लक्ष्मणपूर, एक पडाव.........४

Primary tabs

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
13 Jan 2022 - 3:17 pm

https://www.misalpav.com/node/49710 लक्ष्मणपूर १
https://www.misalpav.com/node/49726/backlinks लक्ष्मणपूर २
https://www.misalpav.com/node/49748/backlinks लक्ष्मणपूर ३

Laxman Tila लक्ष्मन टीला

ताजमहाल सारख्या काही नशीबवान सरकारी मर्जीतल्या तर काही वेरूळ,उनाकोटी सारख्या सशक्त,आत्मनिर्भर बाकी जुन्या इमारती,ढासळलेल्या भितीं,गडकोट कधी चिरेबंदी,गजबजलेल्या वैभवशाली,श्रीमंत आणी सामर्थ्यवान.आता आगांवर वाढलेलं जंगल,कबूतर,वटवाघळे,जाळी जळमटं वागवत या सर्व इतीहासाच्या पाऊलखुणा,काही पुसटत्या तर काही निसटत्या,अबोल गत आठवणीनां जपत कशाबश्या तग धरून उभ्या, बिचाऱ्या जास्त काही सांगू शकत नाही.

वर्तमानात राहून भटकंती करताना त्यावेळचे सौंदर्य, कला, संस्कृती,घटना इ. बद्दलचा आढावा ,आस्वाद घेण्यासाठी इतीहासाचा संदर्भ अनिवार्य. स्थानिक वाटाडे, संग्रहालये काही प्रमाणात मदत करतात.आजकाल आतंरजालावर सुद्धा भरपूर माहिती उपलब्ध आहे. ही सोय सत्तर ऐशीच्या दशकात नव्हती.जेव्हा शहरातल्या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली तेंव्हा विचाराचं मोहळ उठलं आणी उत्सुकता वाढली.काय,कधी, कसे अनेक प्रश्न, विशेषतः लखनौ मधील रेजिडेन्सीला भेट दिल्यानंतर जास्तच , मग उत्तरासाठी पुस्तकां कडे वळालो.ब्रिटिश अधिकाऱ्यांनी यात मोलाची कामगिरी करून ठेवली आहे. खालील सर्व पुस्तके एकोणिसाव्या शतकाच्या आगोदरची तर Sir Edward H Hilton (Senior Student of LA Martineer Collage),लेखकाने प्रत्यक्ष १८५७ च्या सैनीक विद्रोहा मधे स्वताः भाग घेतला होता त्याचे प्रत्यक्षदर्शी वर्णन तर मौलाना अब्दुल हलीम हे शेवटचे नबाब वाजीद अली शाह यांच्या जवळचे व काळातले. यांच्या व्यतिरिक्त इतर अन्य कोण लखनऊ बद्दल अधिकारीक माहिती देऊ शकतील!
मेजर जनरल अलेक्झांडर कनिंगहाम, ब्रिटिश इंजिनियर ,भारतीय पुरातत्त्व आणी इतिहासाचे अभ्यासक, भारतीय पुरातत्व विभागाचे ( ASI ) संस्थापक व प्रथम प्रमुख सर्वेक्षण अधिकारी म्हणून १८६१ मधे ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी एक नवीन आध्याय सुरू केला.विस्तृत माहिती बद्दल संदर्भ पुस्तकांचे लेखक व आतंरजालाचे आभार.

1- The Lucknow Album by Darogha Ubbas Ali , published in 1874.
2- The Tourist guide to Lucknow by Edward H Hilton, published in 1899.
3- A short history of Lucknow by Major A T Anderson, Royal Field Artilary, published in 1913.
4- Lucknow,The Capital of Oudh by Lt Col H A Newell (writer of Topee and Turbon).
5- The Defense of Lucknow by Lord Alfred Tennyson , 1874 (संभवताः).
6- "गुजश्त: लखनौ", मौलाना अब्दुल हलीम" शरर "यांनी लिहीलेल्या उर्दू पुस्तकाचा , "पुराना लखनौ",श्री नंदकुमार अवस्थी यांनी हिन्दीत केलेला अनुवाद. आणी आशी अनेक.......

