतो मी?
@ पकल्ला तर काय घ्या >>
:)) :)) :))
काय पकल्ला म्हनुन र्हायले भौ?? टेंशन इल्ले. आपन्हुन कोन कायबी पकडत न्हाई. :))
17 Oct 2014 - 3:19 pm | अत्रुप्त आत्मा
@ कदी कल्ला केला नाय काय?? >>> *mosking*
17 Oct 2014 - 2:50 pm | विटेकर
राष्ट्रीय खेळ ..
एकामेकाचे पाय ओढणे हा आहे, त्याला मैदान लागत नाही, पुण्याच्या गल्लीबोळात सभागृहे आहेत आणि प्रत्येक सोसायटीत कम्युनिटी हॉल.
"कुठलाही विषय घेऊन काथ्या कुटणे" हा राष्ट्रीय छण्द आहे.
17 Oct 2014 - 3:25 pm | नानासाहेब नेफळे
पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे राष्ट्रीय कर्तव्य=== सवाई गंधर्व महोत्सवात संगीतातले षष्प काही कळत नसताना अर्ध्याचड्डीत व थ्रीफोर्थात जाणे, जाताना लोड तक्के उश्या घेऊन जाणे, आपण सोडून इतर लोक सांगितीक बाबतीत तुच्छ आहेत अशी नजर ठेवणे, एखादी तान दिर्घ होत गेल्यास तक्के उशी लोडावरुन देहाचे पीठुळ गाठोडे उचलून 'वा वा क्या बात है!जियो!! हे विचित्र हातवार्यांसकट ओरडणे (काहीजण याला 'दाद' म्हणतात) व आजबाजुला कटाक्ष टाकुन आपल्या दर्दीपणाचे किती चाहते आहेत याचा अंदाज घेणे.
मैफील चालू असताना पाठीमागच्या पटांगणात 'कोकणस्थी' पदार्थ चरायला जाणे, भाजणीचे थालीपीठ, दडपे पोहे कांदेपोहे वगैरे पदार्थ कधिच न मिळाल्यागत हादडणे, त्यासाठी रांगा लावुन भांडण करणे. हातामध्ये हेल्मेटं घेउन महोत्सवात एन्ट्री मारणे व भेटलेल्या प्रत्येक परिचीतास' ऑफिसवरुन आम्ही दोघे डीरेक्टली इकडेच आलो!(अनुनासिक) असे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याच्या अविर्भावात सांगणे :lol:
17 Oct 2014 - 3:32 pm | विनोद१८
तुला कुठेतरी 'कोकणस्थी मिरची' लागून झालेली गळवे ठुसठुसायला लागली काय, खरे सांग खोते सांगु नकोस ?? तसे जर असेल तर त्यावर उपाय्ही सुचविता येतील, बोल.
17 Oct 2014 - 4:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
17 Oct 2014 - 4:47 pm | नानासाहेब नेफळे
कोकणस्थी मिरची>>>> ही घार्या आणि निळ्या रंगात येत असावी! फारच तिखट!!नाकातुन पाणी काढणारी अनुनासिक :lol:
17 Oct 2014 - 3:33 pm | बॅटमॅन
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे याचे राष्ट्रीय अॅडमायरर - नानासाहेब नेफळे.
17 Oct 2014 - 3:33 pm | अत्रुप्त आत्मा
@देहाचे पीठुळ गाठोडे>>>
17 Oct 2014 - 4:44 pm | बॅटमॅन
=))
बाकी नेफळे नानांना एखाद्या पिठूळ गाठोड्याची मोहिनी पडल्यामुळे आणि ती निर्दयपणे झिडकारल्यामुळे ते पुण्याची इतक्या कसोशीने विरोधभक्ती करीत असावेत असे वाटते.
17 Oct 2014 - 4:51 pm | काळा पहाड
तसं असेल तर णाणांणा माझे सहानूभूतीपूर्वक समर्थन. चालू दे णाणा..
17 Oct 2014 - 4:58 pm | नानासाहेब नेफळे
गोळीबंद पुणेरी पुरचुंडीचे पाच ते सात वर्षात ओबडधोबड गठुडे होते याचा याची डोळा अनुभव घेतला आहे ,त्यामुळे मोहीनी 'पाडून' घेतली नाही.
