पुरोगामी!(एक छोटिशी गोष्ट)

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
7 May 2008 - 5:09 am

"आई-बाबा फारच मागं लागले आहेत.रोज रोज मागे लागुन नवीन नवीन स्थळं दाखवतात.
साला लग्न मला करायचय्,पण घाइ ह्यांनाच आहे. मी ही ह्यांच्या दबावाला बळी पडलो तर नावाचा सुधीर साठे नाही .
आपण आपल्या मर्जीनच पोरगी पाहणार.
साला रोज रोज तिथुन इतक्या लांबुन भारतातुन फोन करतात आणि विषय काय्,तर "काय ठरवलस्?कधी पहायची?"
छ्या. ह्यांचा फोन असा खाली ठेवला नाही ,तोच लक्ष लॅपटॉपच्या
(चल संगणक्=लॅपटॉप?) स्क्रीन कडे(स्क्रीन=पडदा?) गेलं. फुकटात ढीगभर साय मिळाल्यावर एखाद्या बोक्याला होइल,
तशा आनंदाने येक आवंढा गिळुन,मोठ्ठे डोळे करुन बसलो चटिंगला.
" सुधीर वैतागुन सांगत होता.

पण चेहर्‍यावरचे भाव आता जरा छान झाले. तो म्हणला...
" ती हां तीच स्पृहा. वर्ग सखी.,राष्ट्रिय पातळीवर ऍथलीट म्हणुन मान्यता पावलेली.
वर्गात मुलिंशी बोलायला कधिच फारसं जमलं नाही.
पण तिचं मोकळं ढाकळं वागणं,सहज मिक्स्-अप होणं जाम आवडायचं.
तिचे बर्‍याचदा वर्तमान पत्रातुन बक्षिसं घेतानाचे वगैरे फोटो येत. तेही छान वाटायचे.
शिवाय कुणशिही बोलताना ती लागलिच बोलतं व्हायची, बोलतं कराय्ची.
एखादा जोक आवडला तर पटकन टाळीहि द्याय्ची.(म्हणुन मी जोक मारायचे अनेक अयशस्वी प्रयत्न पण केले.)

आता नाही म्हटलं तरी ,तिच्या स्वभावानुसार मिळता जुळता जॉब मिळाला होता.एच आर चा,अगदि नुकतीच ऑफर आली होती.
आणि खेळणही अजुन चालुच होतं.
चॅटिंगलाही मला तिचा हाच स्वभाव आवडायचा.वेब कॅम तर सगळेच वापरतात्,पण ही अगदि मॉडेर्न स्टाइल मध्ये घरी
ज्या ड्रेस वर असायची,त्यावरच चॅटींग करायची.उगिच "काकु"बाईं सारखं नाही.
सदैव आपली ती बर्म्युडा येक असायची अंगावर आणि स्लीव लेस पांढरा शुभ्र टी-शर्ट.
आणी अंग काठी निव्वळ शिड शिडित्,ऍथलीटची,स्वभावात मोकळेपणा.तजेलदार सावळा रंग.
मी तर भारतीय "शारापोवा"च म्हणेन तिला ,तिच्या टवटवीत पणावरुन.
बर्रेच दिवस अशा ऑन लाइन गप्पा चालायच्या.
अगदि "गांगुली म्हातारा झालाय की द्रवीड " इथ पासुन ते अगदि कॉलेज मधल्या दिवसांबद्दल.
किंचित खेचाखेची चालायची आणि थोडाफार चावटपणा आणि चावटगप्पा सुद्धा.
वाटलं "अहा..काय सही आहे ही जोडीदार म्हणुन्.किती मोकळी आहे. हिच्या सोबत राहणं म्हंजे दिवस भर गप्पा,मन मोकळेपणा
आणी शिवाय कुठलीही फालतु बंधनं नाहित. " ही मिळाली तर काय होइल्,मी स्वप्नातच इमले बांधुन पाहिले,
त्या "काकु" स्टाइल वाल्या नवर्‍या सोबत फिरतानाही हातात हात घालायला घाबरतात रस्त्यावर.ही असेल तर
गळ्यात गळे घालुन हिंडेन.पण आता कुणास ठाउक आई-बाबा कुठलं लचांड पाहणारेत माझ्यासाठी."

