पार्श्वभूमी - हातकणंगले तालुक्यातल्या मौजे रांजणवाडी बुद्रुक मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. म्हणजे घटनाच आहे, पण सत्य आहे. किंवा सत्यच आहे, पण घटना आहे.
______
काही दिवसांपूर्वी रांजणवाडी बुद्रुकमध्ये ग्रामसभा होती. या सभेमध्ये सकाळच्या पारी गावाबाहेर 'बसायला' जाणार्या ग्रामस्थांना आणि त्यांच्या मुलांना सरपंचानी आमंत्रित केले होते. हेतू हा होता की सरकारच्या नव्या नियमांची या लोकांना माहिती द्यावी आणि लोकांना घरोघरी बांधकामासाठी प्रोत्साहित करावे.
पण झाले भलतेच. या सरपंचांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला. त्यांनी भाषणात सांगितले की - आपल्या गावात सकाळीसकाळी बाहेर बसायला जाणार्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना (मुद्देमालासकट? रंगेहाथ?) अटक करण्याचा ग्रामपंचायतीचा इरादा आहे. त्यामुळे गावकर्यांनी सावध राहावे. पाठलाग करण्याचा कामावर नेमण्यात आलेल्या भरारी पथकात चपळ आणि वेगवान लोकांचा भरणा आहे. एकतर 'त्या' अवस्थेत पलायन करणे हे गुन्हेगारांना फारच गैरसोयीचे होईल आणि दुसरे म्हणजे अटक झालेल्या आरोपींना त्यांची वैयक्तिक स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर कडक शासन करण्यात येईल. सरपंचांनी सदर भाषणात 'बूच' किंवा या अर्थाचे काही इतर ग्राम्य शब्द वापरले. तेंव्हा ग्रामस्थांनी काळजी घ्यावी आणि आपापल्या आवारांत सरकारी अनुदानाने काही विशिष्ट कार्यपूर्तीसाठीची आवश्यक अशी बांधकामे करुन घ्यावीत.
यावर ग्रामस्थांना हसावे की रडावे तेच समजेना. हे सरपंच घाबरवत आहेत की प्रोत्साहन देत आहेत तेच कळत नव्हते.
मौजे रांजणवाडी बुद्रुकमध्ये खाजगी बांधकाम अतोनात महाग आहे. पब्लिकसाठी म्हणून केलेल्या सुविधांमध्ये काही वेगळ्याच समस्या आहेत. प्रायव्हेट सुविधांमध्ये ह्या समस्या नाहीतच याची शाश्वती नाही.
काळजीने मौजे रांजणवाडी बुद्रुकच्या ग्रामस्थांना खूप घोर लागला आहे. या जागतिक समस्येवर मंथन होऊन त्यातून उत्तररुपी नवनीत हाती लागावे, म्हणून हा लेखनप्रपंच.
प्रतिक्रिया
14 Dec 2010 - 5:54 am | गुंडोपंत
हा धागा विडंबन नसून अश्लाघ्य साहित्याचा विकृत प्रकार आहे. तरी मी संपादकांना विनंती करतो की हा धागा त्वरित संपादित करण्यात यावा.
14 Dec 2010 - 6:02 am | सन्जोप राव
ते होणार असेल तर ते होईलच. आपण मॉरल पुलिसिंग केले नाही तरी चालेल. आणि वकीली चालत नसेल तर दुसरा धंदा शोधा. असे अशील बळकावण्याचा प्रयत्न नको.
14 Dec 2010 - 6:01 am | आमोद शिंदे
हाहाहाहाहा..माईंड मॅप आवडला!!
अवांतरः ह्या गुंडोपंतांना काय झालंय>?
14 Dec 2010 - 6:21 am | शुचि
आवरा!!! हसून हसून मरायची वेळ आली आहे. :-D
भरारी पथक काय ...... त्या अवस्थेत पळणारी लोकं काय ..... सॉलीड!!!!!!
