तो व मी - लफडा अनलिमिटेड.

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
17 Feb 2009 - 7:10 am

तो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे.
मी- कारे असं का वाटलं तुला ?
तो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे.
मी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी ?
तो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला.
मी- तु व्ही- डे विसरलास लेका ? चांगले केले धुतला ते.
तो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही तरी करुन.
मी- काय झालं व्यवस्थीत सांग.
तो- शनिवारी सकाळी तीने मला हसून चहा दिला बेड वरच.
मी- मग, तु काय केलं.
तो- नेहमी पेक्षा त्यात साखर जास्त होती, म्हणून मी म्हणालो साखरेचे भाव खुप वाढले आहेत.. जपून वापरा.
मी- धत्त तेरी की.. पुढे.
तो- ति तनातना गेली पाय आदळत.. पुढील पंधरा मिनिटात काचेचे ग्लास व कप बश्या सगळ्या फुटल्या.
मी- तु वाचलास ना ?
तो- नाही ती किचन मध्ये भांडी धुत होती, मी नाष्टा मागीतला.
तो- जळलेला परठा व आंबट दही दिले.. लोंणचं पण नाही दिले यार.
मी- येवढं झालं तरी तुला आठवलं नाही की काहीतरी आज खास डे आहे ते ?
तो- अरे आज काल माझा गझनी झालेला आहे, नेहमी काहीना काही विसरतो, मार्केट मुळे डोक्यात पक्त भाव वरखाली वरखाली चालू असतात.
मी- अरे येड्या, लेका तुला किती दा सांगितले की ३.३० मार्केट बदं. डोक्यातनं सगळे बाहेर काढायचं लगेच.
तो- बरोबर आहे रे पण, त्या दिवशी मार्केट पण चालू नव्हतं सुट्टि होती, तरी देखील आठवलं नाही.
मी- तु मिपा वर नाही आला होतास का ? बुंदी पाडल्या प्रमाणे कविता-लेख पाडले होते यार व्हि-डे वर.. ते वाचून तर तुझ्या डोक्यात आलं असंतच.
तो- अरे मी मिपावर नाही आलो त्या दिवशी , जमलंच नाही.
मी- मग दुपारचे जेवण पाठवले तीने तुला ?
तो- नाही. मी फोन केला घरी व विचारले तर म्हणाली डोबंल तुझं... जेवणासाठी फोन करतयं येडं.
मी- अरे बापरे... म्हणजे जेवण कलटी ? तुझ्या ऑफिस मध्ये कोणीच नव्हतं का ? आसपास तुला कुठली खुण नाही दिसली व्हि-डेची ?
तो- अरे, शनिवार... एखाद दुसरा आजोबा सोडला तर ऑफिस मध्ये कोणिच येत नाही.. त्यात एयरटेलची लाइन खराब होती नेट पण चालू नव्हतं.
मी- ह्म्म. मग संध्याकाळी तू सरळ घरी गेला असणार.
तो- नाही यार लफडा तेथेच झाला.. एका मित्राचा फोन आला, खांदा मागत होता.
मी- अरे अरे, कोण गेलं ?
तो- अबे, कोणी गेलं नाही, तो म्हणाला मला रडायला हक्काचा खांदा हवा.
मी- असं काय... मग ठीक आहे, पुढे.
तो- मग काय मी खांदा दिला त्याने खंबा दिला.. माझाच आवडता ब्रन्डचा.
मी- म्हणजे तु टल्ली.
तो- नाही जास्त नाही पिली काहीच पॅग मारले तो रडता रडता व्हि-डे च्या आवशीला शिव्या देत होता.
मी- का ?
तो- त्याच्या बायकोने त्याला घरातून बाहेर काढलं होतं.
मी- का रे ?
तो- तो व्हि-डेला गिफ्ट नाही घेऊन गेला म्हणुन. तेव्हाच माझी पण ट्युब पेटली.
मी- बरं झालं तुला वेळीच आठवलं.
तो- अरे नाही यार, आठवलं खरं पण रात्री ९ ला दुकान कुठले उघडे असणार.
मी- मग तु काय केलंस.
तो- शहर भर भटकलो रात्री ११ पर्यंत.
मी- मग काही मिळाले का गिफ्ट.
तो- नाही पण एके जागी, नवीनच पॅक केलेले बुके पडलेले दिसलेले... चुकुन पडले असावे अथवा कोणी तरी रागाने फेकले असावे.
मी- मग काय केलंस तु ?
तो- मी ते बुके उचलले व त्याला व्यवस्थीत केले व तेच घरी घेऊन गेलो.
मी- धन्य आहेस, पुढे.
तो- दहा मिनिटे तीने दरवाजाच उघडला नाही, पण उघडल्यावर मी तीला ते बुके दिले व हॅप्पी व्हि-डे विश केला स्टाईल मध्ये.
मी- ती खुष झाली असणार मग.
तो- नाही, काय नुस्तेच बुके म्हणुन तीने ते बुके सोफ्यावर टाकले.
मी- मग काय झालं बॉ !
तो- त्या बुक्यातून एक छोटंस कार्ड बाहेर पडलं ते तीने उचललं व सरळ किचन मध्ये गेली.
मी- किचन मध्ये का ? चहा करायला गेली असेल तुझ्या साठी तु कार्ड मध्ये काही तरी चांगले लिहले असणार... ती पाघळली... ह्या बायका अश्याच.
तो- डोबंलाचं पाघळली, आत जाऊन एक खराटा व लाटणं घेऊन आली.... काली मातेच्या अवतारामध्येच सरळ एन्ट्रीं.
मी- का ? ती का भडकली रे ?
तो- अरे तीने अर्धा तास धुतल्यानंतर मला विचारले ही "राधिका कोण" म्हणून.
मी- आता ही राधिका कोण यार.. मध्येच आली ?
तो- अरे ते बुके कुठल्यातरी राधिकेने आपल्या जानु ला गिफ्ट केलं असणार त्यात " जानु, आय लव्ह यु - राधिका." लिहले होते.
मी- =))
तो- लेका राजा हसतो आहेस काय.. आता मी काय करु ? परवा पासून तीने जेवायला सोड.... चहा पण नाही विचारला .
मी- ह्म्म्म एक काम कर, एखादं नेकलेस गिफ्ट कर... जरा तीला खुष कर... मग हळुच सांग तु ते बुके कुठून आणलं होतंस ते व का !
तो- म्हणजे एका बुक्याची किंमत कमीत कमी पस्त्तीस हजार :O
मी- लेका एवढ्यातचं भागलं तर ठीक.. नाय तर किती शुन्य वाढतील पुढील व्ही-डे पर्यंत ते तुला काय त्या ब्रम्ह देवाला पण नाय कळणार... !
तो- ह्म्म ठीक. बघतो ट्राय करुन आज. सांगेन तुला उद्याच.
मी- चल. निघतो आता अजून एकाला खांदा देणे आहे, वाट बघत आहे बिचारा.

