चार वर्षापुर्वीची गोष्ट आहे, मँगलोर एक्स्प्रेस ने मी ठाण्याहुन कणकवली ला निघालो होतो. आयत्या वेळी बेत ठरल्या मुळे, रेइजर्वेशन कन्फ़र्म होणे शक्य नव्हते, म्हणुन टाईम्स ऑफ़ वींडीया घेत्ल आणि. निघलो. S ३ च्या दारत शिरलो. टीसी महाशयांना सीट साठी हटकल तर साहेबनि असा काय लूक दीला कि त्यांच्याशी सोयरिकच करायला मागत होतो. मग सोबत घेतलेल टाईम्स ऑफ़ वींडीया दारा कडे अंथरला आणि बैठक जमवली.
गाडी १०.३० च्या सुमारास ठाण्याहुन सुटली, दोन तीन प्रवासी सामान घेउन धावाधाव करत होते. गाडी पारसीक बोगद्याच्या बाहेर पडल्यावर माझ्या शेजरी अजुन एक जण पेपर टाकुन बसला. त्याला पाहुन मला उगाचच अस्वस्थ व्ह्यायला लागलं, ( रात्री झोपल्यावर पाय कुठे सोडु हे त्या अस्वस्थे मागचं मुळ कारण) पण कळंबोली येइस्तोवर त्याच्याशी ओळख करुन त्याला थोडं सरकुन घ्यायला सांगण्यात मी यशस्वी झालो. इतक्यात गाडी पनवेल स्टेशन मध्ये शिरली ५-६ ब्यागा वाले आत आले सोबत २ – ३ समोसे आणि वडेवाले पण आत आले. गाडी सुटल्यावर समोसेआणि वडेवाले उतरले आणि ब्यागावाले आपापल्या सिटवर विसावले. मी आणी माझा पेपर वेटींग मित्राने सुटकेचा श्वास सोडला कारण त्या मोकळ्या चिंचोळ्या गल्लीत आम्ही दोघेच झोपणार होतो. माझ्या नेहमीच्या सवयीने मी चार हि दरवजे लॉक करुन घेतले. कारण पुढचे स्टेशन थेट रत्नागीरी होतं. मधल्या स्टेशन वर कुणी चढायचा प्रश्नच नव्हता.
माझ्या समोर असणार्या ६ बर्थ आणि २ साईड बर्थ वर प्रवासी झोपले होते. त्यात साईड बर्थ वर कोकणातील कुटुम्ब झोपलं होतं, साईड अपर बर्थ वर एक पन्नशीतला ग्रुहस्थ घोरत पडला होता, लोवर साईड बर्थ वर त्याची भार्या "नववधु प्रिय मि बावरते” स्टाइल मध्ये झोपायच्या सीट वर पाय सोडुन खिडकी च्या जाळीवर डोकं टेकुन झोपलि होति, बाकिच्या सहा बर्थ वाल्यांचे फक्त पायच दिसत होते. दोन सीट च्य मध्ये चपलांचा खच पडला होता.गाडी पुढे सरकत होती , रात्र चढत होती, तशी डोळ्यावर देखील झोप वाढत होती. पाठिचा कणा ९० अंशातुन हळु हळु ११० – १४० अस प्रवास करत १८० वर स्थिरावला. पाय वॉश बेसिन कडे सोडुन मी निवांत झालो. गाढ झोपेत नसलो तरि कोंबड्याची झोप घेत होतो… सावध.