थोडे विषयांतर अटळच नाही का? मागील धाग्यावर नमूद केल्याप्रमाणे जरा इकडे तिकडे वळून पाहिलं तर केवढा मोठ्ठा इतीहास नजरे समोर येतो.आता आपण हजरतगंज चौका मधे उभे आहेत. पुढे जाण्याच्या आगोदर जरा उजवीकडे बघा.महात्मा गांधीचा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्याच नावाने ओळखला जाणारा रस्ता, सरळ छावणी कडे जातो.चला पुन्हा एकदा छावणी कडे जाऊ.छावणीतून बाहेर पडताना डाव्या बाजूला "पोलो ग्राऊंड",आणी तोच रस्ता पुढे "सदर बझार,केसरबाग,अमीनाबाद" कडे जातो. छावणीच्या काठावर "मोहंमदबाग क्लब",थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे लखनौ-सुलतानपूर-वाराणसी रोड आपल्याला दिलकुशा कोठी कडे घेऊन जातो.रेल्वे क्राँसिग पार केले की "राजभवन (कोठी हयात बक्ष ) पुढे "ला मार्टिनियर काँलेज (Constantia) आणी जनरल पोस्ट आँफिस (रिग थिएटर)", लो आ गये लौट के हजरतगंज चौराहे पे. या सर्व ऐतिहासिक, वास्तू आपला वैभवशाली इतिहास सागंण्यास सदैव उत्सुक आहेत
.मोहम्मदबाग क्लब बद्दल आपण मागच्या भागात आढावा घेतलाय

Mohammadbag Club मोहम्मद् बाग क्लब

शहराच्या विकासात केलेल्या उल्लेखनीय योगदानमुळे स्वताःचे इतीहासात विशेष स्थान निर्माण केलेल्या व्यक्तीचा नामनिर्देश केल्या शिवाय पुढे जाणे अनुचित ठरेल. ज्यांचा उल्लेख अनिवार्य आहे असे मेजर जनरल क्लाउडे मार्टिन,फ्रेंच सोल्जर व प्रख्यात वास्तुविद,कंपनी सरकारच्या बंगाल आर्मी मधे मेजर जनरलच्या हुद्यापर्यंत स्वकष्टाने पोहचले.पुढे नबाब असफ औद ला च्या शस्त्रागाराचा पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती स्विकारली व शेवटपर्यंत, सन १८०० पर्यंत लखनऊ मधेच राहीले.फराद बक्ष की कोठी, बिबीपुर कोठी,राजभवन (कोठी हयात बक्ष) आणी ला मार्टिनियर काँलेज या सर्व इमारती जनरल मार्टिनने वेगवेगळ्या नबाबांकरता रेखाटल्या.आपल्या इच्छापत्रात आपली आपार संपत्ती (४,००,०००/- रुपये, ४००० पुस्तके व ६५० पेन्टिग्ज) शिक्षणसंस्थां करता दान दिली.आपल्या कारकिर्दीत त्यांनी दोन शिक्षणसंस्था लखनौमध्ये, दोन कलकत्यामधे व सहा फ्रान्सच्या जन्मगावी सुरू केल्या. ला मार्टिनियर काँलेज एक प्रथितयश शिक्षणसंस्था आहे.लखनौ गोल्फ क्लब जवळच मार्टिन पुरवा नावाचा कस्बा,तीथे जन. मार्टिन यांचा नोकरवर्ग रहायचा. मृत्यू नंतर त्यांना याच ठिकाणी दफन केले.

सुलतानपूर रोडवर गोमती किनारी दिलकुशा कोठीच्या जवळ, "बिबीपुर कोठी", दोन मजली इमारत मेजर जनरल क्लाउडे मार्टिनने नबाब असफौद्औला करता सन सतराशेच्या शेवटच्या दशकात बांधली होती. नवीन ब्रिटिश रेसीडेन्टचे हे तात्पुरते सरकारी आवास. इथेच प्रथम त्याचे स्वागत केले जात असे. नंतर नबाब स्वताः मोठ्या बॅन्ड बाज्या बरात (Fan fare) घेऊन रेसिडेन्टला हत्तीवरून शहरात मिरवत आसे. नंतर इथे सैन्याकरता दुध डेअरी (Military Farm) बनवली. ड्युटी आँफिसर आसताना इथे दुध, लोणी, साफसफाई वगैरे चेक करण्यासाठी भेट द्यावी लागत असे.

"दिलकुशा कोठी", (Heart's Delight) नबाब सादत अली खान याने शिकारी नंतर मनोरंजन व आराम करण्यासाठी लखनौच्या सीमेवर आसलेल्या जगंलात बांधली होती. १८५७ मधे स्वातंत्र्य सैनिकांनी इथेच साहेबाला धूळ चारली, फिरंग्याचां सर्वात मोठा अधिकारी सर हेनरी हँवलाँक याला कंठस्नान घातले.सर कोलीन कँम्पबेल यांनी पुन्हा एकदा या जागेवर कब्जा केला. जवळच इग्रंज अधिकारी,सैनिकांची थडगी आहेत. जनरल हँवलाँक यांचे थडगे मात्र आलमबाग मधे त्यांच्या नातेवाइकांनी बांधले. पुढे ही कोठी मोहम्मदबाग छावणीच्या कमांडर जनरलचे आवास बनली पण पुढे धोकादायक झाल्यामुळे सोडून दिली.आता फक्त अवशेष उरले आहेत. सध्या आवती भवती छान बाग आहे, इथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होते. बनारस घराण्यातील प्रसिद्ध ठुमरी गायीका,तीनवेळा पद्म पुरस्काराने सन्मानित पंडिता गिरीजादेवी यांचे ठुमरी गायन याच बागेत ऐकण्याचे भाग्य लाभले.

