आशय - भाग ५

किंबहुना's picture
किंबहुना in जनातलं, मनातलं
16 Aug 2016 - 6:49 pm

प्रस्तावना आणि भाग १
आशय - भाग २
आशय - भाग ३
आशय - भाग ४

मी तसा वर्गातला हुशार विद्यार्थी म्हणून गणला जात होतो. जरी कधीही मी वर्गाच्या मेरिटलिस्टमध्ये आलो नसलो, (त्यात नेहमी मुलीच असायच्या) तरी गणित, संस्कृत, विज्ञान वगैरे विषयात असलेल्या गतीमुळे, तसेच माझ्या भावाच्या तसेच वडिलांच्या रेप्युटेशनमुळे तसी माझी इमेज चांगली होती. याचा मला बर्‍याच ठिकाणी त्याचा फायदा मिळायचा. वर्गात जर कधी कोणाशी मारामारी झाली तरी न्याय करताना मला झुकते माप मिळायचे. मी प्रसंग घेऊन कविता पाडण्यात अत्यंत प्रवीण होतो. घरचे वातावरण टिपिकल ब्राह्मणी, त्यामुळे शिव्या प्रकट काय तर मनातल्या मनात देणे म्हणजे देखील पाप. आठवीपासून माझी गीतापठण, आणि इतर उपासना ग्रंथ वगैरेंची संथा देखील चालू होती. गीतापठणात तर मी नाव दिले की इतर मुले स्पर्धेतून नाव काढून घेत असत. पण हे सगळे कौतुक कधी या गोष्टी माझ्या आईवडिलांना कळेल तेव्हा.
मला भाषा या विषयात अतिशय रस होता. आणि इंग्लिश भाषेशी माझे वाकडे नसले तरी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणे म्हणजे माझ्या जीवावर येई. त्यामुळे बायोलॉजी, म्हणजे जिथे इंग्रजीत उत्तरे लिहावी लागत तिथे माझे खूप हाल होत असत. आणि बाकी पण रट्टा मारणे ही गोष्ट मला जमत नसे. पण तरीही दिवस जात होते.
नववीत असताना कवितांसोबत मला काहीतरी लिहावेसे वाटू लागले. घरात येणार्‍या लायब्ररीच्या पुस्तकांपासून, तसेच त्याकाळी चालणार्‍या सिरिअल्स पाहून मी देखील एक कादंबरी लिहायला घेतली. बराच वेळ विचार करून कादम्बरीचा पहिला सीन लिहून काढला, तो होता बलात्कार आणि त्यातून नायिकेची सुटका करणार्‍या हिरो कम व्हिलनचा. बराच प्रयत्न करून मी तो सीन लिहिला. माझ्या ज्ञानाप्रमाणे मी वातावरणनिर्मिती देखील केली होती. अंतर्वस्त्रे न घालणारी नायिका, अचानक हिरोची एंट्री वगैरे. कोणती कादंबरी वाचली होती तेव्हा हे आठवत नाही. पण चांगले लिहिले होते. पण तिथे देखील दुर्दैव आडवे आले. काही कारणाने ते मी ज्यांच्या घरात रहायचो त्यांच्या हातात लागले, आणि नंतर ते मला पुन्हा कधीच दिसले नाही. नाही म्हणायला ते एकदा गावी माझ्या आईच्या हातात दिसले होते. पण तितकेच. परत मला ते दिसले नाही.
पण यातूनच माझा स्वभाव हळूहळू बंडखोर बनत चालला. एकदा असेच तन्मयवरून भांडण झाले होते, आणि घरात अबोला होता. नेमके तेव्हा शळेत प्रगतीपुस्तके दिली होती. माझ्या प्रगतीपुस्तकात तसे लपवण्यासारखे काही नव्हते, पण बोलायचे नाही, त्यामुळे मी ते प्रगतीपुस्तक घरात शोकेसमध्ये ठेवले. योगायोगाने दुसर्‍यादिवशी अबोला संपला, पण काका भेटले नाहीत. मी काकूला प्रगतीपुस्तक दाखवले, पण सही मात्र काकांचीच हवी.
शाळेत प्रगतीपुस्तक द्यायच्या दिवशी मी काकूला सांगितले, आणि प्रगतीपुस्तकावर सही करून टाकली. अर्थात काकूची याला संमती नव्हती, पण माझा नाईलाज होता.
ती रात्र आणि दुसरा दिवस मला यासाठी पुरला. घरातल्या कामांपैकी विहीरीवरून पाणी आणणे हे काम माझ्यावर होते. मी पाणी आणताना काकांच्या तोंडाचा पट्टा चालू होता, मी कोडगा झालोच होतो, त्यामुळे दुर्लक्ष करत होतो. परंतु रागाच्या भरात अचानक ते मला म्हणाले की तू म्हणजे अगदी xxxx (जातीवाचक शब्द) आहेस. मलाही राग आला, मी ठरवले की यापुढे यांच्या हाकेला ओ द्यायची नाही. आणि तो दिवस मी काकांच्या हाकेला अजिबात ओ दिली नाही. त्याबद्दल भरपूर मार खल्ला, पण मी हळूहळू शाब्दिक आणि शारिरिक माराला कोडगा बनत चाललो होतो.

