नाचणाऱ्या गाणाऱ्यांचा देश
एक समाज म्हणून आपण बरीच प्रगती केली आहे. मुलांवर संस्कार करताना छडी लगे छमछम असा सब घोडे बारटक्के पासून सुरु झालेला प्रवास आता मुलांचा कल बघून ऐच्छिक विषय शिकविण्यापर्यंत येऊन ठेपला आहे. आता मुलांना 'मोठेपणी कोण होणार' हा प्रश्न विचारणे शिष्टसंम्मत राहिलेला नाही. मुलांना पॉकेटमनी देणे थोडेफार सर्वमान्य झाले असावे. 'आम्ही म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अभ्यास केला, जुनी पुस्तकं वापरली, सायकलवर शाळा कॉलेजचे शिक्षण घेतले' असे सुनावणे बंद झाले असावे.