✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुरोगामी!(एक छोटिशी गोष्ट)

म
मन यांनी
Wed, 05/07/2008 - 05:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16426 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

नम्र विनंती.

मन
Wed, 05/07/2008 - 05:17 नवीन
ह्या कथेचं नाव काही सुचत नाहिये.जे सुचलय्,दिलय, ते समर्पक वाटत नाहिये. कृपया आपल्याला काही समर्पक नाव सुचत असेल तर कळवावे. आभारी राहीन. एक गोष्ट राह्य्ली:- हे लिखाण केवळ मिसळपावावरच उपलब्ध आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments

योग्य नाव

पक्या
Wed, 05/07/2008 - 05:29 नवीन
आत्ताच वाचली तुमची गोष्ट. मस्त जमली आहे. मला वाटते पुरोगामी हे नाव योग्य आहे. (एक छोटिशी गोष्ट) हे कन्सातील शब्द काढून टाकल्यास बरे वाटेल. शेवट छान केलात. keep it up. आयला ..घरवाली दाल जैसी आणी बाहरवाली चिकन करी - अशा प्रकारच्या पुरोगामी लग्नाळू मुलान्ना तुमच्या ह्या लिखाणातून चपराक मिळेल. पक्या
  • Log in or register to post comments

मस्त गोष्ट

ईश्वरी
Wed, 05/07/2008 - 05:35 नवीन
गोष्ट छान जमली आहे. आवडली. 'घरमे राम गली मे शाम ' ह्या गोविन्दाच्या सिनेमाच्या नावाची आठवण झाली. ईश्वरी
  • Log in or register to post comments

छान,

विसोबा खेचर
Wed, 05/07/2008 - 06:59 नवीन
छान लिहिलं आहेस रे! :) औरभी लिख्खो.... एक गोष्ट राह्य्ली:- हे लिखाण केवळ मिसळपावावरच उपलब्ध आहे. धन्यवाद..:) तात्या.
  • Log in or register to post comments

व्हेरी गुड!

पिवळा डांबिस
Wed, 05/07/2008 - 07:46 नवीन
लिखाण छान आहे, एका वेगळ्याच मनोवृत्तीवर प्रकाश टाकला आहे. मी जर हे लिहिले असते तर शीर्षक "हिपोक्रीट(भंपक)" किंवा "भेकड" असे काहीतरी ठेवले असते. हे लिखाण केवळ मिसळपावावरच उपलब्ध आहे. वा! आम्हीही त्यातलेच! एकच लिखाण निरनिराळ्या ठिकाणी प्रसिद्ध करणे हा आम्हांला तरी साहित्यिक व्याभिचार वाटतो. विचार करा की समजा पु.ल. किंवा जयवंत दळवी इत्यादि प्रथितयश लेखकांनी आपले एकच लिखाण सत्यकथा, किर्लोस्कर इत्यादि अनेक ठिकाणी एकाच वेळी प्रसिद्ध केले असते [ते तर सिद्धहस्त (डिमांडमध्ये असलेले!) लेखक होते] तर आपल्याला त्यांच्याविषयी आत्ता वाटतो तितका आदर वाटला असता काय? कोणत्याही संकेतस्थळावर आपलं लिखाण सार्वजनिकरित्या प्रकाशित करावं पण ते त्या स्थळाशी एकनिष्ठ असावं, असं आम्हाला वाटतं. चला, आता आपण आपला एक एक्सक्लूजिव्ह क्लबच स्थापन करूया!:) कीप इट अप!! -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
Wed, 05/07/2008 - 07:51 नवीन
चला, आता आपण आपला एक एक्सक्लूजिव्ह क्लबच स्थापन करूया! चांगली कल्पना आहे..:) आपला, (एक्सक्लूजिव्ह) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मिपाचे माळकरी!

पिवळा डांबिस
Wed, 05/07/2008 - 07:58 नवीन
तात्या, क्लबला नांव कसं आहे?:)) (नाहीतरी जो तो 'पिणारा' म्हणून बदनाम करतो रांडेचा! सुंठीवाचून खोकला जाईल!:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

डांबिसकाका,

चतुरंग
Wed, 05/07/2008 - 19:05 नवीन
'मिपाचे घोळकरी'! हे नाव जास्त छान वाटतंय! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मी पण आहे हो ...

