प्रिय आई,
प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते.
पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.
मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते.
मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही
इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो.
नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो.
मी गबाळयासारखी घरभर फिरु शकते.
समोरच्या बिल्डींगवर तरूण मुलं येऊन बसतात.
त्याला एण्जॉय करता येत नाही पण तो काही बोलू शकत नाही.
मला एण्जॉय करता येतं मी पण बोलत नाही.
मी टापटीप राहाणं गरजेच नाही.
वाटेल तितका वेळ लोळू शकते.
तुझ्याशि फोनवर बोलायची इच्छाच होत नाहि ...........
ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळाली नाहि तर
मी याला चल फूट म्हणू शकते. मग दुस-या स्वप्नातला राजकुमार.
मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे नाहि.
त्यांना इथं आणणंच अलाऊड नाहि.
मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा जाउ शकते.
अगदि तुझ्याकडेहि ........................
पण लिईरित असल्यापासुण इच्छाच झालि नाहि.
एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं नसेल?'.
खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत.
खुप गप्पा माराव्याशा वाटतात. पण त्या कोंडवाड्यात तुम्ही दोघांनी काढलेले दिवस आठवून शहारे येतात.
अजुणही तुच करतेस ना ? मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला.
सगळ्या नातेवाइकांना, शेजार्यांना जळवायला.
वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत. म्हणजे यू सर्टिफिकेटवाल्या गं
पण अचानक मला जाणिव झाली कि तु लग्न केल होतंसं ना?
माझ्या अंगावर शहारे आले. त्या काळि फक्त लग्न झाल्यावरच मुलं व्हायची ना ?
आज इतकी प्रगती झाली कि त्यासाठी लग्नाची गरज नाही.
आणि मुलांचीही नाही.
कूटुंबा साठी किति फसवणुक केलीस स्वतःची . आहे त्या मधे मन मारत राहिलिस.
ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........
आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते.
आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात.
तुम्हि दोघांनी स्वतःची ही फसवौक केली नसतीत तर आज माझ्या जवळ जे काहि शहाणपण आहे ते कदाचित नसतं.
हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या लिवैन्रिलेशनिता असण्याचा अर्थ उमगतो.
मुलीच्या शहाणपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे.
वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी तू ही अॅक्सेप्ट करशील हे सर्व आणी लग्ना शिवायचं आमचं आयुश्यही आवडु लागेल तुला हळु हळू...........................................
तू आणि पप्पांनी केलेल्या घोडचुकां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम.........
तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................
प्रतिक्रिया
7 Dec 2013 - 5:14 pm | संजय क्षीरसागर
साडेआठ वर्ष संसार करुन म्हणते की :
तिथे चर्चा संपन्न होते. इतर दाखल्यांची आवश्यकताच नाही. मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचायं. कारण अँजेलिना जोली किंवा संध्या गोखलेबद्दल इथे फक्त काल्पनिक चर्चा होईल आणि त्याचा कुणाला काही उपयोग नाही.
7 Dec 2013 - 6:48 pm | प्यारे१
>>>सध्याच्या समाजात लग्नं करून राहाण्याचे फायदे जास्त आहेत
(विथ ड्यु रिस्पेक्ट टु साती मॅडम)
त्यांनी व्यवहार्य मार्ग स्वीकारला आहे असं नाही वाटत तुम्हाला, सर????
7 Dec 2013 - 8:12 pm | साती
व्यवहार्य मार्गं हा शब्दप्रयोग बरोबर आहे.
;)
7 Dec 2013 - 8:14 pm | साती
मॅडम नका हो म्हणू.
8 Dec 2013 - 7:12 pm | प्यारे१
ठीके मॅडम. ;)
(हा शं-भरावा! =)) )
10 Dec 2013 - 8:56 am | निराकार गाढव
बगा बगा. उगाच नाय्येत शानपन. याला म्ह्न्त्यात आणुभव. समद्या मणुक्षांणी या आणुभव संप्प...प..प्प्ण्ण्णतेचा उपेग करूण घेवा हीच म्या गाढवाची प्रार्थना.
7 Dec 2013 - 8:50 pm | सुबोध खरे
लिव्ह इन रिलेशन हि फक्त उच्च मध्यम वर्गात किंवा उच्च वर्गात सफल होण्यःची शक्यता आहे. जेथे स्त्री हि आपल्या पायावर उभी आहे. इतर सर्व वर्गात स्त्री ला ते शक्य नाही. कारण विवाह संस्थेत पुरुष हा आपण एकत्र राहणार याची ग्वाही/ बांधिलकी(commitment) देत असतो. त्यामुळे जनाची (आणि मनाची) तशी तयारी करून असतो. याउलट लिव्ह इन मध्ये TTMM (तुझी तू माझा मी)असल्याने मुळातच हि बांधिलकी नाही. शिवाय या नात्याला कायद्याचे पूर्ण संरक्षण नाही. लिव्ह इन पार्टनर पुरुष दिवंगत झाला तर त्याला मिळणारी विमा किंवा इतर सर्व रक्कम हि त्या स्त्रीला मिळणारच नाही. मग मध्य वयात जर हातात उत्पन्नाचे स्त्रोत नसेल तर ती स्त्री कोणाच्या तोंडाकडे पाहील? त्यातून जर मुल असेल तर अजूनच बिकट परिस्थिती. शिवाय समाजमान्यता नसल्याने सासू सासरेच काय पण स्वतःचे आईवडील सुद्धा आधार देतील याची खात्री काय?
अगदी खालच्या वर्गात जर्री स्त्री हि मुख्य मिळवती घटक असेल तरीही ती जर "नुसतीच" राहत असेल( आधुनिक भाषेत लिव्ह इन) तर आजूबाजूचे लोक तिच्यावर डोळा ठेवून असतात. याच कारणासाठी दारुडा असेल तरी बायका "नवर्याबरोबर राहतात".
तस्मात अजूनतरी स्त्रीसाठी लिव्ह इन पेक्षा विवाहसंस्था हि जास्त सुरक्षित आहे. येणारा काळ जर या नात्याला कायदेशीर आणि फायदेशीर मान्यता देईल तर गोष्ट वेगळी अन्यथा लिव्ह इन रिलेशन हि पुरुषाला फायदेशीर आहे.
हा फार गहन विषय आहे आणि एवढे सगळे टंकायचा कंटाळा आला आहे(तुम्हाला वाचायचाही आला असेलच) म्हणून इथेच थांबवितो.
7 Dec 2013 - 11:30 pm | संजय क्षीरसागर
संपूर्ण सहमत आहे. स्त्रियांच्या हे लक्षात येईल तो सुदिन!.
