विरंगुळा

विश्वासघात ! : ०२

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
23 Aug 2015 - 11:20 pm

विश्वासघात ! : ०१
फोनच्या आवाजाने त्याने डोळे उघडले. केस विंचरणार्‍या रीमाची पाठमोरी सुडौल आकृती दिसली. हेरखात्यात आणि खाजगी आयुष्यात जोडीदार असण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळते.
फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला आणि त्याचा चेहरा ताठरला. उठून त्याने तिच्या खांद्यावर हात टेकले. लटक्या रागाने त्याला दूर ढकलत ती म्हणाली, "आटप लवकर. मोहिमेच्या शेवटच्या सभेसाठी जायचंय. सर्वतोपरी कर्तव्य!"

वाङ्मयविरंगुळा

[ शतशब्दकथा स्पर्धा ] - लोक्शाई (उत्तरार्ध) लोकमान्य (पुर्वार्ध)

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
22 Aug 2015 - 4:16 pm

लोकमान्य

आम्च्या बाई मस्स कड्डक
मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात
अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली.
मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार.

मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत.
कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर.

साहेबाने म्हया इचारले "आज २३ जुलाई म्हंजे काय माहितीये का?"
म्या म्हनलो "माहित नसायला काय झालं? आज लोकमान्यांचा वाढदिवस." टिळकांची गोष्ट बी सांगितली.
मास्तर खुष. चॉकोलेट देउन गेले निघुन.

कथालेखविरंगुळा

(मौजमजा) आमचेही पहिलेवहिले प्रेम...

एस's picture
एस in जनातलं, मनातलं
21 Aug 2015 - 8:38 pm
बालकथामौजमजाविरंगुळा

शिर्षकविहीन (शतशब्दकथा) - उत्तरार्ध..

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
21 Aug 2015 - 1:25 pm

शिर्षकविहीन..

**************************************************************************************

गळ्यातून उसळणार्‍या रक्ताला कसंबसं थोपवत ती कोसळली. तिच्यावर झुकून अश्रु ढाळणार्‍या त्याच्याकडे बघत गुरगुरली, "आय लव्ह यु टू, नासीर! पण सर्वस्व नव्हता कधीच तू माझं ! सॉरी हनी..."

त्याच्या विस्फारत्या डोळ्यांत बघतच तीनं तो सुरा हिसकला, आणि पुर्ण ताकदीनीशी त्याच्या छाताडात खुपसला. पार आतवर शिरला त्याच्या हृद्यात तो घाव.... तिच्यासारखाच !

नाट्यकथाविरंगुळा

पेन्सिल शेडींग : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
21 Aug 2015 - 1:08 pm

संपादक मंडळास नम्र विनंती,
मिपावर कलादालन हा टॅब ब-याच दिवसांपासून दिसत नाही. कृपया कलादालन विभाग परत सुरू करावा.

pula

रेखाटनविरंगुळा

फस्ट बाइट लव्ह

कोमल's picture
कोमल in जनातलं, मनातलं
19 Aug 2015 - 9:27 pm

मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले.

इतिहासकथाभाषासमाजजीवनमानराहणीऔषधोपचारप्रवासमौजमजारेखाटनप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाआस्वादअनुभवमतसल्लामाहितीसंदर्भमदतविरंगुळा

पदार्पण (सिक्वल कथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
19 Aug 2015 - 12:58 pm

एक हॉस्पिटल, बाहेर वर्दळ पण वॉर्डमधे गूढ भयाण शांतता, बाहेर नर्सची लगबग, औषधांचा कडूजहर वास, सातव्या मजल्यावरच्या स्पेशल वॉर्डमधे तो सलग वर्षभर बेडवर खिळून होता… सुरुवातीला काही विसीटर्स यायचे, फुलं बुके वैगरे उशाजवळ ठेवून जायचे, पण एक दोन महिन्यांतच ते थंडावलं. त्या रात्रीसुद्धा त्याच्या जवळचा मॉनिटर बीप बीप असं कोकलू लागलेलं, त्याच्या शरीरात कुठेतरी काहीतरी उलथापालथ होत असावी, आवाजामुळे दोन नर्स धावत आल्या. एक ड्युटीवरची सिनिअर व दुसरी नुकतीच दोन आठवड्यापूर्वी रुजू झालेली नवखी. नर्स जवळ येऊन इंजेक्शन देत म्हणाली, 'सालभरसे बेचारा कोमामे है '…….

मुक्तकविरंगुळा

पशु-पक्षीभूषण

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
18 Aug 2015 - 3:49 pm

जशी मानवी बहुजनसमाजात जागृती झाली तशी ती, पशु-पक्षी समाजातही होऊ लागली. आधुनिक युगांत तर, शहरांत रहाणार्‍या पशु-पक्ष्यांना मानवी गाणी, साहित्य हेही समजू लागले आणि त्यांत आवड-निवडही निर्माण झाली. त्यांनीही जनसभा घेऊन आपापल्या मागण्या मांडायला सुरवात केली आणि मानवी साहित्यसंमेलनासारखेच ठरावही पास केले. अशाच एका सभेचा हा इतिवृत्तांत.

सर्वप्रथम सभाध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले आणि आपल्या दोन तासांच्या भाषणाने पशु-पक्ष्यांना झोपेला आणले. नंतर सर्व औपचारिक विधी संपल्यावर , ठरावांसाठी मुद्दे मांडण्याचा प्रस्ताव मांडला गेला.

मुक्तकसमाजराजकारणमौजमजाविरंगुळा

उडत्या तबकड्या आणि कर्णमय

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जनातलं, मनातलं
17 Aug 2015 - 10:08 am

भाग १ - (उडत्या तबकड्या - काल्पनिक कथा)

मुंबईला गेलेला करण अजून आला नाही, म्हणून त्याच्या घरचे सर्व जण काळजी करत अंगणात बसले होते. तेवढ्यात करणच्या येण्याची चाहूल लागली. सर्व जण उठून उभे राहिले. करण आल्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला. त्याचे बाबा सदानंद त्याला म्हणाले, "एवढा उशीर का बरं झाला?" तेव्हा करण म्हणाला, "बाबा, आमची बस वाटेत पंक्चर झाली होती, म्हणून यायला उशीर झाला." मग सर्व जण घरात आले. जेवण वगैरे आटोपून सर्व गप्पा मारीत बसले. तसे पाहता करणच्या घरात त्याचे आजोबा, बाबा, आई आणि एक लहान भाऊ दिनू. हळूहळू सर्व जण झोपायला निघून गेले.

कथालेखविरंगुळा