✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत

व
विजुभाऊ यांनी
Fri, 10/17/2014 - 12:43  ·  लेख
लेख
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते? आमची कुठेही शाखा नाही. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !! जे का हिंडले बिंडले पत्ता शोधण्यात गुंगले ते उलटे जावोनी गंडले या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही सुजला सुफला मुळा मुठा अन दुथडी भरी नागझरी. सर्वांचे चितळे पोटभरी सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी उण्या दुण्या चे काम नसे हे पुण्या गुण्याचे नाव असे हे. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही. जय हे जय हे जय जय हे....... जय.पुणे......
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
बालकथा
प्रेमकाव्य
बालगीत
औषधोपचार
राहती जागा
मौजमजा
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
29480 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

तोफगोळे धडाडा येऊन पडत आहेत.

कंजूस
Fri, 10/17/2014 - 20:02 नवीन
तोफगोळे धडाडा येऊन पडत आहेत. एकटे अ०आ० बुरुज लढवत आहेत कोणीतरी त्यांच्या मदतीस जावे.
  • Log in or register to post comments

चिंचवडकर आले तर

पैसा
Fri, 10/17/2014 - 21:36 नवीन
चिंचवडकर आले तर आताच त्यांचा धायरीविरुद्ध सामना सुरू होईल. मग आपण नेमके कोणाच्या विरोधात लढतोय हे बुवा विसरून जातील! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

@मग आपण नेमके कोणाच्या

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/18/2014 - 00:09 नवीन
@मग आपण नेमके कोणाच्या विरोधात लढतोय हे बुवा विसरून जातील!>>> :-/ दुष्ष्ष्ट रुपैय्या तै! :D Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चिंचवडकरांना असल्या क्षुद्र

प्रचेतस
Sat, 10/18/2014 - 08:52 नवीन
चिंचवडकरांना असल्या क्षुद्र वादात बिलकुल रस नाही. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+४११०४४

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/18/2014 - 08:53 नवीन
+४११०४४
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हुच्चभ्रू

पैसा
Sat, 10/18/2014 - 10:40 नवीन
आपण पुणेकरांपेक्षा हुच्चभ्रू आहोत असे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

+४११०३३

प्रसाद गोडबोले
Mon, 12/08/2014 - 16:52 नवीन
सत्यवचन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शोधप्रबंधाचे काही विषय

मित्रहो
Sat, 10/18/2014 - 00:02 नवीन
  1. नळस्टॉपवर नळ का नाहीत आणि असले तर किती आहेत?
  2. येरवडा आणि येरवंडण वेगऴे आहेत हे बाहेरच्या मूर्खांना का कळत नाही?
  3. वैशालीचाच उपमा जगात (पृथ्वी + मंगळ) श्रेष्ठ का?
  4. हिमालयाला भारतीयांनी भारताची पर्वती का म्हणू नये?
  5. स्वारगेटला गेट कुठे आहे?
  • Log in or register to post comments

काय एकएक प्रतिसाद आहेत

पाषाणभेद
Sat, 10/18/2014 - 00:28 नवीन
काय एकएक प्रतिसाद आहेत एकेकाचे. सगळेच सुटलेत.
  • Log in or register to post comments

मेलो

अर्धवटराव
Sat, 10/18/2014 - 00:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments

ए बॅट्या.. हा शेर पूर्ण कर रे...

अर्धवटराव
Sat, 10/18/2014 - 00:45 नवीन
पुणे-अतिपुणे वात्रट झांगड मिपावतरी होयअति | तसे xx xxx xxxxx xxxxx xxxxxxxxx xx पति ||
  • Log in or register to post comments

मुबईचा राजदूत म्हणून मी

खटपट्या
Sat, 10/18/2014 - 00:49 नवीन
मुबईचा राजदूत म्हणून मी पुण्यात येणार आहे. राजदूतावासासाठी जागा सांगावी. आणि पुण्याचं मंत्रिमंडळहि जाहीर करून टाका एकदाच.म्हणजे. म्हणजे द्विपक्षीय चर्चा करायला मोकळे. (सीमावादावर वगैरे)
  • Log in or register to post comments