एवढ्यात आईचा फोन आला.तिकडुन आवाजः- "अरे ऐकतोस का ,मुलगी मिळाली रे त्या शादी डॉट कॉम वर तुला हवी तशी.
फोटोत सुंदर दिसतेय, कालच बोलले तिच्याशी . तुझ्याच कॉलेजची दिसतीय. नॅशनल ऍथलीट,फोटो आणि माहिती मेल केलिये तुला.
आता तु असं कर की.."
आई एवढ बोलेपर्यंत मोबाइल झाला डिसचार्ज्,फोन झाला कट.
पण पण....
"नॅशनल ऍथलीट्,माझ्याच कॉलेजची...म्हण्जे..स्पृहा तर नै?"
डोक्यात शंका आली आणि लगेच जाउन मेल पाहिला.
तो...तोच फोटो.स्पृहाच ती.

म्हणजे आता हिच्या सोबत जन्मभर रहाय्ला मिळणार तर.
आणि तीनं मग सांगितलं का नाही चॅट वर आपल्याला की आपलच नाव तिला""स्थळ" म्हणुन आलय्,
गम्मत करायची,फिरकी घ्यायची म्हणुन असं केल तिनं?

"
पण ..पण ..एक मिनिट्..हे काय होतय?
मी तिला होकार कसा देइन?
हे हे सगळं ठरायच्या किती तरी आधि पासुन ही अशी बाह्या आणि तंगड्या उघड्या सोडुन बसते वेब कॅम समोर.
म्हण्जे, ही शहाणी,ज्याच्याशी फारशी कॉलेजातील धड पुर्ण ओळखही नाही त्याच्या समोर एवढी मोकळी राहते.
मग प्रत्यक्ष तिला भेटणार्‍या लोकांसमोर कशी असेल?
छे ..हे असलं मला मुळीच आवडणार नाही माझ्या बायकोनं केलेलं.
अस कुणाशीही एकदम सलगीनं वागलेलं.
बायको आहे, तर बायको सारखं वागावं उगिच डोक्यावर बसु नये.
मी देइन ना मोकळीक, पण एका मर्यादेतच.अस दुसर्‍या पुरुषांशी इतकं कस बोलवतं हिला...
छ्या...
असल्या कॅरेक्टरची बायको नकोच आपल्याला.
त्या पेक्षा नकारच कळवतो तिला.
"

सुधीर "नकार" कळवायला जाउ लागला फोन कडे.
त्याचे (स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍याचे)हे " सु विचार " ऐकुन मी तसाही थोडासा चकित झालो होतो.
(माझं आश्चर्य आवरुन ) त्याला मी म्हटलं "स्थळ चांगल आहे -नाही मी काहिच म्हणणार नाही.ते तुलाच माहितिए.
पण एवढं नक्की,की तु नकार दिलास तरीही तुझ्यापेक्षा कैक पट चांगली स्थळं तिला मिळतील."
तु आता फक्त ह्या विषयाबद्दल मौन धारण केलस तरी हे लग्न होणार नाही.एखाद -दोन दिवसात होकार येइलच इतर
ठिकाणंहुन तिला,मग चालेल का तुला?"

सुटकेचा नि: श्वास टाकत सुधीर खाली बसला . "मला लग्न नाहिच करायचं असल्या कॅरेक्टर वालिशी"
असं काहिसं पुट्पुट्ला आणि पुन्हा हावरट नजरेनं चॅटींग ची विंडो मोठी करुन "मोकळ्या" विचारांच्या
गप्पा मारु लागला,
इतरांच्या होणार्‍या बायकांशी!!
त्यांच्या मोकळेपणा बद्दल तो फारच आग्रही होता.!!!

कथासंस्कृतीवाङ्मयसाहित्यिकराहणीमौजमजाप्रकटनविचारअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मन's picture

7 May 2008 - 5:17 am | मन

ह्या कथेचं नाव काही सुचत नाहिये.जे सुचलय्,दिलय, ते समर्पक वाटत नाहिये.
कृपया आपल्याला काही समर्पक नाव सुचत असेल तर कळवावे.
आभारी राहीन.

