पुणेरी विक्षिप्तपणा
_______________________________________________________
सदर लेख केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही.
_______________________________________________________
ही घटना 'मे २००७' मधली, या काळात मी 'चाणक्य मंडल परिवारचा एक अभ्यासक्रम' पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्यात सुमारे एक महिना वास्तव्याला होतो. सदाशिव पेठेतील एका विद्यार्थी गृहात मी आणि माझा मित्र राहत असताना आलेला हा एक गंमतीशीर अनुभव.
***
(वार: रविवार, वेळ: सुमारे १४:२०)
दुपारी काहीश्या उशिरानेच जाग आली आणि घड्याळात बघून दचकलो, अरे १४:२०? ओह माय गोड इट्स टू लेट... घाई घाईत आन्हिक उरकली आणि आता संध्याकाळ होई पर्यंत काहीतरी टीपी करू म्हणून जवळच्या सायबर ची वाट धरू म्हणून विचार केला. पण भूक लागली होतीच ना..तितक्यात आमच्या शेजारील रुम मधला विद्यार्थी म्हणाला आपला मालक आहे ना श्री. XXXX (या श्री. XXXX चे एक छोटेसे अल्पोपहारगृहपण आहे)तो एकदम उत्कृष्ट आम्लेट बनवतो.. यु मस्ट गिव इट अ ट्राय.. मी म्हटलं ठीकाय जाऊ त्यांच्याकडेच.
***
(वेळ: 15:00)
त्यांच्या रूम वर पहिल्या माळ्यावर गेलो. तेव्हा तर मालक झोपलेले असून ते १६:३० वाजता उठतील असे समजलं.
***
(वेळ: १६:3०)
मी पुन्हा त्यांच्या रूम वर पहिल्या माळ्यावर गेलो. तर मालक अजूनही झोपलेले असून ते आता आपल्या पुनः निर्धारित वेळेस म्हणजे १७:०० वाजता उठतील अस समजलं.
***
(वेळ १७:००)
मालक झोपेतून जागे आणि अस्मादिकांना खास पुण्याचं वैशिट्य असलेल्या शैलीत "काय पाहिजे?" म्हणून विचारते...
आता पुढचा संवाद पहा:
(इं: इंटरनेटप्रेमी, मा: मालक)
इं: काका मला एक दोन आम्लेट हवी आहेत..
मा: ओ नीट काय ते सांगा एक का दोन?
इं: दोन, दोन..
मा: बर कशाबरोबर खाणार पोळी का ब्रेड?
इं: ब्रेड.
मा: ठीक आहे, अर्ध्या तासाने या.
इं: ठीक, पण काका मला जरा बाहेर जायचं आहे, लवकर नाही का मिळणार?
('मा' एक तुच्छता पूर्ण कटाक्ष टाकतात.)
इं: ठीक आहे मग मी १७:३० वाजता येतो.
मा: हम्म..
***
(वेळ: १८:00)
भुकेने पोटात कावळे ओरडू लागले आणि आम्ही चला आता आम्लेट घेऊन येऊ आणि मस्त पैकी ब्रेड बरोबर हाणू अस विचार करून मालकांकडे रवाना.
(वेळ: १८:१०)
मा: हे घ्या आम्लेट तयार..
इं: छान , किती झाले पैसे?
मा: २५ रु.
इं: हे घ्या..
[मा', 'इं' कडुन पैसे घेतात, (आणि वाचकांना अतिशयोक्ती वाटेल, पण ते रु.१० च्या नोटांच्या खरेपणाची चाचणी देखील घेतात!) असो.]
मा: ब्रेड कुठायत?
'इं' अवाक, मालकानेच ब्रेड आणार असे आश्वासन दिल्याने, अस्मादिकांनी ब्रेड आणलेच नव्हते!
मा : अरे काय तुम्ही मुंबईकर? ब्रेड कुठायत..? मी तुम्हाला विचारलेल ना कशाबरोबर खाणार म्हणून?
इं: मा, हो आणि मी तुम्हाला सांगितलेलं की ब्रेड बरोबर खाणार.
मा: अरे मग आणायचे नाही का ब्रेड? तुम्ही मुंबईकर असेच बावळट!
इं पुन्हा एकदा अवाक, खरतर तुम्हाला एखादी गोष्ट कशाबरोबर खाणार अस एखादा खाद्य सेवा पुरवठादार विचारतो, तेव्हा तोच ती वस्तू मुख्य वस्तू सोबत पुरवणार असाच त्याचा साधा सरळ अर्थ होतो. इथे मात्र 'मा' मात्र सरळ माझ्यावरच घसरले..
आणि शेवटी मलाच पायपीट करत जाऊन, ब्रेड आणून ते आम्लेट खावं लागलं!
(एक्स पुणेकर)
प्रतिक्रिया
11 Aug 2010 - 3:32 am | शेखर काळे
तर त्यांचेच होते ना !
11 Aug 2010 - 8:52 am | दीपक साकुरे
कोंबडीचे असावे.. एक अंदाज हो..:)
11 Aug 2010 - 4:06 am | पाषाणभेद
१४:२० पासून १८:१० पर्यंत भुक मारली या पेक्षा उपास करणे काय वाईट होते. पुण्याल राहून पुण्य पदरात पाडून घेण्याची मालकांनी सोय केलेली होती. ती संधी तुम्ही वाया घालवली. आता पुन्हा प्रयत्न करा.
11 Aug 2010 - 4:15 am | विश्वनाथ मेहेंदळे
(सदर प्रतिक्रिया केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही.)
