आशय - भाग ६

किंबहुना's picture
किंबहुना in जनातलं, मनातलं
2 Dec 2019 - 9:04 am

भाग 5

माझा संतापाने तिळपापड झाला. चहा प्यायच्या टेबलवर मी त्याला झाप झाप झापला. तो देखील मला सॉरी म्हणाला. तो म्हणाला की रात्री तूच माझ्या जवळ येऊन झोपलास, मला वाटले तुला सवय आहे याची, आणि नकळत माझ्या हातून तसे घडून गेले.
मी देखील त्याला वॉर्निंग देऊन विषय संपवला.>>>>>

पण विषय अर्थातच संपलेला नव्हता. जाणाऱ्या दिवसांसोबत माझा रागही शांत झाला. अश्यातच एका रात्री त्याने पुन्हा प्रोपोझल मांडलं. का कोण जाणे, मला या वेळेस त्याची दया आली, जे अतिशय अयोग्य होतं, पण ते मला खूप उशीर कळलं.. तेव्हा मी फक्त 'मला काही त्रास होत नाहीये ना' इतकाच विचार करत होतो. आपण करत असलेल्या चुकीच्या कृतीला तंत्त्विकतेचा मुलामा देऊन मनाची समजून घालण्यात मी यशस्वी झालो होतो. नंतर त्या प्रकारची अनेक वेळेस पुनरावृत्ती झाली, आणि ती देखील माझ्या संमतीने. पॅसिव्ह असलो तरी मी एक सहभागी होतोच.
मी तेव्हा नकार दिला असता तर? त्याची पुन्हा हिम्मत झाली नसती माझ्याजवळ यायची. आणि महत्वाचे म्हणजे मला fungal infection जे तेव्हा मिळाले, ते एकतर मिळालेच नसते, किंवा दुसऱ्या माध्यमातून खूप उशीर मिळाले असते. आज असे वाटते की तेव्हा आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहणे खूप आवश्यक होते.

पण ते वय खूप विचित्र होतं. आणि त्यात माझा भिडस्त स्वभाव. तशातच दहावीचे वर्ष पार पडले. दहावीच्या वर्षात तश्या बऱ्याच गोष्टी घडल्या, एखाद्या पौगंडावस्थेतील मुलाच्या आयुष्यात घडव्या तश्याच. ते जग खूप मर्यादित गोष्टींभोवती फिरत असते.
आई वडिलांची आर्थिक ओढाताण बघत होतोच, आणि त्यावेळेस वयाला अनुसरून, आपण लवकरात लवकर कमवायला लागले पाहिजे हा एकमेव विचार डोक्यात स्थिर झाला. (खरे तर माझ्या आईवडिलांची स्थिती इतकी हलाखीची नव्हती, व्यवस्थित मध्यमवर्गीय होते ते. पण माझ्या डोक्यात ते कशामुळे भरले गेले होते ते काही माहीत नाही.) त्या विचाराला अनुसरून मी पॉलिटेक्निक ला जाण्याचा निर्णय घेतला. घरातून खूप विरोध झाला, पण तास की निर्णयावर ठाम होतो, त्यामुळे माझा एक भाऊ ज्या कॉलेजला होता, त्याच कॉलेजला मला देखील पाठवण्याचा निर्णय झाला.
ऍडमिशन मिळणे हा प्रॉब्लेम नव्हताच. ऍडमिशन मिळाली, चांगली कम्प्युटर ला मिळाली. मला मेकॅनिकल हवे होते, पण ते तिथे नव्हते, आणि घरच्यांना कॉम्पुटर हवे होते, ते तिथे होते. त्यामुळे जे आहे ते घ्यायचं या गोष्टीवर मांडवली करून आम्ही कॉलेज मध्ये दाखल झालो.

कॉलेजमधील काही गोष्टी मी इथे अगोदर सांगेन, मी साधारणपणे एक हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होतो. टेस्टस मध्ये मी टॉप केलं नसलं तरी सेकंड टॉप करत होतो, बऱ्याच विषयामध्ये पहिला येत होतो, आणि सगळं आयुष्य छान चालू होतं. काही कारणाने असलेली इंग्रजीची भीती देखील निघून जात होती. नवीन मित्र होत होते, आणि जगाशी पण ओळख होत होती. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट बदलली नव्हती, आणि ती म्हणजे

माझ्या तोंडावर दिसणारा बावळटपणा, आणि माझा भिडस्त स्वभाव.

लहानपणापासून मी खरेतर अत्यंत व्रात्य म्हणून प्रसिद्ध होतो. मारामारी करणे मला शाळेत आणि घरी देखील नवीन नव्हते. अर्थात मी सहसा बचावात्मक मारामारी करत असे, पण लहानपणी एकदा बहिणीला टोकेरी कोणास फेकून मारली होती, तेव्हापासून माझ्यावर गरम डोक्याचा म्हणून शिक्का बसला होता. आणि बोलण्यात तर मी कोणालाच ऐकत नसे, समोरच्याचे वय, नाते वगैरे काहीही मुलाहिजा न बाळगता मी फटकन बोलून जात असे. जसजसा मी वयात आलो, तसेतसे आईवडिलांना या गोष्टीबद्दल काळजी वाटू लागली, त्यामुळे मला कायम शांत राहा असे सांगितले जाऊ लागले. कुठेतरी मलादेखील आपल्यामुळे आईवडिलांना त्रास होतो हे पाहून शांत राहायची सवय लागली, आणि ते न बोलणे पुढे भिडस्तपणात कधी परावर्तित झाले ते कळलेच नाही. हळूहळू भिडस्तपणा हा माझ्या स्वभावाचा अविभाज्य घटक झाला.

गाव ते कॉलेज साधारण 200 किमी होते, त्यामुळे सामान्यपणे माणिण्यातून 2 वेळा हा प्रवास बस किंवा रेल्वे ने घडत असे, माझी घराशी attachment थोडी जास्त होती, त्यामुळे असेल कदाचित, मी दिवस-रात्र ना बघता कधीही घरी जायला निघत असे.

असो, माझ्या आयुष्यातले बरेचसे 'turning points' याच दोन वर्षीय कालखंडात आलेत, त्यामुळे याबद्दल सविस्तर बोलावे लागणार आहे.

तूर्तास बास.

क्रमशः

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

2 Dec 2019 - 10:28 am | यशोधरा

आज सगळे भाग वाचले.
लेखनशैली संयत असल्याने आवडलं लिखाण.

तरी असलं काही वास्तव सहन नाही होत....या अशा विषयाला हात घातल्याबद्दल तुमचं कोतुक आहे.

किंबहुना's picture

3 Dec 2019 - 1:10 pm | किंबहुना

धन्यवाद.

शित्रेउमेश's picture

4 Dec 2019 - 8:21 am | शित्रेउमेश

सगळे भाग आज वाचले. खूप छान लिहीताय... ...या अशा विषयावर लिहिल्यबद्दल तुमचं कोतुक...