श्रावण
काळ्याशार पाटीवर
पांढरी शुभ्र रेघ
ग्रीष्माच्या पाठीवर
काळे काळे मेघ
खरपुस ताबुंस मातीवर
हिरवी चंद्रकळा
प्राजक्ताच्या झाडाखाली
मोतीयाचा सडा
सुखावली धरती
सुखावली मने
इवल्या इवल्या रोपानी
डुलती हिरवी राने
चिंब झाले मन
रुंजी घालतो साजण
उभा भाऊ दारी म्हणे
आला पंचमीचा सण
मन पाखरू पाखरू
पोचले आईच्या पायाशी
डोळ्यात श्रावण भरून
उभा साजण दाराशी
२९-७-२०२२