लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र

खटासि खट's picture
खटासि खट in जनातलं, मनातलं
3 Dec 2013 - 7:30 pm

प्रिय आई,

प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते.

पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.

मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते.
मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही
इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो.
नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो.
मी गबाळयासारखी घरभर फिरु शकते.
समोरच्या बिल्डींगवर तरूण मुलं येऊन बसतात.
त्याला एण्जॉय करता येत नाही पण तो काही बोलू शकत नाही.
मला एण्जॉय करता येतं मी पण बोलत नाही.
मी टापटीप राहाणं गरजेच नाही.
वाटेल तितका वेळ लोळू शकते.
तुझ्याशि फोनवर बोलायची इच्छाच होत नाहि ...........
ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळाली नाहि तर
मी याला चल फूट म्हणू शकते. मग दुस-या स्वप्नातला राजकुमार.
मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे नाहि.
त्यांना इथं आणणंच अलाऊड नाहि.
मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा जाउ शकते.
अगदि तुझ्याकडेहि ........................
पण लिईरित असल्यापासुण इच्छाच झालि नाहि.

एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं नसेल?'.
खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत.
खुप गप्पा माराव्याशा वाटतात. पण त्या कोंडवाड्यात तुम्ही दोघांनी काढलेले दिवस आठवून शहारे येतात.

अजुणही तुच करतेस ना ? मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला.
सगळ्या नातेवाइकांना, शेजार्यांना जळवायला.
वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत. म्हणजे यू सर्टिफिकेटवाल्या गं

पण अचानक मला जाणिव झाली कि तु लग्न केल होतंसं ना?
माझ्या अंगावर शहारे आले. त्या काळि फक्त लग्न झाल्यावरच मुलं व्हायची ना ?
आज इतकी प्रगती झाली कि त्यासाठी लग्नाची गरज नाही.
आणि मुलांचीही नाही.
कूटुंबा साठी किति फसवणुक केलीस स्वतःची . आहे त्या मधे मन मारत राहिलिस.
ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........
आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते.
आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात.
तुम्हि दोघांनी स्वतःची ही फसवौक केली नसतीत तर आज माझ्या जवळ जे काहि शहाणपण आहे ते कदाचित नसतं.

हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या लिवैन्रिलेशनिता असण्याचा अर्थ उमगतो.
मुलीच्या शहाणपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे.

वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी तू ही अ‍ॅक्सेप्ट करशील हे सर्व आणी लग्ना शिवायचं आमचं आयुश्यही आवडु लागेल तुला हळु हळू...........................................

तू आणि पप्पांनी केलेल्या घोडचुकां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम.........
तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................

संस्कृतीशुद्धलेखनसमाजजीवनमानराहणीसद्भावनाअभिनंदनअनुभवशिफारससल्लामदतवाद

प्रतिक्रिया

जेपी's picture

3 Dec 2013 - 7:37 pm | जेपी

अम्मळ गंडलय .

सुहास..'s picture

3 Dec 2013 - 7:40 pm | सुहास..

थोडा ज्यादा हो गया :(

सोत्रि's picture

3 Dec 2013 - 7:51 pm | सोत्रि

जिलबी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

-(शुभेच्छुक) सोकाजी

सचिन कुलकर्णी's picture

3 Dec 2013 - 8:15 pm | सचिन कुलकर्णी

अगदी तुमच्या आयडीला साजेसे विडंबन..

जेनी...'s picture

3 Dec 2013 - 8:26 pm | जेनी...

हे राम .

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2013 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

http://hindi.boldsky.com/img/2011/11/10-20-jalebi-201011.jpg

खटासि खट's picture

4 Dec 2013 - 1:09 pm | खटासि खट

जिलबीच हायं न्हवं ?
जेण्ट्स-गडीच नाराज झालं म्हणा कि..

अग्निकोल्हा's picture

3 Dec 2013 - 11:29 pm | अग्निकोल्हा

लिविन्न्वालिच्या भावना छान उभ्या केल्यात विडंबन म्हणावे का प्रश्न पडतो?

पैसा's picture

3 Dec 2013 - 11:43 pm | पैसा

हेच लिहायला आल्ते!

सांजसंध्या's picture

4 Dec 2013 - 12:22 am | सांजसंध्या

लिव इन स्त्रियांना वरदान वाटू शकतं हेच भारतातल्या पुरूषांना अ‍ॅक्सेप्ट होणार नाही.