अहो पुणेरी विक्षिप्तपणा काय म्हणता? मालकांचे कुठे काय चुकले? पुणेकरांना बरोब्बर माहित असते कुठल्या ठिकाणी कसे वागावे. (ही माहिती नुकत्याच एका शतकी धाग्यात कळली हो). तुमच्या जागी एखादा पुणेकर असता तर तो सगळे विचारून मगच गेला असता. पाव कुणाचे, अन्डी कुणाची, कांदा, तेल, तवा कुणाचा. आणि इतके करूनही त्याला असा अनुभव आला असता तर त्याने इथे असा धागा-बिगा अजिबात काढला नसता. कारण मांजरीचे दात (की नखे, नक्की माहित नाही) तिच्या पिल्लांना लागत नाहीत. (संदर्भ :- तोच शतकी धागा)
तुम्हालाच माहित नव्हते कुठे कसे वागायचे आणि मग वरून इथे असा कांगावा करता होय. मुंबईकर म्हणजे पण ना, एकेक नग असतात. हात टेकले आम्ही या मुंबैकरांपुढे !!!
(ह. घ्या.)
एक्स मुंबईकर
मरतंय आता, पळावे लागणार इथून
11 Aug 2010 - 4:40 am | राजेश घासकडवी
अहो मेहेंदळेभाऊ, तुम्हाला या म्हणण्याचा अर्थ नीट कळलेला नाही. (तुम्ही मुंबईकर म्हणजे असे ना, तुमच्यापुढे हातच टेकले) त्याच्या अनुभवावर त्याने इतका खवचट, इतका खवचट धागा काढला असता, किंवा पाट्या लिहिल्या असत्या की इतर पुणेकरांनी म्हटलं असतं की अरे, हा आपल्यातलाच आहे. मग ते खवचट बोलणं त्यांना लागलं नसतं.
पुणेकरांचे ते अनुभव, गमतीदार टिप्पणी, हलकीफुलकी चेष्टा, कष्टमरांच्या चक्रमपणाचं मनोरंजक सादरीकरण... तुम्ही एक्स मुंबईकर ना, लवकरच नुसते एक्स होणार तुम्ही.
(स्वगत - मिपावरच्या विषयांचा टर्नअराउंड टायम फारच कमी झालाय का सध्या?)
11 Aug 2010 - 4:49 am | बबलु
चालू द्या..
11 Aug 2010 - 5:08 am | बेसनलाडू
परवाच्या कट्ट्याला पुणेकर मिसिंग असल्याची रुखरुख अजूनही लागून राहिलेली दिसतेय ;)
(भारतीय)बेसनलाडू
11 Aug 2010 - 10:19 am | विजुभाऊ
तुम्ही मुंबईकर असेच बावळट!
हम्म.... आयते गिळायला मिळते ना मुम्बैत नाक्यानाक्यावर. त्याचा परीणाम
नशीब तुमचे मालक तुम्हाला येताना दोन प्लेट घेऊन या असे नाही म्हणाले.
अवांतरः स पेठेत येथे अन्न गिळून मिळेल असा बोर्ड लावायचा विचार करतोय
11 Aug 2010 - 4:25 am | वात्रट
!! इं प्रेमी पुणेरी म्हणणार , जुनाच वाद रंगणार
कल्ला येथे होणार , मज्जा येणार निश्चित !!
11 Aug 2010 - 4:32 am | Dhananjay Borgaonkar
खुप छान काल्पनिक संवाद लिहिला आहे. बहुदा ढकलपत्रातुन आला असावा.
सध्या स्वतःचा टी.आर्.पी वाढवण्यासाठी लोक पुण्याचा वापर करत आहेत.
करा हो करा.
11 Aug 2010 - 4:37 am | इंटरनेटस्नेही
@Dhananjay Borgaonkar
अजिबात नाही. ही माझ्या आयुष्यातील सत्यघटना आहे.
11 Aug 2010 - 4:47 am | Dhananjay Borgaonkar
अबब..सत्यकथा वाचुन शहारा आला.
11 Aug 2010 - 4:40 am | केशवसुमार
१७:३० ला येतो सांगून १८:१० ला गेलात तरी ही तुम्हाला ऑम्लेट मिळले.. :O
मा. नी तुमचा उद्धार नाही केला? :O ऑम्लेट कोंबडीने खाल्ले असे नाही सांगितले :O केवळ अशक्य..
एकतर मालक पुणेरी नसणार नाहीतर नक्कीच ही घटना काल्पनिक आहे..
(पुणेरी)केशवसुमार
11 Aug 2010 - 5:37 am | पंगा
:D
11 Aug 2010 - 4:41 am | अनिवासि
आत्तापर्यन्त अश्या गोष्टी पुण्यातच होतात असे वाटत होते. (मी पुणेकरच आहे) नुकताच अमेरिकेत गेलो होतो. प्रवास करताना highway वर भारतिय क्यफे मध्ये थाम्बलो. मालक शीख होता पण दुकानतल्या पाट्या अगदी पुणेरी होत्या.
उदा: cash only, no checks-- NO EXCEPTIONS
मेनुवर होते: none of the dishes include rice or nan or any thing else.
आणि अशाच अनेक सुचना. सगळ्या वेळात एकदाही हसला नाही. waiters नी सर्व काहि बघितले- जाताना वरपण बघितले नाहि. दुपारि फक्त आम्हीच तेथे होतो आणि ते पण सर्व भरतिय!
