ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -३

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
30 Aug 2009 - 8:11 pm

मागील भाग.. २

हम्म्म... थोडे थोडे कळाले आहे.. तुला काय सांगायचे आहे ते... पण जरा क्लियरली सगळे पुन्हा सांगशील का मला ?
ही एवड्या स्पीड मध्ये बोलते.. की काही मुद्दे कळतच नाहीत... खरं तर मला कळतं.. पण तिचा आवाज पुन्हा पुन्हा माझ्या कानावर पडू दे म्हणून मी जवळ जवळ प्रत्येक गोष्ट.. रिपीट करायला लावतो.. मी.. हे तीला कसे कळणार. मला वाटतं ती मला अजून पण मंदच समजते... व विसराळूपण.... विसराळू आहे.. पण मंद.. ह्मम्म मी नाही... आता राहिली तीची अडचण... मोठी अडचण आहे... काय करु शकतो हे बघावे लागेल.. हिला संध्याकाळी फोन करायला सांगतो.. म्हणजे तो पर्यंत मला पण वेळ मिळेल..

*****
चल, मी नंतर कॉल करते मम्मीचा फोन येत आहे...
हा मदत तरी काय करणार ? काही कळत नाही आहे कसे होणार आहे माझे... देवा माझी मदत करे !

*****

ह्म्म, ठीक आहे एक काम कर... संध्याकाळी फोन कर. तो पर्यंत मी बघतो, काय करु शकतो ते... चल बाय !
झालं लागली आजच्या दिवसाची वाट्... यार काय होणार तुझे... देवा माझी मदत कर रे.. तुच सहारा मला !

*****
चल बाय.. बाय.. मी संध्याकाळी कॉल करते तुला.
किती अजीब माणूस आहे हा... एकदा पण विचारले नाही.. मागे अचानक का गायब झाले ते... विसरला असेल... !

*****
अरे.. नऊ वाजले फोन नाही आला तीचा.. हरकत नाही.. चल टेक ड्रिंक & डिनर..

*****
ही दिवटी कधी जेवणार कधी झोपी जाणार... बाबांनी हिला का माझ्या छातीवर बसवले आहे .. काय कळत नाही... हा तुझे प्रताप बघूनच लहान बहीणीला तुझ्या बरोबर सोडले आहे.. !
देवा... त्याला झोपु देऊ नकोस रे.... तो एकदा झोपला की.. की मेल्यात जमा होतो.. मग जगात आग लागो.. वा भुकंप होवो... त्याला उठवणे अशक्यच.

*****

अरे ती जेवण करुन मग फोन करेल रे... तुला का काळजी लागली आहे बे ? करेल तर करेल कॉल... नाही तर नाही करेल... आता किती वेळा फोन बघणार आहेस.. वाजला तर तुला कळेलच ना... मुर्ख ! मला झोप येऊ लागली यार... पाऊणे ११ वाजले.. आता... आज जेवण पण गोड लागलं नाही... मला वाटतं पॅग जरा जास्तच झाले... झोप आता... उद्या पाहू... माझा लायटर कुठे आहे यार... सिगरेट !

*****

साडे आकरा वाजले... ती दिवटी आता झोपली... त्याला कॉल करते.... रिंग रिंग रिंग... फक्त रिंग होत आहे... अरे देवा... झोपला की काय !
शट.. पन्नास कॉल झाले असतील... आता हा उद्या सकाळीच सातला उठणार.... चल एक शेवटा कॉल करुन बघते.. नाही तर मी पण जाते झोपायला...

*****

अरे.. उठ.. फोन वाजत आहे बघ.. एवढ्या रात्री कोण कॉल करत असेल यार... ओह शट.. ती असेल... उचल उचल फोन.... शट... कट झाला.. बाप रे... किती ह्या मिस्ड कॉल्स.. माय गॉड.. क्रेझी आहे हे नक्की ही मुलगी... किती वाजले... साडे बारा... . कॉल करु कि नको... एक कॉल करुन पाहू.. उचलला तर ठीक.. नाही तर.. उद्या पाहू....

*****

मुर्खा तु एकदम मजेत झोपला आहेस.... मी केव्हा पासून कॉल करते आहे.. तुला !
ओह्...त्याला मी मुर्ख म्हणाले... तो रागावणार तर नाही ना.. मी पण ना कधी कधी मुर्खासारखे बोलून जाते.... दिवस भर काम करुन आला असेल... झोप लागली असेल त्याला.. तु पण ना.. त्याच्यावर तुझा कुठला हक्क नाही आहे हे तु का विसरतेस सारखे सारखे... तो फक्त मित्र आहे तुझा....

*****

स्वारी यार... तुला माहीत आहे.. माझी झोप.. ओह ... गॉड.. स्वारी... माझं डोकं.. भणभणतयं... !
काही कळत नाही आहे.. डोके एकदमच गरगरत आहे... ती नीमोसुलाईड कुठे पडली आहे काय माहीत...
शट.. पाण्याची बाटली... किचन मध्ये.. आता उठावे लागणार.. .. हे काय फुटलं आता... ग्लास ! ओह गॉड... लागली वाटतं काच.. !