14 Dec 2010 - 6:23 am | आमोद शिंदे
ह्याला म्हणतात खिलाडू वृत्ती!!
ये गुंडोपंत को गुस्सा क्यू आता है?
14 Dec 2010 - 9:28 am | राजेश घासकडवी
जीएंच्या कथांमधली माणसं, राक्षस, दीपस्तंभ, झालंच तर कस्तुरीमृग हे घटक स्वतंत्र अस्तित्व घेऊन नव्हे तर रूपक म्हणून येतात. त्यामुळे अभिधेपासून फारकत घेऊन व्यंजनेचाच आधार घ्यावा लागतो. रावांचं हे लिखाणदेखील मला तसंच रूपकांनी परिप्लृत वाटलं.
मला सापडलेल्या सामंतर्यात आश्चर्यकारकरीत्या सरपंच हे सरपंचच राहातात. मात्र मौजे रांजणवाडी बुद्रुक हे मिसळपाव.कॉम असावे की काय असा संशय घ्यायला जागा राहाते. मग ग्रामपंचायत, विधी, गावकरी वगैरे सर्व गोष्टींचा - अगदी बुचांपर्यंत - मेळ लागतो.
आता मंथन होऊन काय लोणी हातात येतं ते पाहायचं.
14 Dec 2010 - 9:37 am | नरेशकुमार
डोस्क्यात काय घुसल असल तर शप्पथ !
इथे पोर झुकझुक गाडी खेळू र्हायले आनी तुमि इमान काय उडवताय. तुम्च इमान डॉस्क्यावरुन गेल.
14 Dec 2010 - 9:43 am | आंसमा शख्स
प्रतिसाद देण्या इतके विशेष नसल्याने प्रकाटाआ
14 Dec 2010 - 9:59 am | मी_ओंकार
भरारी पथक राहीलेकी भाऊ.
- ओंकार.
14 Dec 2010 - 10:17 am | नितिन थत्ते
मला वाटतं की रांजणवाडीचे सरपंच ज्या भाषेत बोलत आहेत ते भाषण गावातल्या टग्यांनी लिहून दिलेले असावे असे वाटले.
14 Dec 2010 - 10:49 am | विजुभाऊ
घासकडबी काकांचे बरोबर आहे.
अभिदा आणि व्यंज्यने बरोबर उपमा आणि उत्प्रेक्ष्येचा अविश्कार हा लेखकाचा हातखंडा आहे
लेखणीला कंड सुटलेला असताना प्रतिभेने बंड केल्यानन्तरचे लेखन हा वाचकाना प्रचम्ड दंड आहे असे काही काही वेळा वाटते
मागल्या लौकीकाला जागून लेखनात आपोआपच कीक येईल असे लेखकाला वाटत असावे अशी शंका येवून वाचक मूक होतो.
काही वेळा लेखनात दीप असला तरी बातमी चीप होती. असल्या लिखाणात वाचकाला काही गम्य असेल असा लेखकाचा रम्य समज असू शकेल पण अशा लिखाणाने वाचकाचा भ्रम निरास होतो आणि लेखकाने मांडलेली शब्दांची आरास ही शब्दांची अशी नुसतीच रास आहे हे कळून नवे काही वाचायला मिळेल ही आस विरून मानसीक त्रास होतो.
काहितरी चांगले वाचायला मिळेल या आभासापोटी वाचणारांची मात्र नुसतीच गळफास होते.
15 Dec 2010 - 6:19 pm | चिगो
फाटलो... फुटलो.. संपलो..
काय विजुभौ हे.. अनुप्रासाचा विश्वविक्रम करायचा मुड हाये काय !? :-)
14 Dec 2010 - 9:46 am | अवलिया
वा!
सरपंच भलतेच तडफदार दिसत आहेत. गावातील समस्येचे अगदी योग्य आकलन झालेले दिसत आहे.