8 Dec 2013 - 8:12 am | सांजसंध्या
यात त्या स्त्री ची फरफटच आहे असं नाही वाटत ? तिची कुठलीही चूक नसताना "पवित्र" राहता यावं म्हणून "दारुडा" "बाहेरखाली" "बसून खाणारा" कसाही असला तरी कुंकवाचा धनी असलाच पाहीजे. पातिव्रत्य, योनीशुचिता या सर्व कल्पना पुरुषाच्या. तिचं पालन करण्यासाठी तिने खितपत पडायचं. पण नव-याने दारुडा असू नये यासाठी हा समाज काही करणार नाही, तिच्यावर लोक डोळा ठेवतात म्हणून तिला त्याच्याबरोबर नांदण्यासाठी भाग पाडणार.
8 Dec 2013 - 12:24 pm | सुबोध खरे
सांजसंध्या ताई,
दुर्दैवाने ते सत्य आहे. स्त्रीची पुरुषसत्ताक पद्धतीत फरफट होतेच. आजही जोवर कायद्याचे संरक्षण सर्वसामान्य माणसा(स्त्री) पर्यंत पोहोचत नाही तोवर स्त्रीला कुंकवाचा धनी हा लागणारच. कारण आजही निम्न वर्गातील स्त्री जर एकटी( मुलांबरोबर) राहत असेल तर रात्रीबेरात्री तिचा दरवाजा ठोकणारे हलकट असतातच. त्यामुळे असा रोजचा ससेमिरा लागण्यापेक्षा दारुड्या का होईना पण एक "पुरुष" घरात असावा लागतो. गरिबी हि अशी वाईट गोष्ट आहे कि विधवा किंवा नवर्याला सोडून आलेल्या स्त्रीला आई बाप सुद्धा आपल्या घरात थारा देत नाहीत. यासाठी आर्थिक किंवा सामाजिक उन्नती होत नाही तोवर स्त्रीची खरी बंधमुक्ती होणार नाही
10 Dec 2013 - 9:05 am | निराकार गाढव
ह्म्म्म.... शोकांतिकाच म्हना की... बाकी काय पाईंटावर पाईंट पकडून दावलाय राव; पट्लं बगा यकदम!
7 Dec 2013 - 11:38 pm | खटासि खट
लिव्ह इन रिलेशन ला अनेक देशांमधे कायद्याचं संरक्षण आहे. आपल्याकडेही सर्वोच्च न्यायायलाने लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्याचं संरक्षण देऊ केलं आहे. तसंच काही मार्गदर्शक तत्त्वंही सांगितलेली आहेत.
सध्या उच्च वर्गामधे लिव्ह इन रिलेशन संपन्न होतात हे तुमचं निरीक्षण बरोबर आहे. पण विवाहामधे पुरूष ग्वाही देतो किंबा निम्न आर्थिक वर्गात लग्न हा स्त्री ला आधार आहे हे पटलेलं नाही. अनेक स्त्रिया दहा घरची कामं करून किंवा पडेल ती कामं करून घरकाम करतात आणि नवरा त्यांना मारझोड करतो. दारू पितो. त्या महिलाच घर चालवत असतात आणि लग्नाबद्दल स्वतःच्या नशिबाला दोष देताना दिसतात. सुशिक्षित मुली हे सहन करीत नाहीत.
लग्न वाईटच आहे असं माझं म्हणणं नाही. लग्नाचे पुरुषाला मिळणारे फायदे इतके अंगवळणी पडले आहेत कि त्याबद्दल विचार केला तरच ते लक्षात येतात. लग्न काय किंवा लिव्ह इन काय सहजीवन हे विश्वासावर आणि दोघांमधल्या नात्यांवर अवलंबून असतं. याच विचाराने काही लोकांना असं वाटलं कि जर हे नातं मजबूत असेल तर मग लग्न वगैरे विधींची किंवा समाजाच्या परवानगीची गरज काय ? हे अर्थात सीरीयस रिलेशनशिप बद्दल आपण बोलतोय. भ्रष्ट आवृत्तीबद्दल नाही. समाज म्हणजे तरी काय ? नवरा मारहाण करत असताना मूग गिळून बसणारा. जर दोघांतलं अंडरस्टँडिंग परफेक्ट असेल तर लग्न केलं काय किंवा लिव्ह इन मधे राहीलं काय फरक पडू नये.
पण लग्नामधे ज्या काही अडचणी आहेत त्या म्हणजे काही कारणाने आपलं एकत्र सहजीवन अशक्य आहे हे लक्षात आल्यानंतर दोघांच्या सहमतीने वेगळं होता आलं पाहीजे (कुणावरही अन्याय न करता). लग्नाची अनेक वर्ष एकत्र काढल्यानंतर विभक्त होण्यासाठी कायदेशीर लढे देण्यात काही काळ खर्च व्हावा हे विचारी मनुष्याला पटण्यासारखं नाही. तसंच लिव्ह इन मधे विभक्त झाल्यानंतर मुलांचं काय हा प्रश्न आहे, पण तो घटस्फोट झालेल्या जोडप्यांतही आहेच.
एकेकाळी प्रेमविवाह हे पाप समजलं जात होतं. आईवडिलांनी आणि जाणत्या लोकांनी करून दिलेले विवाह हे काहीतरी विचार करूनच केले असतील ना असा युक्तीवाद त्यामागे होता, तो आता कितीतरी मागे पडलाय. तसंच लग्न करूनच एकत्र राहीलं पाहीजे असं कुणाला वाटत नसेल तर त्यांच्या त्या विचारांचा, स्वातंत्र्याचा आदर करायला शिकलं पाहीजे. काळाबरोबर अनेक गोष्टी बदलतात. टाकाऊ बाद होतात. लिव्ह इन काळाच्या कसोटीवर टिकलं नाही तर बाद होईल, पण जर लोकप्रिय झालं तर नैतिक, सामाजिक कायदेही बदलतील. आपल्याला नव्या गोष्टींकडं पाहण्याचा दृष्टीकोण बदलला पाहीजे.
7 Dec 2013 - 11:48 pm | संजय क्षीरसागर
जर नातं मजबूत असेल तर सेपरेशनच्या प्रोव्हिजनची (`लिव-इन') गरजच नाही!
8 Dec 2013 - 1:46 pm | सुबोध खरे
सर्वोच्च न्यायालयाने फक्त एवढेच म्हटले आहे कि मोठ्या कालावधीच्या लिव्ह इन रिलेशन ला विवाहासारखे धरता येईल.यात फक्त domestic violance खाली कारवाई करता येईल. परंतु यात काही मोठ्या फटी आहेत. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल म्हणजे पूर्ण कायदा नाही. ( कायदा करणे हे न्यायसंस्थेचे काम नाही तर ते लोकसभेचे आहे.) उद्या दुसरे खंडपीठ किंवा पूर्णपीठ या विरुद्ध निकाल देऊ शकते.
दुसरे म्हणजे या संबंधातून निर्माण होणार्या संततीला वारसा हक्काचे कोणते फायदे आणि कोणत्या वैयक्तिक कायद्याखाली द्यायचे हे अजून स्पष्ट नाही.
शिवाय या संबंधात एखादी व्यक्ती अपंग झाली तर दुसर्या व्यक्तीवर तिच्या पालन पोषणाची जबाबदारी टाकता येईल काय. आणि अशा परिस्थितीत जर त्या दुसर्या व्यक्तीने लग्न केले तर आपोआप ते कायदेशीर राहते आणि लिव्ह इन बाद ठरते.
