मी आशय, या कथेचा नायक. तुम्हाला कळले असेलच की आता मीच आत्मकथन करायला सुरुवात केलेली आहे. बाकी नमनाला घडाभर तेल घालून झालेले असल्यामुळे मी आता परत पूर्वपीठिका सांगत नाही, तर सरळ मुद्द्यावर येण्याआधी एक गंमतीशीर किस्सा सांगतो आणि मग मूळ मुद्द्यावर येऊ.
मी साधारण सहावीत असेन. मला पहिल्यापासून पेपर वाचायची आवड, हातात कागद मिळाला की तो वाचलाच पाहिजे असा शिरस्ता. तेव्हा आमच्याकडे तरूण भारत यायचा. त्यात वेगवेगळे लेख असायचे. त्यातच एकदा एक लेख विवाहसंस्थेचा होता. साधारण रोख असा होता, प्राचीन काळापासून जगात चालत आलेले विवाह, वेगवेगळ्या धर्मातील विवाहप्रथा, वगैरे. त्यात नेमका यम-यमीच्या संवादाचा उल्लेख होता, यमाला यमीपासून मुले हवी होती वगैरे वगैरे. मला अचानक शोध लागला की अरेच्च्या, बहिणीला पण भावापासून मुले होऊ शकतात. अर्थात पुढचा प्रश्न आला की असे घरातल्या घरात नुले जन्माला घालायचे सोडून हे लोक मग लग्न कश्यासाठी करतात? बर्याच वेळाने मला त्याचे उत्तर मिळाले. पण आता हे उत्तर बरोबर आहे की नाही हे कसे कळणार?
रात्री जेवताना मी माझ्या बाबांना प्रश्न विचारला, बाबा लग्न कशासाठी करतात?
बाबांच्या हातातला घास हातातच राहिला. संपूर्ण घरात एकदम सन्नाटा पसरला. आजही मला तो सन्नाटा आठवतो. मी पुढे बोलतच होतो. मुले तर बहिणीला भावापासून पण होतात ना? मग लग्न कशासाठी करायचे? बाबांच्या आणि आईच्या चेहर्यावर काळजी दाटून आली. शेवटचा उपाय म्हणून बाबांनी मला विचारले, तुला काय वाटते?
मी बोललो "सोपे आहे, जर घरातच अशी मुले जन्माला घातली तर मग दोन कुटुंबांमध्ये नाती कशी जुळणार?"
बाबांनी पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, हो रे बाळा, तू म्हणतोस ते अगदी खरे आहे. हेच कारण आहे लग्न करण्याचे. आणि वातावरणातला ताण एकदम हलका झाला. असो.
मी सातवीत असताना एक दिवस शाळेत लघुशंकेला गेलेला असताना स्वप्निलने माझी अवस्था पाहिली, आणि पटकन म्हणाला, "अरे हे एव्हढे मोठे असणे वाईट असते" आणि मी थोडासा गोंधळलो. हे काही पहिल्यांदा होत नव्हते. जेव्हा जेव्हा जोराची लागायची तेव्हा काहीतरी टणकपणा मला जाणवायचा तिथे, पण मला वाटायचे हे सगळे आपोआप होते. पण त्यावेळेस स्वप्निल म्हणाला आणि मला जाणवले की हे काहीतरी वेगळे आहे. मग मला चाळाच लागला. जरा एकांत मिळाला की त्याचे निरीक्षण करत बसायचो. घर आमचे तसे मोठे होते, आणि अभ्यास करताना लक्ष ठेवायला देखील कोणी नव्हते. त्यामुळे मला तू काय करतोस वगैरे विचारायला कोणी नव्हतेच.
अभ्यास करताना देखील मला एका बाजूला स्वतःशीच खेळायचा नाद लागला. नशीबाने कोणी पाहिले नाही नाहीतर फारच कठीण होते तेव्हा. पण हे प्रकरण तेव्हढ्यावर थांबले नाही. अचानक केव्हाही काहीही कारण नसताना पँट फुगीर व्हायची आणि लपवताना नाकी नऊ यायचे. काय करावे काही कळत नसे.
