आशय - भाग ४

किंबहुना's picture
किंबहुना in जनातलं, मनातलं
13 Aug 2016 - 11:40 pm

प्रस्तावना आणि भाग १
आशय - भाग २
आशय - भाग ३

दहावीच्या क्लासच्या काळात आम्ही सगळे जिथे रहायचो तिथे एक भयानक किस्सा घडला. व्हेकेशन क्लास संपत आलेला असताना म्हणजे साधारण २०-२१ मेच्या दरम्यान पाउस पडला. अम्ही जिथे रहायचो तिथे नारळाच्या बागेला पाणी पुरवण्यासाठी एक विहीर होती, त्या विहीरीवर एक पंप होता. त्या पंपाला नेमके शॉर्टसर्किट झाले, आणि करंट पंपाच्या लोखंडी पाईपातून आजूबाजूच्या जमिनीत पसरला होता. दुपारच्या वेळेत आम्ही सहज बागेत फिरायला गेलो तेव्हा ही गोष्ट आमच्या लक्षात आली. बाजूच्या सगळ्या जमिनीवर करंट असल्यामुळे तिथे चालणार्‍यांना माईल्ड करंट लागत होता. आम्हाला जाम मजा येत होती. आम्ही बराच वेळ त्या करंटची मजा घेत तिथे उभे रहिलो, पण शेवटी कोणीतरी बागेतल्या कामगाराला सांगायला हवे म्हणून आम्ही सगळे त्या कामगाराच्या झोपडीकडे निघालो. त्या रस्त्यावर नेमका तो पाईप होता ज्याला करंट होता. आम्हाला सवय होती की जाताना त्या पाईपावर उडी मारायची आणि पुढे जायचे. मी म्होरक्या होतो. पण नेमके कसा काय कोण जाणे मी पाईपावर उडी न मारता सरळ चालत गेलो. माझ्या मागे चिन्मय होता, त्याने त्या पाईपावर उडी मारली. तो केवळ एक किंकाळीच मारू शकला आणि बेशुद्ध पडला. २३० व्होल्ट ३ फेझ चा शॉक त्याला बसला होता.
पुढेची ५ मिनिटे माझ्या आयुष्यातील फार कठीण मिनिटे होती. तो मुलगा बेशुद्ध होऊन पडला, तो नेमका त्याचा एक पाय त्या लोखंडी पाईपवरच पडला. सलग एक मिनिट तो शॉक खात होता. मी त्याला हाताने सोडवायचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला, कारण तो करंट मी सहन करू शकत नव्हतो. आम्ही जोरजोरात गड्याला हाका मारल्या. तो धावत आला. एका क्षणात त्याने परिस्थिती ताडून जवळच्या एका पीव्हीसी पाईपाने त्याचा पाय लोखंडी पाईपावरून काढला. नशीबाने तो १/२ का १ इंची पाईप त्याचा पाय उतरवेपर्यंत टिकला. एक इंची पीव्हीसी पाईपाने असा पाय उचलणे कठीण आहे, कारण तो पाईप लवतो. पण त्या मुलाच्या आयुष्याची दोरी बळकट होती. मग त्याला प्रथमोपचार करून आम्ही घरी घेऊन आलो, डॉक्टरांना बोलवले होतेच, त्यांनी तपासले, आणि ऑल ओके असल्याची खात्री दिली.
त्याला प्रचंड अशक्तपणा आला होता, चातीत थोडेसे दुखत होते. पण बाकी ठीक होते. मग त्याला घरी पाठवून दिले आणि विषय संपला. पण आम्हाला मात्र कायमचा धडा मिळाला.

अश्यातच शाळा सुरू झाली. आमच्या वर्गात एक मुलगा होता. त्याचे नाव प्रणय. त्याला आई नव्हती. त्याच्या वडिलांचे कुठले तरी छोटेसे दुकान होते. एकटे राहणे म्हणजे काय ते खरे तर सांगणे फार कठीण. पण तो हे सगळे खूप ग्रेसफुली हँडल करायचा.
त्याचा मेंदू खूप शार्प होता. आम्ही त्याला सगळे सायंटिस्ट म्हणायचो. सतत काहीना काहीतरी किडे करत असे. मी शाळेत जाताना नेहमी त्याच्याकडे जाऊन त्याच्याबरोबर पुढे जात असे. मी जायचो तेव्हा नेहमी त्याची आंघोळ चालू असे. एक पडदा त्या पडद्यामागे तो आणि त्याचे बाबा, बाहेरच्या खोलीत एका खुर्चीवर मी, अशी ती ५-६ मिनिटे असायची.
एक दिवस आम्ही ठरवले की उष्णता दिल्यावर नेमक्या काय रासायनिक अभिक्रिया होतात ते पहायचे. मग त्याचे बाबा घरात नसताना, आम्ही हा प्रयोग करायचे ठरवले. एका पातेलीत पाणी घेतले, आणि त्या पाण्यात काय टाकायचे असा विचार करता आम्हाला त्याच्या बाबांची तंबाखूची पुडी दिसली. आम्ही तोच तंबाखू त्या पाण्यात टाकला. चांगले उकळवल्यावर थोड्या वेळाने खर्‍या अभिक्रियांना सुरुवात झाली. आम्ही नाकावर रुमाल घेऊन त्या अभिक्रिया पाहत होतो. त्या तंबाखूची मशेरी होऊन हळूहळू तो करपायला होता. आम्ही असा निष्कर्ष काढला की कोणताही पदार्थ तापवला की शेवटी त्याचा कर्बन होतो. पण, तेव्हढ्यात त्याचे बाबा आले कुठे गेलेले ते आणि मग आमच्याच अभिक्रिया झाल्या. बिचार्‍याला कार्बन होईपर्यंत मार पडलो. त्याच्या बाबांच्या चहाच्या पातेलीला आम्ही कायमस्वरूपी तंबाखूचा वास दिला होता.