म्हणजे काय की असे 'पुणेरी" सगळीकडेच. भेटतात
11 Aug 2010 - 4:46 am | Dhananjay Borgaonkar
जाउद्याहो आता असल्या भाकडकथेत काही राम नाही.
||कोणीतरी पुण्यावर कोटी करणार , जुनाच वाद रंगणार
यांचा उगाच टी आर पी वाढणार, आता कंटाळा आला निश्चित||
11 Aug 2010 - 4:49 am | बबलु
चालू द्या..
11 Aug 2010 - 5:12 am | असुर
इथे बऱ्याच गोष्टी गृहीत धरल्यामुळे गडबड झाली आहे.
१. तुम्ही विद्यार्थी-गृहात राहत होतात आणि तरीही दुपारी २:२० पर्यंत झोपा काढत होतात ही तुमची पहिली चूक. मेसची वेळ पाळायलाच हवी.
२. दुपारी ३ वाजता खायला मागितलं, ही दुसरी चूक. पुण्यात वेळच्या वेळी खायला मिळतं, उगाच अवेळी खायला मागाल तर लोक फाट्यावर मारतात.
३. पुण्यात कोणीही दुसऱ्याला दुपारी झोपेतून उठवत नाही. अपमान करून घ्यायची तयारी असेल तरच असले प्रमाद करावेत.
४. ज्या अर्थी मालकांनी स्पष्ट सांगितलं नाही की 'ते सोय करणार आहेत', त्याअर्थी तुम्ही ओढून ताणून ते गृहीत धरलं!
५. १० रुपयाच्या नोटेची चाचणी कशी घेतात ते एकदा स्पष्ट करून सांगितले तर बरे होईल. आणि चाचणी करावी लागेल अशी नोट तुम्ही का दिली??
तुम्हाला पायपीट झाली म्हणून हे सगळं रामायण तुम्ही जन्माला घातलं खरं, पण रामाची सीता कोण ते विसरलात. एकाच दुपारी ५ चुका केल्यावर (आणि त्यातल्या २ चुका म्हणजे अक्षम्यच) तुम्हाला फक्त ब्रेडसाठी पायपीट झाली हे खरं तर तुमचं भाग्य!
उगाच आपलं कोण पण चालू होतं आणि पुण्याला नावं ठेवायला सुरुवात! आहे हे असं आहे, पुण्यात यायला कोणीही आमंत्रण दिलेलं नाही. जमत असेल तर या, हा इथला सिंपल रूल आहे!
-- (पक्का पुणेकर) असुर
टीप: सदर प्रतिसाद केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश अजिबात नाही.
--(डिसक्लेमर) असुर
11 Aug 2010 - 10:14 am | सविता
+१००००००००००
13 Aug 2010 - 11:21 am | मी-सौरभ
+१ च
(जास्त वाया का घालवा??)
14 Aug 2010 - 1:04 pm | प्राजक्ताचि फुले
मस्तच!!!! :)
11 Aug 2010 - 8:20 am | गोगोल
आम्लेट कस झाल होत?
11 Aug 2010 - 8:41 am | विकास
हा लेख विरंगुळा/मनोरंजनासाठी असल्याने तसेच कुणाच्या भावना दुखावण्यासाठी नसल्याने, त्याच प्रकारात केवळ गंमत म्हणून ही कॉमेंट धरावीत.
या शिर्षकात redundancy आहे. एकतर पुणेरी म्हणा अथवा विक्षिप्तपणा म्हणा... ;)
11 Aug 2010 - 9:01 am | पाषाणभेद
>>>या शिर्षकात redundancy आहे. एकतर पुणेरी म्हणा अथवा विक्षिप्तपणा म्हणा...
एकनंबरी
11 Aug 2010 - 9:03 am | चिंतामणी
पॉपकॉर्न घेउन बसलो होतो.
पण पुरेशी मजा नाही आली.
(निराश)चिंतामणी.
11 Aug 2010 - 9:17 am | मृत्युन्जय
काळजी करु नका काही काही सामने दुसर्या इनिंग मध्ये रोचक होतात. भारत पाकिस्तान सामना कसा नेहेमिच हिट & हॉट असतो. तसेच पुण्याचा सामना पण नेहेमिच हिट असतो. कोणितरी वाईड बॉल टाकेलच. इतर कोणि नाही टाकला तर थोड्यावेळाने मीच टाकतो. काळजी नसावी.
पुणेरी विक्षिप्त
मृत्युंजय
11 Aug 2010 - 9:23 am | चिंतामणी
तुझे आगमन झाले आहे ना.
आता काळजी नाही करणार.
इंतजार और सही और सही
11 Aug 2010 - 9:44 am | अप्पा जोगळेकर
मजा वाटली. हे केवळ पुण्यातच घडू शकेल. उगाच आपले आपटत बसतात हे पुणेकर. आधी विक्षिप्तपणे वागायचं आणि वरती दुसर्यांना शहाणपणा शिकवायचा. चालायचंच. पाण्याचा गुण असावा.
(हलके घ्या अथवा घेउ नका. आहे हे असं आहे असं म्हणावंसं वाटतंय. पण आम्ही पुण्याचे नाही. ह.घ्या. )
11 Aug 2010 - 10:48 am | सुहास..
मजा वाटली. हे केवळ पुण्यातच घडू शकेल. उगाच आपले आपटत बसतात हे पुणेकर. आधी विक्षिप्तपणे वागायचं आणि वरती दुसर्यांना शहाणपणा शिकवायचा. चालायचंच. पाण्याचा गुण असावा. >>>
धन्यवाद जोगळेकर काका !!
