मनिषा
मनिषा
मनिषा म्हणजे मनी माझ्या जवळच्या नात्यातील मुलगी. गोरीपान, हसली की गालावरची खळी फार सुंदर दिसायची. त्यात तिच्या दातावर एक दात आलेला आणि वरच्या ओठावर उजव्या बाजूला मोठासा तिळासारखा ठिपका. काळेभोर डोळे नि काळेभोर लांबसडक केस. माझ्या पेक्षा वयाने सहा-सात वर्षे लहान.
असेच एकदा कोणीतरी वडीलधारे म्हणाले यांची जोडी छान दिसेल. हे ऐकून ती इतकी सुंदर लाजली की बस. मलाही ती आवडत होतीच, पण आता मनोमन मीही तिला आयुष्याचा जोडीदार मानायला लागलो.