फक्त भरारी पथकातील सदस्यांनी विशिष्ट कार्यपूर्तीसाठीची आवश्यक अशी बांधकामे करुन घेतली होती की नाही आणि करुन घेतली असल्यास त्यांचा यथायोग्य उपयोग ते करत होते की नाही की पाठलाग करुन ग्रामस्थांवर दंड कारवाई झाल्यावर भरारी पथकातील सदस्यच त्या मोकळ्या जागेचा सदुपयोग करत होते हे कळाले नाही.
14 Dec 2010 - 9:43 am | वेताळ
तरी देखिल गावकरी संयमाने दुसर्या गावाच्या वेशीवर जावुन समाधी लावु शकतील असे मला सध्यातरी वाटते.
14 Dec 2010 - 10:11 am | शिल्पा ब
बकवास विडंबन
14 Dec 2010 - 11:11 am | परिकथेतील राजकुमार
लिहिण्याचे श्रम वाया जाणार असे वाटते.
14 Dec 2010 - 11:38 am | टारझन
त्या पेक्षा होळकरबाईंच्या आंगणवाडीच्या मागचं बोळकांड बरं .. काय ?
- टम्रेलराव
14 Dec 2010 - 12:38 pm | गवि
मध्यंतरी एका गावात भरारी पथक स्थापन करुन सकाळी क्रियामग्न व्यक्ती उघड्यावर आढळल्यास त्यांना गांधीगिरी पद्धतीने पथकातल्या सर्वांनी गाठून पकडून गुलाब फूल द्यायचे (लाज वाटावी आणि सर्वांमधे पसरावेही याकरिता) असे ठरून कारवाई सुरु झाली.
एक मध्यमवयीन गृहस्थ (जे स्वतःच या "हागणदारी मुक्त गाव "प्रोजेक्टचे एक मेन मेंबर होते) त्यांनाच भल्या पहाटे कार्यमग्न अवस्थेत या पथकाने "स्पॉट" केले आणि फूल देण्याच्या क्रियेसाठी त्यांच्या मागे लागले असता लाजेस्तव हे गृहस्थ जिवाच्या आकांताने पळू लागले. त्यांना हार्ट ट्रबल होता. हार्टात कळ येऊन त्यांचे ताबडतोब प्राणोत्क्रमण झाले.
ही बाजारगप नाही. सत्य घटना आहे. पेप्रात वाचली असेल कोणीतरी..
14 Dec 2010 - 3:16 pm | प्रकाश घाटपांडे
आपल्या देशाची लोकसंख्येचा विचार करता सर्वांचाच मुद्देमाल हस्तगत करुन त्याचा योग्य विनिमय केला तर आपल्या शेती मालाचे उत्पादन वाढुन राष्ट्रीय संपत्तीत भर पडेल.
पंढरपुरच्या वारकर्यांची वाटेत एकाने आपल्या वावरात सोय करुन दिली होती त्यामुळे त्याच्या वावरातील शेतीमालाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे तो आता वारकर्यांना आग्रहाचे निमंत्रण देतो. ही माहिती आम्हाला वारकर्यांच्या वैद्यकीय पथकात काम करणार्या एका हितचिंतकाने दिली असल्याने विश्वासार्ह आहे.
रांजणवाडी बु|| मधील ग्रामस्थांनी यापासून बोध घ्यावा.
14 Dec 2010 - 3:36 pm | नरेशकुमार
आमि मुद्देमाला सकट राष्ट्रीय संपत्तीत भर टाकायला तयारच आहोत,
ठिकान बोला फक्त.
14 Dec 2010 - 3:55 pm | प्रकाश घाटपांडे
वीज टेलीफोन यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणार्या कंपन्यांनी बिले भरण्याचे सर्व प्रकारचे मार्ग व सुविधा या गरजेनुसार पुरवल्यामुळे त्यांच्या थकबाकीत लक्षणीय घट झाली व तिजोरीत वाढ झाली. बिले पटकन भरल्यास सूट देखील पुरवली जाते. म्हणजे पुर्वी दंड करुन जो महसुल वाढत नव्हता तो सूट देउनही वाढू लागला.