एखादं कुणीतरी ओलांडुन जाताना लाथ लाउन जायचं. मग रागानेच पण काहीशा आळसाने एक डोळा उघडुन “कोन तो मायझयो” अशा अवीर्भावात जमेल तेवढा राग डोल्यातुन ओकत परत पापण्या ओढुन घ्यायच्या. हे असचं सगळं चालत असताना मध्येच अंगावर पणाचे तुषार उडाले, डोळे उघडुन बघावं तर मन मानेना, आळस म्हणाला पवसाचं पाणी असेल, पण मेंदु म्हणाला “ साहेब आपण वॉश बेसिन शेजारी झोपला आहात” तस पटकन उठुन बसलो , दिवस पवसाचे होतेखरे, पण ते तुशार पावसाचे नव्हते, कुणीतरी लुंगीवाला आजोबा हात धुत होता. मध्येच घश्यातुन “ख” ची बाराखडी म्हणत होता, त्या बरोबर मी सगळे पेपर गोळा केले आणि हात पय जवळ करुन बसलो. मनात म्हणालो ह्याचं झाला कि परत झोपु. पण साला १२.३० वजत कुणी घसा साफ़ करत का? पाच एक मिनिट मध्ये त्याचं ते खर्ज लावणं संपलं आणि आजोबा दोन सीट च्य मधल्या अंधारात अंतर्धान पावले. मी पुन्हा १८० चा कोन सेट केला आणि शांत झालो. मग पुढची १० १५ मिनिटे उगाच अंगावर पाणी पडल्याच भास होत राहीला. पण झोपे पुढे भास फ़िके पडले, मी पुन्हा झोपी गेलो. ईतक्यात एक आवाज कानावर आला “ पपा मल शु शु आलि” पण मी कही कही डोळेउघडले नाही तसाच पडुन राहीलो. तेवढ्यत त्या बारक्या पोरच्या पप्पांचा रीप्लाय आला "पुढे जाउन कर” तेवढ्य ते पोरग बोललं “ इथे कोन तरी झोपलाय” आणि तेवढ्यात बाहेरच पावसाचे पाणी माझ्या अंगावर उडालं.. त्याबरोबर लाथा झाडत विज पडावि तसा उठुन बसलो. पटापट सगळे पेपर जमा केले. बघतो तर ते पोरगं दोन हात लांब उभं होतां. ७ ८ वर्षाचा असेल जेमतेम. माझी धड्पड ऐकुन माझा पेपर वेटींग सहकारि पण जागा होत म्हणाला, “ काय ओ ,काय झाला?” आता ह्याला काय सांगु कि मला काय झालं? ऊगाच वर बघत म्हणालो कि “पवसाचा पाणी भितुत इला वाटता” इतक्यात वाट मोकळी झालेली बघुन ते पोरगं पण शु शु करायला निघुन गेला.
पोरगं पण सराइत रेल्वे प्रवासी होतं. तो टॉयलेटचं दार वैगरे लावायच्या भानगडित पडला नाही, एक पाय आतमध्ये आणि एक पाय बाहेर ठेवत त्याने हल्ला बोल केला. आणि निघुन गेला. गाडी धडधडत पुढे जात होति. त्या मुलाच्या क्रॉस बॉर्डर फ़ायरींग च्या रागाने टोयलेटचं दार देखील रागाने आपटत राहीलं. शेवटी माझ्या पेपर वेटींग मित्राने मध्यस्थि करुन टॉयलेटचा दरवाजा लॉक केला. आम्ही पुन्हा झोपि जायचा प्रयत्न करु लागलो. ईतक्यात कुणी ४५ ५० वर्षाचा दाक्षिणात्य दानव तोंडात टूथ ब्रश कोंबून वॉश बेसीन कडे उभा राहीला. हातात इप्को ची ट्युब होति. आणि तो एक टक आरशात बघत उभा होता. बरं पटापटा ब्रश कर आणि निघ …. तर … तस हि करत नव्हता… नुसता ब्रश कोंबुन उभा होता. माझ्या पेपर वेटींग मित्राने मला खुणे विचारला कि हा असा काय? मी त्याला त्याच्या हातातल्या इप्को टूथपेस्ट कडे बोट दाखवुन हळुच