समाजजीवनमानराहणीप्रकटनसल्लाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

17 Feb 2009 - 7:18 am | आनंदयात्री

मस्त लिहलं आहे राजे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Feb 2009 - 11:13 am | घाशीराम कोतवाल १.२

राजे
=)) =))
सॉलिड राजे सॉलिड
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Feb 2009 - 2:49 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच बोल्तो...

बिपिन कार्यकर्ते

किट्टु's picture

17 Feb 2009 - 4:33 pm | किट्टु

+१!!!

छान लिहीलं आहे!!!

मराठी_माणूस's picture

17 Feb 2009 - 7:22 am | मराठी_माणूस

मस्त

परिकथेतील राजकुमार's picture

17 Feb 2009 - 8:29 am | परिकथेतील राजकुमार

झकासच लिहिलय राजे, एकदम राजे स्पेशल ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

अनिल हटेला's picture

17 Feb 2009 - 7:26 am | अनिल हटेला

>पुढील पंधरा मिनिटात काचेचे ग्लास व कप बश्या सगळ्या फुटल्या
>>जळलेला परठा व आंबट दही दिले.. लोंणचं पण नाही दिले यार
>>>मग काय मी खांदा दिला त्याने खंबा दिला.. माझाच आवडता ब्रन्डचा.
>>>>आत जाऊन एक खराटा व लाटणं घेऊन आली.... काली मातेच्या अवतारामध्येच सरळ एन्ट्रीं.
>>>>>अर्धा तास धुतल्यानंतर मला विचारले ही "राधिका कोण" म्हणून.
>>>>>>अजून एकाला खांदा देणे आहे, वाट बघत आहे बिचारा.

=)) =))

अवांतर - राजे ,हे अनुभव आहेत की कल्पनाविलास ? ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

ब्रिटिश's picture

17 Feb 2009 - 12:23 pm | ब्रिटिश

>>>राजे ,हे अनुभव आहेत की कल्पनाविलास ?

वैच पुछता मय

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

दशानन's picture

17 Feb 2009 - 12:26 pm | दशानन

वैच मत पुछना !

समिधा's picture

17 Feb 2009 - 7:48 am | समिधा

मस्त लिहलं आहेत. वाचुन गंमत वाटली.

सहज's picture

17 Feb 2009 - 7:58 am | सहज

अरेरे राजे तुमच्या कथेतल्या मित्रांनी भारतीय नारी/आर्य स्त्रीशी लग्न केले असते तर हे घडले नसते हो. ;-)

अवांतर - सीतेने रामाला सुवर्णमृग आणायला धाडले त्या दिवशी १४ फेब्रुवारी होती का ?

दशानन's picture

17 Feb 2009 - 8:00 am | दशानन

>>सीतेने रामाला सुवर्णमृग आणायला धाडले त्या दिवशी १४ फेब्रुवारी होती का ?

=)) असावा असा माझा ही अंदाज !

सहज's picture

17 Feb 2009 - 8:01 am | सहज

असा समज पसरवायला हरकत नाही, बरेचजण इमानदारीत जातील गिफ्ट आणायला की घरी येइस्तोवार संकट नाहीसे झाले असेल म्हणुन ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Feb 2009 - 10:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि वर पुन्हा संस्क्रूतीरक्शन करणारे लोक व्हॅलंटाईन डेला विरोध करणं सोडून देतील हा फायदा निराळाच.