ठिकाणे शोधत बसण्या पेक्षा बसल्या जागी सोय केली पाहिजे तरच महसुल वाढेल. लोकांनी क्रयशक्ती वाढवली पाहिजे. पायाभुत सुविधा असल्या शिवाय राष्ट्राची प्रगती होत नाही. आजच्या पायाभुत सुविधेवरील खर्च हे उद्याचे उत्पन्न असते.
14 Dec 2010 - 3:40 pm | टारझन
पकाकाकांशी सहमत आहे. दोन पावलं पुढे जाऊन मी तर म्हणेन " श्रेष्ठ दान .. गुदान "
14 Dec 2010 - 3:59 pm | प्रकाश घाटपांडे
खर तर आधुनिक विनोबांचा अवतार ही चळवळ वेगानी वाढवेल. उगीच नाही सोनखताला महत्व दिले आपल्या पुर्वजानी.
14 Dec 2010 - 4:06 pm | स्पा
" श्रेष्ठ दान .. गुदान "
कहर आहे हा..............
14 Dec 2010 - 4:59 pm | नन्दादीप
"गुदान " म्हणजे त्याना "गुदान गरम "असे म्हणायचे असेल .. होय ना टारझन भाउ???
टीप :
("गुदान" हा शब्द सलग आहे. मधेच एकही रिकामी जागा नाही याची सर्वानी नोन्द घ्यावी.)
14 Dec 2010 - 5:41 pm | उमराणी सरकार
अहो गुदान गरम असे नाव नाहीये हो!!! Gudang गरम आहे. आता ल्यव मराठीत.
14 Dec 2010 - 5:51 pm | नन्दादीप
gudang मधील "g"(शेवटचा) साइले॑ट आहे बर का...!!!
आता "साइले॑ट" अर्थ विचारु नका...
14 Dec 2010 - 4:15 pm | प्रकाश घाटपांडे
मागे आम्ही उत्तराखंडला पर्यटनाला गेलो त्यावेळी तिथे सुलभ दानगृहाची सोय होती. तेथील व्यवस्थापकाने सांगितले की बहुसंख्य पर्यटक आदान प्रदान करायला इच्छुक असतात. त्याने असेही सांगितले की इतके दिवस आमच्या सरकराच्या ही गोष्ट लक्षातच आली नव्हती. लोक तिथे स्वखुषीने दानही करतात व वर सेवा मुल्यही देतात. यामुळे तेथील पर्यटक दात्यांची संख्या अक्षरशः तिप्पट चौपट झाली होती. दानपेटी विदेशी पद्धतीची सुबक व स्वच्छ असेल तर विदेशी पर्यटक सेवामुल्यही जास्त देतात.
14 Dec 2010 - 4:31 pm | इंटरनेटस्नेही
=)) =)) =)) =))
सर्व आंबटशैकिनांना खाद्य मिळाले असेलच!
14 Dec 2010 - 4:33 pm | अवलिया
विदेशी आणी स्वदेशी दानाच्या गुणवत्तेत काही फरक असतो का?
14 Dec 2010 - 4:40 pm | प्रकाश घाटपांडे
गु णवत्तेत फरक नसतो. पण दानपेटिका ही आकर्षक व स्वच्छ व विदेशी पद्धतीची असेल तर मिळणारे सेवा मुल्य हा जास्त मिळते हा अनुभव त्यानी सांगितला.