कवितानागेश's picture

4 Dec 2013 - 10:50 pm | कवितानागेश

भारतातल्या काय, कुठल्याच नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Dec 2013 - 2:22 am | विश्वनाथ मेहेंदळे

बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट आहे. अनेकदा मुलिंना लग्न (Commitment) हवे असते, मुलांना स्वातंत्र्य...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Dec 2013 - 2:22 am | विश्वनाथ मेहेंदळे

बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट आहे. अनेकदा मुलिंना लग्न (Commitment) हवे असते, मुलांना स्वातंत्र्य...

कवितानागेश's picture

6 Dec 2013 - 12:42 pm | कवितानागेश

अहो, जगात फक्त भारत आणि अमेरिका इतकी २च स्थळं आहेत का?

आणि कमिट्मेंटचे म्हणाल तर ती प्रत्येकालाच समोरच्याकडून हवी असते!
अगदी आईवडलांनासुद्धा अपत्यांकडून म्हातारपणी सांभाळ करण्याची हमी हवीच असते.

... मी फक्त निरिक्षण नोंदवत होते. :)

निराकार गाढव's picture

8 Dec 2013 - 11:01 am | निराकार गाढव

अरे व्वा! या पानावर जिल्ब्या अवतरल्या की!! कसं झकास वॉटतया!
.

संजय क्षीरसागर's picture

4 Dec 2013 - 11:39 pm | संजय क्षीरसागर

लिव इन स्त्रियांना वरदान वाटू शकतं

लेखात लिहीलेल्या सवलती सोडल्या तर इतर काही अँगल आहे का तुमच्या या म्हणण्याला?
(कारण ते स्वातंत्र्य तर दोघांनाही आहे, त्यात विषेश काही नाही)

काय भारी अँगल मारलाय राव. मला तर आनंदाने ओरडावसंच वॉटतया! हॉ कू SSS हॉ कू SSS हॉ कू SSS...

.

मुक्त विहारि's picture

3 Dec 2013 - 11:30 pm | मुक्त विहारि

झक्कास

कवितानागेश's picture

3 Dec 2013 - 11:50 pm | कवितानागेश

:D मस्त.

शिद's picture

4 Dec 2013 - 1:24 am | शिद

मस्त जमलय.

विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!!
मला एक प्रश्न पडतो या लिव इन वाल्यांबद्दल. लग्न करायच नाही, बंधन नको आहे, कुणाची जोर जबरदस्तीसुद्धा नको आहे अन जबाबदारीही नको आहे. मग राहता राहिली भूक! मग त्यासाठी वन नाईट स्टँड का नाही स्विकारला जात? उगा लिव इन मध्ये चुकुन एखादा पार्टनर गुंतला भावनिकरित्या तर लोचा होतो तो तरी नाही व्हायचा!

बॅटमॅन's picture

4 Dec 2013 - 12:25 pm | बॅटमॅन

हे बाकी नेमके हो!!

Dhananjay Borgaonkar's picture

4 Dec 2013 - 1:51 pm | Dhananjay Borgaonkar

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Dec 2013 - 2:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

भूकेसंबद्धीची सुरक्षा मिळविण्यासाठी मानव हंटर-गॅदरर जीवनपद्धती सोडून शेतकरी झाला. :)

तेव्हापासून फूड सेक्युरिटीचं बिल ;) आहे म्हणा की.

विडंबन, सुडंबन की भरकटलेली पण रोचक चर्चा ?

चित्रगुप्त's picture

9 Dec 2013 - 6:09 pm | चित्रगुप्त

मग त्यासाठी वन नाईट स्टँड का नाही स्विकारला जात?

आमचे वाघिणीचे दूध अंम्मळ कच्चे असल्याने याचा अर्थ नीट उमजला नाही. 'वन नाईट स्टँड' म्हणजे एक रात्रभर उभे रहाणे, खडा पहारा देणे, असा आहे का? मग त्याचा लिविन वगैरेशी काय संबंध? की 'वन नाईट स्लीप' असे म्हणायचे आहे?

बॅटमॅन's picture

9 Dec 2013 - 6:21 pm | बॅटमॅन

एका रात्रीपुरता संबंध ठेवून आपापल्या वाटेने निघून जाणे म्हणजेच वन्नैट्ष्ट्यांड.

