बायपास...
खुप मजा यायाची गावांत. पूर्वी एवढा पैसा कधीच दिसायचाच नाही. व्यवहार ज्वारी, बाजरी आणि गहु यांवर चालायचे. आठाभर बाजारी घातली कि हप्ताभरच्या चहाची सोय व्हायची. लोकं कष्टाळु होती तशीच प्रेमळ ही खुप होती. कुना एकाच्या दुःखावर अख्खी गल्लीच काय तर गांव गोळा व्हायचा. हाड़ाचं वैर असलं तरि दवाखाना म्हटलं कि उतरंडीत ठेवालेले पै पैसे निघायचे. अडल्या बाळंतनीला तालुक्याला नेयाला निम्म्यारातिला गाड्या जूपायच्या.