म्हणालो कि “ ये दात के लिये नही आत के लिये है” त्यावर तो म्हणल “म्हंजे” त्यावर मि म्हणालो “ म्हंजे ह्यो प्रेशर बनयता मेलो” ५ एक मिनिटे तशिच गेली, गाडी बोगद्यात घुसलि होती , कानाच्या पडद्यांवर प्रेशर जाणवत होता, डब्ब्यात थोडासा धुर जाणवला. शेवटी मि दाक्षिणात्य दानवाला म्हणालो “ भाइ थोडा दूर खडे रहो, हमे सोना है” तर भाइ लक्षच देइन, इप्को ची किक लागायला लागलि होती, मि परत तेच बोललो. तेंव्हा त्याने एक फ़ालतुसा लूक देत तोंडातुन ब्रश बाहेर काढला आणि आम्हाला म्हनाला कि “ ये सोनेका झगा हय क्या” आणि परत तोंडात ब्रश कोंबला. बस ना मग …..पेपर वेटींग भाइ तापला ना अन लगेच सुटला त्याच्यावर “ तो क्या ये दात घासने क जगा है क्या?” घडी मे टायम देको कितना बजा है. प्यार से बोला तो समझता नही क्या” “ खुप दादागीरी झालि ह्या मद्राशांची , साला रेल्वे आमची आणि दादागीरी हेंची. एक तर आमका दोनच गाडिये तेच्यात सुदा हे आमच्या उरार बसतले मायझये..ब्ला ब्ला ब्ला"
त्याचा आवेग पाहुन त्याला शांत करायचा मी प्रयत्ना करत होतो. तेवढ्यात त्या मद्राशाने तोंडातुन ब्रश काढला. तो आता काही तरी बोलणार आणि वादावादि होणार, म्हणुन मी पटकन मध्येच बोललो “ भाइ आगे वाले वॉश बेसीन को युज करो” त्या मद्राशाने पण माझ्या पेपर वेटींग मित्र ला तोंडी लावण्या पेक्षा ब्रश तोंडात कोंबणं जास्त पसंद केलं आणि पुढच्या डब्ब्याच्या वॉश रूम कडे निघुन गेला. त्याची पाठ फ़िरल्यावर पेपर वेटींग मित्राची हिम्मत अजुन वाढली, त्याने मद्राशाला मराठीमधुन शिव्या वैगरे द्यायला सुरुवात केली. त्याला कसाबसा सम्जावाला आणि माझ्याकडच्या पेपराच्या दोन तीन पुरवण्या देउन झोपता केला. मग मी पण मग थोडासा कलंडलो.
१ वाजुन गेला होता. गाडी हलत होती. ज़्यावर झोपलो होतो तो सरफ़ेस पाठिला आणि डोक्याला टोचत होता. घरच्य बेड ची खुप खुप आठवण आली. सीट वर झोपलेल्यांचा खुप हेवा वाटत होता. (त्यांच्य सीट चा)दिवस पावसाचे होते म्हणुन फ़ार वर्दळ नव्हती.सुमारे २ च्या आसपास गाडी वीर स्थानकाजवळ क्रॉसींग साठी थांबली. डब्ब्याच्या मार्गीकेमधले लाइट्स सोडले तर बाकी सगळा अन्धार होता. डब्ब्यात तशी थोडी जाग होती. काही लोक जागे होते. काही झोपले होते.
गाडीने १० मिनिटानी हॉर्न दीला आणी किन्चीतशी हलली. तेवढयात पाय सोडुन बसलेली माउली जोरात किन्चाळली. मि धादकन उथुन उभा रहिलो. मी पुढे होउन विचारलं की काय झालं?, तीच्या मंगळ्सुत्राचे थोडे मणी तीच्या ओन्जळीत सांडले होते. थोडे सीटवर आणी थोडे उरलेल्या मंगळ्सुत्राला लटकले होते. पुढे झालेले सगळे समजुन गेले कि काय झालं ते. बाई एकदम घाबरली होती, इतक्यात अर्धा डबा गोळा झाला होत. सगळ्यांनी चौकश्या सुरु केल्या होत्या.एका दोघा दागिन्यानि लगडलेल्या नवविवाहितांच्या नवर्यानी तर लगेच आपापल्या बायकांना स्ट्रोल शालि गुंडाळल्या. ह्या सगळयात माझ्या बसायच्या पेपर चा बाजार उठला होता. विक्टीम माउली ओक्सा बोक्षि रडत होती, लोक तिला शांत करत होते , मग चर्चा सुरु झाल्या, गर्दितले दर्दी जागे झाले, गर्दितला एक जण “ मागे एकदा सायन ला बस मध्ये आमच्या हिची चैन मारलि ना, मला आधिच डौट होता, मि लगेच एकाला धरल आणि म्हनालो गपगुमान चैन काढुन दे, तेनि मगे लगेच कधुन दिली.” इत्यादि…
मी पण मग उभ्या उभ्या चर्चेत सहभागी झालो. सगळे आपापला अनुभव सांगुन विक्टिम माउलीला शांत करु पाहत होते. लोकांनी रेल्वे पोलीसांना शिव्या द्यायला सुरुवात केली होती. विक्टीम माउली पण त्यात सहभागी झाली. दोन चार शीव्यांनंतर तीला देखील थोडं मोकळं वाटलं असेल. गाडी अजुन थांबुनच होती. चर्चा पण हळुहळु तुटक होत गेली. काही लोक मणी शोधायला गुंग होते. एवढ्यात त्या मण्यांचा असली दावेदार तीचा नवरा साईड बर्थ वरुन तिच्यावर डाफ़रला " तुका घराकडेच सांगललय, ही असली सोन्गा घालुन भायर पडा नको, सांगलाला आयकाक नको मगे बस रड्त" एवढयात शेजारच्या मीडल्बर्थ ला बसलेली एक विसेक वर्षाची मुलगी मध्येच बोलली " बाबानु तुमी वगीच आरडा नकात, लोका न्हीजली ह्त घार काय ता? तसा पन ता ब्यांटेक्स चाच होता" ब्यांटेक्स शब्द कानावर पडल्यावर मणी उचलणार्यांबचा उत्साह मण्यांसारखा गळुन पडला. एक जण जमा केलेले मणी विक्टीम माउलीच्या हातात ठेवत म्हणाला की " काकी इतकेच सापडले" बाकीचे मणीरत्नम पण अलगद उठ्ले आणी आपापल्या जागेवर जाउन बसले. सगळे रेल्याक्स...
मी पण खाली बसण्यासाठी वाकलो तर पेपर गलीतगात्र अवस्थेत होते. सगळे तुकडे जमा करुन बसुया म्हटल तर काही तुकडे दरवाज्याच्या फ़टीत अडकले होते. ओढुन काढले अस्ते तर अजुन तुकडे झाले अस्ते. म्हणुन म्हटलं की दरवाजा उघडुन पेपर काढावा. म्हणुन दरवाज्याच्या जवळ गेलो. इतक्या दरवाज्याच्या खीडकीतुन बाहेर एक आक्रुती हलताना दीसली. खरतर मी घाबरलोच, पण डब्यात खुप जण असल्याने भिती जरा कमी झाली , मी थोड सावध झालो. दरवाज्याच्या खीडकीची काच धाडकन खाली केली. मागे वळलो आणी दुसर्या दरवाज्याची काच पण खाली केली. इतक्यात पेपर वेटींगवाल्या मित्राने मला इशार्याानेच विचारलं की काय झालं. त्याला सांगीतला की दरवाज्याच्या बाहेर हँडल ला कुणीतरी लटकलयं. तो पण टेन्शन मध्ये आला. त्याने आणी मी डब्ब्यातल्या अजुन दोघातीघाना सावध केलं. त्या दोघानी अजुन दोघाना. ५ मीनीटाच्या आत सगळ्या काचा धडाधड लावुन घेतल्या. हँडल ला लटकलेली आक्रुती तशीच निपचीत होती, काही हाल्चाल नव्हती, मागच्या १० मिनिटामधले आमच्या सगळ्यांचे संवाद ती आक्रुती ऐकत होती. इनफ़्याक्ट अमच्या हाल्चालि देखील तिला दिसत होत्या.
