सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
9 Dec 2007 - 1:51 am

आपण भरपूर चित्रपट पाहतो. त्यातील बहुतेक संवाद हे आपल्या लक्षात राहतात. बहुतेक वेळा ते संवाद किंवा ती एक एक वाक्ये लक्षात रहावीत अशाच प्रकारे लिहिलेली असतात.
उदा. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील 'राज, अगर यह तुझसे प्यार करती है तो ये पलट के जरूर देखेगी... पलट... पलट' हे वाक्य. माझ्या मते हे वाक्य नेहमी वापरात यावे, लक्षात रहावे अशाच विचाराने लिहिले असेल. पण त्याच्या सादरीकरणावरही तेवढाच जोर दिला गेला.

आता असेच वाक्य शाहरूख खानच्याच राजू बन गया जंटलमन मध्ये वापरले गेले होते. किंवा खरे तर राजू बन गया.. मधील हे वाक्य "अगर वह पलट के सिस्टर की ऑंखो में आँखें डाल के देखेगा तो फिर वह जा नही पायेगा.... पलट... पलट" पुन्हा दिलवाले दुल्हनिया.. मध्ये वापरले गेले. हे वाक्य ज्या प्रकारे सिनेमात वापरले गेले आणि एवढे लोकप्रिय झाले, की ते पुन्हा वापरायचा मोह आवरता आला नसेल. पण एक आहे, ते वाक्य खरोखरीच अर्थपूर्ण आहे. :)

आता आणखी थोडी सर्वांना आवडलेली वाक्ये..

तुम्हारा प्लान ही गलत है.. लगता है कच्चा खिलाडी है.
पहिले वाक्य आमिर खान परेश रावल ला म्हणतो, दुसरे वाक्य सलमान खानला. सिनेमा: अंदाज अपना अपना.. ह्या सिनेमातील तर एक एक वाक्ये लक्षात राहण्याजोगी आहे,

इसको क्या घडी करके डालू क्या?
अपना प्यारा सर्कीट, ह्याबद्दल जास्त लिहिणे नको. सर्वांनाच माहित आहे.

केक के लिये हम कहीं भी जा सकते है...
सैफ अली खान, डिंपल ला म्हणतो. सिनेमा दिल चाहता है.

अशी इतर प्रसिद्ध वाक्ये लिहिण्याचा प्रयत्न नाही. तो तर सगळीकडेच चालू असेल.
इथे आहेत मला लक्षात राहिलेली काही वाक्ये... आता ती तुमच्याही लक्षात नसतील, अर्थपूर्ण नसतील, खास कोणाच्या लक्षात रहावीत म्हणून लिहिली नसतील. पण काही कारणाने माझ्या लक्षात राहिलीत.

शैतान जहाँ जहाँ राम वहाँ वहाँ
राम लखन मधील हे वाक्य. सिनेमात शेवटच्या मारामारीच्या आधी आहे. मी आणि माझ्या बहिणीने ऐकल्याबरोबर प्रतिक्रिया दिली.. क्या डायलॉग है.

खुशकिस्मती सिर्फ़ एक ही बार दरवाजा खटखटाती है, पर बदकिस्मती तब तक दरवाजा खटखटाती है जब तक तुम दरवाजा ना खोल दो.
हमारा दिल आपके पास है. तनाझ कूरीम ऐश्वर्या ला सांगत असते. त्यातील शब्दांमुळे लक्षात राहिलेय अजून.

मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया.
चायना गेट.. मुकेश तिवारीच्या तोंडी हे वाक्य आहे. मी सिनेमा अजून पूर्ण पाहिला नाही पण हे वाक्य जरूर पाहिले आहे. एक वेगळे वाक्य म्हणून लक्षात राहिले.

अंकुश दिखने में भले ही छोटा हो, पर वह हाथी को काबू कर लेता है.
सिनेमा: मि. बेचारा. अनिल कपूर च्या छापखान्यात काम करणारा मुलगा कर्जाचे पैसे मागणाऱ्या लोकांना सांगतो.

धनाजी रामचंद्र वाकडे... ध.रा.वा. आता कोणाला धरावा?
धूमधडाका: अशोक सराफ जेव्हा शरद तळवळकरांच्या घरासमोर येतो तेव्हा हे वाक्य आहे. लहानपणी बहुधा पहिल्यांदा अशा प्रकारचे वाक्य ऐकले (किंवा समजले) असेल म्हणून अजुनही लक्षात आहे.

अरे मारने से पहले यह तो जान लिया होता के जिसे मार रहे वह कोई लुच्चा हैं या अपने मालिक का बच्चा है.
बोल राधा बोल... कादर खान ऋषी कपूरला मारल्याबद्दल गावकऱ्यांना जाब विचारत असतो. नक्की माहित नाही कोणी लिहिले ते. पण मला वाटतं हे वाक्य नक्की कादर खाननेच लिहिले असणार. अशाच प्रकारची बरीच वाक्ये कादर खानने भरपूर सिनेमांत म्हटली आहेत. कादरखानच्या तोंडी तशाच प्रकारचे संवाद असलेला सिनेमा म्हणजे स्वर्ग से सूंदर.
ह्यावरून आठवले. कादर खान हा हिंदीचा प्रोफेसर आहे असे ऐकले होते. त्याच्याच तोंडी हे असले संवाद/वाक्ये मग खटकतात.

घर का दूध खत्म हो गया है.
परिणीता मध्ये विद्या बालन संजय दत्त ला सांगते. पूर्ण सिनेमात एकदम अर्थपूर्ण, मस्त आणि छान वाक्ये असताना हे वाक्य ऐकून मला, माझ्या मित्रांना हसू आले. हे वाक्य नको होते असे वाटते.

मुझे दो दस चाहिये. एक दस.. दो दस.
जान से प्यारा मध्ये मतिमंद(?) गोविंदा आपल्या आईला (की इंस्पेक्टर भावाला) २० रू मागताना म्हणतो. एक वेगळे वाक्य आणि गोविंदाच्या संवाद शैलीने ते वाक्य लक्षात आहे.