एक गोष्ट राह्य्ली:-
हे लिखाण केवळ मिसळपावावरच उपलब्ध आहे.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

पक्या's picture

7 May 2008 - 5:29 am | पक्या

आत्ताच वाचली तुमची गोष्ट. मस्त जमली आहे.
मला वाटते पुरोगामी हे नाव योग्य आहे. (एक छोटिशी गोष्ट) हे कन्सातील शब्द काढून टाकल्यास बरे वाटेल.
शेवट छान केलात. keep it up.
आयला ..घरवाली दाल जैसी आणी बाहरवाली चिकन करी - अशा प्रकारच्या पुरोगामी लग्नाळू मुलान्ना तुमच्या ह्या लिखाणातून चपराक मिळेल.
पक्या

ईश्वरी's picture

7 May 2008 - 5:35 am | ईश्वरी

गोष्ट छान जमली आहे. आवडली.
'घरमे राम गली मे शाम ' ह्या गोविन्दाच्या सिनेमाच्या नावाची आठवण झाली.
ईश्वरी

विसोबा खेचर's picture

7 May 2008 - 6:59 am | विसोबा खेचर

छान लिहिलं आहेस रे! :)

औरभी लिख्खो....

एक गोष्ट राह्य्ली:-
हे लिखाण केवळ मिसळपावावरच उपलब्ध आहे.

धन्यवाद..:)

तात्या.

पिवळा डांबिस's picture

7 May 2008 - 7:46 am | पिवळा डांबिस

लिखाण छान आहे, एका वेगळ्याच मनोवृत्तीवर प्रकाश टाकला आहे.
मी जर हे लिहिले असते तर शीर्षक "हिपोक्रीट(भंपक)" किंवा "भेकड" असे काहीतरी ठेवले असते.

हे लिखाण केवळ मिसळपावावरच उपलब्ध आहे.
वा! आम्हीही त्यातलेच! एकच लिखाण निरनिराळ्या ठिकाणी प्रसिद्ध करणे हा आम्हांला तरी साहित्यिक व्याभिचार वाटतो. विचार करा की समजा पु.ल. किंवा जयवंत दळवी इत्यादि प्रथितयश लेखकांनी आपले एकच लिखाण सत्यकथा, किर्लोस्कर इत्यादि अनेक ठिकाणी एकाच वेळी प्रसिद्ध केले असते [ते तर सिद्धहस्त (डिमांडमध्ये असलेले!) लेखक होते] तर आपल्याला त्यांच्याविषयी आत्ता वाटतो तितका आदर वाटला असता काय? कोणत्याही संकेतस्थळावर आपलं लिखाण सार्वजनिकरित्या प्रकाशित करावं पण ते त्या स्थळाशी एकनिष्ठ असावं, असं आम्हाला वाटतं.

चला, आता आपण आपला एक एक्सक्लूजिव्ह क्लबच स्थापन करूया!:)
कीप इट अप!!

-पिवळा डांबिस

विसोबा खेचर's picture

7 May 2008 - 7:51 am | विसोबा खेचर

चला, आता आपण आपला एक एक्सक्लूजिव्ह क्लबच स्थापन करूया!

चांगली कल्पना आहे..:)

आपला,
(एक्सक्लूजिव्ह) तात्या.

पिवळा डांबिस's picture

7 May 2008 - 7:58 am | पिवळा डांबिस

तात्या, क्लबला नांव कसं आहे?:))
(नाहीतरी जो तो 'पिणारा' म्हणून बदनाम करतो रांडेचा! सुंठीवाचून खोकला जाईल!:))

चतुरंग's picture

7 May 2008 - 7:05 pm | चतुरंग

'मिपाचे घोळकरी'! हे नाव जास्त छान वाटतंय! ;)
चतुरंग

छोटा डॉन's picture

7 May 2008 - 6:50 pm | छोटा डॉन

तुमचा जर खरच असा एक्सक्लूजिव्ह क्लबचा विचार असेल तर माझ्यासारख्या एका अनएक्सक्लूजिव्ह पामराला पण बरोबर घ्या. आम्ही पण दुसरीकडे कुठेच झक मार नाही, जी काही काशी करायची ती इथेच करतो ...