तश्यातच मी आठवीत गेलो, आणि तुकडी बदलली. या तुकडीत मुले आणि मुली एकमेकांशी बोलायची बंद झाली. कोणी काय पिन मारली कोणाला काही कळले नाही, पण अचानक एखादी जादूची कांडी फिरवावी तसे मुलांचे आणी मुलींचे एकत्र बोलणे, खेळणे बंद झाले. मी खूप विचार केला, पण असे का झाले ते कळेना. त्यातच एक नवीन गोष्ट कळली, ती म्हणजे लाईन मारणे.. एका मित्राने एक दिवस समजावून सांगितले, की आपल्याला जी मुलगी आवडते त्या मुलीकडे बघत बसणे म्हणजे लाईन मारणे. तो म्हणला तू कोणावर लाईन मारणार? माझ्या मनात आली ती प्रीती, पण तिच्यावर तर तो अगोदरच लाईन मारत होता, मग त्यानेच सुचवले, मी वर्गातला संस्कृत पंडीत होतो, त्यामुळे त्याने संस्कृतमध्ये हुशार असलेली एक मुलगी शोधली आणि माझी जोडी जमवून टाकली.. मी काही तिच्यावर लाईन मारत नव्हतो, पण लोकांच्या समाधानासाठी नाटक तर करायलाच लागायचे. खरे तर मग मी वाट बघू लागलो ती रक्षाबंधनाची.
असो, पण माझ्या स्वप्नात मात्र प्रीतीच यायची. माझी स्वप्न आपली साधी असायची.खरे तर त्याला दिवास्वप्न म्हटले तर अधिक बरे होईल. एका खोलीत मी आणि प्रीती, एकमेकांच्या मिठीमध्ये, एकदम विवस्त्र. अर्थात आमच्या कल्पनेची झेप तेव्हडीव, त्यामुळे पुढे काय करायचे याची काहीच कल्पना नाही. पण तेव्हढ्या कल्पनेने देखील मनाला गुदगुल्या व्हायच्या.
अशी दिवास्वप्ने मी रात्ररात्रभर देखील बघत असे.
मी ज्यांच्याकडे रहायला होतो, त्यांचा एक छोटा मुलगा होता. तन्मय. पण त्याच्या गोष्टी आपण नंतर बघू.
आठवीमध्ये असताना माझी अजून एक फँटसी होती... आमच्या शाळेत मुले मुली वेगवेगळी बसायची. मला नेहमी असे वाटायची की जर मी मॉनिटर झालो तर मुलामुलींना एका बेंचवर बसवेन.. माझ्या बाजूला अर्थात "माझी", आणि काहीतरी कारण होऊन ती रडायला लागेल, आणि मी यशस्वीपणे तिची समजून घालीन.. दुर्दैवाने माझे स्वप्न तिथेच राहिले. मी कधी मॉनिटर झालो नाही
माझ्याप्रमाणे मुलींचे काय होत असेल हा प्रश्न मला नेहमीच पडलेला असे. पण हाय रे कर्मा. ते मला कोण समजावून सांगणार? मी आपला मिळेल त्या मार्गाने आपली ज्ञानाची भूक भागवायचा प्रयत्न करत होतो.