@ ईंटरनेटप्रेमी ....बाहेर पाटी वाचली नव्हती का ? जर बाहेर पाटी नसेल तर तो आम्लेटवाला 'पुणेकर' नसणार याची खात्री देतो..पाटी असेल तर आपण पुण्याबाहेरचे आहात ह्याची खात्री देतो,देतो कसली आहेच.
11 Aug 2010 - 10:10 am | नगरीनिरंजन
पुणेरी पुण्यवंत केवळ दयाबुद्धीने दुसर्यांवर उपकार म्हणून व्यवसाय करत असतात हे एकदा समजून घेतले म्हणजे त्यात विक्षिप्तपणा काही नाही हे सहज कळेल. व्यवसायच काय काही काही अतिपुण्यवान अतिपुणेरी लोक तर इतरांवर उपकार म्हणूनच जन्म घेतात. हे माहित नसताना कोणी वर त्यांच्याकडून ग्राहकसेवा वगैरेची अपेक्षा करण्याची जुर्रत करत असेल तर ती ज्याची त्याची जबाबदारी. त्यातूनही त्यांची वेळ न पाळणे म्हणजे उपकारकर्त्यावर उलटण्यासारखे आहे. त्या मालकांनी तुम्हाला ऑम्लेट दिले यातूनच त्यांचा मायाळू आणि परोपकारी स्वभाव दिसतो.
(पुणेरी दुकानदारांकडून अनेकदा उपकृत झालेला पापी) नगरीनिरंजन.
11 Aug 2010 - 10:13 am | प्रकाश घाटपांडे
या पुर्वी मिपावरील समाजात विक्षिप्तांची संख्या वाढावी - अरुण टिकेकर हा लेख जरुर वाचावा. शीर्षकात हायपर लिंक आहे.
संक्षिप्त
11 Aug 2010 - 11:15 am | पाषाणभेद
संपादकांसाठी: महोदय, लिंक अन अक्षर एकाच रंगाचे असल्याने वाक्यात कोठे लिंक असेल तर नविन फॉर्मॅटमध्ये ती लिंक नजरेस येत नाही. माउसओव्हर करावा लागतो. अन लेखकाला/ प्रतिसादकर्त्याला घाटपांडेकाकांसारखी वरील सुचना द्यावी लागते. कृपया लिंकमधला अक्षररंग बदलावा हि नम्र विनंती.
मीपा हे वाचकांसाठी आहे. केवळ माउसओव्हर न केल्याने महत्वाच्या लिंक्स उघडल्या जात नाहीत. नविन बदल करा पण जे जुने आहे ते सगळेच टाकावू नाही हे सांगणे इच्छीतो.
धन्यवाद.
14 Aug 2010 - 7:28 pm | संपादक मंडळ
आपल्या सुचनेची नोंद घेतली.
धन्यवाद.
11 Aug 2010 - 10:28 am | मनि२७
झक्कास प्रतिक्रिया...
लगे राहो मुंबई-पुणे मुंबई...
मनी... :-)
11 Aug 2010 - 11:16 am | मृत्युन्जय
मला तरी एक ऑम्लेट खाण्यासाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वाट पाहणे हाच विक्षिप्तपणा वाटतो. पुण्यातले लोक त्यापेक्षा घरी करुन खातील.
आणि जिथे रांगा लागत नाहीत तिथे काही चांगले मिळु शकते या गोष्टीवर आमचा विश्वास नाही.
शिवाय पुणेरी माणुस दुपारी १-४ दुकान बंद ठेवतो. पण ठीक ४ वाजता उघडतो देखील (दुकान). त्यामुळे ५ वाजेपर्यंत जर झोपला असेल तर तो नक्कीच पुणेकर नव्हता. बाहेर्गावचा कोणि असेल तर त्याची जबाबदारी त्या गावावर राहील. कृपया उठ्सुट पुण्याला नावे ठेवु नयेत.
त्यात भरीस भर म्हणजे ५.३० ला येतो असे सांगुन तुम्ही ६ वाजता गेलात. तरी तुम्हाला ऑम्लेट दिले गेले म्हणे. मग चुक त्याची नाही. एकतर दिवसभरात त्याच्याकडे जाणारे तुम्ही एकमेव गिर्हाइक. त्यात उपहारगृह चालवणार्या माणसाच्या घरी जाउन तुम्ही त्याला त्रास दिलात. ५ चांदण्या चमकवणार्या हॉटेल मालकाच्या घरी जाउन असे काहीतरी मागवुन दाखवा बरे. बरे गेलात तर गेलात ज्या वेळेस संपुर्ण पुणे विश्रांती घेते त्या वेळेत गेलात. त्यात नंतर जाताना सांगितलेल्या वेळेपेक्षा उशिराने गेलात. एवढे सगळे प्रमाद एका दिवसात घडल्यावर त्याने तुम्हाला पुणेरी हिसका (तो पुणेरी नसेल तरी दाखवेल) दाखवला नसता तरच नवल आहे.
11 Aug 2010 - 11:22 am | मराठमोळा
शब्दा शब्दाशी प्रचंड सहमत. :)
(पुणेकर)
11 Aug 2010 - 11:39 am | दत्ता काळे
५ चांदण्या चमकवणार्या हॉटेल मालकाच्या घरी जाउन असे काहीतरी मागवुन दाखवा बरे.
पुण्याच्याच हॉटेलची कश्याला बात ..? पुणे काय नी ठाणे काय ? मालकाकडून चांदण्या मिळाल्या कि पूर्वी चपला घालून बाहेर निघायचे हा देखील एका हॉटेलचा नियम होता. (कृ. ह. घ्या )
13 Aug 2010 - 11:25 am | मी-सौरभ
सही...
