कधी कधी मे च्या प्रचंड उन्हामध्ये देखील पावसाचा हलकासा वर्षाव देखील मन हेलावून जातो असेच काहीतरी त्याच्या सोबत घडले होते, अस्ताव्यस्त राहाणारा, मित्राच्यात दंगा घालणारा, तासंन तास फोनवर बोलणारा तो अचानक दोन दिवसामध्ये बदला, गप्पा मारणे नाही, चुकून देखील फोन करणे नाही जेव्हा आम्ही फोन करु तेव्हा त्याचा फोन बिझी दिवस असो वा रात्र... व हाच बदल जवळ जवळ महिनाभर सर्वजण पाहत होते, काय झाले काय नाही ह्यावर चर्चा करत होते मित्राच्या गप्पामध्ये हॉट टॉपिक बनला होता व अचानक एक दिवस त्याचा फोन आला...
तो - अबे अडचण आहे मदत करशील का ?
मी- बोल लेका जवळ जवळ दिड महिन्याने तु माझी आठवण काढली आहेस... बोल काय मदत करु ? काय अडचण आहे ?
तो- बोलायचे होते तुझ्याशी...
मी- बोल.
तो- येथे असे फोनवर नाही... बसू कुठे तरी.. !
मी - चल संध्याकाळी डिडीआर वर एक टेबल तुला माहीतच आहे कोपरा.. !
तो- डन. सात वाजता.
मी- ठिक.
तो बरोबर सातच्या ठोक्याला पोहचला, त्यांची वाढलेली दाढी व त्याचा हाल पाहून समजले गडी कामातून गेला आहे... प्रेमात पडला आहे वाटतं... !
तो- हाय..
मी- हाय घाल तुझ्या तोंडात परत... राम राम !
तो- राम राम..
मी- बोल लेका काय घेणार ?
तो- बियर.. हॅनी कॅन.
मी- ठिक. वेटर... एक हॅनी कॅन, एक फोस्टर.
तो- अरे यार... कसे सांगू !
मी- तोंडाने सांग.. व सरळ सरळ सांग.. गोल गोल फिरु नकोस व फिरवू नकोस.
तो- ह्म्म.. मला एका मुलीवर प्रेम आहे..
मी- तुझा अवतार बघून समजले... पुढे.
तो- यार ती पण माझ्यावर प्रेम करते आहे...
मी- गुड... मग अडचण कुठे... १८ वर्षापेक्षा मोठी आहे ना ती ;)
तो- अरे यार... तु जोक करु नकोस.. हाल खराब आहे माझा..
मी- चल ओके बोल.
तो- हे बघ.. मला ती मागील महिन्यात भेटली होती ५ मे ला.
मी- तरीच तु मागील महिन्यापासून भेटला नाहीस आम्हाला... बढिया है.. !
तो- अरे वेळच मिळत नव्हता... तर मी काय म्हणत होतो... ती मला पाहताच क्षणी आवडली..
मी- गुड... पुढे काय ?
तो- मी तीची मदत केली एका कामासाठी तेव्हा पासून बोलणी चालू केली.
मी- काय मदत केलीस ?
तो- काही नाही तीला काही हार्डवेअरचे सामान घ्यायचे होते पण तीला समजत नव्हते व मी जवळच होतो तेव्हा मदत केली..
मी- पुढे..
तो- तीचे खरीदी काम झाल्यावर मी व ती एकत्र कॉफी घेतली व ओळख झाली...
मी- मग तु नंबर घेतलास... तुम्ही फोन वर बोलू लागलात.... चार दिवसाने तीला पण वाटले की तिला तु आवडतोस.... पुढे बोल.
तो- अबे, तुला कसे कळाले ?
मी- चल.. चल... पुढे सांग.. !
तो- पण येथेच अडचण आहे.. यार.. तीचे आधी कोणावर तरी प्रेम होते व त्यांचा ब्रेक-अप झाला होता..
मी- मग ? त्यात अडचण काय ?
तो- मला देखील काही अडचण नाही यार.. पण ती त्याला अजून पुर्ण विसरली नाही आहे... !
मी- त्यांचे लफडे कुठेवर पोहचलं होतं ?
तो- लग्नाच्या तयारीत होते...
मी- मग काय बिनसलं ?
तो- ती तयार... मुलगा पुळचट निघाला.. तो घाबरला व बाजूला झाला..