अपवाद : माझा ब्लॉग ....

बाकी डांबिसकाकांनी सुचवलेले नाव एकदम समर्पक आहे ....

बाकी मन, कथा आणि लेखनशैली मस्तच ...
तुमच्या आधी पडलेल्या प्रतिसादावरून तुमच्या असलेल्या तयारीची कल्पना आलीच होती.
लिहीत रहा. आम्ही वाचतो आहोत ....

अनएक्सक्लूजिव्ह छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मानस's picture

7 May 2008 - 8:03 pm | मानस

मिपा चा एक्सक्लूजिव्ह वाचक :) , दुसरीकडे कुठेही फिरकत नाही.

आनंदयात्री's picture

7 May 2008 - 10:02 am | आनंदयात्री

एक्सक्लूजिव्ह क्लबाचा मी आजपासुन मेंबर. आपापल्या ब्लॉगवर आपले लेखन ब्याकअप (तसेही कोण वाचते तिथे) म्हणुन ठेवण्याबाबत क्लबाचे काय धोरण राहील ?

पिवळा डांबिस's picture

7 May 2008 - 11:49 pm | पिवळा डांबिस

आमचे मत फक्त सार्वजनिक संकेतस्थळांच्या (मिपा, नमोगत, मायबोली, मराठीवर्ल्ड इत्यादि) बाबतीत होतं. तुमची अनुदिनी (ब्लॉग) हा आम्ही वैयक्तिक समजतो व तो यांत समावेशित करीत नाही.

हे ही स्पष्ट करू इच्छितो की यांत अमुक एक संकेतस्थळ श्रेष्ठ वा कनिष्ठ असे सुचवण्याचा हेतू नाही. लिखाण आपापल्या आवडीप्रमाणे कुठेही प्रकाशित करावं, पण त्यानंतर ते इतरही स्थळांवर लावण्यावर आम्ही नापसंती व्यक्त केली होती.

भडकमकर मास्तर's picture

7 May 2008 - 1:49 pm | भडकमकर मास्तर

हिपोक्रीट म्हणजे भोंदू असं जास्त योग्य राहील का?
( भंपक म्हणजे थोडं अर्थाने मूर्ख आणि बावळट शी जवळीक राखतं असं वाटतं)

भडकमकर मास्तर's picture

7 May 2008 - 1:59 pm | भडकमकर मास्तर

साहित्यिक व्याभिचार
B) B) कसला झकास शब्द आहे...
पण आता डांबिसकाका, तुमच्यावर तसे लोक चिडणार बहुतेक... तयार रहा...

(केवळ मि पा वर लेखन करणारा ) भडकमकर

प्रभाकर पेठकर's picture

7 May 2008 - 8:58 am | प्रभाकर पेठकर

ह्या लिखाणाचा विषय दांभिकता असल्या मुळे 'दंभ' हे नांव उचित वाटतं.

ऋचा's picture

7 May 2008 - 9:17 am | ऋचा

तुझ म्हणजे अस वाट्टय कि..

आपला तो बाळ्या आणि दुसर्‍याच ते कार्ट....

गोष्ट खुप छान आहे आवडली

आनंदयात्री's picture

7 May 2008 - 10:04 am | आनंदयात्री

मनराव लेख छान जमलाय, आवडला :)

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 12:11 pm | धमाल मुलगा

मनोबा,

छान रे...
स्वैर विचार, मोकळी अभिवृत्ती आणि पुढारलेपणाची टिमकी वाचवणार्‍या हिणकस मनोवृत्तीला एकच फाडकन ठेऊन दिलीयेस....

सुरुवातीची तिच्याबद्दलची ओढ, आवड नंतर हीच आपली बायको...आपल्या घरच्यांची सून होणार म्हणल्यावर तीचा तो मोकळेपणा झटकन डोळ्यांवर येतानाचं वळण...मस्तच !