14 Dec 2010 - 4:43 pm | टारझन
माझ्या माहितीनुसार कोणत्याप्रकारचा कच्चा माल ( मराठीत रॉ मट्रेल) वापरला आहे त्यावर गु णवत्ता ठरत असावी. जाणकारांनी प्रकाश टाकावा ; )
-
14 Dec 2010 - 4:45 pm | अवलिया
सहमत. त्याचप्रमाणे सदर कच्चा माल प्रक्रिया करतांना वापरलेले इतर अनुषंगिक द्रव्य आणि त्यानंतर एकजीव होण्यासाठी केलेल्या शरिरबाह्य आणि अंतर्गत हालचाली यांचा सुद्धा कसा प्रभाव पडतो यावर सुद्धा जाणकारांनी प्रकाश टाकावा.
14 Dec 2010 - 4:55 pm | टारझन
सर्वांगिण परिस्थितीचा विचार करता , दात्याच्या आरोग्य परिस्थितीचा सुद्धा फरक पडत असावा. कारण ह्यामुळे कधी सढळ हाताने(इच्छा असो नसो) दान होत असावे तर कधी "जुदा होके भी .. तु मुझ मे कही बाकी है .. " किंवा तत्सम राग आळवुन दानकार्य होत असावे. जाणकार न सांगता प्रकाश टाकतीलंच !
14 Dec 2010 - 4:59 pm | गवि
टारझनभाऊ..
काय हे? हसून पोटाला पीळ पडला..
हे भगवान..
14 Dec 2010 - 5:00 pm | नन्दादीप
>>"जुदा होके भी .. तु मुझ मे कही बाकी है .. "
ह. ह. पु. वा. झाली.....
14 Dec 2010 - 5:01 pm | प्रकाश घाटपांडे
कधी संचित माल फार नसतो पण दातृत्वाची उबळ येते तर कधी माल भरलेला असतो पण दातॄत्वाची उबळच येत नाही.
ही प्रेरणा आतुन यावी लागते
14 Dec 2010 - 5:27 pm | गवि
दानाविषयी दोन गोष्टी महत्वाच्या:
एक. दान "सत्पात्री" पडावे.
दोन. "या हाताचे त्या हाताला" कळू नये.. अतएव गुप्तदान असावे.
14 Dec 2010 - 5:33 pm | Nile
सहमत आहे, पात्र स्वच्छ नसेल तर सढळ मनाने दान देता येत नाही ब्वॉ.
14 Dec 2010 - 5:29 pm | अवलिया
बाजारात बाह्यप्रेरक उपलब्ध आहेत.
14 Dec 2010 - 5:36 pm | टारझन
चला ... ऑफिसातुन निघायची वेळ झाली ... थोडं दान करुन येतो ...
दिसामाजी काही (ना काही) दान करावे
14 Dec 2010 - 5:23 pm | अवलिया
दानाचे प्रमाण आणि आस्तिक नास्तिक याचा काही परस्परसंबंध आपल्यातल्या प्रज्ञावान विचारवंताला दिसत आहे का? असल्यास कसा यावर प्रकाश टाकावा.
14 Dec 2010 - 6:00 pm | नरेशकुमार
प्रकाश यान्नि प्रकाष टाकुन टाकुन सगळे मिपा प्रकाशमय झालय. आनि आजपासुन सगळे सढळ हाताने दान करतिल याचि खात्रि वाटते.
14 Dec 2010 - 4:51 pm | प्रकाश घाटपांडे
पाच रुपयाचे नाणे व पाच रुपयाची नोट यात 'मुल्यात्मक' फरक नसला तरी वजनात व आकारात फरक असतो हे मान्य आहे.
तसेच हजार रुपयांची नोट वा शंभराच्या दहा नोटा वा दहाच्या शंभर नोटा यात असणारा संख्येचा फरक असतो. ब्यांकेत म्हनुन तर डिनॉमिनेश लिवत्यात.
15 Dec 2010 - 12:48 am | इंटरनेटस्नेही
=)) =)) =)) =))
जबराट!! धागा आणि त्यावरील प्रतिसादही मस्त!
धागा चोप्य पस्ते करुन संग्रही ठेवण्यात आला आहे! :)