हे म्हणजे आपण एखाद्याला मी तुला घर देतो म्हणून वायदा केलात आणि दुसर्याला परस्पर घर विकून त्याचे कर भरून कागदपत्र पंजीकृत(रजिस्टर) केले तर अगोदरच वायदा आपोआप रद्दबातल ठरतो.
अशा परिस्थितीत दुसरी व्यक्ती न घरकी न घाट की अशी राहते.
थोड्क्यात हा करार(?) फक्त फायदेशीर ठरतो कायदेशीर नाही.
आता लग्नात अशीच परिस्थिती उद्भवली तर काय होते ते पहा. मुलांना बापाच्या(आईच्या)वडिलोपार्जित संपत्तीत कायद्याने वाटा मिळतो. त्यांच्या पोषणाची जबाबदारी सज्ञान होईपर्यंत बापाची(आईची) राहते. बायकोला(नवर्याला) त्यांच्या पूर्व परिस्थितीप्रमाणे आयुष्यभर पोटगी मिळते. थोडक्यात कायदा त्या टाकलेल्या बायकोला( नवर्याला) अगदीच उघड्यावर पडू देत नाही.
नवरा बायकोचे पटेल कि न पटेल, यात कायदा काहीच करू शकत नाही परंतु जेंव्हा लग्न विच्छेद होतो तेंव्हा बायको( किंवा नवरा) याला आणि विशेषतः मुलांना त्यातून उघड्यावर येऊ नयेत अशी थोडी तरी सोय कायद्याने केलेली आहे.
लिव्ह इन मध्ये असे कोणतेही कायद्याचे संरक्षण आज तरी नाही. त्यांची परिस्थिती आजही "ठेवलेल्या" बाई सारखी आहे. जोवर नवर्याची(किंवा बायकोची) मर्जी आहे तोवर सर्व ठीक.
यात प्रश्न पुरुषाचा फारसा येत नाही. कारण तो लिव्ह इन मधुन बाहेर पडला तर त्याच्या बरोबर लग्न करायला किंवा आपल्या मुलीचे लग्न करून द्यायला अनेक बाप तयार होतात परंतु एखादी स्त्री लिव्ह इन मधुन बाहेर पडली तर तिच्याशी लग्न करायला किती पुरुष तयार असतील आणि किती बाप आपल्या मुलाचे तिच्याशी लग्न लावतील?
किती जरी समतेचा आव आणला तरी स्त्री पुरुष समानता हि अजून केवळ कागदोपत्री आहे. त्यामुळेच कायदा हा जास्त स्त्रीला झुकते माप देणारा आहे.
अजून तरी लिव्ह इन हे उच्च वर्गातील स्वावलंबी स्त्रीचे चोचले म्हणूनच आहेत. पटले तर पटले नाही तर सोडून दिले. लग्न झाले नाही तरी मी स्वतःच्या पायावर उभी आहे कारण माझ्याकडे(माझ्या बापाकडे) भरपूर पैसे आहेत.
या बाबतीत मला र धों कर्वे यांनी १९३१ साली लिहिलेले वाक्य आठवते "चरितार्थासाठी बहुतेक स्त्रिया लग्न करतात"
तसेच दुसरे वाक्य "कॉलेज हि मुलींची शाळा आणि लग्न याच्या मधील काळ घालवण्याची जागा आहे"
दुर्दैवाने आजही हि दोन्ही वाक्ये ८५ % पेक्षा जास्त स्त्रियांमध्ये सत्य आहेत.(१% उच्च वर्ग आणि १४ % मध्यम वर्ग).
सध्या इतकेच
7 Dec 2013 - 10:43 pm | दिव्यश्री
+१
भारी प्रतिसाद डॉक्टर ...
7 Dec 2013 - 11:41 pm | स्टुपिड
खट बुवा/तै लेख आवडला. चर्चा लै मनोरंजक आहे. काय ठरलं शेवटी? कोण जिंकला?
10 Dec 2013 - 9:16 am | निराकार गाढव
ईश्य! हे काय विचारणं झालं? ते सांगायलाच हवं का?

7 Dec 2013 - 11:45 pm | खटासि खट
तै ?
पुरूषांच्या विरोधात गेलो म्हणून ? अहो भाऊ, असं काही करू नका.
जिंकण्या हरण्यासाठी नाहीच काही. चर्चेचा तर कंटाळा येतोय. पण कुणी तुम्ही हे लिहू नका, ते लिहू नका म्हटलं कि सटकते.
7 Dec 2013 - 11:57 pm | आशु जोग
महाभारतामधेही लिव इन चे संदर्भ आहेत
कुणी तरी खोदकाम करा ना ;)
13 Dec 2013 - 8:11 pm | निराकार गाढव
गुर्जींना इचारा की... त्यांले सम्द्या इषयांमधलं सम्दं कळतं.
नायतर या दोनपैकी एक गडी निवडा:
१

२
https://encrypted-tbn2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTO6yNm-F8MB9xAsmSo...
बगा कोन पसंद पडतंय ते. आनि हो. आमचे गुर्जी चर्मचक्षूंना दिसू शकत नाहीत.... कारण ते "आमचे" गुर्जी हैत ना. हॉ कूSSS हॉ कूSSS हॉ कूSSS...
-
14 Dec 2013 - 12:25 am | आशु जोग
यालाच 'जान प्रबोधिनी' मराठी म्हणतात का !
8 Dec 2013 - 1:23 pm | साती
मूळात लिव ईन्मध्ये रहाताना 'लग्न' या संस्थेला आपण नाकारत आहोत त्यामुळे लग्नामुळे येणारे फायदे-तोटे आपण नाकारत आहोत हे मान्य करून तशी तयारी असली पाहिजे.
पार्टनरच्या संपत्तीवर अधिकार हवा, पगाराचे - पेंशनचे - रिटायरमेंटचे(पार्टनरच्या) बेनिफिट हवे तर सरळ लग्नच करावे.
8 Dec 2013 - 3:05 pm | पैसा
खट-खट बहुतेक गाणं म्हणत बसले असावेत! क्या से क्या हो गया...चाहा क्या..क्या मिला...
8 Dec 2013 - 5:05 pm | कवितानागेश
सध्याचे 'लिव-इन' चे स्वरूप मुख्यतः 'एक्स्टेन्डेड बघण्याचा कार्यक्रम' असा आहे असं वाटतंय.
काही वर्षे एकत्र राहून बघायचे की खरोखरच एकमेकाम्शी जमू शकतं की नाही. उगाच लग्न करुन संपूर्ण आयुष्य पणाला लावण्यापेक्षा काही वर्षे खर्ची घालू असा विचार कुणी केला तर वाईट काही नाही.
