मत
टंकबोली
बोली ही कुठल्याही संभाषणात संवादात आपण वास्तव जगात वापरतो.आपण त्याला वैखरी वाणी असेही म्हणतो. ही बोली वापरताना आपण नकळत अजून एक संवादाच माध्यम वापरत असतो ते म्हणजे देहबोली. ही देहबोली आपल्या बोलीत मिसळून गेलेली असते. या देहबोली व बोली यांच्या समुच्चयातून आपल्या भावना प्रकट होत असतात. आपल्या बोलीतून व्यक्त होणारे भावना, विचार यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले प्रकटीकरण झाल्यानंतर समोरच्याला झालेले त्याचे आकलन यात ताळमेळ नसेल तर गैरसमज तयार होतात. हा ताळमेळ तपासायचा कसा? आपण तो प्रतिसादातून तपासायचा प्रयत्न करतो. म्हणजे पुन्हा आकलन हा मुद्दा अपरिहार्य.
हल्लीचे काही वार्ताहर
सध्या मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्या व माध्यमांच्या विश्वासाहर्तेनी एकदम तळ गाठला आहे. छापील व डिजीटल माध्यमांचा पैसा कमावणे हा मोठा व्यवसाय झाला आहे. ह्या कारणामुळे वाहिन्यांचे व माध्यमांचे काम चालवण्यासाठी व पैसा मिळवण्यासाठी कोणत्या बातम्या कशा द्यायचा ह्याचे धोरण आखले जाते. ते बातम्या देत नाहीत तर त्यांच्या आवडत्या राजकीय पक्षाला साजेसं जनमत तयार कसे करता येईल त्या दृष्टिकोनातून बातम्यांची निवडकरून लोकांपर्यंत पोहोचवतात. असली माध्यमे व वाहिन्या PR Agency सारखे काम करतात. हे झाले माध्यमांचे. त्यात नोकरी करणाऱ्या वार्ताहरांची कथा तर अजून आगळी आहे.
गणेशोत्सव, गणपती बसवायचा मुहूर्त ,किती दिवस बसवावा गणपती?
दरवर्षी गणेशोत्सव अंगीभूत असणाऱ्या गणेशप्राणप्रतिष्ठापना यांच्या मुहूर्तांच्या लागू/गैरलागू असण्याबद्दल छोट्याश्या फेसबुक पोष्टी टाकत होतो.. यावेळी जरा विस्तृत मांडणी करता यावी म्हणून विषयबोलक टाकलेला आहे.
नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.
मुक्काम पोस्ट कॉरन्टाईन सेंटर
******
जसं रामाने रावणाला मारलं, ओबामाने ओसामाला मारलं, अगदी तसचं कोरानाला जर एकूण समाजाने मारायचं म्हणजे संपवायचं असेल तर मग ‘कॉरन्टाईन’ होणं हाच जालीम उपाय, करोनापूर्वी ‘कॉरन्टाईन’ या शब्दाचा तसा काही परिचय नव्हता पण आता हा जीभेवर रेंगाळला, ते शुदध मराठीत ‘विलगीकरण’ बोलायला मजा नाही येत… ते जीभेवरुन विरघळल्यासारखं वाटतं….
******
करोना व्हायरस - अंताची सुरवात?
२०व्या शतकाच्या उत्तरार्धात जग खुप जवळ आले. परदेश प्रवास नित्याची बाब झाली. वेगवेगळ्या देशातील लोक दुसर्या देशात सहजपणे स्थायीक होउ लागले. मेल्टिंग पॉट चा कॉन्सेप्ट काही शहरापुरता मर्यादीत न रहाता जगभर पसरला. अत्यंत जोमाने आर्थिक भरभराट होउ लागली. २१व्या शतकाच्या सुरवातीला नवनवीन गॅजेट्स स्वस्तात उपलब्ध झाली. व्हॉट्सअॅपने STD / ISD कॉल्स ईतिहासजमा केले. पण त्याचबरोबर नैसर्गीक साधनसंपत्ती प्रचंड महागली. अवघ्या काही वर्षांतच सोने, जमीन ईत्यादी १० तो १५ पट महागले. लोकांचे आयुष्यमान खुप वाढले. पुढारलेल्या देशात लोक सहजपणे ९० - १०० वर्षे जगु लागली.
भाजी घ्या भाजी,स्वतःसाठी ताजी!
आज 3 महिन्यांनी गुलटेकडी मार्केटयार्डला गेलो (कित्ती सुख वाटलं म्हणून सांगू!? वारकऱ्यांना पंढरपूर, तैसे आम्हा मार्केटयार्ड!) उद्याच्या कामाची फुल फळ घेतली आणि भाजीत-शिरलो.
कृतघ्न -7
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154
भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159
भाग 3: https://www.misalpav.com/node/46183
भाग 4: https://www.misalpav.com/node/46203
भाग -5
https://www.misalpav.com/node/46261
भाग -6
सह्याद्रीचा सिंह गर्जतो...
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व.