एकानं दुसऱ्याला पोक केलं की दुसऱ्यानं पहिल्याला पोक करायचं, कोणी ‘हे’ शेअर केलं की कोणी ‘ते’ शेअर करणार, कोणी ‘ह्याची’ इमेज पेष्ट केली की कोणी ‘तिच्या’ इमेजा पेष्ट करीत सुटणार... सोशल नेटवर्किंग साईटा म्हणजे निस्ती पोकापोकी झालीय बघा. काय मनाला वाट्टेल ते गरळ बाहेर टाकून ओकाओकी करीत जायचं. भिंतीवर चढून पाहिजे ते खरडीत निघायचं, वाट्टेल ते डकवित चालायचं, नक्को नक्को त्या लिंका पेष्टवित जायचं. मग त्या कोण उघडून पाहतो तर कोणी न उघडताच छान, मस्त, उत्तम असं लिहून पुढे पळतो.
सकाळ झाली रे झाली की सुप्रभात, जीएम म्हणत कोण काय प्रतिक्रिया देतो ते चाळीत जायचं. दुपारीही तेच. अन् रात्री तर काहीच विचारू नका. वाट्टेल ते चाटींगत जागायचं. असा एकंदर भयंकर मामला चालेला असतो. सोशल नेटवर्किंग साईटवर तासनतास बसणे, कामावर लक्ष न देता भलतेच कॉमेंट्स पास करीत राहणे, कसलेही पाचकळ ज्योक वाटीत सुटणे असा हा निष्कर्मी वेळ वाया जात असतो. असो ह्यातून काय निष्पन्न होणार असते याचा तर कोठे विचारच केला गेलेला नाहीये.
फक्त जग जवळ येत असल्याचा आभास होत असतो. प्रत्यक्षात या साईट्समुळे आपण कितीतरी मित्रांशी प्रत्यक्ष बोलण्याऐवजी कॉमेंट्स पास करणे व चाटींग करणेच पसंत करीत असतो. अगदी समोर बसलेल्या व्यक्तीशीही आपण आभासी जगात बोलत बसतो. त्यासाठी अनेक डमी आयडी बनवून घेत असतो. एका परीक्षणाद्वारे असे सिद्ध झाले आहे की प्रत्येक मूळ आयडीचा किमान एक तरी डमी आयडी असतोच असतो. काही काही बहाद्दर तर दहा बारा अकाऊंट्स खोलून इतरांच्या गप्पांवर वॉच ठेवतात. किंवा स्वतःच्या वॉलवर स्वतःच प्रेमील इशारे टाकून स्वतःशीच बोलत राहतात, स्वतःच प्रश्न विचारतात अन् स्वतःच उत्तरेही देतात! काहीजण आपल्याच जवळच्या मित्राशी फिमेल आयडी वापरून चाटींग करीत बसतो किंवा त्याला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतो. काहीजण वेगळ्याच नावाने वावरून स्वतःच्या मूळ आयडीचा उदोउदो करीत फिरतात तर काहीजण एकाच व्यक्तीला विविध नावांनी काहीबाही प्रश्न विचारून भंडावून सोडतात, त्रास देतात, त्यांचे ‘खाजगी आयुष्य’ उघडपणे वॉलवर पेस्ट करून बोभाटा करून टाकतात. असा हा निरर्थक भोचकपणा काहीएक कार्य घडवून आणत नाही. उलट नस्ता उपद्व्याप अन् वेगळाच असूरी आनंद देऊन जातो. हे आभासी जग आपल्याला नेणार आहे कोठे, याचा कोणी विचार तरी केला आहे का?
एका नेत्याच्या बाबतीत फेसबुकवर नुकत्याच उघडकीस आलेल्या एका लांच्छनास्पद घटनेवरून हे लक्षात येते की कोणीही कोणाचीही उघड उघड बदनामी करू शकतो, अश्लील बोलू-वाचू-लिहू शकतो, घाणेरडी चित्रे अपलोड करू शकतो. खास अश्लीलतेला वाहिलेली अनेक अकाउंट्स सर्रास निर्माण केली जात असतात. त्यावर नट-नट्यांची किंवा प्रख्यात व्यक्तींची अश्लील चित्रे कॉम्प्युटरवर तयार करून अपलोड केले जातात. भलत्याच नावाने ही विकृत कार्ये पार पाडता येत असल्याने पोलिसांच्या सायबरसेलला देखील असे आयडी शोधून काढणे अवघड होत आहे हे त्यांच्याकडे लाखोंनी पडून असलेल्या तक्रारींवरून दिसून येत आहे.