मी- ह्म्म्म. कुत्र्याच्या जातीचा असेल... पुढे सांग..
तो- मी तिला म्हणालो मला काही हरकत नाही आहे ना माझ्या फॅमेलीला...
मी- तु घरी विचारलेस ?
तो- हो. आई तयार आहे बाबाची काही अडचण नाही.
मी- मुलगी कशी आहे ?
तो- मस्त आहे... मनमिळावू आहे...
तो- तीचे अजून कुठे मन मिळलेले आहे ह्याचे काय खोदकाम केलेस की नाही ?
तो- गरज पडली नाही... मला विश्वास आहे तीच्यावर.. !
मी- माय गॉड... चल म्हणजे गाडी खुपच पुढे गेली आहे तर... लगे रहो !
तो- अरे असे काय नाहि... ! पण मला विश्वास आहे.. !
मी- ठिक बोल पुढं.
तो- तीला पण आहे माझ्यावर विश्वास.
मी- ह्म्म्म... मग अडचण काय आहे !
तो- तीचा बाप व तीचा तो एक्स प्रियकर.
मी- काय ?????
तो- तीचा बाप तयार नाही आहे... व तीचा प्रियकर हिला सोडायला तयार नाही आहे.. ती विचित्र हालत मध्ये आहे.
मी- काय बी नाय समजले राव आम्हाला... परत एकदा समजव.
तो- हीने घरात त्याच्यासाठी खुप भांडण केले... वर्षभर घरी बोलली नाही... जे करता येईल ते केले..
मी- ह्म्म्म.
तो- शेवटी तीचे वडील तयार झाले पण तो मुलगा त्यांना भेटायला गेलाच नाही ... म्हणाला त्याच्या घरात अडचण आहे.. !
मी- ओह तेरी... मुलगी डेरिंगबाज आहे राव.. पुढे.. !
तो- हो आहे... खरं. आता तीचा प्रियकर तिला रोज फोन करत आहे व मरणाची धमकी देत आहे...
मी- ह्म्म्म, इमोशनल ब्लॅकमेल करत आहे म्हण ना सरळ.
तो- हो यार.... तीला ह्यासर्वाचा त्रास होत आहेच पण आता तीच्या मुळे मला देखील खुप त्रास होत आहे...
मी- का, तुला काय अडचण ?
तो- अरे त्याला तर मी एकटाच काफि आहे रे पण ही म्हणते जो परत तीचे वडील हो म्हणत नाहीत तो पर्यंत लग्न करणार नाही.
मी- ह्म्म्म्म. व तीचा बाप आता लव्ह मॅरेज साठी तयारच नसणार ते पण दुस-या मुलाशी... गुड !!!!!
तो - व्हॉट गुड यार. माझा हाल खराब होत आहे...
मी - एक काम कर माझी मिटींग ठेवतोस का तीच्या बरोबर ? फोन वर अथवा प्रत्यक्ष.
तो- हो नक्कीच. ह्यासाठीच तुझ्याकडे आलो आहे यार.. !
मी- ह्म्म्म, शनीवार. वेळ तु ठरव. जागा ठरव व बील तु भर. ;)
तो- नक्की. मी आताच बोलतो तीच्याशी.
मी- नको. माझा उल्लेख करु नकोस.
तो- ठिक आहे.
त्याने शनीवारची वेळ मागीतली तीच्याकडे व तीने वेळ दिला व आम्ही शनिवारी भेटलो. ती, तो व मी.
तो- हा राज. माझा खास मित्र.
ती- नमस्कार... !
मी-नमस्कार... बरं वाटलं नमस्ते एकून मला वाटलं तू पण हाय करतेस की काय..
ती- असे काही नाही.. मला नमस्ते आवडते.
मी- तू एक काम करे .. जा जरा फिरुन ये तास भर.
तो- ठीक. तु काळजी करु नकोस मी येथेच आहे आसपास मनमोकळेपणाने बोल.
मी- ती माझ्या सोबत आहे तु काळजी करु नकोस... जा.
ती- पण...
मी- काळजी नको. मी तुला खाणार थोडीच आहे व आपण जे खाणार आहोत त्याचे बिल तो भरेलच ;)
ती- हा हा.. ठिक आहे.