छोटा डॉन
Wed, 05/07/2008 - 18:50 नवीन
तुमचा जर खरच असा एक्सक्लूजिव्ह क्लबचा विचार असेल तर माझ्यासारख्या एका अनएक्सक्लूजिव्ह पामराला पण बरोबर घ्या. आम्ही पण दुसरीकडे कुठेच झक मार नाही, जी काही काशी करायची ती इथेच करतो ... अपवाद : माझा ब्लॉग .... बाकी डांबिसकाकांनी सुचवलेले नाव एकदम समर्पक आहे .... बाकी मन, कथा आणि लेखनशैली मस्तच ... तुमच्या आधी पडलेल्या प्रतिसादावरून तुमच्या असलेल्या तयारीची कल्पना आलीच होती. लिहीत रहा. आम्ही वाचतो आहोत .... अनएक्सक्लूजिव्ह छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सहमत

मानस
Wed, 05/07/2008 - 20:03 नवीन
मिपा चा एक्सक्लूजिव्ह वाचक :) , दुसरीकडे कुठेही फिरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

साहित्यिक व्याभिचार / पटले

आनंदयात्री
Wed, 05/07/2008 - 10:02 नवीन
एक्सक्लूजिव्ह क्लबाचा मी आजपासुन मेंबर. आपापल्या ब्लॉगवर आपले लेखन ब्याकअप (तसेही कोण वाचते तिथे) म्हणुन ठेवण्याबाबत क्लबाचे काय धोरण राहील ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

स्पष्टीकरण!

पिवळा डांबिस
Wed, 05/07/2008 - 23:49 नवीन
आमचे मत फक्त सार्वजनिक संकेतस्थळांच्या (मिपा, नमोगत, मायबोली, मराठीवर्ल्ड इत्यादि) बाबतीत होतं. तुमची अनुदिनी (ब्लॉग) हा आम्ही वैयक्तिक समजतो व तो यांत समावेशित करीत नाही. हे ही स्पष्ट करू इच्छितो की यांत अमुक एक संकेतस्थळ श्रेष्ठ वा कनिष्ठ असे सुचवण्याचा हेतू नाही. लिखाण आपापल्या आवडीप्रमाणे कुठेही प्रकाशित करावं, पण त्यानंतर ते इतरही स्थळांवर लावण्यावर आम्ही नापसंती व्यक्त केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

हिपोक्रीट

भडकमकर मास्तर
Wed, 05/07/2008 - 13:49 नवीन
हिपोक्रीट म्हणजे भोंदू असं जास्त योग्य राहील का? ( भंपक म्हणजे थोडं अर्थाने मूर्ख आणि बावळट शी जवळीक राखतं असं वाटतं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

साहित्यिक

भडकमकर मास्तर
Wed, 05/07/2008 - 13:59 नवीन
साहित्यिक व्याभिचार B) B) कसला झकास शब्द आहे... पण आता डांबिसकाका, तुमच्यावर तसे लोक चिडणार बहुतेक... तयार रहा... (केवळ मि पा वर लेखन करणारा ) भडकमकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

दंभ...

प्रभाकर पेठकर
Wed, 05/07/2008 - 08:58 नवीन
ह्या लिखाणाचा विषय दांभिकता असल्या मुळे 'दंभ' हे नांव उचित वाटतं.
  • Log in or register to post comments

आपला....

ऋचा
Wed, 05/07/2008 - 09:17 नवीन
तुझ म्हणजे अस वाट्टय कि.. आपला तो बाळ्या आणि दुसर्‍याच ते कार्ट.... गोष्ट खुप छान आहे आवडली
  • Log in or register to post comments

छान

आनंदयात्री
Wed, 05/07/2008 - 10:04 नवीन
मनराव लेख छान जमलाय, आवडला :)
  • Log in or register to post comments

मनोबा, छान

धमाल मुलगा
Wed, 05/07/2008 - 12:11 नवीन
मनोबा, छान रे... स्वैर विचार, मोकळी अभिवृत्ती आणि पुढारलेपणाची टिमकी वाचवणार्‍या हिणकस मनोवृत्तीला एकच फाडकन ठेऊन दिलीयेस.... सुरुवातीची तिच्याबद्दलची ओढ, आवड नंतर हीच आपली बायको...आपल्या घरच्यांची सून होणार म्हणल्यावर तीचा तो मोकळेपणा झटकन डोळ्यांवर येतानाचं वळण...मस्तच !
.....आणि पुन्हा हावरट नजरेनं चॅटींग ची विंडो मोठी करुन "मोकळ्या" विचारांच्या गप्पा मारु लागला, इतरांच्या होणार्‍या बायकांशी!! त्यांच्या मोकळेपणा बद्दल तो फारच आग्रही होता.!!!
फर्मासच !!! लिही, अजुनही लिही...असंच छान..उत्तम लिहि... हे लिखाण केवळ मिसळपावावरच उपलब्ध आहे. ह्याचा आम्हाला केवळ 'मिसळपावकर' म्हणून अभिमान वाटतो. आपला - (मिपाचा माळकरी) ध मा ल.
  • Log in or register to post comments