.....आणि पुन्हा हावरट नजरेनं चॅटींग ची विंडो मोठी करुन "मोकळ्या" विचारांच्या
गप्पा मारु लागला,
इतरांच्या होणार्‍या बायकांशी!!
त्यांच्या मोकळेपणा बद्दल तो फारच आग्रही होता.!!!

फर्मासच !!!

लिही, अजुनही लिही...असंच छान..उत्तम लिहि...


हे लिखाण केवळ मिसळपावावरच उपलब्ध आहे.

ह्याचा आम्हाला केवळ 'मिसळपावकर' म्हणून अभिमान वाटतो.

आपला
- (मिपाचा माळकरी) ध मा ल.

अन्जलि's picture

7 May 2008 - 1:37 pm | अन्जलि

शब्बस लिखन खुप चन अहे अशि खुप मुले अस्ततात गोश्तिचे नाव दम्भिक योग्य वतेल

भडकमकर मास्तर's picture

7 May 2008 - 1:55 pm | भडकमकर मास्तर

एकदम मस्त जमलाय लेख...
अप्रतिम ....
अजून लिहा....
(एक सूचना.....)..कथेचा शेवट सुद्धा प्रथम पुरुषी ठेवला असता तर विरोधाभास अधिक जोरात घुसला असता, आणि आपल्या ( चुकीच्या) निर्णयाचं केविलवाणं समर्थन वाचताना अधिक मजा आली असती...

..(प्रत्येकात एक दाम्भिक दडलेला असतो, तो कधीतरी वर येतो असे मानणारा) भडकमकर

स्वाती दिनेश's picture

7 May 2008 - 1:57 pm | स्वाती दिनेश

लेख/कथा आवडली..
स्वाती

मन's picture

7 May 2008 - 3:48 pm | मन

काहिंना आहे तेच नाव बरोबर वाटत्यं,.
तर बहुतांशी जणांनी दंभ-भोंदु-हिपोक्रीट
असे किंवा ह्यच्याशी संबंधी नाव सुचवलय.(आणि मलाही ते पटलय.)
हिपोक्रीट हे फारच छान आहे.पण इथं शक्य तितकं मराठी वापरायची इच्छा आहे.
(माझ्या (भविष्यातील) अनुदिनीत या कथेच्या आंग्ल अनुवादात हेच नाव ठेवायचं ठरवलयं.)
(तसही इथे चॅटिंग,लॅपटॉप्,विंडो ह्यांना तितकेशे समर्पक मराठी शब्द वापरता आले नाहित म्हणुन आधिच
कससंच होतय.)

तर,
दंभ हे नाव ठेवण्यापे़क्षा "दर्शन दंभ" ठेवलं तर कसं राहील.?
किंवा "दंभ जन्म","साक्षात्कार","दंभ्-दर्प"(दंभाचा दर्प्,दुर्गंध ह्या अर्थाने)
ही नावं कशी वाटतात?
म्हणजे आपल्याला जाणवलेला कथेतला "दंभ" तर इथे आहेच्,पण त्यातही थोडसं स्पेसिफिक होता येइल या नावांमुळे.

काय म्हणता मग मंडळी?

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

मनस्वी's picture

7 May 2008 - 4:40 pm | मनस्वी

झाले का नाव ठेवून? नसेल तर "घमघमाटलेल्या उदबत्तीचा खदखदणारा दांभिक दर्प" हे नाव कसे वाटते?

आता जरा "लेखा"विषयी बोलूया?
मला लेख आवडला. सभ म्हटले तसे शेवट प्रथमपुरुषी अधिक प्रभावी ठरला असता.
मनोवृत्तीचे दर्शन घडविण्यात यशस्वी ठरला आहात.

समाजातील काही मुला॑च्या मनोवृत्तीचा ठाव घेतला आहे, त्या॑ना मैत्रिण ही मनाने मोकळी ढाकळी,मॉडर्न, बोल्ड, हवी असते त्याच्या॑वर भरवसा नसतो की ह्या मुली स॑सार कसा करतील, सआणि बायको मात्र एकदम शालिन, अति मॉडर्न नको.
असे दाखवायचे की मी किती फ्री माइन्डेड आहे, आणि आतुन कुलुप लावलेले दार.

