जे दिसतं, खरं असतं
ते पटत नाही.
जे अस्तित्वात नसतं
नुसतं भासतं
त्याच्यासाठी तंडायचं.
इतिहासातल्या कथेपायी
एक मेकायला तोडायचं.
भाकर दुसरेच भाजतात
आपण पेटुन राख व्हायचं.
कोपर्यातल्या म्हतारीला कधी उठून तांब्याभर पानी
नाही द्यायचं
अण् झेंडे घेऊन रानोरानभटकायचं.
'तो' सर्वत्र आहे म्हणायचं
वरतुन दगडापुढं रात्रंदिस रांग धरायचं.
'त्याला' ही हे पटत नसल
पोट धरून 'तो' ही हसत असल.
उपासातापासाने 'तेव' पावला असता
तर रसत्यावरचा भिकारी रास्त्यात मावला नसता.
आपण रक्ता-घामाच्ं टाकून पेटी भरतो
आणि पुजारी गाड्यात फिरतो
प्रतिक्रिया
22 Oct 2015 - 9:20 am | चांदणे संदीप
पहिल्या ९ ओळींपर्यंत एका लयीत चालली आहे कविता! पुढे जरा अडखळलीये.
ठीक प्रयत्न! अजून चांगल लिहू शकता.
पुलेशु!
28 Oct 2015 - 9:30 pm | आनंद कांबीकर
धन्यवाद. करू प्रयत्न.