दम्भिक्पना

अन्जलि
Wed, 05/07/2008 - 13:37 नवीन
शब्बस लिखन खुप चन अहे अशि खुप मुले अस्ततात गोश्तिचे नाव दम्भिक योग्य वतेल
  • Log in or register to post comments

अहाहा.....मस्त

भडकमकर मास्तर
Wed, 05/07/2008 - 13:55 नवीन
एकदम मस्त जमलाय लेख... अप्रतिम .... अजून लिहा.... (एक सूचना.....)..कथेचा शेवट सुद्धा प्रथम पुरुषी ठेवला असता तर विरोधाभास अधिक जोरात घुसला असता, आणि आपल्या ( चुकीच्या) निर्णयाचं केविलवाणं समर्थन वाचताना अधिक मजा आली असती... ..(प्रत्येकात एक दाम्भिक दडलेला असतो, तो कधीतरी वर येतो असे मानणारा) भडकमकर
  • Log in or register to post comments

छान!

स्वाती दिनेश
Wed, 05/07/2008 - 13:57 नवीन
लेख/कथा आवडली.. स्वाती
  • Log in or register to post comments

ओक्के

मन
Wed, 05/07/2008 - 15:48 नवीन
काहिंना आहे तेच नाव बरोबर वाटत्यं,. तर बहुतांशी जणांनी दंभ-भोंदु-हिपोक्रीट असे किंवा ह्यच्याशी संबंधी नाव सुचवलय.(आणि मलाही ते पटलय.) हिपोक्रीट हे फारच छान आहे.पण इथं शक्य तितकं मराठी वापरायची इच्छा आहे. (माझ्या (भविष्यातील) अनुदिनीत या कथेच्या आंग्ल अनुवादात हेच नाव ठेवायचं ठरवलयं.) (तसही इथे चॅटिंग,लॅपटॉप्,विंडो ह्यांना तितकेशे समर्पक मराठी शब्द वापरता आले नाहित म्हणुन आधिच कससंच होतय.) तर, दंभ हे नाव ठेवण्यापे़क्षा "दर्शन दंभ" ठेवलं तर कसं राहील.? किंवा "दंभ जन्म","साक्षात्कार","दंभ्-दर्प"(दंभाचा दर्प्,दुर्गंध ह्या अर्थाने) ही नावं कशी वाटतात? म्हणजे आपल्याला जाणवलेला कथेतला "दंभ" तर इथे आहेच्,पण त्यातही थोडसं स्पेसिफिक होता येइल या नावांमुळे. काय म्हणता मग मंडळी? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

मनोवृत्ती

मनस्वी
Wed, 05/07/2008 - 16:40 नवीन
झाले का नाव ठेवून? नसेल तर "घमघमाटलेल्या उदबत्तीचा खदखदणारा दांभिक दर्प" हे नाव कसे वाटते? आता जरा "लेखा"विषयी बोलूया? मला लेख आवडला. सभ म्हटले तसे शेवट प्रथमपुरुषी अधिक प्रभावी ठरला असता. मनोवृत्तीचे दर्शन घडविण्यात यशस्वी ठरला आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन

समाजातील सत्य परिस्थिती दर्शवणारा लेख.

