विरंगुळा
न्यायालयाच्या पायरीवर....
फ्रँझ काफ्काच्या एका कथेवर आधारीत....
न्याय...
सगळीकडे अंधुक प्रकाश पसरला होता आणि मोठ्या मुष्किलीने पुढचे दिसत होते. अतीश्रमाने त्याला चक्कर आली होती का त्या अंधारामुळे त्याला दिसत नव्हते हे त्याला कळत नव्हते. त्याला एकदा वाटत होते की तो एक उंच मिनारापाशी उभा आहे. त्या मिनाराला एक दरवाजा होता आणि त्याच्यावर पाच गरुडांचे पुतळे. मोठ्या डौलाने ते सोनेरी प्रकाश फेकत होते.
‘
‘हं ऽऽऽ पोहोचलो एकदाचा !’’ तो मनाशी म्हणाला.
असेच काहितरी सुचलेले- फोटो.
"पप्पा,तुम्ही स्कुल मध्ये जायचे तेंव्हा मोबाईल नव्हते पण kodak camera तर असायचा ना मग तुम्ही त्याने स्कुलचे,स्कुल फ्रेंड्सचे फोटो का काढले नाहीत?"
माझ्या मुलाने हा प्रश्न केला आणि मन भुर्रकन शाळेच्या दिवसात गेले.
दिवाळी,घरातील कोणाचे तरी लग्न,उरूस आणि जून मध्ये सुरु होणारी शाळा अशा मोजक्याच प्रसंगी मिळणारे नविन कपडे त्यात शाळेचा पांढरा शर्ट,खाकी पँट नविन मिळणे हि सुद्धा एकप्रकारे चैनीची गोष्ट होती.
असेच काहितरी सुचलेले
मंडळी आपल्या लहानपणी सर्वांना आकर्षण असायचे ते दिवाळीला मिळणारे फटाक्यांच्या बरोबर नविन कपड्यांचे कारण फटाके फुटल्यानंतर मोठा आवाज व्हायचा आणि नंतर येणारा धुराचा वास जसा आवडायचा तसाच दिवाळीत अंगावर असणाऱ्या नविन कपड्यांचा सुगंध हा मनाला वेडे करायचा.
थोडे मोठे झाल्यावर कधीकधी गावातल्या कोणाच्यातरी लग्नात मोठाल्या पंख्यांवरून सोडलेला अत्तरमिश्रित पाण्याचा फवाराही आवडू लागला नंतर नंतर तर नवरा-नवरी यांच्या आसपास वावरताना कार्यालयातील पंखा नाहीतर आलेला वारा सुद्धा अत्तर,सेंटचा मनमोहक सुगंधी झुळूक द्यायचा.
मी आर्ची बोलत्येय.
काय मस्त सकाळ उजाडलीये अजुनही झोपुन राहावसे वाटतंय , पण आईने तरीही उठवलेच. नाही तर शाळेला उशीर झाला असता. सगळं लवकर आटोपले तेवढ्यात शैला, शारदा आल्याच. मग डबा दफ्तरात टाकुन तशीच पळाले शाळेला.
शाळेत जाता जाता वाटेत त्यांना काल आईकडे नागराजदादा आलेला सांगितले आणि कायतरी पिक्चर काढाणारे म्हणे तर मला काम करायला पाठवशील का हे विचारत होता. तशा "अय्या खरंच" दोघी एकदमच किंचाळल्या. "ए मग तु हिरोईन झलीस की आम्हाला नाही ना विसरणार? " आणि "हिरो कोण आहे ?" "काय नाव पिक्चरचं?" प्रश्नाचं मोहोळ माझ्या मागे लावले. अगं अजुन कशात काय नाही मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगु.
आरोळ्या फेरीवाल्यांच्या
पूर्वी मुंबई सोडली तर इतर शहर, गावांत आतासारखी बाजारपेठ खूप कमी होती. मॉल तर अस्तित्वातच नव्हते. मग काही नित्य गरजा भागवणार्या वस्तूंसाठी दारावर येणार्या फेरीवाल्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची. बहुतेक फेरीवाले तेच ठरलेले असल्याने ह्या लोकांबरोबर चांगला परिचय होऊन एक आपलेपणाही तयार होत असे. त्यांच्या रस्त्यावरून दारापर्यंत येणार्या आरोळीवरून कोण व्यक्ती आली असेल हे कळायची. कुठल्या कुठल्या दूरवरच्या गावातून ही लोक व्यवसायासाठी पायी भटकत यायची.
निर्गुणी भजने (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - दुसरा चरण
मागच्या भागात मी ऐतरेयोपनिषदातील विश्वोत्पत्ती चा सिद्धांत आणि सुनता है गुरु ग्यानी चा पहिला चरण यांचा संबंध आहे असा अर्थ लावला होता. त्यानुसार, निर्गुणाच्या इच्छेने प्रथम निर्गुणातून चार लोकांची निर्मिती, त्यानंतर हिरण्यपुरुषाची निर्मिती, त्याच्या अवयवातून चार लोकाच्या लोकपालांची म्हणजे गुणांची निर्मिती, मग गुणांच्या कार्यसाफल्यासाठी मानवी देहाची निर्मिती, या देहातील विवक्षित अवयवांमध्ये एकेका गुणाने स्थान ग्रहण करणे आणि मग देहाच्या टाळूतून चैतन्य शक्तीने मानवी देहात प्रवेश करणे असा पहिल्या चरणाचा अर्थ लावला होता.
निर्गुणी भजने (भाग २.३) सुनता है गुरु ग्यानी - पहिला चरण
सुनता है गुरु ग्यानी या भजनावरचा मागचा लेख धृवपदामुळे माझ्या मनात आलेले विचार असा होता. त्यावरील प्रतिक्रियेत माझे मित्र संकेत यांनी फार चांगला संदर्भ दिला. कबीर विणकर होते. हातमागावर चालणारा त्यांचा व्यवसाय. हातमागावर कापड विणताना देखील “झिनी झिनी” आवाज होतअसतो. पूर्वेचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी येथील राहिवासी अभिषेक प्रभुदेसाई यांनी देखील त्याला दुजोरा दिला. आपण जो व्यवसाय करतो त्यातले किती तरी शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यात येतात आणि त्यातील उदाहरणे देऊन आपण, आपल्याला सुचलेले विचार इतरांसमोर ठेवत असतो. या अंगाने मी कबीरांच्या भजनांचा विचार केला नव्हता.
ती - ६
एक संघ मैदानातला - भाग १९
मी मात्र तो आवाज कुठून येतोय याचा शोध घेण्यासाठी जनरेटरच्या मागे जाऊ लागले. जाता जाता मी जागूकडे पाहिले तिने मला थांबण्याची खूण केली, मी ती जवळ येईपर्यंत थांबले. ती जवळ येऊन काहीतरी खाणा-खुणा करायला लागली पण मला ती काय म्हणतेय ते समजेना. म्हणून मी हात झटकला आणि मागच्या बाजूला जाऊ लागले. तेवढ्यात परत आवाज आला, "आत्ता बरोबर कोणाला आणलं आहेस का तू ?"
" अं... नाही... का ?"
" मग इकडे तिकडे बघत हात का झटकत आहेस?"
आता तो डोक्यात जायला लागला होता. एवढे प्रश्न मला विचारणारा हा कोण टीकोजीराव?