बातमी!
मागे एका साहित्यिक चळवळीतील सदगृहस्थांनी गप्पा कट्टा नावाचा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला त्याच्या सर्व बातम्या आम्ही सातत्याने देत होतो. एकदा मात्र, एक बातमी लागली नाही. तो अक्षरश: तणतणत आला, आणि भरपूर ज्ञान शिकवू लागला. तुम्ही फालतू बातम्यांना जागा देता, आणि साहित्यिक चळवळीतील या वेगळ्या उपक्रमासाठी तुमच्याकडे जागा नसते वगैरे बोलू लागला, म्हणून मी त्याला, एखादी फालतू बातमी दाखव असे म्हणाल्यावर त्याने पिशवीतून त्याच दिवशीचा अंक काढला व एका बातमीवर बोट आपटू लागला. मी बातमी पाहिली.
त्याला फालतू वाटणाऱ्या बातमीचा मथळा होता, ‘चाॅकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर बलात्कार’...