कदाचित 'लग्न' या प्रकाराचे गाम्भिर्य कळत असल्यानीच एक्दम घाईघाईनी ते लग्न करत नाहीत! :)
9 Dec 2013 - 5:51 pm | बाळ सप्रे
'एक्स्टेन्डेड बघण्याचा कार्यक्रम' - त्यालाच "trial marriage" म्हणत असावेत..
बापरे आणखी कन्फ्युजन !!
marriage आणि trial marriage आणि live in अशी तुलना करावी लागणार आता!!
8 Dec 2013 - 5:11 pm | खटासि खट
@ पैसातै :D
गाणं नाही. फक्त एक इग्नोर केला कि कै प्रॉब्लेम नाही. चर्चेची (लिहिण्याची) सवय नाही येवढा येकच प्रॉब्लेम !
@ डॉ खरे साहेब
तुमच्याइतकं समजावून सांगता येत नाही. काय म्हणायचंय हे तुम्ही समजावून घेऊ शकाल असं वाटतं. तुम्ही चर्चेचं सार काढलंच आहे. समाज अजून इतका उत्क्रांत झाला नाही. स्त्री देखील जागृत झालेली नाही. नाहीतर मग कुंकू, मंगळसूत्र याचाही वेगळा विचार झाला असता.
सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स :-
http://www.ndtv.com/article/india/supreme-court-frames-guidelines-for-de...
कौटुंबिक हिंसा कायद्याखाली लिव्ह इन रिलेशन मधील स्त्री ला संरक्षण आहेच.
पण सातीने म्हटल्याप्रमाणे एकदा लिव्ह इन रिलेशन मधे रहायचं ठरवल्यावर लग्नाला मिळणारे कायदेशीर फायदे कशाला हवेत? आमचं पटतंय तोप्रयंत एकत्र राहू, नाहीतर वेगळे होऊ, त्याबद्दल कुणीच कुणाला दोष द्यायचा नाही हे अंडरस्टँडींग दोन्ही पार्टीचं असल्यावर कायद्याचा विचार येतच नाही. दोन स्वतंत्र व्यक्ती एकमेकांचा आदर करत एकमेकांवर एकत्र राहणे हे लिव्ह इन मधे अपेक्षित आहे. सहजीवनामधेच आपण आनंदाने राहू शकू कि नाही हे कळतं. लिव्ह इन रिलेशन म्हणजे कायमच लग्णाशिवाय राहणे असंही नाही. या जोडप्याला आपण एकत्र राहण्यात काहीच अडचण येणार नाही हे काही वर्षे एकत्र राहील्यावर लक्षात आल्यानंतर ते लग्न देखील करू शकतात. कोर्टाने एका केसचा निकाल देताना पतीच्या त्रासापासून सुटका म्हणून दुस-या व्यक्तीबरोबर (लग्नाशिवाय) एकत्र राहणे यालाही लिव्ह इन रिलेशन मानले आहे. याला स्वैराचार असं झटकन लेबल लावण्याच्या आधी जरा विचार केला तर हा मोठाच दिलासा आहे. बसून खाणा-या नव-यांना ही चपराक तर जुलमाने नांदणा-या स्त्रियांना आनंदी आयुष्यासाठी एक पर्याय आहे. अर्थात एव्हढा मोठा धाडसी निर्णय घेणं जमेलच असं नाही. स्लम एरीयात अशी उदाहरणे दिसतात कि.. फक्त त्याला लिव्ह इन म्हणतात हे त्यांच्या गावीही नसतं आणि त्यामागे वैचारीक भूमिकाही नसते.
जेव्हां लग्नाशिवाय एकत्र राहणे या कृतीलाच कायद्याने ओळख (संरक्षण) नव्हे नव्हती तेव्हां आर्थिक व्यवहार, शाळेचा प्रवेश, बिलं, अशा अनेक गोष्टींना तोंड देताना जी अडचण निर्माण होत होती त्यासाठी लग्न करावं लागत होतं. पण अनेक देशात लिव्ह इन रिलेशन हा आता कायदेशीर व्यवहार झालेला असल्याने ही अडचण दूर झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे एक प्रकारे लिव्ह इन रिलेशनला ओळख मिळालेली आहे. म्हणूनच लग्न हा आता ऐच्छिक विषय राहीलाय. लग्नविषयक कायदे हे सामाजिक मान्यतेनुसार बनलेले आहेत. मागेच म्हटल्याप्रमाणे मान्यता बदलतील तसे कायदे हळू हळू बदलत जातील.
8 Dec 2013 - 8:56 pm | सुबोध खरे
साहेब,
एवढे सगळे काथ्याकूट झाल्यावर त्या दुव्याची शेवटची ओळ हेच सांगते आहे कि त्या स्त्री ला पोटगी हवी आहे आणि त्यासाठीच तिने न्यायालयात खटला दाखल केला. त्यात आमच्यात प्रेम होते आमचे संबंध इतके घट्ट होते हे न्यायालयात तिला सिद्ध करावे लागलेच न? मग हे सर्व दोन जीवांमध्ये आदर प्रेम असेल तर या सर्व गोष्टींची गरज काय असे म्हणण्याचा दांभिकपणा कशाला?
""पण सातीने म्हटल्याप्रमाणे एकदा लिव्ह इन रिलेशन मधे रहायचं ठरवल्यावर लग्नाला मिळणारे कायदेशीर फायदे कशाला हवेत? आमचं पटतंय तोप्रयंत एकत्र राहू, नाहीतर वेगळे होऊ, त्याबद्दल कुणीच कुणाला दोष द्यायचा नाही हे अंडरस्टँडींग दोन्ही पार्टीचं असल्यावर कायद्याचा विचार येतच नाही. दोन स्वतंत्र व्यक्ती एकमेकांचा आदर करत एकमेकांवर एकत्र राहणे हे लिव्ह इन मधे अपेक्षित आहे. सहजीवनामधेच आपण आनंदाने राहू शकू कि नाही हे कळतं.""
शेवटी एक गोष्ट सत्य आहे कि स्त्रीला निसर्गाने पुरुषाइतके सशक्त केलेले नाही. शेवटी स्त्री हि मानसिकदृष्ट्या पुरुषात जास्त गुंतत जाते आणि गरोदर पण आणि मातृत्व निसर्गाने लादल्याने शारीरिक दृष्ट्या सुद्धा कमकुवत आहे हे सत्य बहुसंख्य स्त्रीमुक्तीवाद्यानी सुद्धा मान्य केले आहे. मग असे असताना कायदा देत असलेले फायदे नकोत असा मानभावीपणा कशाला.
शांतता हवी हे बलवानाने ठरविले तरच होते दुर्बलाने नव्हे. याच न्यायाने जोवर समाजाचे पुरुषप्रधान संस्कृतीचे विचार जोवर बदलून स्त्रीपुरुष समानतेचे विचार रुजत नाहीत तोवर स्त्रियांचे सबलीकरण हे अरण्यरुदनच राहणार.