मी दोघा तिघाना इशारा करुन लोवर बर्थ वर चढुन मार्गीतल्या ट्युबलाईट्स बोटाने फ़िरवुन बंद केल्या. आश्चर्य म्हणजे कुणीही गोन्धळ घालत नवता. अन्धार झाल्यावर डब्याच्या दोन्ही साइडला खीडकीतुन पाहीलं. गोव्या कडच्या डाव्या बाजुला कुणीही नव्हतं पण उजव्या साइडला मात्र १५ ते २० लोक होते. डब्यातल्या लायटी बन्द केल्यावर ट्र्याक वर ट्रेन च्या बाजुने चीटकुन असलेली १५ २० डोकी स्पष्ट दिसत होती. आमच्या पैकी ५ ७ जणांनी आकडा नक्की केला. एक जण बोलला की पोलिसांना कळवुया. दुसरा बोलला की गार्ड ला कळवु. सगळे काही न काही सागंत होते, सुचवत होते. पण करत काहीच नव्हते. मी म्हणालो की पोलिसाना डायल करा. तितक्यात विक्टीम माउली बोलल्या " साकळी वडा" मी म्हटलो" माजे आवशी गाडी हुभीच आसा, साकळी कित्याक वडतय" ती पण शांत झाली. इतक्यात एमर्जंसी विंडो कडे बसलेली एक आजी जोरात कीन्चाळली. असली भारी किन्चाळली ना , एकदम जोरदार. कोकणात ह्या असल्या कीन्चाळण्याला "आरड पाडली " असं पण म्हणतात. थोडक्यात त्या एमर्जंसी वींडो वाल्या काकी ने बाहेरची हालचाल बघितली असणार. बाहेरच्या १५ २० डोक्याना कळालं की आपल्याला पाहीलं दोघे तीघे काळोखातुन ट्र्याक शेजारच्या गवतात घुसले. ते बघुन डब्ब्यतल्या २ ३ काचा वर झाल्या. चोर चोर म्हणुन अजुन दोघे ओरड्ले. त्यांचा आवज ऐकुन ज्या झोप्लेल्या स्त्रीव्रुंदाला ह्याची काहीच कल्पना नव्हती त्या सुधा ओरडायला लागल्या. इतक्यात गाडी चालु झाली.चिपळुन ला क्रॉसींगला थांबेस्तोवर सगळे धास्तावलेले होतो. बरेच लोक प्लाट्फ़ॉर्म वर उतरुन रेल्वे पोलिसाना शोधत होते. ह्या दरम्यान मी एक पुठ्ठा मिळवला बसायला कम झोपायला. आणी गाडी चालु झाल्यावर झोपी गेलो.
सकाळी जाग आली तेंव्हा गाडी नांदगाव ला सायडींग ला उभी होती. ऊठुन फ़्रेश झालो. विक्टिम माउली आणि तिची फ़्यामिली झोपेतच होती. साईड अपर बर्थ वरच्या माउलीच्या पतिदेवांना कणकवली येतेय असं सांगुन उठवलं. झोपायला घेतलेल्या पेपर आणी पुठ्ठ्याची मोळी केली आणि डस्ट्बिन मध्ये नेउन कोंबलि आणि कणकवली स्टेशन ला उतरलो.
शुध्दलेखनाच्या चुका दुर्लक्षीत कराव्या ही विनंती.
समाप्त.
प्रतिक्रिया
2 Jun 2017 - 7:36 pm | आदूबाळ
मस्त लिहिलंय. लिहित रहा रघुनाथभाऊ!
2 Jun 2017 - 8:42 pm | माम्लेदारचा पन्खा
तर ते जिव्हाळ्याचे विषय आहेत . . . . त्यांचं सगळं वेगळंच असतं . . . छान लिहिलं आहे . . . . अजून अनुभव येऊ द्या !
2 Jun 2017 - 9:23 pm | सतिश गावडे
मी तीन वर्षे "दिवा -सावंतवाडी" आणि "रत्नागिरी - दादर" या गाड्यांनी जवळपास प्रत्येक शनिवार रविवार असा दिव्य प्रवास केला होता त्याची आठवण झाली.
मी ही पेपर टाकून पाय दाराच्या पायऱ्यावर टाकून दारातच बसत असे. गाडीने सव्वा सहाला दिवा सोडला की पनवेल येईपर्यंत सकाळची विलोभनीय लोटादृष्ये दिसत असंत. :))
3 Jun 2017 - 6:08 pm | गामा पैलवान
पौष्टिक वास पण मारायचा का संगे? धारावीत मंगलप्रभातसमयी गाडी सिग्नलला उभी राहते तेव्हा मारतो तसा.
-गा.पै.