11 Aug 2010 - 12:24 pm | संजयशिवाजीरावगडगे
एक तुच्छता पूर्ण कटाक्ष टाकतात ? छान टिपले !
पुणेकर आहेच मुळी जगात अद्वितिय !!!!
11 Aug 2010 - 2:45 pm | हेमा
लेख मजेशीर आहे.
12 Aug 2010 - 12:07 am | कवितानागेश
मुंबईकर असून वाट कसली बघत बसता ४-४ तास!
मला मी. छ. शि.रा.बो. सारखे नाट्यमय वाक्य टाकावसे वाटतय..
'लाज वाटते तुम्हाला मुंबईकर म्हणण्याची!'
...४ तास भूक मारून वाट पहायची,
....... तीसुद्धा एका 'पुणेकरावर' विसंबून.
अशा वेळेस पुणेकर सुद्धा 'बावळट'च म्हणणार तुम्हाला...(एक तुच्छता पूर्ण कटाक्ष!!)
पुण्यात १७६० ठिकाणे आहेत गिळायला.............
********************
( वास काढत भटकणारी-मुंबईकर)
13 Aug 2010 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार
स्वतःच्या लेखनाला भारंभार प्रतिसाद पडावेत,कुठेतरी आणि कशीतरी का होईना लेखनाची दखल घेतली जावी, धुरळा उडावा ह्यासाठी केलेला एक अतिशय खोडसाळ प्रयत्न.
गंमतीशीर का विक्षिप्त ?? का खरेतर गंमतीशीर पण पुण्यात आला म्हणुन विक्षीप्त ??
दुपारी उठुन आन्हिक उरकली ?? हे कसे शक्य झाले ? बरं तुम्ही ट्राय करायला गेलात ह्याचा अर्थ स्वतःच्या अक्कल हुषारीने गेलात, मालक अक्षता घेउन आलेले न्हवते हे क्लिअर झाले.
इंप्रे सेठ खुद १४:२० तक सोने वाले १६:३० तक सोनेवाले दुसरे के बारे मे ऐसा नही लिखते.
बर मग ? आपण स्वतःला हापिसातले साहेब समजता काय ? की आपण आल्याबरोबर मालकाने चपराशासारखे खाडकन उठुन सलाम ठोकावा ?
कौतुकास्पद. उशीरा उठुनही, आन्हिक न उरकता मालकानी आधी तुमची दखल घेतली ह्याबद्दल खरेतर तुम्ही त्याचे आजन्म ॠणी राहायला हवे होते. कातड्याचे जोडे करुन...
असो..
ह्या संवादात काही चूक वाटत नाही. ऑर्डर देताना एकदाच आणि क्लिअर द्यावी असे महागड्या हाटिलात देखील लिहिलेले असतेच की.
इथे खरेतर तुमच्याकडून "काय काय मिळु शकेल?" असा प्रश्न अपेक्षीत होता. म्हणजे पुढचा खुलासा मालकाला आपोआप झाला असता. इथे तुम्ही प्रश्न न समजुन घेता घाईघाईने माती खाल्ल्याचे स्पष्ट दिसुन येते.
टपरी पासून पंचतारांकीत पर्यंत सगळीकडे (सगळ्या शहरात) ऑर्डर दिल्यापासून ती तयार होउन येईपर्यंत कमीत कमी १५ मिनिटे लागतील असे ठळकपणे लिहिलेले कधी वाचले नाहीत काय ? मग उगा मालकासमोर बाजीरावकी कशाला ?
तुमच्या चेहर्याकडे बघुन आता त्यांना झाला असेल मोह नोटा तपासून घ्यायचा त्याला आता काय करणार ? बाकी २५ रुपायात २ घरगुती आम्लेट म्हणजे तुमचे पांचो उंगलीया घी मे और सर...
वरच्या संभाषणात मालकानी आश्वासन दिल्याचे कुठेही आढळून येत नाही.
+१ महामुर्ख सुद्धा चालले असते.
हे कुठले गणित बॉ ? उद्या दूधवाल्याने दूध आणायला कधी न्हवे ते दुपारी गेल्यावर "काय साहेब दूध काय बासुंदीला का आज ?" असे विचारल्यावर त्याच्याकडून दुध आटवुन, चारोळ्या/बदाम वगैरे घालुन मिळायची अपेक्षा करता का ?
बर मग ?
एक्स ? आमच्याकडे प्रेमभंगी माणसे दुसर्या पार्टिला हा शब्द वापरतात. पुणेकर हा फक्त पुणेकर असतो ! तो एक्स फेक्स वगैरे नसतो.
असो...
पुढच्यावेळी शिक्षणासाठी परदेशी जावे, इकडे येउन नये.
13 Aug 2010 - 1:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>स्वतःच्या लेखनाला भारंभार प्रतिसाद पडावेत,कुठेतरी आणि कशीतरी का होईना लेखनाची दखल घेतली जावी, धुरळा उडावा ह्यासाठी केलेला एक अतिशय खोडसाळ प्रयत्न.
तुमच्यासारखा हुशार पुणेकर कसा काय बळी पडला हो या कारस्थानाला? अनुल्लेखाने का नाही मारले?
असो, प्रत्येक वाक्याचा कीस पाडून, विनाकारण ओढून ताणून टीका करायची आणि कधी न पाहिलेल्या त्या मालकाची बाजू घ्यायची ही केविलवाणी धडपड कशासाठी हो ? केवळ हे सर्व पुण्यात घडले म्हणून? प. रा. साहेब, तुमचे काही जुने लेख वाचले आहेत. खूप छान लिहिता. कशाला असे प्रतिसाद देण्यात वेळ आणि क्रयशक्ती वाया घालवताय? काही तरी नवीन छान लिहा की. आम्ही त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडू. नक्की.
