प्रकटन

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट ?

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
7 Jan 2020 - 7:46 pm

मागच्या वर्षात जागतिक स्तरावर जॉब लॉस आणि स्लो-डाउन पहावयास मिळाले असुन, चालु वर्षाची सुरुवात अमेरिकेने इराणच्या सुलेमानी यांना ठार करुन केलेली आहे !
मिडल इस्ट आणि तेल याकडे आता पहावे लागेल, तसेच जरी जालावर तज्ञ मंडळी इराण अमेरिका थेट युद्ध करण्याची शक्यता कमी आहे असे सांगत असले तरी वेळ आल्यास इराण Strait of Hormuz ब्लॉक करण्याचा न्यूक्लिअर पर्याय वापरेल का ?
P1

धोरणप्रकटन

उभे गाढव मुकाबला

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in जनातलं, मनातलं
7 Jan 2020 - 6:00 pm

शीर्षक वाचून आपणास हा लेख जलिकट्टी व तत्सम चुरसदार खेळाची माहितीपट आहे अशी अपेक्षा असेल तर आपला अपेक्षाभंग होऊ शकतो. सहसा अशी वाक्ये तळटीप म्हणून वापरतात परंतु लेखाच्या सुरवातीलाच असे वाक्य टाकण्याचे 1च कारण !वाचकसंख्या वाढवण्यासाठी थोडा "धुरळा " उडवायचा होता.

मांडणीकलाप्रकटनविचारसमीक्षालेख

माझं हॉटेलिंग..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
7 Jan 2020 - 12:05 pm

माझं लहानपण सांगलीत गेलं. बापटबाल आणि पटवर्धन हायस्कूल ह्या माझ्या शाळा. माझं कुटुंब साधं, बाळबोध. अशा घरात बाहेरचं खाणं ही अशक्यप्राय गोष्ट होती.तरीही मी हॉटेलात जाण्याचा पराक्रम केला.

मी मॅट्रिकला असतानाची गोष्ट! त्यावेळी सांगली गाव आजच्याइतकं विस्तारलेलं आणि पुढारलेलं नव्हतं. गजानन मिल, काळी खण, प्रताप टॉकीज हे गावाच्या बाहेर आहेत असे वाटे. हरभट रोड, कापडपेठ किंवा मेन रोड, गणपती पेठ आणि गाव भाग हेच मुख्य गाव. राममंदिर,ओव्हरसिअर कॉलनी हे भाग आजच्याइतके गजबजलेले नव्हते. गावात हॉटेल्स फारशी नव्हती.

जीवनमानप्रकटनअनुभव

पंखा

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
3 Jan 2020 - 11:34 pm

।। पंखा ।।

एप्रिल- मे मधील दहावीचे सुट्टीतले वर्ग सुरू होते. गरागरा फिरणाऱ्या पंख्याखाली बसूनही घामाच्या धारा लागलेले विद्यार्थी , त्या धारांशी रुमालांनी लढत होते. मधेच वहीच्या पुठ्ठ्यांनी वारा घ्यायचा फुका प्रयत्न. आजकालचे पुठ्ठेही तसे तकलादूच. मुलंमुली भिजलेल्या चोळामोळा झालेल्या रुमालाने कसेबसे स्वतःला गोळा करत करत अभ्यासाकडे नेत होते. एरवी तसाही गणिताने घाम फुटतोच त्यात उन्हाळ्याच्या नवीन समीकरणांची भर पडली होती!

मुक्तकसाहित्यिकजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवविरंगुळा

जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
18 Dec 2019 - 2:23 pm

आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकताना काहीकाही विचारतरंग उमटतात आणि तेच आपल्या आनंदाचं साधन बनतात.

कालपासून एक गाणं मनात गुंजी घालत होतं.

संगीतधर्मइतिहासप्रेमकाव्यप्रकटनविचार

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
12 Dec 2019 - 7:01 pm

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.

समाजजीवनमानतंत्रप्रवासप्रकटनविचारलेखअनुभव

त्रिपात्री आणि एक अंकी नाटक....?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Dec 2019 - 10:42 pm

खालील नाटक हे तद्दन काल्पनिक आहे. केवळ टाइमपास म्हणून लिहिले आहे. ह्या नाटकात कुठल्याही प्रकारचे विचारमंथन नाही. त्यामुळे, खूप विचार करणार्यांनी पुढील नाटक वाचले नाही तर फारच उत्तम.

ज्यांनी वाचले आहे, त्यांच्यासाठी....ह्या नाटकाला योग्य ते शीर्षक द्यावे, ही नम्र विनंती. धन्यवाद. ...

...........

नाट्यप्रकटनविचार

कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९

avichougule's picture
avichougule in जनातलं, मनातलं
2 Dec 2019 - 10:56 pm

### कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९ ###

खूप दिवसानंतर लिहायचा योग आला आहे निमित्त आहे कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९

मागच्या वर्षी ट्रायथलॉन झाल्या बरोबर ठरवलं होत की पुढच्या वर्षी परत नक्की करायचं, कारण तो सोहळाच एवढा अप्रतिम होता, हो हो सोहळाच. मग काय एप्रिल मध्ये ट्रायथलॉन ची तारीख आली आणि लगोलग आम्ही सगळे मित्रपरिवाराने नोंदणी केली.

मांडणीप्रकटन