आज पुढारलेल्या समाजातही किती बाप आपली मुलगी कुणाबरोबर "लिव्ह इन" म्हणून राहायला जाते म्हटल्यावर खुशीने तिला निरोप देतील? मी मध्यम किंवा निम्न वर्गाबद्दल बोलतच नाही. मी तरी याला नक्कीच तयार होणार नाही.
8 Dec 2013 - 10:54 pm | संजय क्षीरसागर
The guidelines include presence of sexual relationship and children which mean, "Marriage like relationship refers to sexual relationship, not just for pleasure, but for emotional and intimate relationship, for procreation of children, so as to give emotional support, companionship and also material affection, caring etc.
"Having children is a strong indication of a relationship in the nature of marriage. Parties, therefore, intend to have a long standing relationship. Sharing the responsibility for bringing up and supporting them is also a strong indication."
आणि लेखाच्या पहिल्या पानावर, लेखकानं विचारलंय :
8 Dec 2013 - 9:53 pm | अधिराज
लिव्ह इनमध्ये एक पुरूष/स्त्री किती स्त्रियां/पुरुषां बरोबर राहू शकतो/शकते यावर काही मर्यादा असते का? जर एखाद्या पुरुषाचे लग्न झाले असेल व तो पुरूष असे लिव्ह इनमध्ये राहत असेल तर त्यावर काही बंधन किंवा शिक्षा आहे का?
8 Dec 2013 - 10:05 pm | खटासि खट
लिव्ह इन ही लॉङ्म टर्म सीरीयस रीलेशन शिप आहे. एकापेक्षा जास्त वगैरे गैरसमज आहेत. असं पाहण्यात आहे का ? अशा गोष्टींना लिव्ह इन रिलेशन म्हणत नाहीत. गूगल सर्च दिला तर व्याख्या मिळू शकते.
9 Dec 2013 - 3:02 pm | अधिराज
हा!हा!हा! अहो गूगलवरूनच उत्तरं मिळवायची असतील तर इथे प्रतिसादांतून चर्चा करण्याचे काहि प्रयोजनच राहणार नाही.
माझ्या प्रतिसादातील प्रश्न धागाकर्त्यालाच लागू होतो असं नाहिये, त्यामुळे तुम्हाला माहित नसेल तर त्रास कशाला करून घेताय. ज्यांना माहित आहे ते देतील प्रतिसाद त्यांची इच्छा असेल तर.
9 Dec 2013 - 3:54 pm | खटासि खट
???
:hz:
गूगल सर्च दिला तर..असं त्रास झाल्यासच म्हणतात हे माहीत नव्हतं. धन्यवाद.
8 Dec 2013 - 9:54 pm | अधिराज
विडंबन मस्त झाले आहे!
8 Dec 2013 - 10:02 pm | खटासि खट
एकदा लिव - इन मधे राहील्यानंतर पोटगीची अपेक्षाच करू नये. तसा दावा करणे हा दांभिकपणाच आहे. त्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण त्यावरून लिव्ह इन रिलेशन चुकीचं आहे असं म्हणता येईल असं वाटत नाही. नातेवाईकांच्या दबावामुळेही असे दावे केले जातात. त्याबद्दल काहीच सांगता येत नाही.
हे मी आधी म्हटलेलं आहे. तसंच ज्यांना ते पटलेलं आहे त्यांना तसं जगू द्यावं इतकाच भारतापुरता तरी हा विषय आहे आपल्यापर्यंत हा मुद्दा येईल तेव्हां येईल. पण आपल्या अपत्याने कसं जगावं हे सुद्धा आपणच ठरवावं याबद्दलही प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतील. येणा-या काळात त्यात बरेच बदल होतील हे निश्चित.
माझ्याकडे आता काही सांगण्यासारखं नसल्याने मी शीला दीक्षित (राजीनामा).
8 Dec 2013 - 10:39 pm | संजय क्षीरसागर
वर अधिराजनं विचारलंय
हा प्रश्न पुरेसा मार्मिक आहे. लेखकाचं त्यावर उत्तर मजेशिर आहे :
लिव-इनमधे कसला आलाय लाँग टर्म आणि सिरियसनेस? त्या गोष्टी नकोत म्हणून तर लिव-इनची आयडिया निघालीये.
....आणि लेखकाला माहितीचा एकच हुकमी सोर्स माहितीये : गुगल सर्च!
8 Dec 2013 - 11:58 pm | खटासि खट
आमच्यासारखे असंख्य साधारण बुद्धी, सामान्य कुवतीचे लोक मजेशीरपणे गूगलवरच विश्वास टाकतात.
अतिविद्वान, प्रकांडपंडीत, असामान्य बुद्धीमत्ता असलेले लोक बहुधा संक्षी सर्च देत असावेत... आम्हाला वेळ आहे अजून.
त्स्मात आपल्यापासून लांबच आहोत. आपण आपल्यासारख्या प्रकांड पंडिताशी चर्चा करावी हे उत्तम नाही का राहणार ?
9 Dec 2013 - 9:49 am | संजय क्षीरसागर
त्यामुळे चर्चेचं फलित असं की :
लिविन हा निव्वळ टाईमपास आहे आणि विवाह ही एका दीर्घ आणि उत्तम सहजीवनाची संधी आहे. सुखावह वैवाहिक नातं निर्माण न करता येणं हा विवाह-संकल्पनेचा दोष नसून व्यक्तिगत उणीव आहे. ज्या व्यक्ती पारस्पारिक समन्वय निर्माण करु शकत नाहीत त्या लिविन मधे असल्या काय की विवाहात, त्यांना प्रश्न निर्माण होणारच.
लिविनची सगळ्यात महत्त्वाची गोची अशीये की एकदा नंबर ऑफ रिलेशनशिप्सचा आकडा वाढला की नात्यातली गुंतागुंत वाढत जाणार. मनाला सारखा बदल हवा असतो त्यामुळे `आधीचा' बरा होता की `पुढचा' बरा असेल यात व्यक्ती सदैव दोलायमान राहणार. त्यात कधीही एकमेकांना बाय करु शकत असल्यानं सध्याच्या नात्यात जरा कुरबुर झाली की जुळवण्यापेक्षा मोडण्याची घाई असणार. आणि त्यावर "सध्याच्या नात्यातली जवळीक" हाच एकमेव उपाय आहे याची कुणाला कधीही कल्पना येणार नाही. अशा तर्हेनं लिविन हा पर्याय स्त्री-पुरुषांना कायम अस्वस्थ ठेवणार.
लग्नात काहीही जोखिम नाही. एकदाच परस्परांवर संपूर्ण विश्वास टाकून निर्णय घेतला की मग कोणतीही गोष्ट त्या नात्याला बाधा आणत नाही. ते नातं दिवसेंदिवस गहीरं होत जातं. ती आणि तुम्ही एकरुप होता. एकमेकांचा सहवास बंधन नव्हे तर कंपनी होतो. जगणं धमाल होतं.