याल्लोग को तडीपार नही बोलने का.
तडीपार सिनेमात मिथून बहुतेक वेळा स्वत:ला याल्लोग (की असेच काहीतरी) म्हणत असतो.

अठासी... नवासी... अस्सी
पनाह सिनेमात नसिरुद्दीन शहा ने इतरांना शिक्षा दिलेली असते, तेव्हा तो त्या नेणार असलेल्या मुलाला आकडे मोजावयास सांगतो. त्या मुलाची अठासी.. नवासी नंतर गफलत होऊन तो पुन्हा अस्सी वर सूरू करतो.

be patient be patient.. ok doctor.. ok doctor
ऐसी भी क्या जल्दी है सिनेमात विवेक मुशरान ची वाट पाहत सर्व बसले असताना सचिन म्हणतो की विवेक ला उशीर झालाय. अशोक सराफ त्याला म्हणतो be patient be patient.. तेव्हा सचिन म्हणतो ok doctor..ok doctor... (ह्यात अशोक सराफ डॉक्टर दाखविला आहे.)

समीर.. मुझे अपनी बाहों में भर लो..
मोहोब्बतें मध्ये किम शर्मा जुगल हंसराजला म्हणते. किम शर्माच्या त्या संवाद फेकीवर आम्हाला भरपूर हसू आले होते.

एक टीव्ही है फ्रीज है.. एक भगवान भी हैं देख...
सत्या सिनेमात स्नेहल (असेच काहीतरी त्याचे नाव आहे) जेव्हा चक्रवर्ती (सत्या) ला दिलेल्या खोलीत घेऊन येतो तेव्हा म्हणतो.

चाय से ज्यादा साला केटली गरम है.
पुन्हा स्नेहल.. हेराफेरी सिनेमात बस स्टॉप वर असरानीला दलाल समजून जेव्हा एक मुलगी देण्याकरता सांगतो, त्यात शेवटचे वाक्य. एक वेगळ्या प्रकारचे वाक्य म्हणून लक्षात राहिले.

पुढील दोन वाक्ये तेरे मेरे सपने सिनेमातील.
दोस्ती में पुछने का नही.. कर डालने का.

यार पहले तो तू सिर्फ करोडपती था.. अब तो अनमोल हो गया है.
अर्शद वारसी म्हणत असतो चंद्रचूड सिंग ला, आपल्या घरी नेण्याआधी.

अपने सर के बाल झडेंगे तो उसका टूथब्रश बनाके दात साफ करेगा..
ह्या सिनेमाचे नाव ओळखा पाहू.... नाना पाटेकर, परेश रावल बद्दल अतुल अग्निहोत्रीला सांगत असतो.

अधर्मी... पापी.. दुराचारी.. बोल सॉरी..
एका धमाल चित्रपटात शेवटी असलेल्या धमाल नाटकातील वाक्य. जाने भी दो यारो सिनेमातील शेवटच्या महाभारत नाटकात नसिरुद्दीन शहाचे वाक्य.

ह्या सारखी खूप वाक्ये असतील, जी आपल्याला ह्या ना त्या कारणाने लक्षात राहिली असतील. सारखी सर्व सिनेमात वापरतात म्हणून नाही.

बाकीची वाक्ये पुन्हा कधीतरी.

कलावाङ्मयभाषावाक्प्रचारशब्दक्रीडाविनोदमौजमजाचित्रपटप्रकटनप्रतिक्रियासमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

9 Dec 2007 - 6:16 am | सहज

एकदम फिल्मी चक्कर है यार तुम!! अपना आदमी लगता है. :-)

"वन लायनर" वरून आठवले C.S.I. Miami मालीकेत हिरो होरेशियो केन (David Caruso)असेच एकदम स्टाइल मधे पोझ घेऊन डायलॉग टाकतो. त्याचे जिम कॅरीने मस्त विडंबन केले आहे.

देवदत्त's picture

9 Dec 2007 - 7:29 pm | देवदत्त

अहो, मी आहेच तसा फिल्मी चक्कर....
तरी सध्या कमी झाले आहे. वेळ नाही मिळत हो तेवढा :(

विसोबा खेचर's picture

9 Dec 2007 - 9:28 am | विसोबा खेचर

देवदत्तराव,

मस्त! पुढील वाक्यांची वाट पाहात आहे...

शोले चित्रपटातील जवळजवळ सर्वच वाक्यं लोकांच्या लक्षात आहेत हेच त्या सिनेमाचं मोठेपण!

"तेरा क्या होगा कालिया?", "कितने आदमी थे?" वगैरे वगैरे!

दिवार चित्रपटातील निरुपा रॉय आजारी असताना शंकराच्या देवळात आयुष्यात प्रथमच जाऊन म्हटलेला "आज खुश तो बहोत होगे तुम...!", हा बच्चन साहेबांचा धीरगंभीर संवाद आजही लक्षात आहे!

मला राजकुमार ह्या प्राण्याने म्हटलेले संवाद देखील अतिशय आवडतात. त्याच्या खरखरीत आवाजातले, "हमसे मिटा सके वो जमानेमे दम नही....." यासारखे संवाद ऐकायला खूप मजा येते! :)

तात्या.

देवदत्त's picture

9 Dec 2007 - 10:01 pm | देवदत्त

तात्या,
आहेत थोडीफार वाक्ये अजून.. सध्या तरी जी लगेच लक्षात आहेत/किंवा पटकन मनात येतात ती लिहिलीत. आणि ती वाक्ये जी सर्वांना तोंडपाठ नसतील अशी निवडली.

बाकी वाक्ये जशी आठवतील तसे लिहित जाईन.

बाकी तुम्ही ही येऊ द्यात हो. :)

घाटावरचे भट's picture

9 Mar 2009 - 5:10 pm | घाटावरचे भट

>>मला राजकुमार ह्या प्राण्याने म्हटलेले संवाद देखील अतिशय आवडतात.