13 Aug 2010 - 2:16 pm | Pain
असो, प्रत्येक वाक्याचा कीस पाडून,
याला मुद्देसूद असे म्हणतात.
विनाकारण ओढून ताणून टीका करायची
विनाकारण शिव्या घातलेल्या चालतात, उत्तर दिले की पोटात का दुखते ?
कधी न पाहिलेल्या त्या मालकाची बाजू घ्यायची
तुम्ही इंटरनेटप्रेमीची बाजू का घेत आहात ? त्याला /तिला पाहिले आहे का ? बाजू घेण्यासाठी व्यक्तीला पाहणे हा तुमचा निकष असेल, आमचा नाही.
केविलवाणी धडपड कशासाठी हो
उगाच टीका आणि त्याचे समर्थन केविलवाणे आहे, प्रत्युत्तर नव्हे
केवळ हे सर्व पुण्यात घडले म्हणून?
रामायणानंतर रामाची सीता कोण असे प्रश्न पडत असल्यास संजय सिंघानियाशी संपर्क साधा.
कशाला असे प्रतिसाद देण्यात वेळ आणि क्रयशक्ती वाया घालवताय?
मला तर हा प्रतिसाद आवडला. इतरांनाही आवडला असेल. पण हा प्रतिसाद देउन इतरांना, इतरांच्या लेखनाला "अनुल्लेखाने मार" असा आपला उपदेश आपण स्वत: मात्र तो आचरणात आणत असल्याचे दिसत नाही.
13 Aug 2010 - 2:54 pm | असुर
>>>तुमच्यासारखा हुशार पुणेकर कसा काय बळी पडला हो या कारस्थानाला? अनुल्लेखाने का नाही मारले?
असो, प्रत्येक वाक्याचा कीस पाडून, विनाकारण ओढून ताणून टीका करायची आणि कधी न पाहिलेल्या त्या मालकाची बाजू घ्यायची ही केविलवाणी धडपड कशासाठी हो ?<<<
उत्तर इथे आहे. प.रा. यांच्या 'खव'मध्ये सापडले हो विश्वनाथभौ.
इंटरनेटप्रेमीगुरू, 12/08/2010 - 19:57
http://www.misalpav.com/node/13771
प.रा. सर प्लीज कमेंट द्याना.
इंटरनेटप्रेमीना एका अस्सल पुणेकराकडूनच प्रतिसाद हवा होता, आणि प.रा. यांनी तो दिला. आणि आपल्या मुद्द्यांची उकल ही pain यांनी केलेलीच आहे.
प.रा. किंवा pain यांची बाजू घ्यायचा प्रश्न इथे येतच नाही, कारण ते त्यांचे समर्थ आहेत. आपण फक्त इतिहासातले दाखले दाखवायचं काम केलं.
विषय संपला.
--असुर
13 Aug 2010 - 3:36 pm | सुहास..
खूप छान लिहिता. कशाला असे प्रतिसाद देण्यात वेळ आणि क्रयशक्ती वाया घालवताय? काही तरी नवीन छान लिहा की >>>
अशाच प्रकारच्या एका जुन्या खरडीच्या आठवणीने डोळे बादलीभर पाणवले , आणी त्याच बादलीत आम्ही ....च्या नावाने आंघोळ करून घेतली !!
धन्यवात !! (वात आणलाय पुणे-जळफळीने!! )
13 Aug 2010 - 2:03 pm | Pain
स्वतःच्या लेखनाला भारंभार प्रतिसाद पडावेत,कुठेतरी आणि कशीतरी का होईना लेखनाची दखल घेतली जावी, धुरळा उडावा ह्यासाठी केलेला एक अतिशय खोडसाळ प्रयत्न.
हे वाक्य प्रतिसादात चोप्य पस्ते करावे असे बरेच लेख सध्या येत आहेत. काही माणसे केवळ खून करणे बेकायदा असल्याने जिवंत आहेत तसे हे लेख आणि (त्यांचे लेखक) केवळ नियमात बसतात म्हणून उडवले जात नसावेत.
13 Aug 2010 - 2:09 pm | राजेश घासकडवी
चोप्य पस्ते - शब्दप्रयोग आवडला. :)
13 Aug 2010 - 2:17 pm | Pain
सॉरी. कॉपी पेस्ट म्हणायचे होते.
13 Aug 2010 - 2:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अय्या, मला वाटलं चोप्य पस्ते नावाचा काही स्पेश्शल खाण्याचा पदार्थ आहे का काय!!
13 Aug 2010 - 2:44 pm | राजेश घासकडवी
मला वाटलं होतं की
चोप्य - चोप देण्यायोग्य
पस्ते - बघ हं पस्तावशील असं काहीसं...
13 Aug 2010 - 2:56 pm | असुर
>>>चोप्य - चोप देण्यायोग्य
पस्ते - बघ हं पस्तावशील असं काहीसं...<<<
खल्लास!!!!
--असुर
13 Aug 2010 - 4:46 pm | हुप्प्या
अस्सल पुणेरी. मानले बुवा.
15 Aug 2010 - 3:40 am | इंटरनेटस्नेही
काही व्यक्तिगत कामांत व्यस्त असल्याने मी थोडक्यात प्रतिक्रिया देतो.
@
शेखर काळे,
दीपक कासुरे,
विश्वनाथ मेहंदळे,
राजेश घासकडवी,
बबलू,
बेसनलाडू,
वात्रट,
गोगोल,
विकास,
चिंतामणी,
अप्पाजोगळेकर,
नगरीनिरंजन,
प्रकाश घाटपांडे,
मनि२७
संजयशिवाजीगडगे,
हेमा,
३ _१४ विक्षिप्त आदिती
आणि सर्व अनामिक वाचक,
आपण माझ्या लेखाला आपुलकीने प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
-----------------------------------------------------------------------------------------
@
पाषाणभेद,
विजुभाऊ,
धनंजय बोरगावकर,
असुर,
केशसुमार,
पंगा,
सविता,
साधासुधासौरभ,
प्राजक्ताची फुले,
मृत्युन्जय,
मराठमोळा,
दत्ता काळे,
लिमाउजेट,
परिकथेतील राजकुमार,
सुहास..,
हुप्या,
पेन,
आणि ते सर्व अनामिक वाचक त्यांच्या मनात अशा स्वरूपाच्या भावना आहेत.
आपण /आपल्या पैकी काहींनी मांडलेल्या काही निवडक मुद्द्यांचा मी परामर्श घेतो:
1. हा लेख मी पुणेकरांवर टीका करण्यासाठी लिहिलेला नाही. प्रत्येक भारतीयाबद्दल मला सारखेच प्रेम आहे, आणि मला त्यांच्या संस्कृतीचा आदर आहे.
2. खरंतर, पुणे शहराशी आणि इथल्या मातीशी माझी भावनिक जवळीक आहे कारण पुणे हे विद्येचे माहेरघर असुन इथल्या 'चाणक्य मंडल परिवार' या भव्य आणि उदात्त हेतूने कार्य करणा-या संस्थेने माझे जीवन घडवले आहे.
3. सदर लेखाच्या सुरवातीला दिल्याप्रमाणे केवळ वाचकांचे मनोरंजन करणे हाच या लेखाचा एकमेव उद्देश आहे.
4. मी आदल्या रात्री सुमारे 03.30 वाजेपर्यंत अभ्यास करत असल्याने मला उशीरा पर्यंत (१४.२० पर्यंत) झोप लागली.
5. एकदा ऑर्डर दिल्या नंतर ती रद्द करणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे मालकांना गैरसोय झाली असती, किंवा तो पदार्थ वाया गेला असता, आपल्या देशात लोकसंख्येचा मोठा भाग अन्नाला मुकत असताना असे करणे मला योग्य वाटले नाही.
6. जेव्हा आपल्याला कोणत्याही अल्पोपहार गृहात ऑर्डर दिल्यानंतर विचारले जाते की, 'हा पदार्थ आपण कशाबरोबर खाणार?', तेव्हा आपण त्या प्रश्नाला उत्तर देतो आणि त्याला 'ठीक आहे' असे प्रत्युत्तर मिळते त्याचा अर्थ साहजिकच तो 'सोबतचा पदार्थ' देखील आपल्यला दिला जाईल असाच होतो. हे माझ्या लेखातील निम्नलिखित संवादातून स्पष्ट होते. :
"मा: बर कशाबरोबर खाणार पोळी का ब्रेड?
इं: ब्रेड.
मा: ठीक आहे, अर्ध्या तासाने या."
पण मालकाच्या वेंधळेपणाला, मीच काही गोष्टी गृहीत धरल्या असे म्हणून 'कव्हर' करण्याचा प्रयत्न अजिबात आवडला नाही.
7. १० रु. ची चाचणी घेतली; त्याबाबतीत माझे काही म्हणणे नाही. हे माझ्या 'असो' 'मधून स्पष्ट होते.
8. माझ्या माहिती प्रमाणे सदर ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची पाटी नव्हती.
पण तरी देखील, आपण माझ्या लेखाला आपुलकीने प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
15 Aug 2010 - 11:06 pm | मी-सौरभ
???
16 Aug 2010 - 1:54 am | शिल्पा ब
;)
16 Aug 2010 - 2:10 am | इंटरनेटस्नेही
@ मा. साधासुधासौरभ,
धागा संपलेला नाही. पण मला अपेक्षित असे सर्व प्रकारचे प्रतिसाद आले आहेत. मी समाधानी आहे. :)
@ मा. शिल्पा ब,
मला आपल्या ;) चा अर्थ कळला नाही.
@ वाचुन लुफ्त उठवणारे पण प्रतिसाद न देण्याचा मानभावीपणा करणारे सर्व सदस्य,
मी आपला विशेष आभारी आहे. लोभ असावा. :)
19 Aug 2010 - 5:13 pm | कर्ण
पुणेकर महन्जे विहीरीतले शहाणे आहेत....
19 Aug 2010 - 5:37 pm | लेखक
अनुभव मस्त आहे .... मला पन ओम्लेट खाव वतायल लागल अहे....काय करनार श्रावण चालु आहे.....!!!!
मला पण असाच एक अनुभव आहे ...एकदा मी पुण्यातल्या एका दुकानात आण्डी आहेत का विचरले ....तर उत्तर काय मिलाव " हे दुकान शाकाहारी आहे ....!! "
19 Aug 2010 - 5:59 pm | मधुकर
अरे हे तर काहिच नाय,
एकदा त्या चितळेच्या दुकानात जाऊन ये, मग कळेल पुणेरी प्रकार काय असतो तो.