9 Dec 2013 - 9:04 pm | पिशी अबोली
तरी इथे बायकांचा अनेक धाग्यांवर 'बिचार्या गांजलेल्या नवर्यांकडून' उद्धार होतच असतो... ;)
10 Dec 2013 - 10:54 am | संजय क्षीरसागर
विवाह काय की लिवीन काय दोन्ही पारस्पारिक मान्यता आहेत. जर एकमेकांबद्दल प्रेम आणि कृतज्ञता असेल तरच संबंध सुखाचे होतील ही उघड गोष्ट आहे. स्वतःच्या वैवाहिक संबंधाविषयी समाधानी नसणं हा पारस्पारिक समन्वयाचा आभाव आहे त्याचा दोष विवाहाच्या संकल्पनेला देता येत नाही.
9 Dec 2013 - 6:45 pm | सांजसंध्या
ओह ! तुम्ही म्हटलंय म्हणजे बाबा वाक्यं प्रंमाण असंच ना ? आणि त्यासाठी तुम्हाला गूगल वगैरेची गरजच नाही...
10 Dec 2013 - 11:23 am | संजय क्षीरसागर
लग्न करुन किती टक्के सुखी आहेत आणि लिवीनमुळे किती पर्सेंट आनंदात आहेत या डेटानं युगुलाच्या पारस्पारिक नात्यात कसा फरक पडेल. आपलं नातं आपण निर्माण करतो आणि जपतो.
लिवीन ही ट्रायल नाही का? खर्या लिवीनची परिणिती सुखी संसारात होणार नाही का? एकदा लिवीनची सवय जडल्यावर सतत संशय (तिची किंवा त्याची मागची लिवीन ब्रेक झाली असेल?) आणि अनकमिटेड रिलेशन्समुळे एकमेकांना समजावून घेण्यापेक्षा, `नाही जुळत गेले उडत' ही वृती कायम राहणार.
मी स्वतःचा अनुभव लिहीतो, मंजूर नसेल तर त्याविरुद्ध विचारपूर्वक मत मांडल्यास चर्चा होईल. उपहासानं काही साध्य होत नाही.
9 Dec 2013 - 6:20 pm | चित्रगुप्त
सर्व प्रतिसाद वाचले नसल्याने हा मुद्दा कुणी मांडला आहे की नाही, हे ठाऊक नाही, परंतु अमेरिकादि देशात नवर्याचा (अथवा बायकोचा) खून करून त्याच्या विम्याची रक्कम मिळवणे, हा प्रकार बरेचदा घडतो, असे डिस्कव्हरी का कोणत्यातरी चॅनेलावर बघितले होते. कायदेशीर लग्न झालेले नसल्यास ती रक्कम स्पाऊसास लाभत नाही, तस्मात लग्नाविना सहजीवन बरे, असे मानले जाते. म्हणजे फायदे घ्या पण धोका टाळा. शिवाय 'आज इधर कल उधर मै किसीकी/किसीका नही' हे लिविन मधे जास्त सोपे.
9 Dec 2013 - 6:50 pm | सांजसंध्या
लग्न झालेल्या जोडप्यात असं काहीच नसतं ना ? सगळेच विवाहीत पुरूष मर्यादापुरुषोत्तम !
लिव्ह इन मधे असा प्रकार उघडकीस आला तर लगेच वेगळं होणं जास्त सोपं आहे.
एक नम्र विनंती आहे. माहीती घेऊन बोललं तर सर्वांनाच बरं पडेल, गैरसमजावर आधारीत चर्चा भरकटणारच..
9 Dec 2013 - 6:57 pm | शिद
माझा एक खोचक प्रश्न... तुम्ही एवढ्या तावातावाने लिव-ईन ला सपोर्ट करत आहात तर जरा फायदे-तोटे पण कळु दे कि या पामरास?
9 Dec 2013 - 6:59 pm | चित्रगुप्त
या विषयावर खास अमेरिकन, मेक्सिकन आणि फ्रेंच लोकांशी (वयोगट ३० ते ७५) बोलण्यातून मिळालेल्या माहितीतून लिहिले आहे. पै़की एका जोडप्याच्या दहा वर्षांच्या सहजीवनानंतर झालेल्या लग्नातही उपस्थिती लावलेली आहे. असो.
9 Dec 2013 - 7:13 pm | सांजसंध्या
@ चित्रगुप्त - गैस नसावा.
लग्नामधे जोडादाराने केलेली फसवणूक उघडकीला आली तर स्त्री ला मनःस्ताप होत नसेल का ? स्त्री ने फसवणूक केली तर किती नवरे तिला माफ करून लग्न टिकवतात ?
लिव्ह इन रिलेशन हे पण सहजीवनच आहे आणि लग्न पण. एकात रूढ अर्थाने सामाजिक / कायदेशीर बंधन नाही. पण जोडीदाराचा विश्वास टिकवणे हे अपेक्षित आहे. वन नाईट स्टँड, एकापेक्षा जास्त जणांशी रिलेशन्स असे मुद्दे वाचले, म्हणून थोडीशी माहीती घेतली तर गैस दूर होतील इतकंच म्हणायचं होतं. मुंबई, पुणे, गोवा अशा ठिकाणी पूर्ण विचारांती लिव्ह इन मधे असणारी जोडपी आहेत. शेवटी पूर्ण विचारांती नसेल तर दोन्हीमधे तोटेच आहेत.
मला जाणवलेला ठळक फायदा म्हणजे आपल्याला हव्या त्याच व्यक्तीबरोबर राहणे. लव्ह मॅरेजमधेही हे होतं. पण अॅरेंज मॅरेज मधे होतं नाही. तरी देखील अॅरेंज मॅरेज टिकून आहे. पण एक प्रकारे तो जुगार आहे. अशा लग्नात स्त्री ने केलेल्या अनंत तडजोडी सवयीच्या आणि अपेक्षित असल्याने त्याची किंमत नसते. (हा वेगळा विषय आहे असं म्हणता येत नाही)..
समारंभपूर्वक लग्न करून नंतर पटले नाही तर प्रचंड मनःस्ताप होतो. त्यातही आईवडिलांनी बघून दिलेलं असल्यास दोष कुणाला देणार ? लिव्ह इन रिलेशन मधे तुम्ही इतरांना दोष देत नाही. पूर्ण विचारांती दोघांचाच निर्णय असल्याने पार्टनर विश्वासपात्र किंवा सहजीवनास अयोग्य निघाला तर पुढचं आयुष्य वेगळं होण्यात शहाणपण असतं.
हे मुद्दे वर येऊन गेलेले आहेत. पुन्हा स्टार्ट पासून सुरुवात का करायची ?
9 Dec 2013 - 8:58 pm | प्रभाकर पेठकर
जोडीदाराने फसवणूक केली तर फक्त स्त्रीलाच मनःस्ताप होतो? हे फार एकांगी विधान होईल. एका जोडीदाराने फसवणूक केल्यास दूसर्या जोडीदारास नक्कीच मनःस्ताप होतो.
अनेक असावेत. माझ्या पाहण्यात दोघे आहेत.
जोडीदाराचा विश्वास टिकविणे दोन्ही संस्थांमध्ये आवश्यक आहे. फक्त लिव्ह-इन मध्येच नाही.