सोशल नेटवर्किंग साईटचे जसे काही फायदे आहेत तसे तोटेही खूप आहेत. निस्तीच पोकापोकी करीत वेळ घालवायचा की आपले आद्य कर्तव्य जाणून ते पार पाडावयाचे याचा सुज्ञांनी जरूर विचार करावा आणि या आभासी जगात घेऊन जाणाऱ्या नेटाला नेटाने चार हात दूर ठेवण्याचा प्रयत्न व्हावा...
प्रतिक्रिया
16 Sep 2011 - 4:55 pm | परिकथेतील राजकुमार
http://www.facebook.com/shriram.divate
बाकी चालू द्या...
16 Sep 2011 - 4:56 pm | स्पा
खिक्क :D
17 Sep 2011 - 4:53 am | शहराजाद
+१
16 Sep 2011 - 10:56 pm | सुहास झेले
:D :D :D :D :D
16 Sep 2011 - 5:31 pm | पिंगू
पोकवण्यात आलेले आहे.. :D
- पिंगू पोकर
16 Sep 2011 - 5:59 pm | जयनीत
शिर्षक अगदी समर्पक आहे ....
आवडलं !
16 Sep 2011 - 8:33 pm | धन्या
अहो सोशल नेटवर्किंग साईटा हे व्हर्च्युअल जग आहे. त्यामुळे तेथे फक्त पोकापोकीच शक्य आहे. तुम्हाला जर ठोकाठोकी करायची असेल तर त्यासाठी ज्या व्यक्तीला ठोकून काढायचे आहे तिला प्रत्यक्षात भेटावे लागेल.
16 Sep 2011 - 8:43 pm | आत्मशून्य
Facebook and orkut is best way to keep in touch with whom we don't want to keep in touch.... ;)
असो, थोडी काळजी घेतली तर फार त्रास होत नाही, तसचं भारतातले सायबर लॉ सूध्दा अत्यंत कडक आहेत. पण ही दूधारी तलवार आहे हे मात्र मान्य.
16 Sep 2011 - 9:36 pm | इंटरनेटस्नेही
डॉ. दिवटे.. लेख मनापासुन आवड्ला. आजवर फेसबुक्/ऑर्कुट इ. सोशल नेटवर्किंग साईट्स वर या पेक्षा उत्तम भाष्य करणारे लेखन वाचनात आले नव्हते.
-
http://www.facebook.com/rishikesh.chindarkar
16 Sep 2011 - 9:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इंट्या वाचन वाढव, मोठा हो. आणि अज्ञान असलं तरी त्याचं प्रदर्शन कमी कर.
16 Sep 2011 - 10:05 pm | विकास
अज्ञान असलं तरी त्याचं प्रदर्शन कमी कर.
आपण प्रदर्शीत करत आहोत ते अज्ञान आहे हे समजण्याच्या बाबतीतच अज्ञान असेल तर? ;)
बाकी सोशलनेटवर्कींगवरून मला ellen degeneres या अवखळ उभ्या उभ्या विनोदाचे कार्यक्रम करणार्या अभिनेत्रीचे एक म्हणणे आवडते. I don't like FB as I have enough friends. But I like Twitter as I get followers. :-)
16 Sep 2011 - 10:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला तर बुवा फेसबुक आवडतं, तिथे संपादकांचा ससेमिरा नसतो आणि खातं-धागे उडण्याची भीतीही नसते. थोडक्यात लोकशाही असते. ;-)
माणसाला प्रत्यक्ष न भेटताही त्याचे विचार काय आहे हे समजतं. आपले स्वतःचे मित्रमैत्रीणीतर असतातच पण त्यांच्या मित्रमैत्रीणींमधे कोणी रोचक व्यक्ती असतील तर त्यांचं लिखाणही वाचता येतं. समोर बसणारी व्यक्ती तुफान बोरिंग नाहीतर अज्ञान काय हे न समजण्याएवढी अज्ञ असेल तरीही आपण तिच्याशीच बोलावं अशी सक्ती फेसबुकावर होत नाही. ज्या लोकांना काहीही म्हणायचं नसतं किंवा ज्यांनी काही म्हटलेलं मला महत्वाचं वाटत नाही किंवा ज्यांना उगाच मित्रसंख्या वाढवायची आहे अशा लोकांना मी सरळच टाळू शकते.