हुंबैकरांची सीमा

पैसा
Sat, 10/18/2014 - 10:41 नवीन
हुंबैकरांची सीमा कुठपर्यंत? पुणेकरांनी आपली हद्द नदीपर्यंत हे आधीच झाईर केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आमची सीमा पहिला टोलनाका

खटपट्या
Sat, 10/18/2014 - 12:24 नवीन
आमची सीमा पहिला टोलनाका येईपर्यंत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

दुतावास

हरकाम्या
Sat, 10/18/2014 - 12:29 नवीन
सध्या पुण्यात अतिक्रमणाचे पेव फुटलेले आहे. त्यामुळे तुम्हाला दूतावासासाठी योग्य जागा मिळेल असे वाटत नाही. तुर्तास ." मनपा भवनासमोरचा फूटपाथ " चालेल का. उपराजधानीत सध्या फूटपाथची अवस्था वाइट आहे.आणि पुणे राष्ट्रातील " स्वछता " प्रेमी भाजीवाल्यांनी तो आप्ल्या मालकीचा म्हणुन घोषित केलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

हुंबैकरांची सीमा कुठपर्यंत?

विजुभाऊ
Sat, 10/18/2014 - 12:27 नवीन
हुंबैकरांची सीमा कुठपर्यंत? पुणेकरांनी आपली हद्द नदीपर्यंत हे आधीच झाईर केले आहे.
नदी कोणती म्हणायची ? मुळा मुठा भीमा इंद्रायणी ? मुम्बैकरांची हद्द.! सेन्ट्रल आणि वेस्टर्न लोकल जाईल तेथपर्यन्त.
  • Log in or register to post comments

@मुम्बैकरांची हद्द.! सेन्ट्रल

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/18/2014 - 14:15 नवीन
@मुम्बैकरांची हद्द.! सेन्ट्रल आणि वेस्टर्न लोकल जाईल तेथपर्यन्त.>>> Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

गुर्जी आत्ता होऊन जौद्या एकदा

विजुभाऊ
Mon, 12/08/2014 - 16:18 नवीन
गुर्जी आत्ता होऊन जौद्या एकदा आसेतु लॉकॉलेज्टेकडीमाथा शविवारवाडायुक्त संयूक्त घोरपडी हडपसर धनकवडी विश्रान्तवाडी भोसरी सह पुण्यपत्तन........ एकच ध्यास एकाच आवाज पुण्यपत्तन की.......
  • Log in or register to post comments

शविवारवाडा?

बॅटमॅन
Mon, 12/08/2014 - 16:19 नवीन
शविवारवाडा? शनिवार+रविवार कम्बाईन्ड वीकेंडवाडा आहे की काय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अरे हलकट

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/08/2014 - 18:44 नवीन
अरे हलकट खाटुकमॅनाsssssssssssss! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पेशवे त्यांचा जगप्रसिद्ध खेळ

सूड
Mon, 12/08/2014 - 20:52 नवीन
पेशवे त्यांचा जगप्रसिद्ध खेळ वीकांतीच खेळत असावेत बहुधा, तसा विचार केल्यास शविवारवाडा एकदम पर्फेक्ट !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जगप्रसिद्ध खेळ

प्रसाद गोडबोले
Mon, 12/08/2014 - 20:56 नवीन
जगप्रसिद्ध खेळ >>> ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे ;) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नक्कीच !! कधी येताय बोला.

सूड
Mon, 12/08/2014 - 21:29 नवीन
नक्कीच !! कधी येताय बोला. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

@ह्या विषयावर >>

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/08/2014 - 23:06 नवीन
@ह्या विषयावर >> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अगदी अगदी!!!!

बॅटमॅन
Tue, 12/09/2014 - 12:56 नवीन
अगदी अगदी!!!! तदुपरि- घट'पटा'ची चर्चा हा शब्दप्रयोग जितका तत्वज्ञानविषयक चर्चेला लागू होतो तितकाच या आधिभौतिकासही लागू होतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कंचा खेळ?

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 13:17 नवीन
कंचा खेळ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा