मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
14 Jan 2011 - 10:19 pm

सर्व मिपाकरांना २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त्त आमच्याकडे आमच्या सॉ. नि आज बाजरीच्या भाकरी व भाजी असा बेत केला होता. आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे.

पहिला फोटो बाजरीची भाकरी व लोणि

आणि या फोटोत त्याबरोबर भाजी पण आहे,

असो संक्रांतीचं स्पेशल स्लोगन काय तर - तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आणि त्याची पण सोय केलेली आहे. आपले आपले कॅरियर वाहने घेउन यावं आणि तिळ्गुळ घेउन जावा.

चिरंजीवांनी त्यांच्या साईट्वरुन खास पोक्ल्न मागवल आहे त्यासाठी.

आपले वाहन उपलब्ध नसल्यास आमचे कडुन तिळगुळ घरपोच करण्याची व्यवस्था केली जाउ शकेल, ही सोय देखिल चिरंजिवांच्याच सॉज्यनाने.

पुन्हा एकदा सर्वांना संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा व हे वर्ष आपणा सर्वांना अर्थपुर्ण, आरोग्यपुर्ण व आनंदाचे जावो ही सुर्य नारायणाच्या चरणि प्रार्थना.

हर्षद.

संस्कृतीराहती जागामुक्तकजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रणविचारशुभेच्छामाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

14 Jan 2011 - 11:07 pm | शुचि

मस्त बेत!! शेंगदाणे घालून ,लसूण्-मिर्चीची फोडणी दिलेली अळूची पातळ भाजी आठवली. भीषण चविष्ट!!!

अर्धवटराव's picture

14 Jan 2011 - 11:15 pm | अर्धवटराव

चिरंजीवांना पतंग वगैरे उडवायला आवडते कि नाहि मालक??

(पतंगप्रेमी) अर्धवटराव

आत्मशून्य's picture

14 Jan 2011 - 11:33 pm | आत्मशून्य

आज जेवायला हाच मेनू होता मस्त बाजरीची भाकरी आणी लसणाची चटणी व वांगे. तूम्हाला सूध्दा २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा.

मराठे's picture

14 Jan 2011 - 11:37 pm | मराठे

मकर संक्रांतीनिमीत्त शुभेच्छा!

आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे

भाकरीचे फोटो बघून आम्ही तुमची ही इच्छा पूर्ण केली आहे...

मुलूखावेगळी's picture

14 Jan 2011 - 11:59 pm | मुलूखावेगळी

हर्षद
तुझा तिव्र निषेध
भाकरी नि भाजि चा फोटो टाकल्याबद्दल

आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे

इथ खलबली होत आहे

बाकि चिरन्जिवान्चे फोतो छान

डावखुरा's picture

15 Jan 2011 - 12:20 am | डावखुरा

सर्व मिपाकरांना २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा
असेच म्हणतो..(मला फोटो दिसत नाहीयेत,, ;) )

शुचि's picture

15 Jan 2011 - 12:30 am | शुचि

पौराणिक किंवा दंतकथांना काहीसं मनोरंजनात्मक मूल्य असतं. त्यांवर लगेच अंधश्रद्धेचा आसूड ओढायलाच पाहीजे असे नसते.
मकर संक्रांतीची मी वाचलेली अशीच मनोरंजक कहाणी - शनि हा सूर्यपुत्र! शनि आणि सूर्याचे वैर मानले जाते. परंतु या वैरावर, मनातील अढीवर मात करून पित्याचे प्रेम , सूर्याला शनिच्या म्हणजे पुत्राच्या घरी (मकर राशीत) आजच्या दिवशी घेऊन येते. म्हणूनदेखील आजचा दिवस "गोड बोलण्याचा"= अढी विसरण्याचा असा समजला जातो.
___________________________________________________
मला सांगायचे ते सांगीतले. घाला हवा तो गोंधळ.

रथेयुतानाम परिवर्तनाय पुरातनानामिव वाहनानाम |
उत्पत्ती भूमौ तुरगोत्तमानाम दिशीप्रतस्थे रविरुत्तरस्याम ||

सूर्यपुत्र's picture

15 Jan 2011 - 10:19 am | सूर्यपुत्र

धन्यवाद, शुचिताई. मी आत्ता विचारणारच होतो, की मकरसंक्रांतीचे महत्त्व काय म्हणून...
पण शनिचे आणि सूर्याचे वैर का मानले जाते??

पिंगू's picture

15 Jan 2011 - 12:31 am | पिंगू

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

- पिंगू

नरेशकुमार's picture

15 Jan 2011 - 7:38 am | नरेशकुमार

मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा ! ! !

इन्द्र्राज पवार's picture

15 Jan 2011 - 9:57 am | इन्द्र्राज पवार

हर्षद, तुम्हास आणि तुमच्या प्रियजनांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....आणि तुमच्या प्रिय व्यक्तीने आपुलकीने केलेले इतके सुंदर खाद्य समोर दिसत असताना 'जळजळ' होईलच कशी? उलट भूक आणखीन प्रज्वलीत झाली म्हणजे त्यांचे कष्ट आम्हाला पोच झाले. कामानिमित्ताने अन्यत्र असल्याने यंदा बाजरीची भाकरी+त्यावरचा तो सुंदर लोण्याचा गोळा या वर्षी हुकला...पण त्याची कसर तुम्ही दिलेले वरील फोटो पाहून भरून निघाली.....पोक्लॅनरावानाही शुभेच्छा द्या !

इन्द्रा

५० फक्त's picture

15 Jan 2011 - 10:25 am | ५० फक्त

काल आमच्या सॉ. नी भाकरी भाजी चा बेत केला होता, तर आज आमच्या मासाहेबांनी आज शेंगागुळाच्या पोळ्या केल्या होत्या. हो आता होत्याच, फोटो सकाळी आठचे आहेत आणि साडेनउ पर्यंत ब-याच पोळ्या संपल्या आहेत. हे फोटो पण फार घाईत काढले आहेत.

आज आमच्या कडच्या माहेरवाशीणी पण होत्या ना क्मापिटिशिन्ला. फोटो पहा आणि मज्जा करा.



चिउताईचा पहिला फोटो खुपच छान!

प्यारे१'s picture

15 Jan 2011 - 12:16 pm | प्यारे१

लय भारी छत्रपति( अहो खरंच! आडनावच छत्रपति तर काय करणार???).....!!!

नम्सकार,

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

निवेदिता-ताई's picture

15 Jan 2011 - 7:41 pm | निवेदिता-ताई

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

निवेदिता-ताई's picture

15 Jan 2011 - 8:15 pm | निवेदिता-ताई

"नात्यात अपुल्या आहे जिव्हाळा,
आपुलकी अन मायेचा ओलावा !
तीळ आहेत माझ्या मैत्रीचे,
मिसळला गुळ मी प्रेम भराने !
तीळगुळ खाताच हा माझा,
रेंगाळेल स्नेहाळ प्रेमाचा गोडवा !!"

तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ...!!!

विसोबा खेचर's picture

15 Jan 2011 - 10:11 pm | विसोबा खेचर

लै भारी..! :)