विकास, तुमची मागे एक सही होती ती पण मला आवडायची:
मेरे पास फेसबुक है, ट्विटर है, ऑर्कुट है, तुम्हारे पास क्या है?
मेरे पास नौकरीधंदा है।
16 Sep 2011 - 10:55 pm | मन१
सहमत.
अवांतरः- हे फेसबुकचं महत्व मसं वर येउन सांगण्याइतकं मसं महत्वाचं शेवटी वाटतच ना. ;-)
16 Sep 2011 - 10:58 pm | आत्मशून्य
ह्या बाबतीत खरंच सहमत आहे, अगदी ऑर्कूटवरही जरा भडक लीहलं की मूक्तपीठ कम्यूनीटीमधून बॅन लागायचं.. एकूणच मराठी माणसांची मानसीकता तीतकी ओपन माइंडेड असलेली अंतरजालावरही फारशी दीसून येत नाही... तिथही संकूचीतपणा सूटायचा नाही असंच अनूभवाला येतं.
आणी अर्थातच who you are is less important than who you know मूळे एकंदर तीथही फार सूखानं नादतात असेही नाही.
16 Sep 2011 - 11:54 pm | पाषाणभेद
असाच विचार माझाही पक्का व्हायला लागलाय हल्ली हल्ली. म्हणजे अगदीच योग्य वेळेत सांगायच झालं तर कालपासून.
17 Sep 2011 - 6:01 pm | बाळकराम
>>
म्हणूनच, तर फेबु वर असले चाळे चालतात!
बाकी चालू द्या!
17 Sep 2011 - 12:55 am | इंटरनेटस्नेही
अपेक्षित कृती डोळे पाणावले!
17 Sep 2011 - 6:11 pm | बाळकराम
फेबु वा तत्सम सोशल नेटवर्किंग साईट्स बद्दलआणि आम्हा सर्वांचं अज्ञान दूर करा! गरीबावर एवढी कृपा कराच बुवा!
16 Sep 2011 - 10:28 pm | मुक्तसुनीत
सोशल नेटवर्किंग साईट चा उपयोग लोक चुकीचा करतात का ?
होय.
मग त्यामुळे सोशल नेटवर्किंग ही संकल्पनाच चुकीची आहे का ?
नाही.
सोशल नेटवर्किंग साईट्स च्या आधीच्या इमेल आदि माध्यमांचाही दुरुपयोग होण्याचे प्रकार पाहण्यात आलेले आहेत का ?
होय.
मग सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये दोष आहे की त्यांचा योग्य तो वापर न करणार्या आणि प्रसंगी वाईट वापर करणार्या लोकांमधे दोष आहे ?
दोष अशा लोकांमधे आहे. अर्थात फेसबुकसारख्या बाबतीत , साईटस च्या चुकीच्या धोरणामुळे प्रायव्हसीचा भंग होण्यासारख्या घटना घडलेल्या आहेत. या न्यायाने फेसबुक सदोष आहे हे मान्यच. मात्र "नुसतीच पोकापोकी" हा तो दोष नव्हे. असो.
16 Sep 2011 - 10:44 pm | मराठे
उगाच एक आठवलं...
"काय , आजकाल भेटत नाही अजिबात.. काही खुशाली कळली नाही तुझी"
या प्रश्नाची बदलत्या काळाप्रमाणे बदलणारी उत्तरं:
१९९० च्या आसपासः
"अरे यार तू आधी मोबाईल घे.. म्हणजे तुला एसेमेस पाठवता येतिल.. मोबाईल नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल."
२००० च्या आसपासः
"माझ्या सगळ्या मित्रांशी मी इमेल मधून टच मधे असतो.. तु इमेल अकाउंट ओपन कर.. इमेल नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल"
२०१० च्या आसपासः
"तुझ्या फेसबूक मधे अॅडव ना मला... काय फेसबूक वापरत नाही? "फेसबूक" नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल!"