चित्रगुप्त's picture

9 Dec 2013 - 6:23 pm | चित्रगुप्त

म्हणूनच म्हटले वन नाईट स्लीप. :)

बॅटमॅन's picture

9 Dec 2013 - 6:25 pm | बॅटमॅन

:)

चिगो's picture

13 Dec 2013 - 11:41 am | चिगो

Sleep की Slip? Sleep असल्यास चुकलं की राव.. ते काय झोपायला एकत्र येतात की काय? ;-)

ह्यावरुन आठवलेला एक विनोद :
मुलगा, पाद्र्यास : Father, is it wrong to sleep with a girl before marriage?
पाद्री: No, son.. But the problem is you don't sleep... ;-) :-D

आशु जोग's picture

4 Dec 2013 - 4:02 am | आशु जोग

मूळ धाग्यापेक्षा विडंबनच सरस ठरले आहे

खटासि खट

मझा आणलात तुम्ही

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Dec 2013 - 7:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मोगँबो खुष हुआ.

खटासि खट's picture

4 Dec 2013 - 1:12 pm | खटासि खट

धन्यवाद मंडळी.

ऋषिकेश's picture

4 Dec 2013 - 1:38 pm | ऋषिकेश

छानच!

माझ्या पहाण्यात तरी कोणी अजुन लिवइन मधे नाहीये पण मला प्रश्ण असा पडतो की खरच लिविनची का गरज पडते यांना? बर लिविन आहत तर मग लग्नाला काय प्रॉब्लेम आहे? यातुन मुल झालच तर त्याच संगोपन कोणी करायचं?
आणि संस्कार काय आणि कोण करणार?
कदाचित काही लोकांना हे खुप बुरसटलेले विचार वाटु शकतात.

साती's picture

5 Dec 2013 - 8:28 pm | साती

कमाल आहे!
माझ्या पाहण्यात तर मीच होते.
लिव इन मध्ये राहणारे लोक मुलं होऊ न देण्याइतके हुशार असतात.
लग्न न करण्याची हजार कारणे असु शकतात.

तुषार काळभोर's picture

5 Dec 2013 - 9:14 am | तुषार काळभोर

विडंबन??
(मूळ पत्राहून अधिक) विचार करायला लावणारं पत्र आहे खरं!

वासु's picture

5 Dec 2013 - 1:55 pm | वासु

मीही अजुन कोणाला पाहिलेले नाहिये लिवइन मध्ये राहिलेल... पण मला हे पट्तच नाही. असे राहुन काय साध्य करायाचे आहे? जो आदर आपल्याला लग्न झाल्यावर मिळतो तो लिवइन मध्ये राहिल्यावर नाही मिळू शकत. उलट लोक म्हण्तात "हेच संस्कार केले का तुमच्या आई-वडील यांनी?" ह्या मध्ये फक्त आई-वडीलच बद्नाम होतात.

स्पंदना's picture

6 Dec 2013 - 3:24 am | स्पंदना

आता विषय चाललाच आहे तर बेसिक माहीती काही मिळेल का? कसा सुरु झाला हा लिव्ह इन चा ट्रेंड? त्याचे फायदे काय अन तोटे किती?
माझ निरिक्षण. आज ऑस्ट्रेलियात मुले १५-१६ची झाली की मातापित्यांना त्यांनी त्यांच्या घरात राहुन त्यांची कमाई खावी हे पटत नाही. त्यातच १६ वर्षापासून सरकार या मुलांना स्वतःचा भत्ता द्यायला सुरवात करते. तरुणवयातला उथळपणा, हातातले स्वतःच्या नावावर येणारे पैसे या मुळे ही तरुणाई पालकांनाही डोइजड होते. मग हे असे तरुण रक्त घराबाहेर पडुन चाचपडत जगायला सुरवात करते.
त्यातुनही काहीजण काम करत शिक्षण चालु ठेवतात यशस्वी होतात. पण त्यांची पालक त्यांच्या कोणत्याही निर्णयात सहभागी नसल्याने स्वतःचा स्वतः जोडीदार शोधुन तसेच राहीले जाते. त्यातही भांडणे, हेवेदावे असतातच. पण अश्यावेळी लग्न करुन सेटल होण्याचा जो एक महत्वाचा टप्पा असतो त्याचा निर्णय घेण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. तरीहे येथे लग्ने होतात.
इकडे पालक हळुहळु वृद्ध होत जातात. शरीर साथ द्यायच बंद करत. लग्न झाल असेल ठिक नाहीतर मग एकट रहाव लागत. प्रॉपर्टी असेल तर ती विकुन वृद्धाश्रमात १००,००० पासून ३००,००० पर्यंत पैसे भरले जातात. मुलांना फक्त माहीत असत आई या ओल्डएज होम मध्ये आहे. मी भेट दिली आहे अश्या होम्सना. परत जायची इच्छा नाही. मदत करायलाही नाही, अन ते विदिर्ण करणार आयुष्य पहायलाही नाही.
काही दिवसांनी मग मुलांना कळवले जाते आई-बाप जो कोणी असेल तो सिरिअस. जमल तर मुल जातात नाहे तर "आज माझ्या आईच फ्युनरल आहे तिकडे लांब पण मी कामामुळे जाउ नाही शकत अस सहज बोलुन जातात". उसासा वगैरे टाकुन,"धिस इज लाईफ" वगैरे बोलल जात. आई बापान असेल ती प्रॉपर्टी विकुन कधीच बंध तोडलेले असतात, त्यामुळे यांच्याकडुन अपेक्षेलाही तोंड नसत. इनमिन १५ वर्षाचा सहवास काय गोडी लावणार? मुलांना स्वतःला आपणही याच मार्गाने जाणार हे दिसत असत. अन ते त्यांनी स्विकारलेलेही असते.
बोला रहायच आहे लिव इन मध्ये?

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2013 - 8:32 am | अत्रुप्त आत्मा

@इनमिन १५ वर्षाचा सहवास काय गोडी लावणार? मुलांना स्वतःला आपणही याच मार्गाने जाणार हे दिसत असत. अन ते त्यांनी स्विकारलेलेही असते.
बोला रहायच आहे लिव इन मध्ये? >>> बाप रे!!!!!!!!!!!!!!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Dec 2013 - 9:49 am | विश्वनाथ मेहेंदळे

हे सगळे लग्न करून सुद्धा होऊ शकते की. म्हणजे मला हे दोन वेगवेगळे मुद्दे वाटत आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2013 - 11:16 am | प्रभाकर पेठकर

ज्यांची जन्मापासून अशी मनोधारणा तयार झाली असेल त्यांना कदाचित ह्यात कांही वावगं वाटतही नसेल. परंतु नात्यांची घट्ट वीण असणार्‍या आपल्या समाजात ही परिस्थिती फारच धक्कादायक म्हणावी अशी आहे. नात्यातील अत्युच्चतम ओलावा मुलं आणि आई-वडिलांमध्ये आणि त्यानंतर इतर रक्ताच्या नात्यात दिसून येतो. (अपवाद असतीलही पण फक्त नियम सिद्ध करण्यापुरते). तिथेच एवढी शुष्कता असेल तर आयुष्यातील इतर नातेसंबंधांची काय अवस्था असेल? माणुस हा पहिल्या पासून कळपात राहणारा प्राणी आहे. नातेसंबंध हा अशा कळपाला एकत्र धरून ठेवणारा समान धागा म्हणावा लागेल. त्याचीच वानवा असेल तर असा समाज ऐहिकतेपलीकडे कसा विचार करत असेल ह्याची कल्पना करता येत नाही.

लोकं खरच सुखी झाली लिविनमुळे? स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधला फरक कळायला पाहिजे.

म्या काय म्हन्तो...'s picture

6 Dec 2013 - 12:04 pm | म्या काय म्हन्तो...

जर का आप्ल्याला कोणतीच जबाब्दारी नको आणी स्वतन्त्र जगायच असेल तर, एकट किन्वा मित्र-मैत्रिनीन सोबत राह्ता येत. लीव-इन चि गरज काय? आणी जर फक्त वासना शमविण्याचा प्रश्न असेल (शब्द जरा वाईटच आहे पण...तेच खर पण आहे. ) तर मग वन-नाईट-स्टयाण्ड आहेतच...त्यात तर काहिच रेस्पोन्सीबिलिटी नसते. एका जागी राहायचि पण नाहि...

खटासि खट's picture

6 Dec 2013 - 12:59 pm | खटासि खट

लग्न ही संस्था पुरुषसत्ताक आहे असं ऐकून आहे.
मुलीनेच सासरी का जायचं ?
तिनेच घरकाम का करायचं ?
अपत्याच्या जबाबदा-या तिच्यावरच का ?
सासू सास-यांच्या जबाबदा-या तिने घ्यायच्या पण तिच्या आईवडिलांबद्दल काय ?