घरात लायब्ररी होती, तिथे वेगवेगळी पुस्तके यायची, मी ती पुस्तकांमधील वर्णने वाचून आपली तहान भागवत होतो. पण नुसती वर्णने वाचून काय होणार? संभोग हा शब्द ऐकला की माझे डोळे लकाकायचे. त्याबद्दल काहीही आणि कोणत्याही पुस्तकात पहायला मिळाले तरी मला अत्यंत आनंद व्हायचा. बायोलॉजी चे पुस्तक माझे अत्यंत आवडते. पेपरमधली रविवारची पुरवणी, आवज वगैरे माझे त्या काळातले खरे गुरू.. अश्याच एका पेपरमधल्या आर्टिकलमध्ये वाचले, की संभोग ही माणसाला परमावधीचा आनंद देणारी कृती आहे, पण संभोगातील खरे सुख त्या चरमबिंदूमध्ये नसून घर्षणामध्ये आहे. झाले, रात्री झोपायच्या वेळेस मी भींतीसोबत घर्षण करण्याचा प्रयत्न केला, पण हाय रे देवा, त्याचा काही उपयोग झाला नाही.
अश्यातच हळूहळू आठवी सरली. आणि नववी आली. नववीमध्ये देखील तसे काही फार भारी झाले असे नाही. नाही म्हणायला आत्मपीडन केल्यास काहीतरी वेगळीच अनुभूती येते याचा मला शोध लागला होता. हळूहळू घरात कोणी नसताना दोरी, रबर, कपाट यांच्या सहाय्याने मी आत्मपीडन करून घ्यायला सुरुवात केली. रविवारची संध्याकाळ मला या बाबतीत खूप सोयीची होती. त्यावेळी घरातील सगळे फिरायला बाहेर जात असत, आणि मी घर सांभाळत असे.
कपाटाशी खेळतानाच मला एक दिवस समोर ठेवलेले पैसे दिसले, आणि मी गुपचूप त्यातले ५० रु. उचलले. कोणाला काहीच कळले नाही. त्या पैशांचे मी नंतर आईस्क्रीम खाल्ले. त्यानंतर साधारण महिना दोन महिन्यांनी मी असे ५०रु. उचलत असे. घरून पॉकेटमनीसाठी थोडे पैसे येत असत, त्यामुळे माझ्या खिशात पैसे असणे ही काही अशक्य गोष्ट नव्हती, आणि ५०रु. ही त्या काळी मोठी गोष्ट असली, तरी बंडलातून एक नोट गायब झालेली कळणे तसे कठीण होते. अर्थात पकडले जाण्याची भीती असल्यामुळे मी कधीच मोठी चोरी केली नाही, आणि अर्थात माझ्या आर्थिक गरजा देखील तेव्हढ्या मोठ्या नव्हत्या.
अश्या प्रकारे माझे नववीचे दिवस चालले होते. घरात तन्मयसोबत भांडणे नित्याची झाली होती. तो हट्ट करत असे, मी ऐकले नाही की मारत असे, रडत असे, आणि प्रकरण त्याच्या आईकडे गेले की मला शिक्षा होत असे. सामान्यपणे ही शिक्षा असे अबोला. पहिले पहिले मला खूप त्रास होत असे या अबोल्याचा. पण नंतर मला कळले की आपली चूक नसताना हा अबोला होत आहे, आणि मग मी हळूहळू त्याला कोडगा कधी बनत गेलो माझे मलाच कळले नाही. परिणाम आजही मी कितीही भांडण झाले तरी अबोल्याच्या पातळीवर जात नाही. मुलांना कितीही मारले तरी जोपर्यंत त्याला आपले का आणि काय चुकते आहे हे कळत नाही तोपर्यंत त्या मारहाणीचा काहीही उपयोग नाही हे मी साक्षात माझ्या उदाहरणावरून शिकलोय.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
11 Aug 2016 - 6:01 pm | आनन्दा
वाचत आहे..
12 Aug 2016 - 12:10 pm | गिरिजा देशपांडे
चांगलं लिहिताय. सुखवस्तू घरातला असून पैसे चोरतो पचायला जरा अवघड गेलं.
पुभाप्र
12 Aug 2016 - 9:17 pm | किंबहुना
हो पण असे असते बर्याच ठिकाणी.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
13 Aug 2016 - 8:34 am | ज्योति अळवणी
छान लिहिता आहात