मला पण. उदा. 'गेंडास्वामी, हम आखों से सूरमा नहीं चुरातें. आखें ही नो़च लेते हैं...' किंवा 'ये टाईम बम का खेल हम तबसे खेल रहे हैं जब तुम्हारे बापजा़दा अपने बालों में खि़जाब(?) लगाया करते थे'

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2007 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काबाडकष्ट करणारी 'मा' किंवा श्रिमंत कुटुंबातील 'मा' आपल्या लाडक्या किंवा बिघडलेल्या मुलाला " देखो, मैने मेरे प्यारे हाथोसे तुम्हे गाजर का हलवा बनाया है. हे वाक्य नसले तर चित्रपटात काही तरी राहिले आहे, असे वाटायचे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय अभ्यंकर's picture

9 Dec 2007 - 10:45 am | संजय अभ्यंकर

बच्चा समझके कन्धेपे बिठाया तो कान मे मुतता है! इती. नाना पाटेकर

नंदन's picture

9 Dec 2007 - 8:03 pm | नंदन

"गोगोजी, आपका घागरा" किंवा "हजारो मुर्गियां, उनके करोडो अंडे... xxx का राजा, xxx का बादशाह... हमारा बजाज" सारखी अंदाज अपना अपना मधली काही वाक्यंही अशीच.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

घाटावरचे भट's picture

9 Mar 2009 - 5:12 pm | घाटावरचे भट

अंदाज़ अपना अपना मधली सगळी वाक्य लक्षात ठेवण्याच्या लायकीची आहेत.

पुष्कर's picture

10 Dec 2007 - 10:57 am | पुष्कर

आपल्या लेखावरून शिरिष कणेकरांच्या 'माझी फिलमबाजी'ची आठवण झाली. त्यात सांगितल्याप्रमाणे खालील वाक्येही प्रसिद्ध आहेत.

"आज मै तुम्हारे सामने एक बाप कि हैसियत से नहीं बल्कि एक पुलीस अफिसर की हैसियत से खडा हूँ ।"
"बेटा जल्दीसे हाथ मुँह धो लो, मैने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है" (असं कधी म्हणत नाहीत की आज माँ ने तुम्हारे लिये दडपे पोहे किए हैं !)
"मै माँ बननेवाली हूँ/तुम बाप बननेवाले हो/हम दोनों के घर में एक नन्हासा मेहमान आनेवाला है" (ही वाक्ये 'ती' 'त्या'च्या शर्टाच्या बटणांशी चाळा करत बोलते)
"बेटा सेहत के लिये तुम स्विट्झरलँड चले जाओ" (बाप मुलाला म्हणतो) (एकदम स्वित्झरलँड!)
"ये तुम्हारे पिता की आखरी निशानी है"

जिज्ञासूंनी ही वाक्ये कशातली आहेत हे आठवून पहावे.

पुष्कराक्ष

धोंडोपंत's picture

10 Dec 2007 - 11:31 am | धोंडोपंत

लोकहो !!

हिंदी चित्रपट आम्ही पहात नाही, त्यामुळे या विषयावर काही बोलणे शक्य नाही.

आम्ही फक्त दूरदर्शनवर बिपाशा आणि मल्लिकाला "डोळे भरून" पाहतो.

पण तो "शब्देविण संवादु" असल्यामुळे, शब्दातीत असतो. त्याची केवळ अनुभूती घ्यायची असते.

आपला,
(आंबटशौकीन) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सुनील's picture

10 Dec 2007 - 7:18 pm | सुनील

आम्ही फक्त दूरदर्शनवर बिपाशा आणि मल्लिकाला "डोळे भरून" पाहतो.

धोंडोपंत,

काय फक्त बिपाशा आणि मल्लिका? तुमचे अनुभवविश्व असे मर्यादीत ठेवू नका!!!!!!

(अमर्यादीत) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

10 Dec 2007 - 7:04 pm | सुनील

धर्मेंद्रच्या जवळपास सर्वच चित्रपटात असलेले वाक्य - कुत्ते कमिने...मैं तेरा खून पी जाऊंगा...

जुना अभिजित's picture

10 Dec 2007 - 7:42 pm | जुना अभिजित

हे वाक्य मेला ह्या बटबटीत सिनेमात वस्ताद आमिर खान यांच्या तोंडीसुद्धा आहे.

अभिजित
आरे ए येडा की खुळा तू??शाणा हो लेका.

देवदत्त's picture

11 Dec 2007 - 12:44 am | देवदत्त

ते तर आहेच हो.
त्यामुळेच बहुधा तहलका सिनेमात धर्मेंद्रला रागाने साले बोलताना पाहून काहीतरी वेगळेच (की विचित्र?) वाटले होते.

सर्किट's picture

11 Dec 2007 - 3:01 am | सर्किट (not verified)

या सिनेमातील "थोडा खावो, थोडा फेको" पण मस्तच आहे !

देवदत्त एवढी वाक्ये आठवतातच हो कशी तुम्हाला ?

धन्य !

- सर्किट

देवदत्त's picture

13 Dec 2007 - 8:47 pm | देवदत्त

जाने भी दो यारो.. आधीच म्हणाल्याप्रमाणे मस्त वाटतो हा चित्रपट. त्या बंगल्यातील हा केकचा सीन व नंतरचा त्यांचा फोनचे दॄष्य , फोनची अदलाबदल पाहून खूप मजा येते.

देवदत्त एवढी वाक्ये आठवतातच हो कशी तुम्हाला ?
अहो, काही वाक्ये सिनेमा बघताना धुंदीतच लक्षात राहतात.
आणि भरपूर चित्रपटांची (उदा. दिलवाले दुल्हनिया..., कुछ कुछ होता है, अंदाज अपना अपना वगैरे वगैरेंची) तर पारायणेच केली होती. आता काही काही संवाद नीट आठवत नसले, तरी चित्रपट पाहताना एकूण एक संवाद बोलल्या जाईल अजूनही. :)

केदार_जपान's picture

10 Mar 2009 - 1:04 pm | केदार_जपान

जाने भी दो यारो.. भन्नाटच्!!...सगळे फिल्म इन्स्टिट्युट मधुन शिक्षण घेतलेल्या कलाकारांचा तुफान पिक्चर..
नसिरुद्दिन शहा, भक्ति बर्वे, सतिश शहा, नीना गुप्ता, ओम पुरी....पंकज कपूर्...अरे वा.. एक से एक कलाकार...