खूप कमी जोडप्यात वरील प्रश्नांचं सोल्युशन काढलेलं असतं. नाहीतर आनंदीआनंदच असतो सगळा. लिव इन म्हणजे स्वैराचार हे टोकाचं मत आहे. काही आयटी शहरात जागा शेअर करण्यातून झालेल्या लिव इन मधून झालेलं हे मत असणार. लिव -इन - रिलेशन म्हणजे विचारांती घेतलेल्या निर्णयाचाच आपण विचार करू. लग्नसंस्थेला पर्याय असला तर बिघडलं कुठं ? शेवटी लग्नसंस्था म्हणजे तरी काय आहे ? दुर्बल पुरुषाला त्याची बायको त्याच्यासोबत नांदण्याची समाजाने दिलेली ग्वाही अशीही व्याख्या करता येईल . पूर्वी एखाद्या बाहुबलीला कुणाची सुंदर स्त्री आवडली तर उचलून नेली जात होती. त्याच्याविरुद्ध अपील कुठं होतं ? आणि लग्नाचा नवरा काय करत होता ? अशा रक्षण करू न शकणा-या पुरुषाबरोबर राहण्याची ग्वाही कायद्याच्या राज्यात पुरुषाला मिळते. विवाहसंस्थेचे असे तोटे काढायचं म्हटलं तर लक्षात येईल कि ही संस्था पूर्णपणे पुरुषांच्या फायद्याची आहे.

संजय क्षीरसागर's picture

6 Dec 2013 - 1:56 pm | संजय क्षीरसागर

ही आंतरजालाची इच्छुकांस मिळालेली देणगी होय

लै भारी!

बाय द वे, आता तुम्हीच लिव-इनवर चर्चा सुरु केलीये म्हणून प्रतिसाद देतो.

विवाहसंस्थेचे असे तोटे काढायचं म्हटलं तर लक्षात येईल कि ही संस्था पूर्णपणे पुरुषांच्या फायद्याची आहे.

हे एकांगी विधान आहे.

मानवी जीवनाचा (स्त्री असो की पुरुष) समग्रतेनं (जन्म ते मृत्यू) विचार करुन विवाह ही संकल्पना निर्माण झालेली आहे. मानवी मुलाला स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वात प्रदीर्घ कालावधी लागतो (साधारण तेवीस ते पंचवीस वर्ष). या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे.

व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.

संक्षींशी चक्क सहमत व्हावं लागतंय! =))

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2013 - 3:29 pm | अत्रुप्त आत्मा

@संक्षींशी चक्क सहमत व्हावं लागतंय!>>> =)) आंम्हीपण शमत हाय! =))

संजय क्षीरसागर's picture

6 Dec 2013 - 3:53 pm | संजय क्षीरसागर

यापरता दुसरा आनंद तो काय?

निराकार गाढव's picture

8 Dec 2013 - 11:07 am | निराकार गाढव

हकडे तकडे चोविकडे!!
.

खटासि खट's picture

8 Dec 2013 - 12:16 pm | खटासि खट

ग ग म्हटलं कि प्रातःस्मरणीय गाढवाचा(च) आठवतो आठवणीनं. त्यातून निराकार असल्यानं वंदन करतो.

- सावळा खट

मृत्युन्जय's picture

7 Dec 2013 - 1:17 pm | मृत्युन्जय

सहमत आहे. खरेच चांगला प्रतिसाद.

लै भारी!

.

व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.

माझ्या जवळपास मात्र १७ वर्षापासुन ते ८५ वर्षापर्यंतची जोडपी एकत्र काही अपरिहार्य, काही जमतय का बघु असे म्हणुन, काही दोघांनाही कोणि इतर मिळाले नाहित म्हणुन, काही दोघांचीही गरज म्हणुन असे (लीव्ह-इन)राहात आहेत. काहि आनंदाने तर काही ना आनंद ना दुःख अश्या विचारात.

खटासि खट's picture

6 Dec 2013 - 3:01 pm | खटासि खट

या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे.

लिव इन मधे राहून हे सर्व करता येणार नाही हे कशाच्या आधारावर ठरवलंय ? (त्यासाठी विवाहाची गरज काय ?)

संजय क्षीरसागर's picture

6 Dec 2013 - 3:09 pm | संजय क्षीरसागर

एकदा अपत्य जन्म झाला की पती-पत्नीत एक अनामिक भावनुबंध तयार होतो. त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे.

खटासि खट's picture

6 Dec 2013 - 3:14 pm | खटासि खट

त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे. >>
याला काही आधार ? लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?

खटासि खट's picture

6 Dec 2013 - 3:16 pm | खटासि खट

एकदा अपत्य जन्म झाला की पती-पत्नीत एक अनामिक भावनुबंध तयार होतो.

मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?

म्हणजे चर्चेला दिशा राहील. वेगवेगवेगळे मुद्दे किंवा मुद्यांची पुनरावृत्ती टाळता येईल.

लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?

मूल हवं असेल तर रितसर लग्नाचा समाजमान्य पर्याय आहे. मग लिव-इन कशाला?

मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?

तुम्ही असफल विवाह आणि लिव-इन यांची सरमिसळ करतायं. असफल विवाहाची वेगळी कारणमिमांसा आहे. तुम्ही फक्त लिव-इन वर्सेस (सफल किंवा वेल अ‍ॅक्सेप्टेड) विवाह अश्या दृष्टीकोनातून तुमचे विचार लिहा.

तुमचं लिव इन बद्दल काय मत आहे ते लिहा ना, ते बरं पडेल. चर्चेसाठी तुम्हीच उत्सुक होता म्हणजे माहीतगार तुम्हीच. आम्ही मौजमजा, टाईमपास या कॅटेगरीत मोडणारे..

आदर्शची काही गरज नाही. तुम्ही स्वतः केलेले स्टेटमेण्टस का केले हा सोपा प्रश्न आहे उत्तरासाठी. तेव्हढी उत्तरं द्या.
आग्रह नाही.

व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही. >>

हे पण काय झेपलं नाय बाबा. लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ? तसच विवाह म्हणजे घटस्फोट, विभक्त जोडपी नाहीतच हे तरी कुठून घेतलय ?

मग तुमच्या दृष्टीनं लिव-इनचं वय काय? टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील?

तसच विवाह म्हणजे घटस्फोट, विभक्त जोडपी नाहीतच हे तरी कुठून घेतलय ?

असफल विवाह हा वेगळा मुद्दा आहे. विवाहाला लिव-इन हा पर्याय आहे का असा विषय आहे.

साती's picture

6 Dec 2013 - 6:27 pm | साती

अमृता प्रीतम बद्दल वाचलं नाही का? त्यांचे वय किती होते?
त्या मरेपर्यंत लिवईनमध्ये होत्या.

आमच्या गावातल्या घरासमोर एक लिव इन जोडपे राहते.
काकूचे वय ४८-५० असेल. काकांचे वय ५०-५५.
काकांना स्वतःची मुले आहेत काकूंना मुलबाळ नाही.
दोघंही अगदी प्रतिष्ठितपणे आपापल्या समाजात वावरतात (दोघे वेगवेगळ्या जातींचे आहेत)
तोंडावर तरी त्यांना नाव ठेवायची कुणाची हिंमत नाही.

खटासि खट's picture

6 Dec 2013 - 6:32 pm | खटासि खट

तुम्हाला मुद्दे समजत नाहीत असं दिसतंय. तुम्ही एका ठिकाणी लिव इन २५ ते ४० वर्षे एकत्र राहणे असं म्हणता. सर्वात पहिल्यांदा हे स्टेटमेण्ट कसं काय केलं हे जाणून घेणं हे आमचं कर्तव्य आहे.

दुसरं म्हणजे विवाह बंधनात स्त्री पुरूष "समाधानी" असते तर वर सांगितलेलं झालं असतं का ? विवाह झाला म्हणजे स्त्री-पुरूष समाधानी होतात, सुखी होतात, त्यांची टक्केवारी किती याबद्दल तुमच्याकडे काही विदा आहे काय ?

तुमची सिग्नतुरे आवडली हो. सुविचार म्हणून वापरु का कघीतरी ?

खटासि खट's picture

6 Dec 2013 - 6:59 pm | खटासि खट

बिनधास्त वापरा.

मलापण त्यांची सिग्नतुरे आवडली आहे.

पिशी अबोली's picture

6 Dec 2013 - 6:58 pm | पिशी अबोली

टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील?

मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का? केवळ लग्न या संस्थेने त्यांना बांधून ठेवलंय म्हणून ते स्वतःशी आणि बायकोशी प्रतारणा करत जगतात का? मग लिव इन मधला प्रामाणिकपणा काय वाईट?

केवळ भावनिक गुंतवणूक नाकारणे या कारणासाठी लिव इन वर टीका करत असाल, तर भावनिक नातं अजिबात नसूनही आयुष्यभर केवळ 'लग्न झालंय' म्हणून एकत्र राहणार्‍यांच्या परिस्थितीबद्दल काय म्हणणं आहे?

