शिनेमाचं कोर्ट
शिनेमाचं कोर्ट.
भुतकाळात म्हणजेच माझ्या बालपणी
'ब्रम्ह सत्यं जगन्मिथ्या 'च्याचालीवर,'शिनेमा सत्यं जगन्मिथ्या'; अर्थात : आजूबाजूला जे दिसतंय ते खोटं असू शकेल पण शिनेमात दाखवतात ते सत्य असते, अशी धारणा असण्याच्या वयात,शिनेमातली कोर्टं,
शिनेमातल्या कोर्टात चालणारे खटले,शिनेमातल्या कोर्टातले व
कोर्टाबाहेर,म्हणजे घर,क्लब इ.ठिकाणी असणारे जज्जसाहेब,
सरकारीवकील,बिनसरकारी,म्हणजे साधेवकील,साधेपोलीस,
साहेबपोलीस,खरे साक्षीदार,खोटे साक्षीदार,सज्जनआरोपी,बदमाशआरोपी,
हे सगळेच 'लयी भारी'या कॅटॅगिरीत मोडणारे असायचे !