( याची देही हा शब्द आमच्या चारीत्र्यास शोभत नसल्याने गाळलेला आहे. (बायकोचा एकपत्नीव्रती 'अहो नाना' ) )
17 Oct 2014 - 5:07 pm | बॅटमॅन
पुरचुंडीच्या हँडलिंगची मोहिनी बोलून दाखवली नाही तरी कळते ओ णाणा. राहूदे =))
17 Oct 2014 - 5:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
णाणा ठणाणा करणार आता =))
17 Oct 2014 - 5:26 pm | नानासाहेब नेफळे
तुमच्या पुणेरी आवडीनिवडी आमच्या नावाने खपवु नका! :lol:
17 Oct 2014 - 5:28 pm | बॅटमॅन
आम्हांला पुरचुंडी चांगली असल्याशी मतलब. मग ती पुणेरी असो नायतर अजून कुठली. तुम्हांला मात्र पुणेरी पुरचुंडीच जास्त भावते असं दिसतंय =))
17 Oct 2014 - 4:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्याबाबतीत णेफळे णाणांशी सहमत.
17 Oct 2014 - 1:58 pm | प्यारे१
>>> कोथरुड=उपराजधानी
>>> उपराजधानी= सहकारनगर
नानुली, नक्की काय म्हणायचंय?
17 Oct 2014 - 2:27 pm | वेल्लाभट
उपराजधानीसाठी दोन ठिकाणांत स्पर्धा आहे असं दिसतं.
17 Oct 2014 - 2:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सहकार नगर हे कोथरूडमध्येच येते ना?
बर्याच पूर्वी तेथे जाणे व्हायचे.
17 Oct 2014 - 2:37 pm | काळा पहाड
माई, नसलं तरी थोड्याच दिवसात येईल. आमच्या फौजांना त्याला कोथरूड संस्थानात विलीन करण्यासाठी तिकडे कूच करण्याचे आदेश दिले आहेत.
17 Oct 2014 - 3:25 pm | विनोद१८
प्यारे१ ने उपराजधानीबद्दल विचारले आणि लगेच माईचे त्याला उत्तर आले...!!!!
18 Oct 2014 - 12:11 pm | हरकाम्या
नानासाहेब तुम्ही बर्याच गोष्टी विसरलात.
१) राष्ट्रीय पोषाख
२) राष्त्रीय " शिवी "
या वयात विसर्भोळेपणा वाढला की काय?
17 Oct 2014 - 1:20 pm | विजुभाऊ
ओ नानासाहेब.. उपराजधानीचा मान मध्यवर्ती ठिकाण अर्थातच" डोंबोलीला" जातो
17 Oct 2014 - 2:27 pm | वेल्लाभट
पुण्यातल्या डोंबोलीला की काय ? :D
17 Oct 2014 - 2:47 pm | विटेकर
पुण्यात " डोंबल", डोम्बोली नै काई ..
आणि डोंबवली ब्रह्मांडाचा मध्य आहे, पुण्यक राष्ट्राचा नाही.
17 Oct 2014 - 2:31 pm | वेल्लाभट
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही. यातून मोडेन पण वाकणार नाही हा राष्ट्रीय संदेश प्रतीत होईल.
17 Oct 2014 - 2:41 pm | काळा पहाड
गल्ली चुकली पी.एल.! तो बाणा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पिंपरी-चिंचवड चा.
17 Oct 2014 - 3:03 pm | टवाळ कार्टा
झेंड्यावर चिन्ह मात्र "पाटी"चे :)
17 Oct 2014 - 3:23 pm | विजुभाऊ
त्यापेक्षा तो रबरासारख्या चिवट ( चिकट नाही) पदार्थापासून बनवावा. म्हणजे इथे कोणताही विषय कितीही ताणता येतो हे आपोआप अभिप्रेत होईल
17 Oct 2014 - 2:48 pm | विजुभाऊ
तरीही तो थोडासा वक्रच राहील. झेंड्यातूनही आमचा तिरकसपणा दिसला पाहिजे
17 Oct 2014 - 3:16 pm | वेल्लाभट
बरोब्बर ! बेस्ट
17 Oct 2014 - 3:01 pm | पैसा
काय प्रतिसाद आहेत एकेक! थांबा, अजून मृत्युंजयाने तुम्हाला अनुल्लेखाने मारले आहे तोपर्यंत! =))
17 Oct 2014 - 3:02 pm | बॅटमॅन
घटाख्य पंचाक्षरी राष्ट्रीय खेळ तर नैये ना ;)
17 Oct 2014 - 3:50 pm | सूड
हायला !!