दहावी नुकतीच सुरू झाली होती, आणि एकदा मधल्या सुट्टीत आम्ही दोघे ग्राऊंडवर गप्पा मारत होतो. त्यावेळेस प्रणय मला म्हणाला काय रे तुला वीर्य म्हणजे काय ते माहीत आहे का? तोपर्यंत वीर्य या शब्दाशी माझा संबंध फक्त पुराणकथांमध्येच होता. अमुक एका देवाची तौक एका अप्सरेला पाहून वीर्य सांडले वगैरे, मग त्याने ते पायाने चुरडले आणि त्यातून ढमुक इतके पुत्र जन्माला आले, किंवा याचे वीर्य तिने गिळले आणि त्यातून संतती निर्माण झाली वगैरे. ज्याच्याकडे जास्ती वीर्य तो जास्ती मोठा, असा साधा हिशोब होता. पण ही वस्तू आपल्याकडे पण अशी सहज उपलब्ध असते याची तशी कल्पनाच नव्हती.
त्यामुळे मी म्हणलो नाही, मला काही कल्पना नाही. मग त्याने मला मौलिक माहिती पुरवली. अरे हे सगळ्या पुरुषांकडे असते. मला जरा एका प्रयोगासाठी हवे आहे, तू मला जरा ते मिळवायला मदत करशील का? मला आनंद झाला. या निमित्ताने थोडेसे अधिकचे ज्ञान आअपल्या पदरात पडेल, आणि एक नवीन प्रयोग करायला मिळेल म्हणून मी पण तयार झालो.
मग आम्ही दुसर्‍या दिवशी दुपारी त्याच्या घरी गेलो. प्रणय ने मला एक झिप लॉक वाली पॉलिथिन दिली, आणि म्हणाला की आपल्याला वीर्य यात गोळा करायचे आहे. मी बोललो ठीक आहे. मग त्याने मला नेमके काय करायचे ते दाखवले, आणि मी त्याप्रमाणे कृती करून त्याचे वीर्य गोळा केले त्या पॉलिथिनमध्ये. त्याला ते दिल्यावर त्याने ते खिडकीतून टाकून दिले. मला कळेना, जर आपण हे एव्हढ्या कष्टाने मिळवले आहे तर हा टाकून का देतो? पण मनात म्हटले काही तरी झाले असेल, आणि त्याला हे आवडले नसेल.
तेव्हढ्यात तो म्हणाला आता तुझे काढूया. मी देखील त्याने सांगितल्याप्रमाणे झोपलो. त्याने जवळ जवळ १० ते १५ मिनिटे प्रयत्न केले. पण आम्हाला काही जमले नाही. शेवटी तो म्हणाला की जाऊदे, तुला काही जमत नाही. आम्ही परत शाळेत आलो
हा सरळ सरळ माझ्या पौरूषत्वाचा अपमान होता. मला त्या दिवशी रात्री झोप येईनअसामाझ्यात काहीतरी कमी आहे असे मला वातायला लागले. आता अशी परिस्थिती आहे तर नंतर लग्न झाल्यावर काय होईल या विचाराने मला पार पोखरून काढले. शेवटी मी ठरवले की आज या प्रकरणाचा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा.
नशीबाने मी त्या दिवशी रूममध्ये एकटाच होतो. मी चंग बांधला. काय करायचे हे मला साधारण माहीत होते, मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, आणि अखेरीस साधारण अर्ध्या तासाने मला या कामी यश मिळाले. मी देखील पुरूष झालो होतो.

(क्रमशः)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

14 Aug 2016 - 12:02 pm | आनन्दा

चांगले लिहिले आहे. पण आता याच्या पुढे काय?
बाकी शॉकचा अनुभव मात्र मी देखील घेतला आहे. हा अनुभव भयानक आहे.

ज्योति अळवणी's picture

15 Aug 2016 - 10:17 am | ज्योति अळवणी

एकूणच मुलांची पौगंडावस्थेतील मानसिकता चांगली वर्णन केली आहे

किंबहुना's picture

15 Aug 2016 - 1:12 pm | किंबहुना

धन्यवाद ज्योतीतै, अजून बरेच कच्चे दुवे राहून जातायत, बघूया मूळ गाभ्याला हात न लावता लिहिता आले तर लिहेन..
@आनन्दा अजून कथेचा मूळ विषय यायचा आहे.

गिरिजा देशपांडे's picture

16 Aug 2016 - 4:50 pm | गिरिजा देशपांडे

वाचतेय. पुभाप्र

I have a feeling his father was abusing him sexually.
दहावीतल्या मुलाला अंघोळ करायला वडिलांची मदत लागू नये..