तुमच्याकडे पैसे व ईच्छा आहे म्हणुन तुम्ही विकत घेऊ शकत नाही (ईथे अर्थशास्त्राच्या नियमाला छेद देणार दुकान आहे ते चितळे म्हणजे)
त्याला तुम्ही ग्राहक म्हणून आवडलात, त्याच्या नियमाचे पालन केलात व कसलिही कुरबुर न करता मान खालि घालुन दिलेलि वस्तु मुकाटयाने घेण्याची तयारी दाखविलात तरच तुम्हाला वस्तु मिळतील.
ये है पुणे.
19 Aug 2010 - 6:32 pm | मृत्युन्जय
त्याला तुम्ही ग्राहक म्हणून आवडलात, त्याच्या नियमाचे पालन केलात व कसलिही कुरबुर न करता मान खालि घालुन दिलेलि वस्तु मुकाटयाने घेण्याची तयारी दाखविलात तरच तुम्हाला वस्तु मिळतील.
म्हणजे नक्की काय करतात हो चितळे? माझ्या डोळ्यासमोर एकदम फुल्ल बाह्यांचा पांढराशुभ्र बनियान घातलेला जान्हवेधारी चष्मीश म्हातारा आला की जो दारात उभा राहुन आत येणार्या माणसाला नखशिखांत न्याहाळतो. आणि माणुस आवडला तर टीक करुन आत पाठवतो नाहीतर बाहेर रांगेत उभे करतो (इथे माझ्या डोळ्यासमोर असहाय्यपणे चेहेरा पाडुन उभे असलेले पुणेकर आले. त्यांच्या चेहेर्यावर एकुणच खुप दीन भाव असतो. आणि ते सारखे त्या म्हातार्याला "ओ मालक जाउ द्यात की आत. खुप दिवसात बाकरवडी खाल्लेली नाही आहे. घेउ द्यात की अर्धा छटाक" असे म्हणत असतात. चाणाक्ष नॉन पुणेरी वाचकांना ध्यानात आले असेलच की ग्राहक पुणेकर असल्यामुळे त्याची अर्धा छटाक पेक्षा जास्त बाकरवडी घ्यायची एकुण लायकी नसणारच. तर असो. खुप अवांतर झाले). त्यानंतर आत पाट्यांच्या जंजाळातुन वाट काढत (जे आत प्रवेश मिळण्यात सुदैवी ठरलेले असतात त्यांनाच फक्त) पाट्या वाचत वाचत आत जावे लागते. आत अजुन एक तस्साच म्हातारा असतो. तो परीक्षा घेतो की सगळे नियम (पाट्यांवर लिहिलेले) पाठ आहेत की नाही ते बघतो. त्यानंतर एक लेखी परिक्षा द्यावी लागते आणि पाटीवर (ग्राहकाने स्वतः आणलेल्या) मी चितळ्यांच्या नियमांचे पालन करेन असे १०० वेळा लिहावे लागते. एव्हढी सगळी दिव्ये पार केल्यावर काउंटरवरचा माणुस वस्सकन ओरडुन मान खाली घालायला सांगतो. आणि मग (मान खाली घातली गेली असेल तर) ग्राहकापुढे त्याला जी आवडेल ती वस्तु ठेवतो. ग्राहकाने जर बाकरवडीच हवी किंवा चिवडाच हवा असा आग्रह धरला तर परत एकदा वस्सकन ओरडतो " जे देतो आहे ते घ्यायचे असेल तर घ्या नाहीतर बाहेर व्हा आधी. वेळ वाया घालवु नका. बाहेर बरीच लोक वाट बघताहेत आम्ही जे देउ ते घेण्यासाठी" आणि मग ग्राहकाने ती वस्तु घेतली तर (घेतली तर म्हणजे काय घ्यावीच लागते न घेउन सांगतो कोणाला. पुढच्या वेळेस हे ही मिळायचे नाही) कॅश काउंटरवरचा माणुस प्रत्येक नोट आणि प्रत्येक नाणे सुर्यप्रकाशात धरुन ३ वेळा चाचपुन बघतो आणि मगच ग्राहकाला बाहेर पडायची परवानगी मिळते.
असेच होत असेल नाही का हो? तर्हेवाईकच शिंचे हे पुणेकर.
19 Aug 2010 - 6:35 pm | कानडाऊ योगेशु
एक बौध्दीक..
वरील प्रतिसादात एकुण किती कंस आहेत. (दाढी खाजवणारी स्माईली.)
- (नीरबुध्द) योगेश
19 Aug 2010 - 6:39 pm | मृत्युन्जय
सगळे पुणेकर "कंस"च असतात हो. कृष्ण नाहीच कोणी.
19 Aug 2010 - 11:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पेटलायस तू!
चितळ्यांच्या डेक्कनच्या दुकानातली सेवा आणि सिस्टम मलातरी जाम आवडली.
(अ-पुणेरी) अदिती
20 Aug 2010 - 12:33 am | मृत्युन्जय
हॅहॅहॅहॅहॅहॅ ... हे आपले असेच कधीतरी. पु लं नी म्हणले आहे ना पुणेकर होण्यासाठी पुण्याचा जाज्वल्य अभिमान असणे गरजेचे आहे म्हणुन. त्याचा प्रताप.
19 Aug 2010 - 6:33 pm | परिकथेतील राजकुमार
'चि' पहिली का दुसरी ह्याचा विचार करण्यात वेळ घालवला तर ऑन द स्पॉट त्या माणसावर ६ महिन्यांची बंदीपण आणतात म्हणे.
महा नाठाळ हे पुणेकर. मला तर कधी कोणी पुण्यात येऊ का विचारले तर मी सरळ सांगतो "*** जा ! पण पुण्यात येउ नका."