2 Jun 2017 - 9:39 pm | संजय क्षीरसागर
तुमच्यासारखे पॉजिटीव विचारसरणीचे आणि विनोदाचं अंग असलेले लोक पाहिले की आनंद होतो.
लगे रहो !
2 Jun 2017 - 9:47 pm | स्पा
बर्याच दिवसांनी मिपावर काहितरी खुसखुशित वाचायला मिळाली
2 Jun 2017 - 9:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी लिहिलंय ! =))
विक्टिम माउली
हा शब्दप्रयोग शब्दकोषाने दखल होण्याइतका मस्तं आहे ! :)अजून वाचायला आवडेल.
2 Jun 2017 - 10:12 pm | एस
हाहाहाहा! लैच भारी!
2 Jun 2017 - 10:20 pm | चांदणे संदीप
...आय हेट रेल्वेचा परवास! पण तुमी लिहिलावं लै झ्याक!
Sandy
2 Jun 2017 - 10:47 pm | रातराणी
मणीरत्नम =))
3 Jun 2017 - 9:50 am | लोनली प्लॅनेट
मस्त लिहिलंय..हसून हसून बेजार झालो
धन्यवाद
ए सी ने प्रवास करून सुद्धा कधी एकदा गाडीतून उतरतो असं वाटायला लावणारे माझे काही अनुभव आहेत
3 Jun 2017 - 12:07 pm | किसन शिंदे
ह्ही ह्ही ह्ही
झक्कास लिहीलंय. रेल्वेचा प्रवास आणि त्यातून कोकण रेल्वेचा असेल तर मग पाहायला नको. :)
3 Jun 2017 - 5:49 pm | भम्पक
ब्यांटेक्स शब्द कानावर पडल्यावर मणी उचलणार्यांबचा उत्साह मण्यांसारखा गळुन पडला. एक जण जमा केलेले मणी विक्टीम माउलीच्या हातात ठेवत म्हणाला की " काकी इतकेच सापडले" बाकीचे मणीरत्नम पण
3 Jun 2017 - 6:44 pm | सानझरी
भारी लिहीलंय.. =))
3 Jun 2017 - 7:08 pm | पद्मावति
मस्तच =))
3 Jun 2017 - 7:14 pm | उपेक्षित
मस्त निखळ विनोदी लेखन
4 Jun 2017 - 8:17 am | उगा काहितरीच
रविवार सकाळ सार्थकी लागली . लै भारी लिहीलंय साहेब.
4 Jun 2017 - 8:50 am | नूतन सावंत
ओ, तुमी होतात खडे. लय भारी लिवलास.अजून येवंदे.मजा आली तुमचो अनुभव वाचान.
6 Jun 2017 - 10:53 am | रघुनाथ.केरकर
आधी काजीत होतय, मगे सुरंगी बुडी. सध्या भीरंडीर आसय.
पावसान सगळ्या रतांब्याचो नाश झालो.
माजे एडे वाकडे बोल गोड मानुन कवतीक केल्याबद्दल खुप धन्यवाद.
कामाच्या निमतान चार गाव फिरणा होता, नये लोक गावतत, दोन नये गोष्टी कानार पडतत.
बाकी ह्या असला काय लिवची प्रेरणा मात्र ह्याच मंचाची गेली पाच स वर्षा मिसळपाव वाचतय. तेच्यात्सुनच ह्या असला बारीक सारीक लिवची हिम्मत झाली.
असोच लक्ष ठेया आमच्यार.
4 Jun 2017 - 9:35 pm | पैसा
कहर लिहिलंय! =))
5 Jun 2017 - 12:30 pm | रघुनाथ.केरकर
सगळ्यांचे धन्यवाद,
माझ्यासारख्या नवख्याला प्रोत्साहन दील्याबद्द्ल.
केरकर
5 Jun 2017 - 12:54 pm | बापू नारू
मजा अली, भारी आहे प्रवास वर्णन
5 Jun 2017 - 7:35 pm | सूड
भारीच, आणखी लिहीत राहा.
27 Jun 2017 - 3:58 pm | धर्मराजमुटके
भारीच, आणखी लिहीत राहा.
27 Jun 2017 - 4:56 pm | स्वराजित
मस्तच लेख