हेडफोन आणि आयुष्य आता एकसारखंच वाटायला लागलंय.
रोज सकाळी उठून गुंता सोडवायला सुरुवात करावी लागते.
रोज विचार करतो हे असं होत तरी कसं..कधी सहज रित्या गुंता सुटतो तर कधी खूप वैताग येतो. मग तो तसाच ठेवून पुढच्या कामात झोकून देतो.
दिवसभर मात्र हेडफोन आणि आयुष्य या दोन्हीचा विसर पडतो.
संध्याकाळी मात्र जरा रिलेक्स झाल्यावर पुन्हा या दोन्ही गोष्टी आठवतात. मग पुन्हा गुंता झालेल्या या गोष्टींची उकल करण्यास सुरुवात होते.
छोटीशी गाठ पण खूप त्रास देते पण ती सुटल्यावर मात्र मनस्वी आनंद मिळतो. कानात हेडफोन टाकून आवडती गाणी एन्जॉय करता करता आयुष्य पण एन्जॉय करण्याचा विचार येतो.
रात्री झोपताना सुरळीत करून ठेवलेल्या या दोन्ही गोष्टींचा सकाळी पुन्हा गुंता झालेला असतो आणि पुन्हा एकदा हा गुंता सोडवण्यात आपण गुंतून जातो.
लेखक - मीच