16 Sep 2011 - 10:53 pm | आत्मशून्य
हेच एकमेव कारण आहे टेलिफोन... टीव्ही... पेजर...मोबाइल.. एस.एम.एस...... एमेल....ओर्कूट... फेस्बूक---- ट्व्वीटर... आणी मिसळपाव..... यांचा शोध लागण्याचं आणी ते यशस्वी होण्याचं... भवीष्यातही जेव्हां जेव्हां या संदर्भात इनोवेशंन होतील यशस्वीच ठरतील :)
17 Sep 2011 - 7:58 am | डॉ.श्रीराम दिवटे
छान प्रतिसाद दिलेत सर्वांनी. आभार.
मनाला वाटेल ते वॉलवर लिहिता येऊ शकते. म्हणजे काहीही लिहायचे का? काहीही डकवायचे का? आपल्याच मित्र मैत्रिणींना वेगळ्या नावाचे आयडी वापरून सतावायचे का? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. यासाठी हा लेख लिहिला आहे. या मुद्द्यावर मंथन व्हावे ही अपेक्षा.
17 Sep 2011 - 8:02 am | शिल्पा ब
"काहीही" म्हणजे नेमकं काय?
17 Sep 2011 - 10:35 am | अमोल केळकर
लेख आवडला
( अवांतर : इथेही Like चे बटण पेरावे ही मिपा व्यवस्थापनाला नम्र विनंती :) )
अमोल केळकर
17 Sep 2011 - 12:08 pm | छत्रपति
"असुन अडचण, नसुन खोळ॑बा" आहेत...!!!
17 Sep 2011 - 6:05 pm | बाळकराम
श्रीराम, एक वेगळ्या धाटणीचा, पण छान लेख!
असेच लिहित राहा.
17 Sep 2011 - 11:30 pm | शिल्पा ब
हा दिवट्यांचाच ड्यु आय डी आहे का?
चेगुसु यांनी प्रकाश पाडावा.
18 Sep 2011 - 7:31 pm | बाळकराम
बाकी, तुम्ही कुणाचे ड्यु आय डी आहात ते आम्हाला कळलं बरं का! ;)
( पण अशा साध्या बाबतीत चेगुसुंनाच प्रकाश पाडावा लागतो, हे बघून मौज वाटली! बाकी चालू द्या!)
19 Sep 2011 - 3:07 am | शिल्पा ब
अय्या खरंच!! मला पण सांगा ना गडे..
19 Sep 2011 - 8:27 pm | धन्या
अहो अशा गोष्टी चार चौघात बोंबलायच्या नसतात हो शिल्पातै.
बाळकराम बोंबलले का? आणि त्यांच्या फक्त दोन ओळ वाचून तुम्ही हा निष्कर्ष काढलात खुपच तल्लख बुद्धी आहे बुवा तुमची. अमेरिकेत असता काय?
20 Sep 2011 - 1:21 am | बाळकराम
<<अमेरिकेत असता काय?>> हे काय इचारनं झालं का राव! आपुन काय न बोलता बी समदं कळतंय त्येन्ला! उगाच अमेरिकेत गेल्याती का त्या? काय म्हंता, काडा चंची आन तंबाकू!
18 Sep 2011 - 9:04 pm | रेवती
दिवटे साहेब, चक्क लेखन आवडले.
१००% पटले असे म्हणता येणार नाही.
बर्याच चांगल्या गोष्टी असतात हो, त्याचा वापर वाईट रितीने करणारेही असतातच.
आता वाईटाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असेल तर काय करणार?
अश्लील गोष्टींसाठी वापर केला जात असेल तर ते मला वाईट आहे असे वाटते पण तसे ते वापरणार्याला वाटत नसेल तर काय करणार? "थोडक्यात गोडी आणि जास्तीत लबाडी" ;)
18 Sep 2011 - 10:25 pm | अविनाशकुलकर्णी
स्वस्त असल्याने नेट व मोबाईल चा वापर व दुर उपयोग वाढला आहे..
उपाय........
मोबाईल...इन कमींग व ऑट गोईंग १० रु /मिनिट रेट करावा,..
नेट ..मिनिमम चार्ज रु.५००० ठेवावा...
त्या मुळे ज्यांना गरज आहेत असेच लोक नेट वापरतिल...