Dilkusha Kothi Old. दिल्कुशा जुने Dilkusha Kothi Present आतचे दिल्कुशा बाग

Gen Havlock's Tomb जेनरल हव्लोच्क्स टोम्ब Alam Bagh आलम बाग

दोनशे वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेली "कोठी हयात बक्ष"( राजभवन) ही इमारत नबाब सादत अली खानने (१७९८-१८१४) बनवली व मेजर जनरल मार्टिन यानी याची रूपरेखा आख़ली. हयात बक्ष म्हणजे जीवन दायीनी. दोन मजली शानदार इमारत पुर्णपणे हिरवळीने नटलेली निसर्गाच्या सानिध्यात असलेली, ब्रिटिश कमिशनर चे अधिकृत आवास. हवादार, चारी बाजूंनी ऊंच छत आणी बरामदे, आतमधे राज दरबार हॉल साधीच पण भव्य वाटणारी वास्तू. सुरूवातीला कर्नल राँबर्ट हे रहात होते तर जेव्हां अवध पुर्णपणे साहेबांनी आपल्या अंमला खाली आणले तेव्हा मेंजर बँक ,कमिशनर, यांना दिली तेव्हां कोठी" बँक हाऊस", या नावाने तर पश्चिमी दरवाजा कडून केसरबाग कडे जाणारा रोड बँक रोड म्हणून ओळखला जात असे. स्वातंत्र्य लढ्यात कोठी १८ -३-१८५८ पर्यत स्वातंत्र्य सैनिकांच्या ताब्यात होती. प्रसिद्ध सेनानी मेजर हडसन,( Major William Stephen Raises Hodson -British leader of irregular light cavalry known as Hadson's Horse ) जखमी झाल्यावर इथेच ख्रिस्तवासी झाला. त्याचे थडगे ला मार्टिनियर्स कॉलेजच्या बागेत आहे. नंतर कर्नल कूपर,अवधचे कमिशनर यांचे अधिकृत भवन झाले. स्वातंत्र्योतर काळातही ही कोठी राजभवन, राज्यपालांचे अधिकृत आवास म्हणूनच राहीले. सरोजनी नायडू प्रथम राज्यपाल, उत्तर प्रदेश, यांनी आपला आखेरचा श्वास इथेच सोडला. हे भवन आम जनतेसाठी बघण्यासाठी ठराविक वेळेत उघडे आसते. विशेषतः वसंत ऋतूत येथील फुलांची बाग व फळ भाज्यांची प्रदर्शन बघण्यासारखे आसते.

Kothi Hayat Baksh राजभवन्/हयात बक्श कोठी

ला मार्टिनियर काँलेज (Constantia) जनरल मार्टिन ने स्वता करता इमारत बनवत असताना ती तत्कालीन नबाबास आवडली व त्याने मुहँ मांगी किम्मत देण्याची तयारी दर्शवली पण नबाबाचा मृत्यूमुळे सौदा पुर्ण झाला नाही. एवढेच वर्णन त्या वास्तूबद्दल सर्व काही सांगून जाते. जनरल चा मृत्यू नंतर ही इमारत त्यांनी बनवलेल्या आराखड्या प्रमाणेच बनली व त्यांच्याच इच्छा पत्राप्रमाणे शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात आली. मार्टिनियर्स १३ सप्टेंबरला (जनरलचा मृत्युदिन) फाऊंडेशन डे साजरा करतात. या काँलेज मधील विद्यार्थी आणि स्टाफने रेजिडेन्सी मधल्या लढाईत साहेबांना मदत केली त्या करता त्यांना मेडल देखील देण्यात आले. मेडिकल प्रवेश परीक्षेचे एक केन्द्र असल्यामुळे बरेचवेळा हे काँलेज आतमधून बघण्याची संधी मिळाली.