मी- तो म्हणतो तसा तु एकदम मनमिळावू स्वभावाची आहेस ह्याची खात्री पटली मला.. चल आता तुमच्या प्रॉब्लेमवर येऊ सरळ.
ती- तुम्हाला त्याने सर्व काही सांगितले असेलच ना.
मी- हो, पण तरी ही काही गोष्टी तुमच्याकडून माहीती व्हाव्यात अशी अपेक्षा.
ती- विचारा.
मी- तु मला तु करुनच बोल व मी देखील तुच बोलेन...
ती- ठिक आहे, विचार तु.
मी- गुड... तुझे व तुझ्या त्या एक्स-प्रियकराबद्दल सांग...
ती- तो माझ्यावर खुप प्रेम करतो... पण घरुन सपोर्ट मिळत नाही आहे त्यामुळे...
मी- तुला का वाटते की त्याचे तुझ्यावर खुप प्रेम आहे ?
ती- म्हणजे ? मी समजले नाही...
मी- असे काही तरी असेलच ना ज्यामुळे तुला वाटतं की त्याचे तुझ्यावर खरोखर प्रेम आहे..
ती- तो माझी काळजी घेतो.. मला काय हवं काय नको ते पाहतो... व जिवापाड प्रेम करतो..
मी- व तु ?
ती- मी पण.. स्वारी.. ! मी पण करत होते..
मी- मग आता अचानक असे काय झाले ?
ती- मी त्याच्या मागे काही दिवसापासून लग्न करु म्हणून मागे लागले होते.. चार वर्ष झाली आमच्या प्रेम प्रकरणाला.. !
मी- ह्म्म्म बरं मग.
ती- पण तो आपल्या घरी विचारायला तयारच नाही आहे... म्हणतो आई म्हणेल तेथेच लग्न करेन..
मी- ह्म्म्म, पुढे.
ती- मी त्याच्या साठी घरी भांडले.. बाबाच्या समोर कधी माझा आवाज निघत नव्हता त्याच्या समोर मी धडधडीतपणे सांगितले ... सर्व.
मी- बढिया... प्यार किया तो डरना क्या.. !
ती- तसे नाही रे.. माझ्या घरी माझ्यासाठी मुले शोधण्याचे काम सुरु झाले होते म्हणून मी गडबड करत होती..
मी- मग पुढे काय... झाले. !
ती- मी त्याच्या समोर रडले.. दंगा केला.. जे जे करु शकते ते केले पण तो तयार झाला नाही.. ! व मागील चार महिन्यापासून त्याने बोलणेच बंद केले.
मी- ओके. मग..
ती- मग मी पण त्याला सोडले व ब्रेकअप केला.
मी- गुड ! पुढे.
ती- मग मागिल महीन्यात हा भेटला... त्याला मी आवडली व मला तो... !
मी- ह्म्म्म.
ती- ह्यांने दोन आठवड्यातच घरी विचारले... व त्याला चार वर्षात हे कधीच जमलेच नाही.
मी- ह्म्म्म... ह्याला मी चांगला ओळखतो... तु सांग पुढे.
ती- आता त्याला परत माझी आठवण आली आहे व तो रोज मला फोन करत आहे व सांगत आहे मला वेळ दे मी घरी बोलतो..
मी- ओ तेरी... पुढे.
ती- आता तुच सांग मी काय करु ? त्याला मी सोडले तरी तो माझ्या मागे पडला आहे..
मी- हे बघ... एक सांग आधी तुझ्या मनात काय चालू आहे.
ती- मी त्याला विसरु शकत नाही आहे व ह्याला सोडू इच्छीत नाही आहे...
मी- दोन दगडावर पाय नको ठेऊ.. पडशील.
ती- मला कळते रे ते सर्व पण.. काय करु.
मी- तुझ्या त्याच्याशी तुझे संबध कुठ पर्यंत पोहचले होते ?
ती- सर्वस्व दिले मी त्याला..
मी- ह्याला सांगितले आहेस हे ?
ती- हो. सर्व काही.
मी- ह्म्म्म्म, गुड. हा काय म्हणतो आहे त्या बद्दल.
ती- त्याला हरकत नाही आहे..
मी- देन गुड.
*********
कुणाला ह्यावर काही मार्ग सापडतो आहे काय ? तीने काय करावे ? त्याने काय करावे ? तीच्या वडिलांचे काय करावे ? तीच्या त्या एक्स-बॉय चे काय करावे ?????
***********
क्रमशः
पुढील भाग / मागील काही लेखमालांचे भाग उद्या व परवा नक्की.
प्रतिक्रिया
19 Jun 2009 - 6:13 pm | अवलिया
>>>पुढील भाग / मागील काही लेखमालांचे भाग उद्या व परवा नक्की.
या भागातील प्रश्नांचे उत्तर उद्या व परवा नक्की.
19 Jun 2009 - 6:17 pm | दशानन
=))
अरे खरचं लिहले आहे सर्व... उद्या तीन भाग लगातार ;)
थोडेसं नवीन !
19 Jun 2009 - 6:17 pm | दशानन
=))
अरे खरचं लिहले आहे सर्व... उद्या तीन भाग लगातार ;)
थोडेसं नवीन !
19 Jun 2009 - 6:22 pm | अवलिया
हम्म.
बाकी, तु मंदीवर मात करण्यासाठी समुपदेशकाचा धंदा चालु केला असल्यास देव तुझे भले करो !
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
19 Jun 2009 - 6:56 pm | वेताळ
एकदम गाडी स्पीड पकडते व एकदम ब्रेक लागतो...आता पळवा गाडी लवकर राजे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
19 Jun 2009 - 6:59 pm | निखिल देशपांडे
राजे अजुन एक लेखमाला चालु....
ह्या राजेचा लफडा काय साला???
क्रमशः
पुढील भाग / मागील काही लेखमालांचे भाग उद्या व परवा नक्की.
कोणी विश्वास ठेवेल का ह्याचा वर???
==निखिल
19 Jun 2009 - 7:19 pm | मराठमोळा
काय राव राजे!! हा काय विक्रम वेताळचा एपिसोड आहे का? उर्वरित पुढच्या भागात. ;)
नानांनी पण मागच्या विक्रम वेताळ गोष्टीचे उत्तर अजुन दिले नाही. :(
असो,
कुणाला ह्यावर काही मार्ग सापडतो आहे काय ? तीने काय करावे ? त्याने काय करावे ? तीच्या वडिलांचे काय करावे ? तीच्या त्या एक्स-बॉय चे काय करावे ?????
माझ्या मते तिने सारखा निर्णय बदलणार्या, आणी मरणाची भिती घालणार्या घाबरट जुन्या प्रियकराला लाथ मारावी, एक कानफाडात मारावी आणी स्वतःच्या वडिलांना विश्वासात घेऊन तुमच्या मित्राबरोबर लग्न करुन मोकळे व्हावे.
बाकी ही स्टोरी "जब वी मेट" ची आहे.. ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
20 Jun 2009 - 9:19 am | दशानन
>>बाकी ही स्टोरी "जब वी मेट" ची आहे..
=))
काय राव इतक्या बकवास चित्रपटाबरोबर माझी कथा तुम्ही कंपेयर करत आहात :D कुछ तो रेप्युटेशन का खयाल करो =))
थोडेसं नवीन !
20 Jun 2009 - 9:25 am | अवलिया
तु़झा आणि रेप्युटेशनचा काय संबंध ? काहीही !
आणि हो,बाकी चालु दे निवांत... :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
20 Jun 2009 - 4:01 am | पोलिसकाका_जयहिन्द
मला कलालेच नाही... ही श्टोरी "जब वी मेट" ची आहे.
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
20 Jun 2009 - 9:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समुपदेशकाचे काम व्यवस्थित चालू आहे, येऊ दे पुढचा भाग लवकर !
20 Jun 2009 - 9:33 am | दशानन
आम्ही नाय बॉ समूपदेशक... आम्हीतर खांदेकरी... फक्त खांदा देतो.. :D
थोडेसं नवीन !
20 Jun 2009 - 9:36 am | अवलिया
आधी खंजीर खुपसता आणि मग खांदे देता :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
20 Jun 2009 - 9:54 am | वेताळ
पुढच्या भागात राजेचा मनमोकळेपणा बघुन ती मुलगी राजेंच्या प्रेमात पडली व पहिल्या दोघाना ठेंगा दाखवला की काय?असे झाले असेल तर मात्र राजे पासुन सावध राहयला पाहिजे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
20 Jun 2009 - 10:56 am | अवलिया
तुला सावध रहाण्याचे काय कारण बुवा?
