राँग नंबर (पार्ट -२)
भेंडी,आजची रात्र पण अशीच जाणार.
सालं, मागच्या वर्षी पर्यंत ठीक होते पण, आता ह्यापुढे दरवर्षी हा दिवस त्रासदायकच ठरणार.इतर लोक आपापले वाढदिवस साजरे करत असतांना, आपण मात्र दरवर्षी ह्या दिवशी असेच कुढत बसणार.
मागच्या वर्षी ह्याच रात्री, ती बिंधास्त पणे आपल्या बॉइज होस्टेल वर आली होती.येतांना पण एकटी नाही, फूल्ल तिच्या गँग समवेत.तिचा बाप तसा आमच्याकडे शेत मजूरच आणि गावच्या प्रथे प्रमाणे त्यांचे घर पण गावा बाहेरच.
जन्मापासुनच ती आणि मी एकत्रच.अगदी बालवाडी ते शाळे पर्यंत.सुरुवाती पासूनच ती एकदम बिंधास्त अगदी आमच्या जातीत शोभेल अशी.धमाल करता-करता, मी पटकन तिला प्रपोज केले.