La Martineer Collage ला मार्टिनियर काँलेज    टावर          ़जनरल मार्टिन
महात्मा गांधी रोड वर जनरल पोस्ट आँफिस (रिगं थिएटर)ची इमारत अतिशय सुरेख "गोथिक" स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. संपूर्ण इमारत लाखेरी विंटाचे बांधकाम( अतिशय मजबूत, पक्की भाजलेली विट बंदुकीच्या गोळ्यानाही न जुमानणारी) , लोखंडाचा अजिबात उपयोग केला नाही. ऊंच ऊंच टोकदार कमानी व चर्च सारखा मोठा आयताकृती हॉल,चारही बाजूंनी उंच गॅलरी व जोडून मोठ्या खोल्या.उचंच उंच छताला मध्यवर्ती कुठलाही आथार नाही हे विशेष. मोठे शिसवी लाकडी दरवाजे.उन्हाळ्यात
बाहेर कितीही गर्मी असो पण आत मात्र महाबळेश्वर.जवळपास अदांजे पाच सहा हजार लोक मावतील एवढा मोठा हाँल. समोर उंच क्लॉक टॉवर, २००३ मधे लखनौ सोडले तेव्हा पर्यंत घड्याळ चालू होते. ब्रिटिश काळात हे " रिंग थिएटर ", होते. इंग्रजी सिनेमे व नाटक प्रदर्शित होत, साहेबांचे मनोरंजनाचे ठिकाण.आसे म्हणतात की "नेटिव्ह" ,देशी लोकांना इथे प्रवेश दिला जात नसे मग तो कोणीही आसो.

GPO जनरल पोस्ट ओफीस    रिंग थिएटर

  मध्यवर्ती हाँल
8 down सहारानपुर लखनौ ट्रेनने भारतीय जनतेचे पैसे इग्रंजाच्या तिजोरीत भरण्यासाठी ९-८-१९२५ ला नेत असताना काकोरी या जवळच्या छोट्या स्टेशन वर फक्त याच पैशांची लुट करण्यात आली होती
पुढे १९२६-२७ मधे रिंग थिएटरचे रुपांतर कोर्टात झाले आणी काकोरी कांडातल्या क्रांतिकारी देशभक्तांवर खटला चालवला गेला. रामप्रसाद ‘बिस्मिल’, राजेंद्रनाथ लाहिड़ी, रोशन सिंह आणी अशफाक उल्ला खां यांना फांशी तर बाकीच्या साथीदारांना कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
कालांतराने जनरल पोस्ट ऑफिस या जागेत स्थलांतरित झाले .

हजरतगंज म्हणजे जुन्यानव्याचा संगम, नेहमीच महत्वाचे ठिकाण राहिले आहे.या चौका मधे चार राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना भेटतात. "हजरतगंज", गोमतीच्या किनारी, १८२७ साली नबाब नसिरुदीन हैदर याने वसवले. चिन, जपान, बेल्जियम या देशातील दागिने व इतर वस्तूंची बाजारपेठ होती. सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर फिरंग्यानीं मोगली वास्तू पाडून पाश्चिमात्य बांधणीच्या इमारती बांधल्या. (To create resemblance to London's Queen Street).डावीकडे वळून बघताना प्रकर्षाने जाणवते.
कोपर्‍यावरच मारूती मंदिर पाठिमागे कोतवाली (पोलिस ठाणे ).मारुतीचे दर्शन हा दर शनीवारचा नेम.तसं उत्तर भारतात मंगळवार हा मारुतीचा वार मानतात. सन ८६ मधे सव्वा रुपयाचा प्रसाद मीळायचा. नेहमी एकाच दुकानदारा कडून घ्यायचो ओळख वाढली एखादा शनीवार खाडा झाला की विचारपूस करायचा.आई किंवा पाहुणे आले तरी आपुलकीनं विचारणा व्हायची. पुन्हा एकदा बदली झाली, पण इतक्या वर्षानंतरही प्रसादाचा सव्वा रुपायाच घेत जुने नाते नवीन केले. आशा आनेक आठवणी. दमला असाल, आज इथेच थांबूया

इतिहासमुक्तकनोकरीप्रकटनलेखअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

13 Jan 2022 - 3:45 pm | मुक्त विहारि

पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत

विजुभाऊ's picture

13 Jan 2022 - 5:01 pm | विजुभाऊ

मस्त सफर चालू आहे कर्नल साहेब

कुमार१'s picture

13 Jan 2022 - 6:39 pm | कुमार१

लेख व फोटो दोन्ही छानच

किती ऐतिहासिक वास्तू एकवटल्या आहेत एकाच शहरात.
मस्त सफर सुरू आहे कर्नलसाहेब.

कर्नलतपस्वी's picture

15 Jan 2022 - 2:48 pm | कर्नलतपस्वी

धन्यवाद प्रचेतसजी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jan 2022 - 12:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

पन वाचता वाचता अचानक हा भाग संपला,
पुभाप्र
पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

15 Jan 2022 - 2:49 pm | कर्नलतपस्वी

प्रत्येक वाचकाचे धन्यवाद.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

17 Jan 2022 - 12:30 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान. हा भागही आवडला.