एखाद्या गोष्टीबद्दल कुठलीही माहीती नसताना स्टेटमेण्ट्स करणं, चर्चा करणं, लोकांना चर्चेला भाग पाडणं याला काय म्हणावं ? किमान आपण जे स्टेटमेण्ट्स करतो त्याबद्दल सफाई पेश करता येत नसेल तर तसं कबूल करण्याचा प्रांजळपणा तरी दिसावा. उगाचच चर्चेला तोंड फोडून पांडीत्य सांडत सुटायचं आणि अंगाशी आलं कि तुम्हीच सांगा अशी १८० अंशातून उसळी घ्यायची असल्या चर्चेला आपला तर रामराम.
आमचं येड्याचं ध्यान कितीतरी बरं, काय म्हणता मंडळी ?

खटासि खट's picture

6 Dec 2013 - 7:07 pm | खटासि खट

पिशी अबोली
क्लिकची जागा चुकली. तुम्हाला उद्देशून नाही,

स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील? ?>>>

तारुण्य ओसरल्यावर लिव इन रिलेशन संपतं असा तुमचा मुद्दा असेल तर गूगलदेवाला शरण जावे. तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही. तुमच्या मते विवाहात अडकून बायकोचं तारुण्य ओसरलं म्हणून बाहेर लफडी करणं हे समर्थनीय आहे का ?

कि विवाह करणारे असं काही करत नाहीत असं म्हणायचंय ?

कवितानागेश's picture

6 Dec 2013 - 6:45 pm | कवितानागेश

तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही.>>
असं कसं? विवाहसंस्था 'जुलुमाचा रामराम' करायला लावते की. :)

खटासि खट's picture

6 Dec 2013 - 6:49 pm | खटासि खट

अचूक टोला.

>>असं कसं? विवाहसंस्था 'जुलुमाचा रामराम' करायला लावते की.

जे ब्बात !!

संजय क्षीरसागर's picture

6 Dec 2013 - 9:37 pm | संजय क्षीरसागर

पहिली गोष्ट, लिव-इनमधे राहाणार की विवाह करणार हा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि तो सध्याच्या अविवाहितांच्या दृष्टीनं विचाराधिन आहे. त्यांना या चर्चेचा काही उपयोग होईल अशी आशा आहे. विवाहितांच्या लिव-इनच्या कल्पना आणि इतरांचे दाखले निरुपयोगी आहेत. तस्मात :

अमृता प्रीतम बद्दल वाचलं नाही का? आणि आमच्या गावातल्या घरासमोर एक लिव इन जोडपे राहते.

याला अर्थ नाही. विषयाला धरुन फक्त तुमचे मुद्दे मांडा.

मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का?

विचार करणं आणि कृत्य यात कमालीची तफावत आहे. शिवाय लग्न हा लिव-इनसारखा निव्वळ आकर्षणाचा भाग नाही त्याला अनेक पैलू आहेत.

तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही

हा विचार लिव-इन संदर्भात आहे. त्याचा साधा आणि सरळ अर्थ असा की नॉर्मल स्त्री चाळीशी उलटल्यावर कुठपर्यंत आणि किती जणांशी कोणत्या आधारावर लिव-इनमधे राहू शकेल.

थोडक्यात जे विवाहाच्या बाजूनं आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि जे लिव-इनमधे राहू इच्छितात किंवा आहेत त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले तर चर्चा विधायक होईल.

दिनेश सायगल's picture

6 Dec 2013 - 11:44 pm | दिनेश सायगल

मला एका वाघावर लेख लिहायचा आहे, तर मी प्राणिसंग्रहालयात किंवा वाघाच्या गुहेत राहू म्हणता?

संजय क्षीरसागर's picture

7 Dec 2013 - 12:04 am | संजय क्षीरसागर

लिव-इनवर चर्चा करण्यासाठी एकतर तुम्हाला तो पर्याय उपलब्ध हवा किंवा तुम्ही तो निवडलेला हवा आणि लिव-इनच्या विरुद्ध मत मांडायच असेल तर तुम्हाला विवाहाचा अनुभव हवा अन्यथा चर्चेला अर्थ नाही.

बॅटमॅन's picture

7 Dec 2013 - 12:12 am | बॅटमॅन

म्हणजे प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टनं प्रेग्नंट व्हायलाच पाहिजे म्हणा की =))

कॉमन सेन्स इतका अनकॉमन असेलसं वाटलं नव्हतं.