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ या कॅटेगरीतल्या मुलींकडे राजे बघत नाही (असे मला वाटते)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
20 Jun 2009 - 11:28 am | दशानन
>>>खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ या कॅटेगरीतल्या मुलींकडे राजे बघत नाही (असे मला वाटते)
=))
हाणतिच्यामायला....
नाना, "दोस्ताना" मुळे लोकांना काही तरी वेगळाच झटका येत आहे.... :D
थोडेसं नवीन !
22 Jun 2009 - 4:47 pm | मसक्कली
हा हा हा............ =))
मला वट्तय कि जर त्यानच प्रेम खर आहे तर त्यनि लग्न करायला कहिच हर्कत नाहि.........!!
त्या घबर्गुन्द्याला दे सोदुन त्या वेळी तो तुला नहि समजु शकला नि आता परत आला का हक्क गाजवयला......... X( जा म्हनाव
आता मि मझा निर्नय घेतलाय ....
माझ आयुश्य मि माझ्या मना प्रमनेच जगेल . मित्राला म्हनाव कर लग्न...
त्याला स्पस्ट सन्गुन ताक म्हनाव ....
माला माझ आयुश्य जगु दे नीट्....आस सन्ग तिला... ;)
बकि तुमि समजदार असहतच......... B)
योग्य निर्नय घ्या नि मोकले व्हा पट्कन........... :)
22 Jun 2009 - 4:48 pm | मसक्कली
हा हा हा............ =))
मला वट्तय कि जर त्यानच प्रेम खर आहे तर त्यनि लग्न करायला कहिच हर्कत नाहि.........!!
त्या घबर्गुन्द्याला दे सोदुन त्या वेळी तो तुला नहि समजु शकला नि आता परत आला का हक्क गाजवयला......... X( जा म्हनाव
आता मि मझा निर्नय घेतलाय ....
माझ आयुश्य मि माझ्या मना प्रमनेच जगेल . मित्राला म्हनाव कर लग्न...
त्याला स्पस्ट सन्गुन ताक म्हनाव ....
माला माझ आयुश्य जगु दे नीट्....आस सन्ग तिला... ;)
बकि तुमि समजदार असहतच......... B)
योग्य निर्नय घ्या नि मोकले व्हा पट्कन........... :)
22 Jun 2009 - 4:48 pm | मसक्कली
हा हा हा............ =))
मला वट्तय कि जर त्यानच प्रेम खर आहे तर त्यनि लग्न करायला कहिच हर्कत नाहि.........!!
त्या घबर्गुन्द्याला दे सोदुन त्या वेळी तो तुला नहि समजु शकला नि आता परत आला का हक्क गाजवयला......... X( जा म्हनाव
आता मि मझा निर्नय घेतलाय ....
माझ आयुश्य मि माझ्या मना प्रमनेच जगेल . मित्राला म्हनाव कर लग्न...
त्याला स्पस्ट सन्गुन ताक म्हनाव ....
माला माझ आयुश्य जगु दे नीट्....आस सन्ग तिला... ;)
बकि तुमि समजदार असहतच......... B)
योग्य निर्नय घ्या नि मोकले व्हा पट्कन........... :)
22 Jun 2009 - 4:48 pm | मसक्कली
हा हा हा............ =))
मला वट्तय कि जर त्यानच प्रेम खर आहे तर त्यनि लग्न करायला कहिच हर्कत नाहि.........!!
त्या घबर्गुन्द्याला दे सोदुन त्या वेळी तो तुला नहि समजु शकला नि आता परत आला का हक्क गाजवयला......... X( जा म्हनाव
आता मि मझा निर्नय घेतलाय ....
माझ आयुश्य मि माझ्या मना प्रमनेच जगेल . मित्राला म्हनाव कर लग्न...
त्याला स्पस्ट सन्गुन ताक म्हनाव ....
माला माझ आयुश्य जगु दे नीट्....आस सन्ग तिला... ;)
बकि तुमि समजदार असहतच......... B)
योग्य निर्नय घ्या नि मोकले व्हा पट्कन........... :)
22 Jun 2009 - 4:48 pm | मसक्कली
हा हा हा............ =))
मला वट्तय कि जर त्यानच प्रेम खर आहे तर त्यनि लग्न करायला कहिच हर्कत नाहि.........!!