दहावी तशी ठीकठाक चालली होती. ते प्रणयने शिकवल्याप्रमाणे मी देखील आपले वीर्य काढायला शिकलो होतो, छान वाटायचेच, पण त्याहीपेक्षा एकदा ते मोकळे केले, की पुढचे ४-५ तास पहिल्यासारखा पँट फुगून अनावस्था प्रसंग येत नसे. त्यामुळे मी रोज आंघोळ झाल्यवर शाळेत जाण्यापूर्वी स्वतःला मोकळे करून घेत असे. पण रोजची १५-२० मिनिटे यात टाकणे म्हणजे फारच झाले. मी वेगवेगळे प्रयोग करून अशी पद्धत शोधून काढली जी मला १ मिनिटात मोकळे करत असे, त्यामुळे काम सोपे झाले. आंघोळ झाली की २ मिनिटात मी मोकळा. पण कधी कधी पद्धत चुकली तर मात्र परत ताटकळायला लागत असे.

शाळा सुरू होऊन थोडेसेच दिवस झाले होते, एक दिवस रविवारी संध्याकाळी आम्ही क्रिकेट खेळत असताना एक मोठा मुलगा बॅग घेऊन आला. आल्याआल्या सराईतासारखा आमच्यात खेळायला पण लागला. मी त्याला ओळखत नव्हतो, पण बाकीचे ओळखत होते. नंतर समजले की मी ज्या खोलीत राहत होतो, त्या खोलीत खरे तर तो पीजी म्हणून राहत होता. तो तिथेच एका कॉलेजला बीएससी करत होता. म्हणजे ज्या गादीवर मी झोपत होतो ती गादी आता त्याला द्यावी लागणार होती. अर्थात ही गोष्ट मला तेव्हा समजली नाही. तो दिवस तसाच गेला. रात्री जेवण झाल्यावर मी झोपायला गेलो.

मध्यरात्री अर्धवट झोपेत असताना आपल्याजवळ कोणीतरी येऊन झोपले आहे असे जाणवले. थोड्या वेळाने कोणीतरी माझी चड्डी खाली ओढली, आणि माझ्या मांड्यांमध्ये काहीतरी वेगळा स्पर्श मला जाणवू लागला. मी खूप झोपेत होतो, पण काहीतरी वेगळे होत आहे याची जाणीव मला होत होती. थोड्यावेळाने ते सगळे थांबले, आणि तश्यातच मी परत झोपलो.

सकाळी उठलो तेव्हा मला साधारण काय चालू आहे याचा उलगडा झाला. रात्री विश्वास माझ्या शेजारी म्हणजे त्याच्या गादीवर झोपला होता. एका क्षणात मला याचा सगळा अर्थ कळला. माझा संतापाने तिळपापड झाला. चहा प्यायच्या टेबलवर मी त्याला झाप झाप झापला. तो देखील मला सॉरी म्हणाला. तो म्हणाला की रात्री तूच माझ्या जवळ येऊन झोपलास, मला वाटले तुला सवय आहे याची, आणि नकळत माझ्या हातून तसे घडून गेले.
मी देखील त्याला वॉर्निंग देऊन विषय संपवला.

(क्रमशः)
हा भाग थोडा छोटा झाला आहे.

संस्कृतीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

16 Aug 2016 - 10:33 pm | आनन्दा

सत्य घटना आहे की काल्पनिक? सत्य असेल तर भयंकर आहे.. वय किती असेल त्या मुलाचे तेव्हा?

ज्योति अळवणी's picture

17 Aug 2016 - 11:08 pm | ज्योति अळवणी

अजून अंदाज नाही आला नक्की काय सांगायचं आहे

खरेतर हा विषय मी पहिल्या भागत स्पष्ट केला आहे. आपण मुलींच्या लैंगिक शिक्षणाबाबतीत बाबतीत जेव्हढी काळजी घेतो त्याच्या १ टक्का देखील मुलाच्या बाबतीत घेत नाही. खरे तर मुले देखील त्याच बदलांमधून जात असतात. मुलींना जे धोके असतात तेच धोके त्यांना देखील असतात. (फक्त गर्भधारणा हा धोका सोडून). हा विषय जसा पुढे जाईल तसे तसे अजून काही गोष्टी समोर येत जातील. आपल्याकडील समजूती, प्रथा, दैववाद वगैरे गोष्टींमधून एखादा कसा फरफटत जायाचीबाहेरच्या जगात वावरताना संभाव्य धोके कसे ओळखावे याची कल्पना नसल्यामुळे मुले त्याला कशी बळी पडतात याचे वर्णन करायचा प्रयत्न आहे. दुसरा हा हेतू की पौगंडावस्थेतील मुलांना हाताळताना काय चुका होण्याची शक्यता असते, किती फालतू गोष्टी त्या वयात टर्निंग पॉईंट बनतात/ परिणाम करून जातात हे देखील सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हेतू हा की ज्यांची मुले या वयातून जात आहेत, त्यांना बदलत्या जगात आपल्या मुलांचे प्रश्न देखील हाताळायला हवेत याची जाणीव होइल.. आणि कदाचित काय करायला नको हे देखील कळेल.
इथे लिहिल्या जाणार्‍या बहुतांश घटना एक तर सत्य आहेत, किंवा सत्याच्या खूप जवळ जाणार्‍या आहेत.

गिरिजा देशपांडे's picture

20 Aug 2016 - 11:08 am | गिरिजा देशपांडे

हेतू हा की ज्यांची मुले या वयातून जात आहेत, त्यांना बदलत्या जगात आपल्या मुलांचे प्रश्न देखील हाताळायला हवेत याची जाणीव होइल.. आणि कदाचित काय करायला नको हे देखील कळेल. - एवढ्याच साठी पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे. पुढचे भाग लवकर येऊ द्या.

ज्योति अळवणी's picture

20 Aug 2016 - 1:19 am | ज्योति अळवणी

तुमच म्हणण पटल. याचा अर्थ असा का की शेवटी तुम्हाला काय अपेक्षित आहे ते लिहून तुम्ही हे लेखन कान्क्लूड करणार आहात?