ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -२

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
14 Aug 2009 - 7:34 pm

मागील.... भाग १

त्याला ही काही समजत नव्हते काय बोलावे... त्यालाच नवल वाटत होते की त्यांने हे प्रश्न विचारलेच कसे ? जवळ जवळ दिड वर्षानंतर तीला सरळ लग्नात अडचण आहे का ? असे कसे विचारले मी .. हा विचार करुन तोच स्वतः ओशाळला.. व क्षमा मागावी हा विचार करु लागला पण तीचे उत्तर त्याला समजलेच नाही... तो आपल्या ह्दयमध्ये अचानक दर्द का झाला ह्याचा विचार करु लागला व त्या क्षणी तो हे देखील विसरला कि तो ऑफिस मध्ये आहे व काम करत आहे व फोन कानावर लावलेला आहे.. !

***********

ती.. काय बोलू ह्याच्या बरोबर... ह्याला सांगू का नको माझी अडचण ? ह्याला पण मी आवडत होते मला माहीत आहे... हा माझी मदत करेल का ? कुठून सुरवात करु काहीच कळत नाही आहे काय करावे तेच समजत नाही आहे... त्याच्याबद्दल कुठून सुरवात करु.. व त्याच्या बदल काय सागू.. काहीच कळत नाही आहे.. दिड वर्षानंतर बोलत आहे... ह्याच्याशी.. काय बोलू.. कसा आहेस रे ? ... हे एकच वाक्य तीच्या तोंडी आले.. !

***********

मी मजेत तु बोल कशी काय आठवण झाली माझी ? काय मदत करु बोल... !
कसा आहे मी... अगं हेच विसरलो आहे कसा आहे.. तुझ्यासाठी तर काही करायला तयार मी मागे पण होतो व आत्ता पण आहे ... हीच्या मनात आहे तरी काय ? आधी किती बोलायची.. तासनं तास.. आता हीच्या तोंडातून शब्द देखील बाहेर पडत नाही आहे.. किती नवल आहे नाही.. गेली पाच वर्ष चॅटवर बोलत असे.. तीच्याकडे मोबाईल आल्यावर फोन वर गप्पा.. कित्येक तास... व अचानक तो आला... व हळूहळू हि दुर.. गेली.. माझा पण नंबर बदलला... व मी कधी तीचा नंबर डायल केलाच नाही... !

***********

अरे.. मी पण ठीक आहे रे...चालू आहे सर्व व्यवस्थीत..... !
काहीच ठीक होत नाही आहे.. जिवनामध्ये उलथापालथ चालू आहे.. तुला कसे सांगू... घरी बाबा-आई लग्नासाठी मागे लागले आहेत... चांगली नोकरी असलेले.. घरदार चांगले असलेले किती तरी स्थळे मला पहण्यासाठी घरी येत आहेत.. व तो काहीच हलचाल करत नाही आहे.. ना सरळ आपल्या घरी विचारत आहे... ना रजिस्टर्ड लग्न करत आहे... काय करु मी ? तुला कसे सांगू रे.. माझी अडचण.. !

***********

ह्म्म... मी काय तुला ओळखत नाही की तुझ्या भावना समजू शकत नाही... अडचण आहे.. बोल काय आहे .. तुझा तो कसा आहे हिरो ??
हिची पण प्रत्यक गोष्ट वेगळी... दुखः मध्ये गुरफटलेली असली तरी.. माझ्यासमोर हसून दाखवते.. अगं तु बोलायच्या आधी मला माहीत असते की तुला काहीतरी अडचण आहे.. कुठे ना कुठे तरी प्रॉब्लम आहे.. तुझ्या काप-या आवाजावरूनच मी ओळखलं... की तुला काही तरी बोलायचे आहे.. पण शब्द सुचत नाही आहेत.. म्हणून.. चुप आहेस... जेवढं मला समजतं आहे.. त्यानुसार लग्नाची अडचण आहे... असे वाटत आहे..

***********

हिरो.. मस्त आहे यार मजेत.. नोयडा मध्ये जॉब करत आहे.. मी इकडे आहे.. !
हिरो... काय बोलू ह्याला मी.. ह्याची अजून सवय गेली नाही त्याला हिरो म्हणायची... मला माहीत आहे.. टोंन्ट मारत आहे मला.. म्हणजे हा अजून मला पुर्ण विसरला नाही आहे.... वेडाच आहे..
ह्याला सरळ सरळ सांगते माझी अडचण काय आहे व काय मदत करु शकतो.. देवा... मदत कर रे माझी..

***********

चांगले आहे... गुड ! तु बोल आता सरळ सरळ काय अडचण आहे.. !
मी ऑफिस मध्ये आहे... बाकीचे लोक काय म्हणतील.. ते. बोल यार बोल... हिची पण गोष्ट गोल गोल फिरवण्याची सवय काय अजून तरी गेली नाही आहे.... तुझी सवय अशीच आहे.. मला माहीत आहे.. आता तु एक निर्णय घेणार व सरळ मुद्याचे बोलणार.. मग थोडी रडणार... मी तुला गप्प करणार.. व पुन्हा तुझी कथा... पुढे सरकणार..