17 Oct 2014 - 3:04 pm | अत्रुप्त आत्मा
पण तुंम्ही? कोंढवा पुण्यात घेणार कि नै? ते आदी सांगा! ;)
आमी अट्टल पिंणदुत्ववादी हाओत! :p
17 Oct 2014 - 3:05 pm | बॅटमॅन
कोंढवा पुण्यात घेणार की त्यावर सुलतानढवा करणार? मुंढव्याचे काय? झालंच तर घोरपडीला घोरपड लावून पाडणार की हाडे पसरून हडपसरपर्यंत जाणार?
17 Oct 2014 - 3:16 pm | अत्रुप्त आत्मा
खाटका...मेल्या थांब कि जरा... =)) एकेक मुद्दा काढायचा..तर भस्सकन ओतलन बादली! :p
17 Oct 2014 - 4:49 pm | इरसाल
बहुधा पुण्य-बकेट च्यालेंज घेतलेले दिसतेय.
17 Oct 2014 - 4:56 pm | बॅटमॅन
पुण्य बकेट च्यालेंज म्हणजे मुळा-मुठा नामक एका मोठ्या गटारीतील बादलीभर पाणी अंगावर ओतून घेणे. तसे रोज रोज केले तर रोगप्रतिकारक शक्ती आक्षी लंडन की विटामिन गोली खाल्यावर पावर वाढते तशी वाढते म्हणे.
17 Oct 2014 - 5:07 pm | इरसाल
अय्या हे काय भलतचं !..........पुन्हा ईईईईईईईईईईईईई......;)
17 Oct 2014 - 3:11 pm | काळा पहाड
पुण्य नगरीचा झेंडा
17 Oct 2014 - 3:17 pm | वेल्लाभट
नाही हो हा काही जमत नाहीये बुवा झेंडा म्हणून.
17 Oct 2014 - 3:32 pm | प्रमोद देर्देकर
राष्ट्रीय पक्षी - कावळा
17 Oct 2014 - 4:50 pm | विजुभाऊ
दर्दुकाका. तुमचे म्हणणे बरोबर आहे.
तो तसा असण्याचे कारण म्हणजे पुणेकर म्हणतो समोर दिसणारा कावळाच बरा.
दुसरा कोणता पक्षी बघण्यासाठी उगीचच " का वळा ?"
18 Oct 2014 - 12:16 pm | हरकाम्या
राष्ट्रीय पक्षी " कावळा " निवडलेला आहे. पण त्यावर शिक्कामोर्तब होण्यापुर्वी तो कावळा " काळा " का "गोरा"
यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. असे माझे मत आहे.
18 Oct 2014 - 2:34 pm | चौकटराजा
ओंकारेश्वरावरचा कावळा... च्यामायला इतरांचे बापाचे वेळी लवकर शिवणारा पण आपली येळ आली की सस्पेन्स !
17 Oct 2014 - 3:32 pm | प्रमोद देर्देकर
चला आता घटना लिहायला घ्या बरं कुणीतरी.
17 Oct 2014 - 3:37 pm | काळा पहाड
अजून प्रतिज्ञा राहिलियेच.
17 Oct 2014 - 3:34 pm | चौकटराजा
पुंण्याच्या 'नाना' पेठेवरूनच मुंबयच्या एका चे नाव नानासाहेब ठेवले काय ?
17 Oct 2014 - 4:14 pm | कंजूस
निषेध!
१९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे.
17 Oct 2014 - 4:28 pm | बॅटमॅन
लक्ष?????
अरे कुठे नेऊन ठेवलं शुद्धलेखन माझं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
१००१ वेळा लिहा. लक्ष नव्हे लक्ष्य.
छ्या:!!!! पूर्वीचं पुणं राहिलं नाही.
17 Oct 2014 - 6:25 pm | कंजूस
चुकलंच लक्ष्य अक्षी. पण आता बाण काय परत येणार आहे ? आणि TAR-GATE ही लिहिलं नाही चुकून TARGET लिहिलं. आता १९ तारखेपर्यंत १००१वेळा लिहित बसतो 'लक्ष्य'. अक्षम्य अपराध घडला तोही या पुण्यनगरीच्या लेखात.क्षमा असावी.
17 Oct 2014 - 4:23 pm | सुहास..
निषेध!
१९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे. >>>
=)) =)) =))
हा आला टिपिकल पुणेरी प्रतिसाद !!
17 Oct 2014 - 4:42 pm | जेपी
पण कंजूस काका तर मुंबैचे आहेत.
पुर्व इतिहास माहित नाही.
17 Oct 2014 - 4:43 pm | विजुभाऊ
स्वतन्त्र "नळ स्टॉप" झालाच पाहिजे
:- बबन ( ई.नळस्टॉप वाला)
18 Oct 2014 - 2:08 pm | हरकाम्या
स्वतन्त्र " नळस्टॉप " झालाच पाहिजे. आणि तिथे "विजुभाउंचा " पुर्णाक्रुती पूतळा उभा राहिलाच पाहिजे.
पाहिजे तर उपराजधानीत मी आत्तापासुन निधी गोळा करायला सुरुवात करतो. लवकरच तुम्हाला तिथ " निधी गोळा करण्यासाठी लावलेली. पुणेकरांचे संध्याकाळचे लाड्के खाद्य असलेली वडापावची गाडी दिसेल.तिथ " वडापाव " खाउनझाल्यानंन्तर डब्यात " वर्गणी " टाकण्यास विसरु नये ही नम्र विनन्ती.
18 Oct 2014 - 2:34 pm | विजुभाऊ
हरकाम्या, विजुभाऊ हे पुण्याबाहेरचे आहेत. ते ज्यानी पेषव्याची नेमणूक केली त्या छत्रपतींच्या गावचे आहेत. तसेच सध्या मुम्बईवासी असतात.
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे मधे परदेशी लोकांचे कसले पुतळे उभारताय?
17 Oct 2014 - 4:50 pm | जेपी
वेगळ आनंद नगर झालच पायजे.
बबन( आनंदनगरवाला)
17 Oct 2014 - 5:00 pm | सूड
ह्याला सहमती!!
(नव-आनंदनगरकर)
17 Oct 2014 - 5:03 pm | सुहास..
च्यायला , मग लोहगावनच काय घोडं मारलय ;)
17 Oct 2014 - 5:22 pm | नानासाहेब नेफळे
डॉलर पाउंड रुपया येन युरो वगैरे चलनांना टक्कर देण्यासाठी 'मोदक' नावाचे नवे राष्ट्रीय चलन सुरु करावे व त्यावर उकडीच्या मोदकाचे चित्र राष्ट्रीय चिन्ह याअर्थी छापावे ,सदर चित्रात मोदकावरचे तूप(साजुक) शोधूनही सापडले नाही पाहिजे,सापडल्यास तो राष्ट्रद्रोह समजावा व आरोपीस वसंतव्याख्यानमालेतील प्रत्येक पुष्प गुंफताना उपस्थीत राहण्याची क्षिशा देण्यात यावी व नंतर व्याख्यानावरील प्रश्नोत्तरे विचारावीत.
पुरेपुर कोल्हापुर व रस्सामंडळास सांस्कृतीक राजधानीचा संयुक्त दर्जा द्यावा.
17 Oct 2014 - 11:18 pm | मित्रहो
अहो नवीन चलन हवे तर मग छापील कशाला, मोदकच चलन. त्याने मोदक बनवायच्या पारंपीरीक व्यवसायाला चालना मिळेल.
17 Oct 2014 - 5:41 pm | यसवायजी
च्यायला तर मग आमच्या से.बा.ला राष्ट्रीय महारस्ता आणी 'चतुरशिंगी'ला रा.पर्वत म्हणण्यात यावे.
17 Oct 2014 - 5:49 pm | विजुभाऊ
अहो पुण्यात सगळेच महा असतं.