त्यातला..शेवटचा सीन नाद्खुळा एकदम्...त्यातला...ध्रुत्रराष्टाच्या तोंडी..'अरे ये क्या हो रहा है.... ;)' हा जबरदस्तच!!

--------------------
केदार जोशी

अमोल नागपूरकर's picture

9 Mar 2009 - 4:02 pm | अमोल नागपूरकर

गाइड चित्रपटात देव आनन्दचा वहीदाच्या बाबतीत अपेक्षाभंग झाल्यावर तो तिला म्हणतो ,' मै समझा था के कोइ और मुझे समझे ना समझे , मेरी रोझी मुझे जरूर समझेगी. ये समझ भी कितनी नासमझ निकली ".

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Mar 2009 - 4:20 pm | घाशीराम कोतवाल १.२

अपने सर के बाल झडेंगे तो उसका टूथब्रश बनाके दात साफ करेगा..

बच्चा समझके कन्धेपे बिठाया तो कान मे मुतता है! ईती नाना पाटेकर

चित्रपट क्रांतीवीर

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सातारकर's picture

9 Mar 2009 - 4:22 pm | सातारकर

बनवाबनवी मधे सचीन त्या छायाचित्राकडे बघून अशोक सराफला म्हणतो;

हे बालगंधर्व आणि ह्या मिसेस बालगंधर्व ना ?

-----
जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ? ;)

रम्या's picture

9 Mar 2009 - 4:36 pm | रम्या

सचिन नाही, सुशांत रे म्हणतो.
आम्ही येथे पडीक असतो!

sanjubaba's picture

9 Mar 2009 - 4:26 pm | sanjubaba

निळु फुले जेव्हा, खलनायकाच्या भूमिकेत असायचे तेव्हा......तेव्हा हे वाक्य हमखास सिनेमात आसायचे
" बाई , रातच्याला माडीवर यायच बर का ?"

आपला ( मराठमोळा)

संजूबाबा

मध्यंतर. (इंटरवल)
समाप्त. (दि एन्ड)

:)

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

आपलाभाउ's picture

9 Mar 2009 - 4:44 pm | आपलाभाउ

नाहि नाहि नाहि कलेक्शन आवद्ल नाहि

sanjubaba's picture

9 Mar 2009 - 4:47 pm | sanjubaba

या सिनेमात एक वाक्य होते " जब गरीबी दरवाजे से अन्दर आती हे तो प्यार खिडकी से बाहर चला जाता हे "
जन्नत.......मधील हे वाक्य जबरा.........

संजूबाबा

सातारकर's picture

9 Mar 2009 - 4:48 pm | सातारकर

सरकारनामा मधलं मुख्यमंत्र्याच्या (यशवंत दत्त) तोंडचे अविस्मरणीय वाक्य;

भीमाS, साहेबांचा सत्कार कर....
-----
जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ? ;)

मदनबाण's picture

9 Mar 2009 - 4:58 pm | मदनबाण

तुम्हारा नाम क्या है बसंती :-- इति जय (शोले)

आणि बर्‍याच चित्रपटात मैने तुम्हारे लिये सुजी का हलवा बनाया है | हे वाक्य कानी पडते.

अवांतर:-- सुजी का हलवा = गोड शिरा ?

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

२. टॉप की रं* बनावूंगी : सडक

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

अमोल नागपूरकर's picture

9 Mar 2009 - 5:37 pm | अमोल नागपूरकर

गाइड चित्रपटात वहीदा देव आनन्दच्या बाबतीत अपेक्षाभंग झाल्यावर त्याला म्हणतो ," जब मतलबसे प्यार हो जाये तब प्यार से मतलब नही रहता."

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2009 - 5:41 pm | बिपिन कार्यकर्ते

आत्ता पर्यंत बर्‍याच तमिळ मित्रांचा सहवास घडला, त्यांच्या मुळे रजनीअण्णाचे बरेच चित्रपट बघितले. आम्ही पण त्याचे एकदम फ्यान झालो. त्या मित्रांच्या तोंडून रजनीअण्णाची बरेच ड्वायलाक ऐकले, पडद्यावर त्याने ही वाक्य उच्चारली की पब्लिक पैसे कसं फेकतं ते पण बघितलं. या धाग्यावर आमच्या रजनीअण्णाची हजेरी लागलीच पायजे... भाषांतरं माझी...

Naan oru dhadavai sonna, nooru dhadavai sonna madhiri.
मै येक बार बोला तो सौ बार बोलनेके जैसा, समजा क्या?

Naan solrathaiyum seiven, sollathathiyum seiven.
मै जो बोला वो करता.... जो नै बोला वो बी करता.

Kanna, panni dhan Kootama varum. Singam Singleaa dhaan varum.
बेटा, सुव्वर साथ (उच्चारी सात) मे आता, लॉयन अकेला आता.

आणि द बेस्ट वन!!!

Es-kiss me
एक्स्क्यूज मी

हे वाक्य तर केवळ खल्लास!!!

बिपिन कार्यकर्ते

सूहास's picture

9 Mar 2009 - 7:29 pm | सूहास (not verified)

पण दिलीपकुमारचा'
कोण कम॑ब्क्त यहा गम भुलाने के लिये आता हे,
हम तो यहा आते हे ,तकि यहा बेठ सके,
तुम्हे बर्दाश्त कर सके.

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

अविनाशकुलकर्णी's picture

9 Mar 2009 - 10:16 pm | अविनाशकुलकर्णी

मै तुम्हारे बच्चे कि मा बनने वालि हु

प्राची's picture

9 Mar 2009 - 10:29 pm | प्राची

सोनाली कुलकर्णी आणि सैफ अली खान यांचातला पहिल्या भेटीतला संवाद:
सोनाली(तिघा मित्रांचा फोटो पाहून):गेहेरी दोस्ती लगती है
सैफःहां,या तोह दोस्ती गेहेरी है,या ये फोटो 3D है... ;)

टिउ's picture

9 Mar 2009 - 11:11 pm | टिउ

- मेरा नाम है पोते, जो अपने बाप के नही होते|
- मै हु जुर्म से नफरत करनेवाला, शरिफो के लिये ज्योती, गुंडोके लिये ज्वाला|

- दिखनेमे बेवडा, दौडने मे घोडा और मारनेमे हथोडा
- मिथुन (लोहा)

बुद्ध's picture

10 Mar 2009 - 3:42 am | बुद्ध

टोपी संभालो गणपतराव हवा बहोत तेज चलता है....