सहमत. पण विचारांती म्हणजे काय? एकमेकांचे अंतरंग समजून येण्यास अर्ध आयुष्य निघून जातं. शिवाय माणसाच्या स्वभावातही फरक पडत जातोच. पंचविस-तिसाव्या वयात असलेला स्वभाव पन्नाशीच्या पुढे टिकतोच असे नाही. वैचारिक परिपक्वतेची पातळी बदलत जाते. दीर्घ काळच्या सहवासात एकमेकांना गृहीत धरण्याचे प्रमाण वाढलेले असते. एका सुरक्षित कोषात विचार करायची सवय लागलेली असते. पूर्वीच्याकाळी विशेष न खुपणारे स्वभावदोष (तेंव्हा असणारी सहनशक्ती आणि आशादायी भविष्यावरील भरवसा) शेवटी सहनशक्ती संपल्याने आणि आशावाद फोल ठरल्यावर जास्त खुपू लागतात. पूर्वी नसलेले बेबनाव नव्याने समोर येऊ शकतात.
प्रत्येक अॅरेंज मॅरेज मधे असे होत नाही? अॅरेंज मॅरेज मध्ये कोणीच सुखी नसतं? सर्व जोडपी नाईलाजाने एकत्र राहात असतात?
अर्रर्रर्र..! पुरुषांना तडजोडी कराव्याच लागत नाहीत? प्रचंड गैरसमज.
आणि प्रेमविवाहात? तिथेही निर्णय दोघांचाच असतो. त्यांचेही पुढे न पटल्यास वेगळे होण्यात शहाणपण आहे? जर मुलं झाली असतील तर त्यांचा काय दोष? त्यांना ह्या जगात आणलं कोणी?
लिव्ह-इन रिलेशनशिप दोघांपैकी एखादा जोडीदार ह्या जगात उरला नसेल आणि उरलेल्या जोडीदारास एकटेपणा असह्य झाला असेल तर पुनर्विवाह किंवा लिव्ह इन रिलेशनशिप समर्थनिय आहे. पण मुले असतील तर त्यांची मतेही विचारात घ्यावीत. शारीरिक संबंधांचे वय उलटून गेल्यावरही भावनिक गरजेपोटी असे संबंध प्रस्थापित होऊ शकतात आणि टिकूही शकतात. अशा जोडीदाराच्या, आपल्या पश्चात, भविष्याची सोय सामंजस्याने करावी. आपली मुले ते पाहतील अशा भरवशावर राहू नये.
10 Dec 2013 - 8:12 am | सांजसंध्या
क्काय क्काय असतात या तडजोडी ? प्रगैस दूर करून घ्यायला आवडेल :)
(म्हणजे तुलना करता येईल)
10 Dec 2013 - 11:33 am | प्रभाकर पेठकर
लग्नानंतर बायको-मुलांची जबाबदारी नवर्याच्या शीरावर येते. सर्वांची जबाबदारी आली की फक्त आपल्यापुरता विचार करून चालत नाही. सर्वांसाठी काय योग्य आहे ह्यावर विचार करून, प्रसंगी आपल्या आवडीनिवडींना मुरड घालून कृती करावी लागते.
आम्हाला चांगले कपडे घालता यावेत (नेहमीच्या वापरातले, छानछोकीचे नाही) म्हणून वडिलांना भोकाभोकांचा गंजीफ्रॉक घालताना पाहिले आहे.
तसेच, कुटुंबाच्या औषधपाण्यासाठी स्वतःचे आजारपण अंगावर काढतानाही पाहिले आहे.
मुलांना उच्च शिक्षणासाठी पैसा पाहिजे म्हणून दीर्घकाळ इथे आखातात नोकरी करणार्या पुरुषांना पाहिले आहे.
मुलांना स्कूटर घेऊन द्यायची म्हणून स्वतः सायकल दामटत मैलोनमैल जाणारे बाप पाहिले आहेत.
पत्नी नोकरी व्यवसाय करू शकत नाही पण तिचे आणि सासूचे पटत नसल्याने आणि तिने मागे धोशा लावल्याने छोटासेच का होईना पण वेगळे घर घेऊन २० वर्षे एचडीएफसीचे हप्ते भरणारे नवरे पाहिले आहेत.
परिपक्वतेचे वय उलटून गेलेल्या, सासू-सूनेच्या वादामध्ये अकारण मध्यस्थाची भूमिका घ्यावी लागून अडकित्यात सुपारीसारखी अवस्था झालेले महाभाग पाहिले आहेत.
मुलींच्या लग्नासाठी म्हातारपणी कर्जांच्या ओझ्याखाली पिचलेले बाप पाहिले आहेत.
वाढत्या महागाईशी तोंड देण्यासाठी निवृत्तीनंतरही (६५-७० वर्षे वयातही) छोट्या-मोठ्या नोकर्या करणारे पाहिले आहेत.
मुलाच्या अपघातात, बायकोच्या दुर्धर व्याधीसाठी म्हातारपणीही आर्थिक खस्ता काढणारे पुरुष पाहिले आहेत.
मुलं रडताहेत म्हणून स्वतःच्या ताटलीतल अन्न त्यांच्या ताटलीत (कारण पातेल्यात कांही उरलेलं नाहीए) वाढून स्वतः तांब्याभर पाणी पिऊन कामावर जाणारे फुटपाथवरचे बापही पाहिले आहेत.
कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे साहेबांची अपमानास्पद वागणूकही सहन करून नोकर्या टिकविणारे पुरुष पाहिले आहेत.
चांगलं स्थळ हातचं जाऊ नये म्हणून हुंड्याची जमवाजमव करणारे आणि ते पैसे फेडण्यासाठी खस्ता खाणारे बाप पाहिले आहेत.
मुलीच्या सुखासाठी आर्थिक गणितं जमत नसतानाही जावयांची सरबराई करणारे, त्यांच्या मागण्या पुर्या करणारे बाप पाहिले आहेत.
आयुष्यभराची कमाई मुलाला व्यवसायासाठी देऊन कफल्लक म्हातारपणाला सामोरे जाणारे बाप पाहिले आहेत.
खूप मोठी यादी आहे हो! एकदा कुटुंबाची जबाबदारी घेतली की हे सर्व करावेच लागते हे मान्य आहेच. पण ह्यात कुठे तुम्हाला तडजोड दिसत नाही का???
हल्ली कमावत्या महिलांमुळे कांही अंशी आर्थिक जबाबदारीला हातभार लागतो. मुद्दा असा आहे की तडजोड ही दोघांनाही करावी लागते.
11 Dec 2013 - 7:18 am | सांजसंध्या
याला तडजोड म्हणत असतील तर पुरुषाने बायकोकडे नांदायला जावे. सासरा आणि जावई यामधे अडकित्त्याची भूमिका बायको बजावेल. कर्तव्यं आणि तडजोड यातच इतका गोंधळ असेल तर काय बोलणार ? हल्ली बायका सर्रास कमावत्या झाल्याच आहेत. पुरुषाने फक्त घर आणि मुलं सांभाळून दाखवावीत. घरी बसून किंवा कमावून.. कसंही !