त्या घबर्गुन्द्याला दे सोदुन त्या वेळी तो तुला नहि समजु शकला नि आता परत आला का हक्क गाजवयला......... X( जा म्हनाव
आता मि मझा निर्नय घेतलाय ....
माझ आयुश्य मि माझ्या मना प्रमनेच जगेल . मित्राला म्हनाव कर लग्न...
त्याला स्पस्ट सन्गुन ताक म्हनाव ....
माला माझ आयुश्य जगु दे नीट्....आस सन्ग तिला... ;)
बकि तुमि समजदार असहतच......... B)
योग्य निर्नय घ्या नि मोकले व्हा पट्कन........... :)
22 Jun 2009 - 6:38 pm | चंबा मुतनाळ
मसक्कली बाई/बुवांचा परिच्छेद पाठांतराला ठेवला आहे का? की रोज ५ वेळा म्हणायचा आहे?
8 Jul 2009 - 4:40 pm | मि माझी
खुप हसू आल हे वाचून.. :)) :)) :)) :))
16 Sep 2009 - 5:31 pm | सुबक ठेंगणी
ह ह पु वा...
=)) =)) =)) =))
8 Jul 2009 - 2:12 pm | विजुभाऊ
पूर्वी श्री नावाचे एक साप्ताहीक यायचे. हल्लीच्या संध्यानन्दचे मोठे भावन्ड म्हणाना. त्यात हे असले एक सदर "ताईचा सल्ला" या नावाने यायचे.
श्री साप्ताहीक होते मात्र भन्नाट. आजतक्/आय्बीएन ७ ची कॉपीच.
"पहा माणसे होतात सापात रुपान्तरीत" या हेडिंग खाली स्नेक चित्रपटाची स्टोरी असायची
8 Jul 2009 - 3:27 pm | ब्रिटिश टिंग्या
त्या पोरीने जुन्या प्रियकराला सर्वस्व दिल्याचे माहिती असुनही नवा प्रियकर तिच्यावर प्रेम करीत आहे हे पाहुन प्रेम आंधळे असते याची प्रचिती आली!
- (डोळस) टिंग्या
8 Jul 2009 - 3:50 pm | विजुभाऊ
सर्वस्व म्हणजे काय रे टिंग्या भौ
8 Jul 2009 - 5:22 pm | ब्रिटिश टिंग्या
हे म्हणजे डोक्यावरचे केस गळुन गेल्यावर शॅम्पु विकत घ्यायचा मोह होण्यासारखे आहे!
- (केसाळ) टिंग्या
8 Jul 2009 - 5:33 pm | विजुभाऊ
तु हापीसात सर्वस्वासोबत शाम्पु वापरून काम करतोस हे माहीत नव्हते. मला वाटले की तू हापीसात फक्त सर्वस्वच अर्पून काम करतोस
8 Jul 2009 - 5:35 pm | परिकथेतील राजकुमार
मला वाटले की तू हापीसात फक्त सर्वस्वच अर्पून काम करतोस
कोणाला अर्पून ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
8 Jul 2009 - 4:42 pm | विमुक्त
प्रेम म्हणजे प्रेम असत...तुमच आमच सेम नसत.....
नया है..तो बेहतर है.... जुन्याला विसर म्हणाव.. नवा बरा आहे...
आणि अस कस जुन्याला विसरता येत नाही?... मग नव्या वर प्रेम कस जडल?... प्रेम आहे की नुसताच गेम आहे?....
8 Jul 2009 - 5:03 pm | परिकथेतील राजकुमार
राज्या तुला फाटक्यात पाय घालायला सांगते कोण रे ?
मेल्या स्वतःचे जुळवायचे बघ आधी मग लष्कराच्या भाकर्या भाज.
सल्लागार
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
16 Sep 2009 - 4:58 pm | स. न. वि. वि.
राजे सावध असा... रात्र वैरयाची आहे... दगाफटका होणे आहे...!!! :T
17 Sep 2009 - 3:03 am | पाषाणभेद
काय पण लोकं असतात. कहाणी जुनी असेल तर त्यांचे किती दिवस टिकले ते पण सांगा.
आणि लवकर टाका पुढला भाग. तुम्हाला वेळ नसेल तर मला कथा टाईप करून मला द्या, मी तुमचे नाव टाकून पुढला भाग टाकतो.
:-)
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या