ल्याड लाईन रेट कमी करुन होणारी गैर सोय टाळता येईल...
व आज मोबाईल वापर जो बोकाळला आहे तो थांबु शकेल.......
मोबाईल व नेट चा व्यवसाया व्यतिरिक्त वापर म्हणजे चंगळ वाद आहे....
लोकांनी ल्यांड लाईन वापरणे जवळ जवळ बंद केल्या गत आहे..
19 Sep 2011 - 3:07 am | शिल्पा ब
तुम्ही काय वापरता? कितपत गरज आहे?
19 Sep 2011 - 4:27 pm | स्मिता.
मोबाईल किंवा आंतरजालाचा भरपूर वापर हा त्या सोयींचा दुरुपयोग कसा म्हणता येईल? किंवा मोबाईचा/नेटचा वापर 'बोकाळल्याने' तुम्हाला-आम्हाला काय त्रास होतो? जोवर तंत्रज्ञानाचा गैरवापर होत नाही तोवर त्याचा वापर कितीही असला तरी हरकत नसावी. खरं तर त्यांच्या सहाय्याने किती तरी लोकांची कामे सुकर होतात.
19 Sep 2011 - 4:47 pm | मृत्युन्जय
बरोबर आहे. मी तर म्हणतो की सरसकट दूरध्वनीवरच (स्थिर काय किंवा भ्रमण काय) बंदी घालावी. दूरध्वनी मुळे लोकांनी पोस्टकार्ड वापरणे बंद केले आहे हो. पत्र लिहिण्याची कलाच नाहिशी होउ लागली आहे. किंबहुना मी तर म्हणतो की पोस्टखातेच बंद करावे. बिचार्या पोस्टमनला किती पळवतात हे लोक. त्यापेक्षा पुर्वीची कबूतर मेसेजिंग सर्व्हिस सुरु केली तर कित्ती बरे होइल. आमच्या सोसायटीत सध्या खुप कबूतरे आहेत ( हा शब्द योग्य अर्थाने घ्यावा ही नम्र विनंती) त्यांचा काही उपयोगही करुन घेता येइल. एका कबूतर मेसेजचे ५००० रुपये. दाणापाण्याचा खर्च वेगळा अॅट अॅक्चुयल.
19 Sep 2011 - 5:02 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी योग्य अर्थाने घेतला गेल्या आहे.
पुढच्या कट्ट्यास आम्ही तुम्हाला न्यायला व सोडायला येऊ ब्रिजेशच्या गाडीतून.
19 Sep 2011 - 5:03 pm | जाई.
आमच्या सोसायटीतही या कबूतरांनी वैताग आणलाय
19 Sep 2011 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार
'या' म्हणजे नक्की कोणत्या ?
१) एकट्याने त्रास देणार्या कबूतरांनी ?
का
२) जोडीने त्रास देणार्या कबूतरांनी ?
पारवा
परा
19 Sep 2011 - 6:20 pm | वपाडाव
बाब्बौ, अग्गा गा गा !!!
एका सोसायटीत किती कबुतरे असतात? किंवा तुमच्या सोसायटीत किती कबुतरे आहेत ?
कबुतर घ्या घ्या घ्या, कबुतर घ्या घ्या घ्या, घ्या $$$ घ्या $$$
19 Sep 2011 - 8:05 pm | रेवती
अरे बाबा परा.........
ख्या ख्या ख्या......
19 Sep 2011 - 9:50 pm | सुहास झेले
ठ्ठो !! =))
28 Sep 2011 - 5:36 pm | अनिकेतपन्त
दिवटे डाक्टर्...तुमच्या लेखाबद्द्ल काय म्हणायच नाही राव आम्हाला...पण 'क्रीडा' म्हणुन बूकमार्क कशाला केलय? आमच्यासारख्या रोजचा पेपर शेवटच्या पानपासुन वाचणार्या लोकांचा पोपट होतो हो बाकी काय नाही.
28 Sep 2011 - 5:51 pm | मेघवेडा
अनिकेतपन्त, <द वणवणे> डागदरसायबांच्या मनरूपी खेळाडूने विचारांच्या मैदानात कोट्याऽनुप्रासादिरूपी सवंगड्यांसोबत केलेली नैबंधिक क्रीडा आहे ही! < /द वणवणे>