ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -१

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
17 Jun 2009 - 9:47 am

कधी कोण आपलं वाटेल व कधी कोणी आपल्या मनातील अंधा-या जागे मध्ये ज्योत घेऊन येईल हे समजणे खुपच अवघड... प्रेमाची रुपेच निराळी.. प्रत्येक नजरेने वेगळी दिसणारी... प्रेमाची अवस्थाच निराळी, प्रेम कुठे व कसे भेटेल हे त्या कामदेवाला देखील माहीत नसावे.. तो मोका साधतो व तीर चालवतो.. नजरेला नजर भिडते व प्रेम होते... ही सर्वमान्य अवस्था.. पण जगात सर्व काही एवढं सोपं नसत की दोन ओळी मध्ये कथा समाप्त... खुप संघर्ष असतो.. काही युध्द लढावी लागतात मनाशी... जनाशी.. तेव्हा कुठे यशस्वी प्रेम भेटतं.. अशीच एक छोटी कहानी... त्या दोघांची ! यशस्वी होऊन समाप्त होईल की अयशस्वी होऊन कुठे तरी समाप्त होईल माहीत नाही कारण येथे सर्व काही सुपरफास्ट आहे.. नाती जुळायला वेळ लागत नाही तेथे तुटायला किती वेळ लागतो.. माझं असे मत नाही आहे की आजकाल प्रेम खुप उथळ झालं आहे.. पण प्रेमामध्ये ती ताकत राहीली नाही असे राहून राहून वाटत आहे.. किती अनुभव किती किस्से.... व अगणित एम. के. श्रोती (संदर्भ-दुनियादारी-सुहास शिरवळकर) माणूस एम. के. का होतो ?

**************************************
तो असाच एक दिवस आपलं जीमेल चेक करत होता, अचानक एका मेल वर नजर पडली.... अरे ही. मला वाटलं होतं विसरली असेल मला.. काय लिहले आहे ते तर पाहू मेल मध्ये.. हाय... कसा आहेस.. सर्व नेहमी प्रमाणे कॉमन....पण हे काय शेवटची ओळ.. मला तुझ्याशी बोलायचं आहे.. ओह तेरी तो... हिला काय झालं ? कधी दिड एक वर्षामागे मेल/चॅटिंग बंद करणारी आज अचानक माझा नंबर मागत आहे.. क्या बात है... !
**************************************
ती.... त्याच्याशी ती केव्हापासून चाट / मेल करत आहे तेच विसरलेली... कधी आपल्या प्रियकराला कसे प्रपोज करावे ह्याची मदत घेतलेली ती ! तीची अडचण होती काहीतरी तिला कोणीच दुसरा आठवला नाही... तीला तोच आठवला दिड-दोन वर्षानंतर.. ! तीला मदत हवी होती.. तो दुर गेला होता काही पावलं.. ती पावलं तीला मोजायची होती... !

***************************************
तो कधी आपलं दुख: विसरुन दुस-यांचे प्रेम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणारा धडपडणारा तो.. अश्याच काही अव्यक्त वेळी त्याने तीची मदत केली होती.. दुरुन सही पण केली होती.. एसटीडी कॉल्स केले... मेल केले.. पत्र पाठवली... तीच्याशी बोलला.. त्याच्याशी बोलला.. तीचे काही वर्षाचे प्रेम त्याने काही दिवसामध्ये जोडून देण्यात यशस्वी देखील झाला.. एक कोपरा मनाचा कुठे तरी त्याचा चीरला गेला हे त्याला कळालेच नाही पण तो विसरला.... सर्व काही त्यानंतर.... तो व त्याची दुख: ह्यातच स्वत:ला गुरफटून घेतलेला... तीला विसरलेला.. जगाला विसरलेला असाच काही पाऊले मागे राहिलेला..... !

****************************************
तीचा तो कुठे तरी दुरवर नोकरी करत होता.... पण काही कारणामुळे त्यांचे बिनसलेले... गोष्ट लग्नापर्यंत येऊन थांबलेली.. एक सर्वस्व देण्यासाठी तयार तर दुसरा नातेसंबधाच्या गुंत्यात अडकलेला... तीला वाटलं मदत घ्यावी कोणाची तरी.. शोधला जुना आयडी त्याचा व एक मेल टाकला की मला बोलायचे आहे... बस !तिला खात्री होती कि तो मदत करणार..

****************************************
तीचा मेल पाहून त्याला नवल वाटलं नाही पण तीने त्याला लक्ष्यात ठेवले आहे हे पाहून त्याचे मन जरा सुखावलं... चला तिला आठवण तरी आहे... नंबर दिला आहे तीने आज संध्याकाळी करु फोन असा विचार करुन त्यांने मेल बंद केला व आपल्या कामात गढून गेला.. पण थोड्यावेळात त्याच्या मनात काय आले काय माहीत... त्याने परत मेल उघडला व आपला नंबर रिप्लाय केला बाकी एक ही शब्द न लिहता..

