FLAME
वीस बावीस वर्षे वयाचे आम्ही एका कॉलेजात शिकायला होतो. मी, सात्या, पव्या, आस्क्या, राजू आणि गुडघ्या एका रुमवर रहात होतो. आमच्या घरमालकाची मुलगी मला लयी लाईन देत होती पण राजाला ते देखवलं नाही. राजानं तिला बहीण मानावं असं फर्मान सोडले. आमच्यात राजा सभ्य नि निर्व्यसनी असल्यानं, हुशार मुलगा रुम पार्टनर आहे म्हटल्यावर आमच्या खोडींकडे बाकीचे कानाडोळा करत. त्यामुळे त्याचं ऐकणं भाग होतं. मी पण उजीवर (उज्वला) लाईन मारणं सोडून दिले. गुडघ्याला मात्र राजाचा लयी राग आला.