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 6:02 pm | धमाल मुलगा

अहो...

आम्हाला स्वतःला अशा मुली/स्त्रीया पहायला आवडतं...मिटक्या मारत त्यांच्याशी जवळीक करायचा प्रयत्न करतो आम्ही,
पण आपल्या बायकोला कोणी असं पाहिलं तर? बरं ती जर अशी मनमोकळी असली तर ?
आमच्या घराण्याची इज्जत, आम्ची समाजातली पत इ.इ. ला चूड नाही का लागणार?

तसाही एक विचार आम्हा मुलांमध्ये असतोच ना की...

"मैत्रिण कशी असावी? चारचौघं कोळसा झाले पहिजेत, अशी फटाकडी...
आणि बायको/होणारी बायको? २४ तासांतल्या कोणत्याही क्षणी आपल्या आईसमोर घेऊन जाता यावी अशी"

चतुरंग's picture

7 May 2008 - 7:30 pm | चतुरंग

ललित छान आहे.
'पुरोगामी' हेच नाव मला पटते. शेवटपर्यंत गोष्ट कशी जाणार आहे हे समजता कामा नये!
'दंभ' हेही चांगले आहे पण मग नावातच तू गोष्टीचा शेवट अप्रत्यक्षपणे उघड करतोस! :)

चतुरंग

ब्रिटिश टिंग्या's picture

8 May 2008 - 1:23 am | ब्रिटिश टिंग्या

मस्त (आणि खरं) लिहीलयं :D

(मिपाचा अजुन एक माळकरी) टिंग्या ;)

इनोबा म्हणे's picture

8 May 2008 - 1:35 am | इनोबा म्हणे

अगदी झकास पकडलंस, 'घरी पोळी आणि बहेर नळी'वाल्यांना!
उत्तम लेखन.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वेलदोडा's picture

9 May 2008 - 2:21 am | वेलदोडा

छान आहे गोष्ट.
पुरोगामी नाव योग्य आहे. काही वेळेस contrast नावे समर्पक वाटतात.
-- वेलदोडा

सुमीत's picture

9 May 2008 - 2:50 pm | सुमीत

पुरोगामी पण छान आहे शिर्षक ह्या कथेला. आवड्ला लेख.

अभिता's picture

10 May 2008 - 12:57 am | अभिता

गोष्ट खुप छान आहे. नाव तर एकदम समर्पक.गोष्टीचे नाव बदलू नका.

धनंजय's picture

10 May 2008 - 3:40 am | धनंजय

छान जमली आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

10 May 2008 - 8:35 am | प्रकाश घाटपांडे

आली अंगावं त घेतली शिंगावं. ही पुरुषी मानसिकता आहे. आन अंगाव येण्याची "इष्टापत्ती" आपल्यावर यावी असही मनातुन वाटत असतं ( आपन खरं बोलायला घाबरत नाय बरका भौ) पण ती ओढवुन घेण्याची ऐपत आपली असतेच असे नाही. किंबहुना नसतेच. आपत्तींच्या दिवास्वप्नात वावरताना खरच अशी एखादी आपत्ती आली कि मंग बल्ल्या होतोय.
पुरोगामी गोष्ट आवडली. बायको विषयी कल्पना बाबत एक सुभाषित
कार्येषु मंत्री
करुणेषु दासी |
शयनेषु रंभा
भोजनेषु माता ||

(कटतो आता)
प्रकाश घाटपांडे

मन's picture

10 May 2008 - 2:51 pm | मन

कार्येषु मंत्री
करुणेषु दासी |
शयनेषु रंभा
भोजनेषु माता ||

सगळच येका फटक्यात सांगुन टाकलत की राव...

(अवांतरः- राशी चक्र ह्या कार्यक्रमात श्री शरद उपाध्ये ह्यांनी तूळ राशिच्या पत्नीचे वर्णन करताना ह्या श्लोकाचा उल्लेख केलाय.)

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

विनोद इन्गळे's picture

24 Jul 2008 - 12:44 pm | विनोद इन्गळे

लेख आवडला, शिर्षक ठीक आहे.
- विनोद इन्गळे