अदिती

मिंटी's picture

17 Feb 2009 - 8:38 am | मिंटी

राजे मस्त लिहिलं आहेस..... मजा आली वाचताना..... :)

पिवळा डांबिस's picture

17 Feb 2009 - 8:40 am | पिवळा डांबिस

मी- ह्म्म्म एक काम कर, एखादं नेकलेस गिफ्ट कर... जरा तीला खुष कर... मग हळुच सांग तु ते बुके कुठून आणलं होतंस ते व का !
तो- म्हणजे एका बुक्याची किंमत कमीत कमी पस्त्तीस हजार
आम्ही आधीच सांगितल होतं कि जुवेलरी घ्या पण खड्यांची!!!!!
नुसत्या सोन्याच्या वाटेला जाउ नकात....
पन आमचं ऐकलं नाहीत.....
आता भोगा आपल्या कर्माची फळं!!!!!
:)

झेल्या's picture

17 Feb 2009 - 8:41 am | झेल्या

राजे, फारच जोरदार...!

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

सुक्या's picture

17 Feb 2009 - 8:42 am | सुक्या

काय लिवलयं राजे. मजा आली.
असले दिवस आयुष्यभर लक्षात रहावे असे वाटत असेल तर फक्त एकदाच विसरा. जन्माची अद्द्ल घडते.
=))

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

दशानन's picture

17 Feb 2009 - 11:01 am | दशानन

>>>असले दिवस आयुष्यभर लक्षात रहावे असे वाटत असेल तर फक्त एकदाच विसरा. जन्माची अद्द्ल घडते.

=))

भले भले गारद होतात बायको / प्रियसी समोर !

सायली पानसे's picture

17 Feb 2009 - 11:25 am | सायली पानसे

खुप छान आहे लेख. वाचताना मजा आली.

जागु's picture

17 Feb 2009 - 11:40 am | जागु

वा राजे मस्तच.

अवलिया's picture

17 Feb 2009 - 12:44 pm | अवलिया

लै भारी रे .....

च्यायला, तु आणि मी भेटल्याची कथा लिहायला बसशील तर तुझ्या सफरीपेक्षा जास्त भाग लिहावे लागतील तुला ...

--अवलिया

भेटण्यासाठी तुला तैयार होतो
पण तुझे फर्मान आले, साद नाही

दशानन's picture

17 Feb 2009 - 12:50 pm | दशानन

+१

१०००००% सहमत.

>>भेटण्यासाठी तुला तैयार होतो
पण तुझे फर्मान आले, साद नाही


हम तो बाहे फैलाए खडे है राह में !
मिलना नसीब में है हमारे !

अभिष्टा's picture

17 Feb 2009 - 1:09 pm | अभिष्टा

मस्तच जमलीय. :-)
---------------------------------
जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा

वृषाली's picture

17 Feb 2009 - 2:25 pm | वृषाली

छान लिहिले आहे.

"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

विनायक प्रभू's picture

17 Feb 2009 - 4:25 pm | विनायक प्रभू

३६४ दिवस व्यवस्थित प्रेम केल्यास वीडेचे असे प्रॉब्लेम येत नाहीत.
नको तीकडे खांदे दीले की वांधे होणारच.
वि.प्र.
भर दुपारी 'डार्क नाईट ' चा अनुभव घेण्याकरता खिडक्यांवर 'डार्क' रंगाचे पडदे बसवावेत.

घाटावरचे भट's picture

17 Feb 2009 - 4:37 pm | घाटावरचे भट

=)) एवढेच म्हणतो...

धनंजय मुळे's picture

17 Feb 2009 - 6:09 pm | धनंजय मुळे

असाच एकदा वाढदिवस विसरून पहा!
- धनंजय

शितल's picture

17 Feb 2009 - 6:17 pm | शितल

=))

सर्वसाक्षी's picture

17 Feb 2009 - 6:59 pm | सर्वसाक्षी

नवरा म्हणजे यंत्रातल बॉलबेरींग, व्यवस्थित चालले तर पावती मिळत नाही जरा चुकल तर शिव्या मिळतात. खायच्या गपचुप.

दशानन's picture

18 Feb 2009 - 7:30 am | दशानन

सहमत.

त्यामुळेच म्हणतो शहाण्याने लग्न करु नये .. गप्प पडून राहावे मजेत !
ना वाढ दिवस ... ना व्हि-डे लफडा !

प्राजु's picture

17 Feb 2009 - 7:12 pm | प्राजु

मस्त लिहिलं आहे.
(बरं यावेळी तुमच्या मित्राचा किस्सा होता.. नाहीतर ........ ) ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

18 Feb 2009 - 7:30 am | दशानन

>>>बरं यावेळी तुमच्या मित्राचा किस्सा होता.. नाहीतर ........

ह्म्म्म्म ;)

पुढील वर्षी माझा लिहीन हां !

=))