पत्र व्यवहार ... एक दुर्मिळ होत चाललेलं काम , कौशल्य ...काय म्हणाल ?
आजच सकाळी (रविवार) जुन्या गोष्टी हाताळत असताना एक जुनं पोष्ट-कार्ड (हो हो पो”ष्ट” च) हाती लागलं. फार जुनं नाही , १० एक वर्षांपूर्वीचं. पण “दुर्मिळ” वाटावं इतकी ही पत्र लिहिण्याची-पाठविण्याची सवय पार भूतकाळात गेल्यासारखी वाटतीये आता. ह्या पत्रामुळे अनेक गोष्टींची विचार शृंखला जागृत झाली, शिवाय रविवार असल्याने विचारांना पसरायालाही मी भरपूर वावही दिला. आता खरं म्हणजे इतरही वार मला असा वेळ नक्कीच देवू शकतात बरंका. पण “रविवार” डोस्क्यात बसलाय , तो त्याचं एक विशिष्ट स्थान घेवून.