शितल
Wed, 05/07/2008 - 17:45 नवीन
समाजातील काही मुला॑च्या मनोवृत्तीचा ठाव घेतला आहे, त्या॑ना मैत्रिण ही मनाने मोकळी ढाकळी,मॉडर्न, बोल्ड, हवी असते त्याच्या॑वर भरवसा नसतो की ह्या मुली स॑सार कसा करतील, सआणि बायको मात्र एकदम शालिन, अति मॉडर्न नको. असे दाखवायचे की मी किती फ्री माइन्डेड आहे, आणि आतुन कुलुप लावलेले दार.
  • Log in or register to post comments

अहो... आम्हा

धमाल मुलगा
Wed, 05/07/2008 - 18:02 नवीन
अहो... आम्हाला स्वतःला अशा मुली/स्त्रीया पहायला आवडतं...मिटक्या मारत त्यांच्याशी जवळीक करायचा प्रयत्न करतो आम्ही, पण आपल्या बायकोला कोणी असं पाहिलं तर? बरं ती जर अशी मनमोकळी असली तर ? आमच्या घराण्याची इज्जत, आम्ची समाजातली पत इ.इ. ला चूड नाही का लागणार? तसाही एक विचार आम्हा मुलांमध्ये असतोच ना की... "मैत्रिण कशी असावी? चारचौघं कोळसा झाले पहिजेत, अशी फटाकडी... आणि बायको/होणारी बायको? २४ तासांतल्या कोणत्याही क्षणी आपल्या आईसमोर घेऊन जाता यावी अशी"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

मना,

चतुरंग
Wed, 05/07/2008 - 19:30 नवीन
ललित छान आहे. 'पुरोगामी' हेच नाव मला पटते. शेवटपर्यंत गोष्ट कशी जाणार आहे हे समजता कामा नये! 'दंभ' हेही चांगले आहे पण मग नावातच तू गोष्टीचा शेवट अप्रत्यक्षपणे उघड करतोस! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

सही रे!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 05/08/2008 - 01:23 नवीन
मस्त (आणि खरं) लिहीलयं :D (मिपाचा अजुन एक माळकरी) टिंग्या ;)
  • Log in or register to post comments

मनोबा,

इनोबा म्हणे
गुरुवार, 05/08/2008 - 01:35 नवीन
अगदी झकास पकडलंस, 'घरी पोळी आणि बहेर नळी'वाल्यांना! उत्तम लेखन. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

पुरोगामी नाव योग्य

वेलदोडा
Fri, 05/09/2008 - 02:21 नवीन
छान आहे गोष्ट. पुरोगामी नाव योग्य आहे. काही वेळेस contrast नावे समर्पक वाटतात. -- वेलदोडा
  • Log in or register to post comments

पुरोगामी

सुमीत
Fri, 05/09/2008 - 14:50 नवीन
पुरोगामी पण छान आहे शिर्षक ह्या कथेला. आवड्ला लेख.
  • Log in or register to post comments

गोष्ट खुप

अभिता
Sat, 05/10/2008 - 00:57 नवीन
गोष्ट खुप छान आहे. नाव तर एकदम समर्पक.गोष्टीचे नाव बदलू नका.
  • Log in or register to post comments

मस्त गोष्ट

धनंजय
Sat, 05/10/2008 - 03:40 नवीन
छान जमली आहे.
  • Log in or register to post comments

खरी गोष्ट

प्रकाश घाटपांडे
Sat, 05/10/2008 - 08:35 नवीन
आली अंगावं त घेतली शिंगावं. ही पुरुषी मानसिकता आहे. आन अंगाव येण्याची "इष्टापत्ती" आपल्यावर यावी असही मनातुन वाटत असतं ( आपन खरं बोलायला घाबरत नाय बरका भौ) पण ती ओढवुन घेण्याची ऐपत आपली असतेच असे नाही. किंबहुना नसतेच. आपत्तींच्या दिवास्वप्नात वावरताना खरच अशी एखादी आपत्ती आली कि मंग बल्ल्या होतोय. पुरोगामी गोष्ट आवडली. बायको विषयी कल्पना बाबत एक सुभाषित कार्येषु मंत्री करुणेषु दासी | शयनेषु रंभा भोजनेषु माता || (कटतो आता) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

अगदि अचुक....

मन
Sat, 05/10/2008 - 14:51 नवीन
कार्येषु मंत्री करुणेषु दासी | शयनेषु रंभा भोजनेषु माता || सगळच येका फटक्यात सांगुन टाकलत की राव... (अवांतरः- राशी चक्र ह्या कार्यक्रमात श्री शरद उपाध्ये ह्यांनी तूळ राशिच्या पत्नीचे वर्णन करताना ह्या श्लोकाचा उल्लेख केलाय.) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

लेख आवडला

विनोद इन्गळे
गुरुवार, 07/24/2008 - 12:44 नवीन
लेख आवडला, शिर्षक ठीक आहे. - विनोद इन्गळे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा