नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
17 Oct 2014 - 12:43 pm

पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते?

आमची कुठेही शाखा नाही.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !!
जे का हिंडले बिंडले
पत्ता शोधण्यात गुंगले
ते उलटे जावोनी गंडले
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही
सुजला सुफला मुळा मुठा अन
दुथडी भरी नागझरी.
सर्वांचे चितळे पोटभरी
सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी
उण्या दुण्या चे काम नसे हे
पुण्या गुण्याचे नाव असे हे.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही.
जय हे जय हे जय जय हे.......
जय.पुणे......

पाकक्रियाबालकथाप्रेमकाव्यबालगीतऔषधोपचारराहती जागामौजमजास्थिरचित्रसद्भावनाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2014 - 7:20 pm | अत्रुप्त आत्मा

@महावस्त्र कार्यक्रमानंतर परत घेतले जाईल. >> का?? असे विचारल्यास विचारणाराचे जिवंतपणीच ओंकारेश्वरावर पिंडदान केले जाइल.

टवाळ कार्टा's picture

17 Oct 2014 - 7:45 pm | टवाळ कार्टा

=))

पैसा's picture

17 Oct 2014 - 6:45 pm | पैसा

मेले हसून!

विटेकर's picture

17 Oct 2014 - 6:09 pm | विटेकर

ह ह पुरेवाट !

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Oct 2014 - 6:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुणे या प्राचीन विषयावर अजूनही चटकदार चर्चा होऊ शकते हे पाहून (हह) ड्वाळे पाणाव्ळे. +D

तिमा's picture

17 Oct 2014 - 6:56 pm | तिमा

आमचा 'परा' असता तर तुम्हा सार्‍यांना एकटा पुरुन उरला असता मोदींसारखा!

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2014 - 7:57 pm | अत्रुप्त आत्मा

असता तर मंजे??? ;-)

तिमा's picture

18 Oct 2014 - 9:53 am | तिमा

हजर असता तर!

म्हणजे?? परा इथे नाही म्हणता?

हरकाम्या's picture

18 Oct 2014 - 12:19 pm | हरकाम्या

तो काय पुणे राष्ट्राची हद्द ठरवायला गेला की काय?

तोफगोळे धडाडा येऊन पडत आहेत. एकटे अ०आ० बुरुज लढवत आहेत कोणीतरी त्यांच्या मदतीस जावे.

पैसा's picture

17 Oct 2014 - 9:36 pm | पैसा

चिंचवडकर आले तर आताच त्यांचा धायरीविरुद्ध सामना सुरू होईल. मग आपण नेमके कोणाच्या विरोधात लढतोय हे बुवा विसरून जातील! :P

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2014 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा

@मग आपण नेमके कोणाच्या विरोधात लढतोय हे बुवा विसरून जातील!>>> :-/ दुष्ष्ष्ट रुपैय्या तै! :D
http://www.sherv.net/cm/emoticons/halloween/vampire-in-casket.gif

चिंचवडकरांना असल्या क्षुद्र वादात बिलकुल रस नाही. :P

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Oct 2014 - 8:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

+४११०४४

पैसा's picture

18 Oct 2014 - 10:40 am | पैसा

आपण पुणेकरांपेक्षा हुच्चभ्रू आहोत असे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न! :P

प्रसाद गोडबोले's picture

8 Dec 2014 - 4:52 pm | प्रसाद गोडबोले

सत्यवचन !

मित्रहो's picture

18 Oct 2014 - 12:02 am | मित्रहो
  1. नळस्टॉपवर नळ का नाहीत आणि असले तर किती आहेत?
  2. येरवडा आणि येरवंडण वेगऴे आहेत हे बाहेरच्या मूर्खांना का कळत नाही?
  3. वैशालीचाच उपमा जगात (पृथ्वी + मंगळ) श्रेष्ठ का?
  4. हिमालयाला भारतीयांनी भारताची पर्वती का म्हणू नये?
  5. स्वारगेटला गेट कुठे आहे?
पाषाणभेद's picture

18 Oct 2014 - 12:28 am | पाषाणभेद

काय एकएक प्रतिसाद आहेत एकेकाचे. सगळेच सुटलेत.