11 Dec 2013 - 10:05 am | प्रभाकर पेठकर
ह्यात तुम्हाला कुठेच तडजोड दिसली नसेल तर वादच मिटला.
झोपलेल्याला जागं करता येतं झोपेचे सोंग घेणार्याला नाही.
समजविण्याचा प्रयत्न संपल्यावर पुरुषाला माघारीची तडजोड करावीच लागते. असो.
11 Dec 2013 - 10:14 am | विश्वनाथ मेहेंदळे
काका, इतकी वर्षे मिपावर काढुन सुद्धा तुम्हा पाशवी शक्तींना समजवावेसे वाटते या बद्दल कौतुक वाटते.
रच्याकने, मूळ प्रतिसाद सुंदर !
11 Dec 2013 - 5:33 pm | प्रभाकर पेठकर
वाद घातल्याने कांहीतरी ज्ञानात भर पडतेच.
आजचा ट्रेंड काय आहे ह्याचे ज्ञान झाले.
'बाईने केली की तडजोड, पुरुषाने केली की 'कर्तव्य'.'
11 Dec 2013 - 6:18 pm | खटासि खट
कसली मज्जा आहे. घुम फिर के भोपळे चौक मे गाडी बार बार आती है. मैलामंडळ रजेवर गेलंय. त्यांच्यावतीनं पुरुषानं बाजू मांडली कि त्यालाच तै म्हणतात, गायनॉकॉलॉजिस्टला प्रेग्ननसीवर बोलायला प्रेग्नंट असण्याची अट घालतात, महाभारताचं थेट प्रक्षेपण करणारी वाहीनी मधेच मनोरंजक कार्यक्रम करतेय... मज्जा मज्जा !!
11 Dec 2013 - 6:42 pm | बॅटमॅन
शब्द बाकी लाईकवण्यात आला आहे. प्रतिसादाशी सहमत हेवेसांनल अर्थातच.
9 Dec 2013 - 9:41 pm | सूड
विश्वासघात करणे ही नेहमी पुरषांची मक्तेदारी असल्यासारखा समज का असतो हे कळलेलं नाही. एकदा मेघना पेठेंचं 'नातिचरामि' वाचा, खाडकन उघडतील डोळे!! पुरुषच विश्वासघात करु शकतात असा तुमचा समज असावा, असं निदान तुमच्या एकतर्फी विधानांवरुन वाटतंय. तसं असेल तर हे पुस्तक मनाला पटणार नाही तुमच्या.
10 Dec 2013 - 5:47 am | सांजसंध्या
विश्वासघात फक्त पुऊषच करतात असं म्हटलेलं नाही. स्त्री ने केला तर त्याकडे पहायचा दृष्टीकोण वेगळा असतो. ती होतीचतशी, वाईट चालीची, बदफैली पासून अनेक विशेषणं लावली जातात. लगेचच त्या बिचा-या पुरुषाला अनेक सल्ले दिले जातात. पण पुरुषाकडून हे झालं तर जाऊ द्या.. एक डाव माफ करा. तरुण वय आहे, असं व्हायचंच असे सल्ले दिले जातात. एखाद दुसरं उदाहरण वेगळं. प्रत्यक्षात फक्त संशयावरूनही बाईला मारहाणीपर्यंत मजल जाते. सुशिक्षित समाजात प्रत्यक्ष मारहाण होत नसेल पण शब्दांचा मार पुरेसा असतो. थोडक्यात चुकला तर पुरूष हा माणूस असतो, पण चुकलेली बाई ही माणूस नसते. त्यामुळं न चुकण्याची जबाबदारी शेवटी बाईवरच येऊन पडते.
वरच म्हटलंय ना विधवा, टाकून दिलेया बाईवर लोकांचा डोळा असतो म्हणून ? हे पुरुषाचं वर्तन सहज म्हणून स्विकारलं जातं. इथंही काळजी बाईनेच घ्यायची असते. रात्री दार वाजवलं तर त्या बाईचाच काहीतरी दोष असला पाहीजे हा समज घट्ट असतो. दार वाजवणारा काय पुरूष असल्याने तो हे करणारच हे गृहीत धरलेलं असतं. जर चुकून काही झालं तर दोष बाईचाच. "रक्षण" न करू शकणारा पुरूष लगेच बिच्चारा ठरून काडीमोड द्यायला पात्र ठरतो. ही उदाहरणं अर्थातच सुशिक्षित वस्त्यांमधली नाहीत. पण मानसिकता ब-यापैकी सगळीकडे लागू पडते.
प्रश्न प्रत्यक्षात फसवणूक / विश्वासघात कोण करतं याचा नसून उघडकीस आल्यानंतर त्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोणाचा आहे. बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमचं उदाहरण आहेच. दहा वर्षे रिलेशन मधे राहील्यानंतर परदेशातल्या फुटबॉलप्लेयर बरोबरच्या पार्टीवरून बिनसलं. हीच गोष्ट जॉन च्या बाबतीत अनेकदा घडते तेव्हां ती अभिमानाने मिरवण्याची असते. तिने ते समजावून घ्यायचं असतं. पण तीच गोष्ट तिने केल्यावर मात्र फिल्म इंडस्ट्रीसारख्या क्षेत्रात राहूनही त्याचा पुरुषी इगो हर्ट झाला. त्या एका कारणावरून त्यांना वेगळं व्हावं लागलं. एकदा नात्याला तडा गेल्यानंतर उगाचच एकत्र राहण्यापेक्षा तो निर्णय केव्हांही चांगला होता.
10 Dec 2013 - 3:59 pm | सूड
पुन्हा पहिले पाढे पंचावन !! चालू द्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
11 Dec 2013 - 7:19 am | सांजसंध्या
बोलणंच खुंटलं.
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
10 Dec 2013 - 10:53 am | Dhananjay Borgaonkar
आजच्या सकाळ पेपरमधे (पुणे शहर पुरवणी) पान नं ३ वर लिविन वर लेख आहे.
त्यात मानसोपचार तज्ञ,समुपदेशक, वकील यांची मते आली आहेत.
फायद्या पेक्षा तोटेच जास्त सांगितले आहेत.
10 Dec 2013 - 10:59 am | Dhananjay Borgaonkar
ईथे लेख पहाता येईल.
13 Dec 2013 - 1:38 pm | मराठी कथालेखक
आता ओपन रिलेशनशिप बद्दल बोलायला हवं… लिव ईन ची तर चिकार जोडपी आढळतील तुम्हाला मोठ्या शहरांत
2 Mar 2016 - 9:54 am | नाखु
सदाहरीत विषयावर
श्री रा रा रा यमगर्नीकर साहेबांनी आपले अनुभवसिद्ध विचार द्यावेत या कारणाकरीता हा धागा वर काढीत आहे.
कोल्हापुर कट्ट्यातील मंडळीनी आठवण करून द्यावी ही विनंती