कांच के महल में रहनेवाला कांचा शेठ !!

साला बन्धुक भी दिकाता है और पीछे भी हटता है !! आयँ

पूरा नाम .. विजय दीनानाथ चौहान , गाव मांडवा ........

बुद्ध

सँडी's picture

10 Mar 2009 - 7:49 am | सँडी

हिरोइनः "भगवान के लिये मुझे छोड दो!"
"तुम्हे भगवान के लिये छोडा तो मै क्या करुँगा?" इति:प्रेमभाऊ चोप्रा

- सँडी

नान्या's picture

12 Mar 2009 - 2:24 am | नान्या

हा संवाद सदाशिवभाउ अमरापुरकरांचा आहे ना, आखरी रास्ता मधील, जया प्रदाला उद्देशुन...

जृंभणश्वान's picture

10 Mar 2009 - 9:35 am | जृंभणश्वान

कंपनी मधल्या १-२ लायनी लय भारी आहेत
एक बात सुन मलिक, अगर कंपनी चंदू के बिना चल सकती है तो चंदू भी कंपनी के बिना चल सकता है
मलिक तू और तेरी कंपनी खल्लास !

हमाल दे धमाल मधे, चेतन दळवी लक्ष्याच्या मनात नसताना त्याच्या कानात काहीतरी सांगत असतो तेव्हा लक्ष्या -
च्यायला, थुक, थुक आता माझ्या कानात :)

यम है हम, हम है यम

मूखदूर्बळ's picture

10 Mar 2009 - 9:51 am | मूखदूर्बळ

सोल्जर (बॉबी देवोल) चित्रपटातले संवाद
१) गोली चलेगी खनपट्टीपे और खून कही औरसे निकलेगा
२) पेहेली बार देख रहा हू शेर की हिफाजत कुत्ते कर रहे है
३) मेरा उसूल है आदमी खतम काम खतम
४) वो बेटा ही क्या जो बाप को चैन की नींद ना सुला सके
५) हे भगवान तुमने कुंभ का मेला क्यु बना या ?

मूखदूर्बळ's picture

10 Mar 2009 - 9:54 am | मूखदूर्बळ

कभी हा कभी ना मधले
१) सुनील तुम हमेसा खीडकीसे क्यु आता है
२) इधरसे जाओ या उधरसे सब रास्ता गॉड के पास जाता है
.
बाझीगर मधले
१) तु क्यू रोती है मा ? रोना तो उसे है जिसने हमे रुलाया है
२) अरे भीख मागने तो वो आया था हमारे पास

उपटसुंभ's picture

10 Mar 2009 - 9:58 am | उपटसुंभ

नंगा नहाएगा क्या निचोडेगा क्या..! इति प्रेम चोप्रा ...दुल्हे राजा
मै तुम्हे भूल जाऊं ये हो नही सकता, तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दूंगा..! इति शेट्टी ...धडकन
टेंशन देने का लेने का नही.. इति रामी रेड्डी ...क्रोध
आपुनका फेवरेट
मै सिल्वरमणी , स्पिकिंग साऊथ.. ऍक्शन कंप्लीट नार्थ..! ... सरकार ;)

राघव's picture

10 Mar 2009 - 10:01 am | राघव

दिल चाहता है मधली आमीर ची काही वाक्ये -
"वैसे भी पर्फेक्शन को इम्प्रूव्ह करना मुश्कील होता है"
"ये यहां बैठी आंसु बहा रही है.. वो वहां बैठा आहें भर रहा है.. ये चक्कर क्या है?"
"अच्छा बहाना है.. वैसे तुम जैसे कई डरपोक है यहां.. वो देखो"

डॉन मधले प्रसिद्ध वाक्य -
"डॉन को पकडना मुश्कील ही नही, नामुमकीन है"

शराबी मधलं वाक्य -
"भई मूंछे हो तो नथ्थुलालाजी के जैसी हो, वरना ना हो"

तेरे घर के सामने मधली ओमप्रकाशची जवळ जवळ सगळी वाक्ये!!!!!!! :)

आणखीही बरीच आहेत.. पुन्हा कधीतरी!

राघव's picture

10 Mar 2009 - 3:02 pm | राघव

मेहमूदचे हे वाक्य..
"ये कमर है? ये कमर थोडे ही है.. ये तो कमरा है!"

जॉनी वॉकरचे हे वाक्य -
"जिसे ढूंढ रहे थे गली गली.. वो घर के पिछवाडे मिली!"

दशानन's picture

10 Mar 2009 - 10:09 am | दशानन

ब्लॅक हॉक डाऊन !

ओह शीट. वी हिट. वी हिट.
ब्लॅक हॉक डाऊन ! ब्लॅक हॉक डाऊन !

हा चित्रपट पाहताना शेवट पर्यंत हे वाक्य डोक्यात घुमत राहतं !

काय जबरा चित्रपट... व काय डायरेक्शन ... माझ्या आवडत्या चित्रपटातील एक !!!!

**********

बाबू मोशाय..........

आनंद चित्रपट त्या राजेश खन्नाचा मला एकमेव आवडलेला चित्रपट..

तेरे लिए में सात रंग के सपने चुनू सपने.... !!

अमोल नागपूरकर's picture

10 Mar 2009 - 10:18 am | अमोल नागपूरकर

आनन्द चित्रपटातील वाक्य ," जिन्दगी बडी होनी चहिये, लम्बी नही."