अर्धवटराव's picture

18 Oct 2014 - 12:39 am | अर्धवटराव

=))

अर्धवटराव's picture

18 Oct 2014 - 12:45 am | अर्धवटराव

पुणे-अतिपुणे वात्रट झांगड मिपावतरी होयअति |
तसे xx xxx xxxxx xxxxx xxxxxxxxx xx पति ||

खटपट्या's picture

18 Oct 2014 - 12:49 am | खटपट्या

मुबईचा राजदूत म्हणून मी पुण्यात येणार आहे.
राजदूतावासासाठी जागा सांगावी.

आणि पुण्याचं मंत्रिमंडळहि जाहीर करून टाका एकदाच.म्हणजे. म्हणजे द्विपक्षीय चर्चा करायला मोकळे. (सीमावादावर वगैरे)

पैसा's picture

18 Oct 2014 - 10:41 am | पैसा

हुंबैकरांची सीमा कुठपर्यंत? पुणेकरांनी आपली हद्द नदीपर्यंत हे आधीच झाईर केले आहे.

खटपट्या's picture

18 Oct 2014 - 12:24 pm | खटपट्या

आमची सीमा पहिला टोलनाका येईपर्यंत !!

हरकाम्या's picture

18 Oct 2014 - 12:29 pm | हरकाम्या

सध्या पुण्यात अतिक्रमणाचे पेव फुटलेले आहे. त्यामुळे तुम्हाला दूतावासासाठी योग्य जागा मिळेल असे वाटत नाही.
तुर्तास ." मनपा भवनासमोरचा फूटपाथ " चालेल का.
उपराजधानीत सध्या फूटपाथची अवस्था वाइट आहे.आणि पुणे राष्ट्रातील " स्वछता " प्रेमी भाजीवाल्यांनी तो आप्ल्या
मालकीचा म्हणुन घोषित केलेला आहे.

हुंबैकरांची सीमा कुठपर्यंत? पुणेकरांनी आपली हद्द नदीपर्यंत हे आधीच झाईर केले आहे.

नदी कोणती म्हणायची ? मुळा मुठा भीमा इंद्रायणी ?
मुम्बैकरांची हद्द.! सेन्ट्रल आणि वेस्टर्न लोकल जाईल तेथपर्यन्त.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2014 - 2:15 pm | अत्रुप्त आत्मा

@मुम्बैकरांची हद्द.! सेन्ट्रल आणि वेस्टर्न लोकल जाईल तेथपर्यन्त.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif

गुर्जी आत्ता होऊन जौद्या एकदा
आसेतु लॉकॉलेज्टेकडीमाथा शविवारवाडायुक्त संयूक्त घोरपडी हडपसर धनकवडी विश्रान्तवाडी भोसरी सह पुण्यपत्तन........ एकच ध्यास एकाच आवाज पुण्यपत्तन की.......

बॅटमॅन's picture

8 Dec 2014 - 4:19 pm | बॅटमॅन

शविवारवाडा?

शनिवार+रविवार कम्बाईन्ड वीकेंडवाडा आहे की काय =))

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2014 - 6:44 pm | अत्रुप्त आत्मा

अरे हलकट खाटुकमॅनाsssssssssssss! =))

पेशवे त्यांचा जगप्रसिद्ध खेळ वीकांतीच खेळत असावेत बहुधा, तसा विचार केल्यास शविवारवाडा एकदम पर्फेक्ट !! ;)

प्रसाद गोडबोले's picture

8 Dec 2014 - 8:56 pm | प्रसाद गोडबोले

जगप्रसिद्ध खेळ

>>>

ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे ;) :D

नक्कीच !! कधी येताय बोला. :D

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2014 - 11:06 pm | अत्रुप्त आत्मा

@ह्या विषयावर >> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

बॅटमॅन's picture

9 Dec 2014 - 12:56 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!!!!

तदुपरि- घट'पटा'ची चर्चा हा शब्दप्रयोग जितका तत्वज्ञानविषयक चर्चेला लागू होतो तितकाच या आधिभौतिकासही लागू होतो. ;)

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 1:17 pm | टवाळ कार्टा

कंचा खेळ?