यसवायजी's picture

9 Dec 2013 - 7:15 pm | यसवायजी

म्हणजे प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टनं प्रेग्नंट व्हायलाच पाहिजे म्हणा की

:)) ए ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव् :))

साती's picture

7 Dec 2013 - 1:54 pm | साती

लिव ईनचा तीन वर्षे आणि लग्नाचा साडेआठ वर्षांचा अनुभव आहे.
म्हणजे मी चर्चा करण्यास पात्रं आहे.
;)

दोन्हींचे आपापले फायदे तोटे असले तरी तुम्ही म्हणता तसे सध्याच्या समाजात लग्नं करून र्हाण्याचे फायदे जास्त आहेत हे नक्कीच.

काय बोललात!

आणि खुद्द तुमचा अनुभव तेच तर सांगतो :

तीन वर्षे लिव ईन + साडेआठ वर्ष लग्न आणि प्रेझंट स्टेटस : मॅरीड!

वॉट एल्स कॅन बी द प्रूफ!

पियू परी's picture

9 Dec 2013 - 7:30 pm | पियू परी

शिवाय लग्न हा लिव-इनसारखा निव्वळ आकर्षणाचा भाग नाही त्याला अनेक पैलू आहेत.

हे कश्याच्या आधारावर लिहिताय? ज्यांची भावनिक गुंतवणुक असुन लीवीन मध्ये राहात आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणाल? लग्नात आकर्षण नसते हे कश्यावरून? कांदेपोह्याच्या कार्यक्रमात अर्धा तास वै. बोलायला एकटे सोडतात. त्या अर्ध्या तासात ते दोघे कश्यावरून एकमेकांच्या कमिटमेंटच्या कल्पनांविषयी बोलतात? माझ्या माहितीत बरेच जण "आधी अफेअर होते का?" अश्या टाईपचे प्रश्न विचारतात. (स्वानुभव नाही).

नॉर्मल स्त्री चाळीशी उलटल्यावर कुठपर्यंत आणि किती जणांशी कोणत्या आधारावर लिव-इनमधे राहू शकेल.

"लिवीन चा पाया फक्त शारीरीक आकर्षण आहे" अशी तुमची काहीतरी गैरसमजुत झालेली दिसते. तसंच पुन्हा लिवीन म्हणजे एकाच वेळी अनेकांशी संबंध हा अजुन एक गैरसमज.

ता.क. मी लिव्ह-इनचे अजिबात समर्थन करत नाही. पण म्हणुन सरसकटीकरण (जनरलाईझेशन) करणार नाही.

सांजसंध्या's picture

7 Dec 2013 - 1:01 am | सांजसंध्या

चला चर्चा करून कुणीतरी का होईना कुठल्यातरी निष्कर्षाला आलं. मी वेडी, चर्चेला घाबरून पळाले, नुकसानच झालं नाई ?

तुषार काळभोर's picture

7 Dec 2013 - 1:01 pm | तुषार काळभोर

कुनाचा कुनाला पायपोस नाय, कोन कुनाला काय बोल्तय ते कळंना...
जे ह्या बाजूचे हैत, त्यांनी ह्या बाजूचे फायदे सांगा..(दुसर्‍या बाजुच्या तोट्यांविषयी न बोलता..)
जे त्या बाजूचे हैत, त्यांनी त्या बाजूचे फायदे सांगा..(दुसर्‍या बाजुच्या तोट्यांविषयी न बोलता..)

जे तटस्थ हैत, त्यांनी शंका इचारा...

सांजसंध्या's picture

7 Dec 2013 - 2:01 pm | सांजसंध्या

असं व्हय. बरं.

--------------------------------------------------------------
कल लुंगी पेहनकु आया, आज पँट पेहनकु.. फटे पुराने जुते भी बदलकू आते तो हम नही पैचानते

संजय क्षीरसागर's picture

7 Dec 2013 - 2:57 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही विषयची योग्य समज दाखवली आहे!

मुक्ती's picture

7 Dec 2013 - 4:14 pm | मुक्ती

कोणाला विचारा?

खटासि खट's picture

7 Dec 2013 - 4:35 pm | खटासि खट

@ साती, अँजेलिना जोलीची लिंक इथं देता आली असती. नंतर कधीतरी अनेक वर्षे लिव इन मधे राहीलेले आणि शेवटी शेवटी लग्न केलेले, न केलेले असे काही सेलेब्रिटीज यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. सेलेब्रिटीजच का इतरांमधेही आहे कि हा ट्रेण्ड. भारतातही आहे.

मध्यंतरी संध्या गोखले या बाईचं लिव इन बद्दलचं एक आर्टिकल वाचनात आलेलं.
http://wonderwoman.intoday.in/story1/do-they-need-to-say-i-do/1/86035.html
संदर्भ म्हणून फक्त. ;)