*****

अरे किती किती धडपडतो आहेस वेंधळ्यासारखा ... हे काय फुटलं.. काच लागली का तुला.. अरे देवा.. ह्या मुलाचे मी काय करु... तुला काही अक्कल... आधी लाईट लावून नाही का उठता येत तुला..
किती वेंधळा आहे हा... जरा पण बद्दलला नाही... आता बँडेज शोधणार... मिळणार नाही.. डेटॉल.. असेल का त्याच्या जवळ.. असेल ! किती लागले असेल.. रक्त खुप येत असेल का ? शट... वेंधळाच आहे..

*****

अगं.. जास्त नाही थोडी काच लागली.. पायाला.. लाईट लावायला विसरलो... !
हि जरा जास्त करते नाही.. थोडंच तर लागलं आहे... लाइट चालू करतो आधी.. ओह शट... चांगले अर्धा ईच काच आत घुसली आहे बे... नशे मुळे तुला आता काही त्रास होत नाही आहे... सकाळी बस.. बोंबलत.. शट.. शट.. बँडेज आहे .. तुझ्या घरी ब्रॅन्डी सापडेल... पण बँडेज.. नो वे.. चल ते डेटॉल असेल बाथरुम मध्ये.. ते लावा व पडा उताणे... बये तु बोल.. माझं असेच चालू राहणार.. धडपडणे..

*****

जास्त लागले का रे तुला ? तु पण ना स्वतःची काळजी घेत नाहीस.. तुझी मी तेथे असती ना एकदम सरळ केले असते तुला....
हा पण ना... पण कधी कधी ह्याचा वेंधळे पणा मला खुप आवडतो.. तर कधी कधी खुप त्रास देउन जातो... त्या हिरोला काही लागलं तर्.. मला जास्त काही वाटत नाही.. पण ह्याला लागल्यावर मी का घाबरली... ये.. ये... कम बॅ़क.. तु त्याच्या जवळ मदती साठी फोन केला आहेस... नो एटॅचमेंट्स... बॅक बॅक.. तु पण ना.. तुझं काही खरं नाही ... !

*****

क्रमश :

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

पोलिसकाका_जयहिन्द's picture

30 Aug 2009 - 8:20 pm | पोलिसकाका_जयहिन्द

हा भाग पण क्रमश: :O

जो पर्यंत सम्पुर्ण गोष्ट येणार नाही....तो पर्यंत आम्ही वाचणार नाही... :-) :-)

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

सुबक ठेंगणी's picture

31 Aug 2009 - 12:01 pm | सुबक ठेंगणी

तुमच्या हिरो-हिरविणींची लफडी आणि आम्हीच गुंतत चाल्लोय्...लवकर लिहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2009 - 4:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>तुमच्या हिरो-हिरविणींची लफडी आणि आम्हीच गुंतत चाल्लोय्...लवकर लिहा

दशानन's picture

31 Aug 2009 - 5:29 pm | दशानन

=))

बरं बरं.... लिहतो ;)

अवलिया's picture

31 Aug 2009 - 9:32 am | अवलिया

राजे ......

तु पण ना.. तुझं काही खरं नाही ... !
येवु दे पटापट सगळे पेंडीग भाग....
पुढे पितृपक्षात खीरवडा खायला जायचे आहे आपल्याला ! वेळ नाही मिळणार बिल्कुल ! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

निखिल देशपांडे's picture

31 Aug 2009 - 12:47 pm | निखिल देशपांडे

राजे....
पुढचा भाग लिहा लवकर....

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आलयावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

सहज's picture

31 Aug 2009 - 12:55 pm | सहज

हे राम! राजे तुम्हाला कोणतरी चावले आहे. नुकतेच कुठल्या एमएलएम सेमीनार ला गेला होता का?

बाकी पोलीसकाकांशी सहमत! जय हिंद!

ऍडीजोशी's picture

31 Aug 2009 - 1:48 pm | ऍडीजोशी (not verified)

ओ राजे काय चाललंय, पटापट टाका की पुढचे भाग. उत्सुकता वाढवून का टांगवून ठेवताय?

सूहास's picture

31 Aug 2009 - 3:01 pm | सूहास (not verified)

पुढचा ...

सू हा स...

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

24 Sep 2009 - 10:21 am | अमित बेधुन्द मन...

पटापट टाका की पुढचे भाग. उत्सुकता वाढवून का टांगवून ठेवताय?

परिकथेतील राजकुमार's picture

24 Sep 2009 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

वाह !

हा भाग एकदम...

क्रमशः

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मसक्कली's picture

24 Sep 2009 - 3:40 pm | मसक्कली

:W

वाट पाह्ते पुधच्या भगाचि...येउ द्या पट़कन

लवंगी's picture

25 Sep 2009 - 2:49 am | लवंगी

:W

दशानन's picture

25 Sep 2009 - 8:31 am | दशानन

एवढ्या रागाने का पुढे काय म्हणून विचारत आहात... अहो प्रेम कथा भुतकथा नाही आहे =))

***
राज दरबार.....

लवंगी's picture

25 Sep 2009 - 9:14 am | लवंगी

वेट कराव लागल कि आम्ही अमळ रागावतो..

दिपाली पाटिल's picture

25 Sep 2009 - 10:16 am | दिपाली पाटिल

पुढे???

:W

दिपाली :W