( पुण्यात सगळेच महापंडीत असतात .नुसते पंडीत असे म्हंटले तर ते आडनाव सजावे.::- संदर्भः पु.लं : _ तुम्हाला पुणेकर मुम्बैकर की नागपुरकर....... )
17 Oct 2014 - 5:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
लक्ष्मी रोड्चा पुणेकरांना अतिशय अभिमान असतो.पुण्याची आर्थिक राजधानी तेथे होईल.हिंजवडी,खरडी,पिंपळे (गुरव्,सौदागर्,निलख) ह्यांना सिलिकॉन व्हॅली बनवता येईल.
वाकडला तुमचा तो ईमिग्रेशन चेक पोस्ट होवू शकेल.
17 Oct 2014 - 5:56 pm | बॅटमॅन
अन मिल्ट्रीचे केंद्र घोरपडी-हडपसर.
लक्ष्मीरोडचे तख्त राखतो हडपसर साचा =))
17 Oct 2014 - 5:33 pm | जेपी
नाना-मामा च्या धर्तीवर मी नविन चित्रपट बनवत आहे.
शिर्षक आहे "नाना आणी माई" कलाकारांची ऑडीशन चालु आहे. ईच्छुकांनी व्यनी टाकावा.
प्रोड्युसर-जेपी
17 Oct 2014 - 5:48 pm | स्वामी संकेतानंद
=))
17 Oct 2014 - 5:58 pm | बॅटमॅन
आणि हो, पुणे देशात रोज दुपारी १ ते ४ प्रवेश बंद असेल. कोणी बेकायदेशीर घुसखोरी केल्यास त्याला रामनाथची मिसळ खाऊ घातली जाईल.
17 Oct 2014 - 6:06 pm | यसवायजी
रामनाथची मिसळ खाऊ घातली जाईल. :))
च्यायचा त्या मिसळीच्या..
17 Oct 2014 - 6:15 pm | बॅटमॅन
अगदी अगदी =))
17 Oct 2014 - 6:18 pm | नानासाहेब नेफळे
रामनाथ मिसळ नकॅ तर पीरीपुकरांना काय बेडेकरचे तिखट पाणी प्यायचे आहे काय!
17 Oct 2014 - 6:22 pm | यसवायजी
णाणाची धाव बेडेकरपर्यंत!!! :))
(फडतरेप्रेमी) SYG
17 Oct 2014 - 5:58 pm | स्वामी संकेतानंद
पुणे माझा देश आहे.
सारे पुणेकर माझे बांधव नाहीत.
माझ्या देशाचा मला जाज्वल्य अभिमान आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला जाज्वल्य अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी जन्मतः आहे.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्या माणसांचा किमान शब्दांत कमाल अपमान करीन.
आणि प्रत्येकाशी तुसडेपणाने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव ह्यांच्याशी फटकून वागण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचा अपमान आणि त्यांची फजिती ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
;)
17 Oct 2014 - 6:05 pm | बॅटमॅन
हा हा हा, परफेक्ट!!!!
श्रीफल आणि महावस्त्रासकट शिक्रण व मटार उसळ या राष्ट्रीय २ कोर्स डिनरने स्वामींना सन्मानित केल्या जावे असा प्रस्ताव मी मजलिस-ए-शूरा-अल-पूना इथे पेश करतो.
17 Oct 2014 - 6:09 pm | यसवायजी
शिक्रण व मटार उसळ घरी घेउन जाता येईल. श्रीफल आणि महावस्त्र कार्यक्रमानंतर परत घेतले जाईल. ;)
17 Oct 2014 - 6:13 pm | स्वामी संकेतानंद
ठ्ठो ! =))
17 Oct 2014 - 6:14 pm | बॅटमॅन
हा हा हा. इदु पक्का पुणेरी =))
17 Oct 2014 - 6:16 pm | नानासाहेब नेफळे
शिक्रण आणि मटारची उसळ ही पुणेरी चंगळवादाची कमाल परीसीमा आहे हे वाट चुकलेल्या पुणेकरांना समजावे यासाठी' पुरेपुर शिकरण'(शिकरण शब्दाची फोड करु नये) नावाची उपहारगृहं सरकारी कार्यालयात चालू करावीत.
17 Oct 2014 - 6:18 pm | बॅटमॅन
या उपाहारगृहांत पोळ्या पुरवल्या जाव्यात की घरून घेऊन यावयास सांगावे?