पुन्हा
कालचक्र उलटे फिरले अन्
पुन्हा जन्मलो
जुन्या चुका विसरून नव्याने
करून बसलो
काचपात्र भंगले तरीही
जोडत बसलो
मुखवट्यांस समजलो चेहरे
तिथेच फसलो
अढळपदी उल्का बघताना
जरी कोसळलो
डोळे कितिदा आले भरूनी
तरीही हसलो
बेचिराख होता होता मग
पुनश्च रुजलो


