अनुभव

माझे आजोळ

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in जनातलं, मनातलं
14 Mar 2016 - 2:08 pm

मी लहानपणी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जात असे. मामाचे गाव आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे आहे. मी, आई, ताई व लहान बहिण असे चाैघेजण प्रथम परभणीला मावशीकडे जात असू. तेथून मावशी व मावशीच्या ३ मुली, १ मुलगा असे ९ जण पुर्णा जंक्शनला रात्री मुक्कामाला जात. रात्री भुरटे चोर असल्यामुळे पाळीपाळीने एकेक जण जागत असू. पुर्णा येथून सकाळी ४ वाजता आदिलाबादला रेल्वे असे.

मौजमजाअनुभव

तुळशीबाग

Dinesh Satpute's picture
Dinesh Satpute in जनातलं, मनातलं
13 Mar 2016 - 7:53 pm

संक्रांतीचे दिवस..रविवारचे दुपारचे जेवण झाल्यावर मस्त झोपण्याचा विचार सुरु असताना बायकोने आपल्याला जेवणानंतर तुळशीबागेत जायचे असल्याची घोषणा केली. उणेकरांसाठी (जगातुन पुणेकर वजा केल्यानंतर जे उरतात त्यांना मी उणेकर म्हणतो ) तुळशीबाग म्हणजे काय प्रकार आहे हे प्रथम सांगतो..तुळशीबाग हि काही फुलांची बाग नाही. तुळशीची रोपे सुद्धा येथे मिळत नाहीत... खरेदीविक्री या विषयात डबल ग्र्याजुएट महिलां तर डॉक्टरेट झालेल्या व्यावसायिक यांच्यामध्ये वस्तूच्या खरेदी विक्री साठी घासाघीस करण्याचे ठिकाण म्हणजे पुण्यातले तुळशीबाग.

विनोदअनुभव

तार

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in जनातलं, मनातलं
13 Mar 2016 - 4:20 pm

१४ जुलै २०१३. रात्रीची १० ची वेळ. अश्वनी मिश्रा ह्यांनी राहुल गांधीना शेवटची तार पाटवली आणी तब्बल १६३ वर्ष सेवा बजावणारी तार सेवा भारतातून कायमची बंद केली गेली. मोबाइल, whats up, sms, email, इंटरनेट असे ताज्या दमाचे खेळाडू असताना तार सेवा चालू ठेवणे तसे पण फ़ायद्याचा व्यवहार न्हवताच. कधी ना कधी तिला जावे लागणार हे स्पष्टच होते. २०११ पासून चर्चा केली गेली आणी अखेरीस १४ जुलै २०१३ ला तिचे देहावसान झाले.

kathaaअनुभव

सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवाणा-या राईडस

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
12 Mar 2016 - 3:50 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

क्रीडाविचारअनुभव

बोटीवरील जीवन

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
10 Mar 2016 - 6:54 am

जर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्‍याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दिल

कथासमाजजीवनमानkathaaप्रवासदेशांतरनोकरीलेखअनुभवमाहिती

सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
9 Mar 2016 - 3:34 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

प्रवासविचारअनुभव

नाव सोनीबाई आणि ................

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 7:52 am

परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा -----

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतसल्लामाहितीसंदर्भचौकशीमदत

'साप'सफाई

Dinesh Satpute's picture
Dinesh Satpute in जनातलं, मनातलं
6 Mar 2016 - 10:48 am

रविवार सुट्टीचा दिवस ....माझा मुलगा , पप्पा पप्पा आवाज देत दरवाजाची बेल वाजवत होता...काय झाले असेल म्हणून मी सुद्धा धावत येत दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मुलाने सुरवात केली... खाली चला लवकर ..सोसायटीतील सर्व लोक खाली जमा झालेत...लहान मुलांनी खेळताना साप पाहिला असं बोलतायेत..मी सुद्धा उत्सुकतेपोटी लगेच खाली गेलो..खाली जमा झालेली गर्दी पाहून आपल्या सोसायटीत एवढी लोकं राहतात यावर विश्वास बसेना.

समाजअनुभव

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
3 Mar 2016 - 2:38 am

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

प्रवासक्रीडाविचारआस्वादअनुभव