जृंभणश्वान's picture

10 Mar 2009 - 11:00 am | जृंभणश्वान

दुर्दैवाने हा डायलॉग गाजला नाही पण भारी आहे
"लेकिन कोई बात नही भय्या, पिताजी के दिल का इलाज मेरे पास है, मै आते हुए बॅटरी के सेल ले आया हूं..."

http://www.youtube.com/watch?v=5HrNLkZx7Gg&feature=related

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Mar 2009 - 11:03 am | बिपिन कार्यकर्ते

पडोसन... आगाच्या तोंडचे पालुपद...

"बिंदू की माँ, जब जब जो जो होना है तब तब सो सो होता है"

बिपिन कार्यकर्ते

सँडी's picture

10 Mar 2009 - 11:22 am | सँडी

"खा..........................................मो......श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्!"

- सँडी
हात का वाकडा झालाय माझा... :(

ब्रिटिश's picture

10 Mar 2009 - 3:22 pm | ब्रिटिश

तुम्हारी मा एक विशाल इस्त्री है. इति राजकूमार , सिनेमा - इतिहास.

ये तो फोकट मे भी महंगा है इति मोहन जोशी ,

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

ब्रिटिश's picture

10 Mar 2009 - 3:22 pm | ब्रिटिश

तुम्हारी मा एक विशाल इस्त्री है. इति राजकूमार , सिनेमा - इतिहास.

ये तो फोकट मे भी महंगा है इति मोहन जोशी ,

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

ब्रिटिश's picture

10 Mar 2009 - 3:22 pm | ब्रिटिश

तुम्हारी मा एक विशाल इस्त्री है. इति राजकूमार , सिनेमा - इतिहास.

ये तो फोकट मे भी महंगा है इति मोहन जोशी ,

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

ऋचा's picture

10 Mar 2009 - 3:25 pm | ऋचा

ये क्या हो रहा है दुर्यधन? जाने भी दो यारो
येन्ना रास्कला.. ओम शांती ओम

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

केदार_जपान's picture

12 Mar 2009 - 7:01 am | केदार_जपान

करन अर्जुन हा सर्वार्थाने एक अत्यंत हीन पद्धतिचा मानसिक अत्याचार, पिळवणुक आणि तत्सम काहीही चालेल असा एक पिक्चर येउन गेला होता... :(...आपल्याला जर आठवत नसेल तर खूप नशिब्वान आहात आपण..

त्यामधे राखी ही तिच्या करिअर बेस्ट रोल मधे होती...ती त्या जमिनदाराला (अर्थातच अमरिश पुरी) नेहेमी सांगायची...

'मेरे करन-अर्जुन आय्यें...गे....धरती का सी..ना चिर के आयेंगे...आसमान का छप्पर फाड के आय्यें..गे'

--------------------------
केदार जोशी

अडाणि's picture

12 Mar 2009 - 7:22 am | अडाणि

असाच लक्षात राहीलेला प्रसंग सत्या मधला ... एकदम खेळिच्या वातावरणात भिकु 'घोडा' देतो सत्याला..

भिकू : एकदम मख्खन है. साली जर्मन मेड है.
सत्या : भिकू मेरेको लेकीन चलानेको नही आता.
भिकू : चलानेको नही आता? साला अपनेको कौनसे कंपिटीशनमे हिस्सा लेने का है? कनपट्टीके तीन इंच बाजू रखनेका और दबानेका ..हॅ हॅ हॅ..... (हा पण एक नंबर डायलॉग आहे, पण खरा टर्न पुढेच आहे)
हसणं संपतय तोवर गाडी बाजूला येवून थांबते, आणि मग भिकू एकदम सिरीअस होउन,
भिकू : मालूम किया मै. वो साला अंदर बैठा है... जग्गू. उडानेका उसको आज ...(काहीतरी असे...)

तसं सत्या हा शिणेमा अत्यंत उच्च! आणि स्टार्ट टू फिनीश आवड्लेला (अगदी गाण्यांसहीत) - पण हा संवाद काही औरच आहे. मधूनच मी नवख्या डेवलपर जवळ जाउन ख्यॅ ख्यॅ करतो आणि मग चेहरा शांत करून त्याला म्हणतो - मालूम किया मै. वो बग इस फाइलमे है. आज सॉल्व करनेकाच....

-
अफाट जगातील एक अडाणि.

अमोल नागपूरकर's picture

12 Mar 2009 - 10:24 am | अमोल नागपूरकर

पेग थ्री मधे उपेन्द्र लिमये एका रेव पार्टीवर धाड टाकतो. तिथे सापडलेला एक मुलगा म्हणतो," पता नही क्या मेरा बाप कौन है?" लिमये थन्डपणे उत्तर देतो," क्यो , तुम्हे पता नही क्या तेरा बाप कौन है?? बहोत सारे बाप है क्या तेरे?"

अमोल नागपूरकर's picture

13 Mar 2009 - 10:43 am | अमोल नागपूरकर

रजेश खन्ना, मुमताज च्या आईना मधले ए के हंगलचे एक वाक्य ," जिन्दगी एक रेल कि तरह होती है. जिसमे आदमी पहले घुसने कि जगह ढूंढता है , फिर बैठने की और फिर लेटने की." मनुष्य स्वभाव आणि त्याची कधीच शान्त न होणारी हाव ह्या वाक्यात चपखलपणे दाखविली आहे.

अमोल नागपूरकर's picture

14 Mar 2009 - 4:27 pm | अमोल नागपूरकर

आनन्द मधील अमिताभचा संवाद," आनन्द मरा नही......... आनन्द कभी मरते नही ".

अमोल नागपूरकर's picture

14 Mar 2009 - 6:16 pm | अमोल नागपूरकर

१९४२ अ लव्ह स्टोरी मध्ये अनिल कपूर चा ब्रिटिशांना सामिल असणारा बाप त्याला म्हणतो," पुलिसको बतादे उन सारे देशद्रोहीयोंके नाम जिन्को तू जानता है ". अनिल त्यावर म्हणतो," मुझे तो सिर्फ एक ही देशद्रोही का नाम मालूम है. और वो आप है, पिताजी."

मी गौरी's picture

17 Mar 2009 - 6:48 pm | मी गौरी

"हे भगवान...मेरी जानकारी के बाहर तुम्हे और भी एक लडका हे !!.....मेरे मायके से जो भी सामान गाडी भर भर के लाई थी , सुत समीत वापस लोटादो..."