***********

हे बघ.. मला तुझी गरज हवी आहे... तो हिरो लग्नाबद्दल सिरियस होत नाही आहे रे.. व माझ्या घरी.. तुला माहीत आहे ना माझे बाबा.. किती हट्टी आहेत.... एकदा एका गोष्टीच्या मागे पडले की पडलेच.. सध्या ते माझ्या लग्नाच्या मागे पडले आहेत.. आठवड्याला कमीत कमी एक स्थळ घेऊनच येत आहेत घरी... व हिरो काहीच हालचाल करत नाही आहे... तो आपल्या घरी तो अजून बोलला पण नाही आहे... काय करु मी... !
येवढं सगळे एका दमात सांगितले.. त्याच्या मंद खोपडीमध्ये काही घुसले की नाही... नाही ह्याला प्रत्येक गोष्ट दोन वेळा सागावी लागते .. हे काय मी विसरले थोडीच आहे.. एक नंबरचा विसर भोळा आहे... सर्व गोष्ट शांत पणे एकुन घेईल व पुन्हा विचारेल.. पुन्हा एकदा सांग.. ना प्लिज.. ! मग मी रागवणार.. व पुन्हा सांगणार.. पण कहाणी पुढे सरकणार... मंद कुठला..

***********

हम्म्म... थोडे थोडे कळाले आहे.. तुला काय सांगायचे आहे ते... पण जरा क्लियरली सगळे पुन्हा सांगशील का मला ?
ही एवड्या स्पीड मध्ये बोलते.. की काही मुद्दे कळतच नाहीत... खरं तर मला कळतं.. पण तिचा आवाज पुन्हा पुन्हा माझ्या कानावर पडू दे म्हणून मी जवळ जवळ प्रत्येक गोष्ट.. रिपीट करायला लावतो.. मी.. हे तीला कसे कळणार. मला वाटतं ती मला अजून पण मंदच समजते... व विसराळूपण.... विसराळू आहे.. पण मंद.. ह्मम्म मी नाही... आता राहिली तीची अडचण... मोठी अडचण आहे... काय करु शकतो हे बघावे लागेल.. हिला संध्याकाळी फोन करायला सांगतो.. म्हणजे तो पर्यंत मला पण वेळ मिळेल..

***********

क्रमशः

समाजजीवनमानप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

14 Aug 2009 - 7:56 pm | Dhananjay Borgaonkar

भट्टी चांगली जमली आहे..येउदेत पटकन पुढला भाग..
च्यायला..चांगली गोष्ट वाचायला लागलो की क्रमशः यायलाच पाहीजे का???

निखिल देशपांडे's picture

14 Aug 2009 - 7:57 pm | निखिल देशपांडे

राजे वाचतोय...
आता पुढचा भाग कधी येणार हा प्रश्नच नको विचारायला

निखिल
================================

मस्त कलंदर's picture

14 Aug 2009 - 8:18 pm | मस्त कलंदर

राजे वाचतोय......

आता पुढचा भाग कधी येणार हा प्रश्नच नको विचारायला =)) =))

असाच अंतचा अंत पण कधी होणार हेही नको विचारायला!!!! =D> =D>

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

राजे वाचतोय......

आता पुढचा भाग कधी येणार हा प्रश्नच नको विचारायला
हिमालयात नाही गेलास तर वेगळीच कथा सुरु करणार हे पण माहीत आहे...

--अवलिया

दशानन's picture

16 Aug 2009 - 8:51 am | दशानन

अरे लिहतो आहे यार.... काम धंदा संभाळून लिहावे लागते यार.. त्यात खव खव खेळण्यासारखे महत्वाचे काम पण आहे ... जर धीरानं घ्या... लवकर लिहतो... पुढील भाग...

*अतं.. जरा वेगळा प्रकार आहे... कथा ठरवून लिहीत नाही आहे ती... सुचेल तसे लिहीत आहे.. त्यामुळे त्याला जरा वेळ लागत आहे... !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

मदनबाण's picture

16 Aug 2009 - 10:21 am | मदनबाण

वाचतोय...

चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

छोटा डॉन's picture

16 Aug 2009 - 11:13 am | छोटा डॉन

भट्टी आणि शैली मस्त जमती आहे.
वाचतो आहे, पुढचा भाग पटापट येऊदेत, जास्त उशीर लाऊ नको बे.

पुलेशु....

------
(लिमीटेड लफड्यातला )छोटा डॉन

मि माझी's picture

17 Aug 2009 - 10:26 am | मि माझी

छान लिहल आहे .. पण ...
>> हे बघ.. मला तुझी गरज हवी आहे...
हे वाक्य थोडं चुकीच वाटल.

दशानन's picture

17 Aug 2009 - 11:36 am | दशानन

नजर चुकीने झाले आहे.. योग्य बदल करतो.

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

टारझन's picture

17 Aug 2009 - 5:12 pm | टारझन

लेखात जसा बदल केलात तसा जिवनात पण करा राजे ...
तुमचं जिवण काय लाईफबॉय आहे काय ? किती उगळलं तरी संपायचं नाव नाय !!
जरा "न्यु लाईफबॉय" व्हा की राव !!
राजेंनी लेखात योग्य तो बदल केला त्यावरून एक गोष्ट पक्की होते की राजे ज्वलनशिल... च्च च्च सॉरी .. बदलशील आहेत !! च्यायला त्या H2O च्या ! नको तेंव्हा नको तिथून H2O काढतात राजे !

- (प्रेमभंगप्रेमी) टाराज जैन

सूहास's picture

17 Aug 2009 - 5:16 pm | सूहास (not verified)

हुश्श्...लिहीलास का बाबा एकदाचा...घन्स..

सविस्तर लिहीतो ..आलोच जरा..

सू हा स...