****************************************
त्याचा मेल येणार ह्याची तिला खात्रीच होती पण तो असा निशब्द पणे फक्त नंबर पाठवेल असे तीला वाटले नव्हते... तिला अपेक्षा होती कि तो विचारेल कशी आहेस.. काय करत आहेस... कॊलेज संपल का ? तो कसा आहे.. काय करत आहे... पण असे काहीच त्यात नव्हतं... फक्त नंबर.. तीने तो नंबर डायल केला.. रिंग झाली... कुठले नवीन गाणे कॊलर टूनला सेट होते... ती ते गाणे गुणगुणु लागली तोच त्याने फोन उचलला...

*****************************************
फोनवर दिसणारा तो अनोळखी नंबर पाहून तो उचलावा की नाहि ह्या विचारात होता तोच त्याला तिच्या मेल मधील नंबर आठवला.. तिचा फोन होता.. काय करु उचलू की नाही उचलू ? हा विचार त्याच्या डोक्यात पिंगा घालत होता.. पण आपण फोन उचलण्यासाठी एवढावेळ का लावत आहोत हेच त्याला समजत नव्हते... जवळ जवळ शेवटच्याच रिंगला त्याने फोन उचलला.. त्याने हल्लो केले.. व तीकडून ही रिप्लाय आला... अरे तीचा आवाज जरा ही बदललेला
नाही... हे समजल्यावर त्याला फार नवल वाटले... !

******************************************
कुठून सुरवात करावी हेच तिला कळेना.. तीने हाय केले पण त्यानंतर काय बोलावावे हेच तिला कळेना.. शक्यतो त्याला तीची अडचण समजली असावी.. त्यानेच सुरवात केली पुन्हा एकदा.. ! कशी आहेस काय करत आहेस बोल अचानक काय झालं तुला माझी मदत घ्यावीशी वाटली... लग्नाची अडचण आहे का ? जवळ जवळ तीच्या मनातील प्रश्नच त्याने नकळत विचारले असावेत... तीला नेहमीच नवल वाटे की ह्याला आपल्या मनातील कसे कळते... तीला काय बोलावे हेच सुचले नाही... ती फक्त हम्म्म असे म्हणून चुप झाली...

******************************************
त्याला ही काही समजत नव्हते काय बोलावे... त्यालाच नवल वाटत होते की त्यांने हे प्रश्न विचारलेच कसे ? जवळ जवळ दिड वर्षानंतर तीला सरळ लग्नात अडचण आहे का ? असे कसे विचारले मी .. हा विचार करुन तोच स्वतः ओशाळला.. व क्षमा मागावी हा विचार करु लागला पण तीचे उत्तर त्याला समजलेच नाही... तो आपल्या ह्दयमध्ये अचानक दर्द का झाला ह्याचा विचार करु लागला व त्या क्षणी तो हे देखील विसरला कि तो ऑफिस मध्ये आहे व काम करत आहे व फोन कानावर लावलेला आहे.. !

क्रमश:

हे ठिकाणप्रकटनविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

बाकरवडी's picture

17 Jun 2009 - 9:59 am | बाकरवडी

अरे काय हे क्रमश: कटकटच आहे.
लवकर टाका पुढचा भाग !
चांगला लिहीलाय !!

:B :B :B बाकरवडी :B :B :B

पर्नल नेने मराठे's picture

17 Jun 2009 - 10:49 am | पर्नल नेने मराठे

ह्म्म
अरे काय हे क्रमश: कटकटच आहे.

चुचु

संदीप चित्रे's picture

17 Jun 2009 - 6:56 pm | संदीप चित्रे

दोघांबद्दल आलटून पालटून वाचताना मजा येतीय...
ती क्रमशः ची वाट सोड रे पण आणि लवकर पूर्ण कर.

सूहास's picture

17 Jun 2009 - 7:04 pm | सूहास (not verified)

सुहास

मस्त कलंदर's picture

17 Jun 2009 - 7:21 pm | मस्त कलंदर

हाही लेख चांगला आहेच पण.... आधी "अंत" तर पूर्ण करा..
दोन्हीही लेखांच्या पु.भा.प्र...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निखिल देशपांडे's picture

17 Jun 2009 - 7:35 pm | निखिल देशपांडे

वाचले रे... प्रतिक्रिया समाप्त नंतरच...
क्रमशः
==निखिल

अवलिया's picture

17 Jun 2009 - 7:47 pm | अवलिया

प्रतिक्रिया देण्यास नम्र नकार.
आधीचे भाग पूर्ण करा खास अभिनंदनाचा धागा काढु ! पण ४८ तासात दुस-या बाकी कथांचा पुढील भाग नाही आल्यास जाहिर निषेधाचा धागा काढला जाईल.

आणि हो, ही धमकी नाही, केवळ पूर्वसुचना.

--अवलिया
(आपलाच )

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jun 2009 - 8:18 pm | परिकथेतील राजकुमार

राजा अरे नालायका !! अजुन एक क्रमशः ????
किती अंत बघतो बे ?

लफडेबाज
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य