चेतन सुभाष गुगळे's picture

4 Oct 2011 - 10:12 am | चेतन सुभाष गुगळे

"अब तो सौदा हो चुका है। पर एक बात बोलु? तुम्हे बिझनेस करना नही आता। तुम इस बिल्डींग के दस बीस लाख कम भी दे देते तो भी मै तुम्हे यह बिल्डींग बेच देता।"

"सेठजी बिझनेस करना तो आपको नही आता। आप इस बिल्डींग के दस बीस लाख और ज्यादा मांगते तो भी मै दे देता।"

(चपापून) "क्यों? ऐसी क्या खास बात है इस बिल्डींग में?"

"बीस साल पहले जब यह बिल्डींग बन रही थी तो मेरी मां यहा मजदुरी करती थी। आज उसके जन्मदिन पर मै उसे यह बिल्डींग तोहफे मे देने जा रहा हुं"

हे संवाद पहिल्या वेळी ऐकले होते तेव्हाही आणि त्यानंतर आतापर्यंत जितक्या वेळा ऐकले त्या प्रत्येक वेळी येणार्‍या अश्रुंना बांध घालु शकलो नाही.

आत्मशून्य's picture

4 Oct 2011 - 10:24 pm | आत्मशून्य

मै वोह आदमी हूं जो शिशेसे पत्थर तोडना जानता हूं - प्रेम चोप्रा (सौतन)

There is no pact between lions and human.(Achilles to Hector ) Troy (2004)

सर्वात फेवरीट
You won't have eyes tonight; you won't have ears or a tongue. You will wander the underworld blind, deaf, and dumb, and all the dead will know: This is Hector. The fool who thought he killed Achilles. (Achilles to Hector ) Troy (2004)
(गौर से देखो इस चेहरेको क्योंकी कल तूम्हारी ना आंखे होगीं ना कान ना जूबान, मौत के अंधेरे गलीयोंमे तूम भटकते फिरोगे पागलोंकी तरह और मूर्दे जान जायेंगे ये हेक्टर है वोह बेवकूफ जिसने ये सोचा की उसने अकीलीस को मार डाला)

When you develop an infatuation for someone you always find a reason to believe that this is exactly the person for you. It doesn't need to be a good reason. Taking photographs of the night sky, for example. Now, in the long run, that's just the kind of dumb, irritating habit that would cause you to split up. But in the haze of infatuation, it's just what you've been searching for all these years. (De - caprio's voice over ) The beach (2000)

चित्रगुप्त's picture

4 Oct 2011 - 2:24 pm | चित्रगुप्त

लग्नाच्या ऐन मंडपात कुणितरी येऊन " ये शादी नही होगी " म्हणणे, आणि मग हिरो वा हिरविणीकडील कुणितरी " ये शादी होगी और होके रहेगी" असे म्हणणे पूर्वीच्या खूप सिनेमात असायचे.

मोहनराव's picture

6 Oct 2011 - 11:39 pm | मोहनराव

ये शादी नही होगी....हे वाक्य नुकताच येउन गेलेला "दिल्ही बेली" मधेपण होतं!!! पण तो पुढे जे काही बोलतो ते आत्तापर्यंतच्या कुठल्याही हिंदी सिनेमात येउन गेलेला नाही...आणि ते इथं लिहिण्यासारखं पण नाही!! ;)

नगरीनिरंजन's picture

4 Oct 2011 - 2:37 pm | नगरीनिरंजन

१.मैं तेजा हूं क्योंकी मेरा नाम भी तेजा है|
मार्क इधर है, मैं तेजा हूं|
ये तेजा तेजा क्या है? तेजा तेजा?

२. रो मत, पुष्पा, अरे ये दुनियावाले ना खुद चैन से जीते हैं ना दुसरोंको जीने देते हैं| ये आसूं बहोत कीमती हैं रे|

इश्क विश्क चित्रपटात (शाहीद कपूर, अमृता राव) एक सरदार आहे..पूर्ण चित्रपटात जेंव्हा केंव्हा तो बोलतो तेंव्हा त्याच्या तोंडात एकच वाक्य आहे "क्या बात कर रहा है यार". पण प्रत्येक प्रसंगात ते वाक्य वेगळ्या अर्थाने वापरले आहे. बघण्यासारखे आहे.

कुछ भी करनेका लेकीन जयकांत शिक्रे का......

आत्मशून्य's picture

5 Oct 2011 - 12:14 am | आत्मशून्य

.

क्रेमर's picture

4 Oct 2011 - 11:55 pm | क्रेमर

चित्रपटाचे नाव आठवत नाही पण 'उचलायचं स्वतःला' हे वाक्य मला फार आवडतं. काहीही नकोशी गोष्ट करायची असल्यास मी स्वत:शी नेहमी गुणगुणतो.

या मारुति कांबळेचं काय झालं

फारएन्ड's picture

5 Oct 2011 - 3:39 pm | फारएन्ड

"मै जानता था आप मजाक कर रहे थे" - अमिताभ मदन पुरी ला "पॉच लाख" देत नाही म्हंटल्यावर (दीवार)

"उम्मीद है की इस हमले का जिक्र तुम किसीसे नही करोगे"
"कौनसा हमला?" अमिताभ आणि कुलभूषण खरबंदा, शक्ती

"किस उल्लू के पठ्ठे ने इसे पानी मे फैका"? अमरीश पुरी
"इस....उल्ली के... पठ्ठीने" ओम पुरी (स्त्रीवेषातील कमल हसन कडे बघून) चाची ४२०

"भाई भाई का प्यार बीच मे आये तो दोनों को गोली मार दे, जा" - नाना, परिंदा

"वॅख्खू, वीख्खी, वॉख्खॉ" वेगवेगळ्या रूपात, अशोक सराफ, धुमधडाका :)

अरे कमीने से याद आया
तेरा बाप कैसा है - दबंग

अविनाशकुलकर्णी's picture

8 Oct 2011 - 5:34 pm | अविनाशकुलकर्णी

भगवान मुझे उठा ले.
कहा मुह काला कर आयी कल्मुरी..
राका हि कबिलेका सरदार बनेगा,..
मेरे लाल.
घर की जवान बेटी जब इतनी रातसे घर आये तो मा को निंद कैसे आयेगी..
मुझे जहर लाके दो.
रिमा अब बडी हो गयी है..
मै एक मा हु.
मा मुझे नोकरी लग गयी..
तु पैदा होनेसे पहले हि मर क्यु नहि गया?
प्रेम पुजा है..
तुझे दुध का कर्जा चुकाना हि पडेगा..
कानुन के हाथ लंबे होते है..
निशा के प्यार ने तुझे पागल कर दिया है..
काश ..आज तेरे पिता जिंदा होते..
आज इंम्तिहान कि घडी है.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Oct 2011 - 10:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:) लैच भारी.

-दिलीप बिरुटे
(अविनाश काकांचा फ्यान)

यकु's picture

8 Oct 2011 - 8:34 pm | यकु

आपको जो भी कहना हो कोर्ट के सामने कहिये...

तमाम सबूतों और गवाहों के बयानात के मद्देनजर ये अदालत फैसला सुनाती है..

अजी सुनते हो...

...जो सवाल आपसे पूछा जाय, सिर्फ उसीका जवाब दिजीये नारंगसाहब..

..ऑब्जेक्शन माय्लॉर्ड.. मिस्टर चढ्ढा मेरे गवाह को गुमराह करने की कोशिश कर रहे है.

..जज्जसाब वो आदमी इस वक्त इसी अदालत में मौजूद है.. ये रहा.. धिच्क्यंव्..(बोट उचलेस्तोवर गोळीचा आवाज)

... आप पसीना पसीना क्यों हो गये हो डाक्टरसाहब.. मैं पूछ रहां हूं क्या यह रिपोर्ट आपने लिखवायी थी?

... ठकरालसाब सिर्फ हां या ना में जवाब दिजिये..

////////////// नावे जनरल आणि काल्पनिक..

सगळेच भारी!!
पण

..जज्जसाब वो आदमी इस वक्त इसी अदालत में मौजूद है.. ये रहा.. धिच्क्यंव्..(बोट उचलेस्तोवर गोळीचा आवाज)

याला विशेष मजा आली..

=)) =)) =))

यकु's picture

8 Oct 2011 - 9:23 pm | यकु

आणखी
अंगुर मधला हिर्यांचा कारागिर..
लेकीन मै ये कह रहा था की बारा तो कब के बज चुके है और पैसे अभी तक मिले नहीं

पूर्ण मुघल - ए - आझम त्यातल्या डायलॉगसाठी !!!

आशु जोग's picture

8 Oct 2011 - 11:35 pm | आशु जोग

उठा ले रे बाबा मेरे को नही इन दोनों को !

ये बाबूराव का श्टाईल है !

कितना कमीना है रे तू !

पहेले तेरी समस्या नक्की करो

आशु जोग's picture

8 Oct 2011 - 11:37 pm | आशु जोग

इथन मस्कारेन्हास के जिंदगी के जस्ट ६० सेकंडस

प्यारे१'s picture

10 Oct 2011 - 3:43 pm | प्यारे१

नहीSSSSSSSSSSSSSSSSSSS
(दोन्ही हात कानावर आणि चेहर्‍यावर आत्यंतिक व्याकूळ भाव)

शाहिर's picture

10 Oct 2011 - 8:15 pm | शाहिर

वक्राकार जिन्यावरुन धड- धड करत नायिका पळत जाते आणि मोठ्या पलंगावर अंग टाकते ...

"मुझे कुछ देर के लिये अकेला छोड दो"

असे म्हणते

मै आपके पास बडी आस लेके आई हूं ।

(हा डायलॉक 'एक्स्युज मी' मधे ऐकल्यापासून कुठेही ऐकला तरी हहपुवा होते!)

आशु जोग's picture

10 Oct 2011 - 11:03 pm | आशु जोग

डॅम इट, आता दाखवतोच बघ तुला इन्सपेक्टर महेश जाधवचा इंगा

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Oct 2011 - 11:13 pm | चेतन सुभाष गुगळे

तो महेश आता इन्स्पेक्टरचा कमिश्नर झाला तरी त्याचं डॅम इट काही सुटलं नाही..

यांचे तर ताडनच केले पाहिजे - जयराम कुलकर्णी धुमधडाका

ठिणगीनं आग लागते पण ठिणगी विझली म्हणून आग विझू नये - भालजींनी लिहिलेला आहे

आशु जोग's picture

10 Oct 2011 - 11:56 pm | आशु जोग

अरे शाम,
पायाला माती लागू नये म्हणून काळजी घेतोस
तशीच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो

आत्मशून्य's picture

11 Oct 2011 - 10:17 pm | आत्मशून्य

जो चौका उडते हूए जाए उसे छक्का केहते है... - देल्हिबेली (अमीर खान)

देल्ली बेलीजमधे स्वतः अमीरखान आहे का?

मला वाटलं की फक्त त्याने प्रोड्यूस केला आहे.

तो असेल तर मग आता बघायलाच पाहिजे.

आत्मशून्य's picture

12 Oct 2011 - 10:10 am | आत्मशून्य

मूख्य चित्रपट संपल्यानंतर सदरील डायलॉग अमिर खानच्या तोंडी आहे व तो अनूषा दांडेकर सोबत, "लॅक्या लव्यो, लॅक्या हेट योव" नावाचे एकदम मस्त आयटम साँग सादर करतो (आणी पाट्या सूरू होतात). चित्रपटात बिभीत्स किळसवाण्या गोश्टीचा वापरे जरी हास्य निर्मीतीसाठी चांगलाच केला असेल तरी या आमीर खानच्या एका गाण्यासाठी चित्रपट थेट्रात बघावाच :) टाळ्या शिट्यांचे मजाच वेगळी त्याला, नाहीतर फक्त हे आमीर खानच "like I love you, like I hate you " साँग जर संपूर्ण भेटलं तरी वंजोय आहे.